इडियाप्पम (स्ट्रींग हॉपर्स) आणी गाजर रस्सम

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
22 Feb 2013 - 9:48 pm

साहित्य गाजर रस्समः

१/२ वाटी तूरीची डाळ स्वच्छ धुवून २०-२५ मिनिटे भिजवलेली
१ टोमॅटो बारीक चिरून घेतलेला
१ मोठं गाजर किंवा २ छोटी गाजरं किसून
दीड टेस्पून रस्सम मसाला ( तुम्ही रेडीमेड आणू शकता किंवा मी घरी बनवलेल्या रस्सम मसाल्याची पाकृ खाली दिली आहे)
१-१/२ टीस्पून चिंचेचा कोळ
१/२ टीस्पून हळद
१/४ टीस्पून साखर (ऐच्छिक)
१/४ टीस्पून हींग
१ टीस्पून मोहरी
५-६ कढीपत्ता
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर

.

रस्सम मसाला: १ -१/२ टेस्पून अख्खे धणे, २ टेस्पून तूरीची डाळ, २ टेस्पून चण्याची डाळ, १ टीस्पून अख्खी काळी मिरी, १ टीस्पून जीरे, ४-५ लाल सुक्या मिरच्या, १/२ टीस्पून मेथीदाणे. सर्व साहित्य एक एक करुन तव्यावर कोरडेच भाजून घ्यायचे. पुर्ण गार झाले की मिक्सरमध्ये एकत्र वाटून बारीक पूड करुन घ्यावी. साधारण अर्धी वाटी रस्सम मसाला तयार होतो.

पाकृ:

भिजवलेली तूरीची डाळ, टोमॅटो, हळद व थोडे हींग एकत्र करुन घ्यावे. त्यात नेहमीपेक्षा जास्त पाणी घालून कुकरला डाळ शिजवून घ्यावी.
शिजवलेली डाळ-टोमॅटो चांगले घोटून घ्यावे व गाळणीतून गाळून डाळीचे पाणी काढून घ्यावे.
डाळीचे पाणी एका पातेल्या उकळायला ठेवावे.
त्यात किसलेले गाजर, साखर व रस्सम मसाला घालून उकळावे.

.

आता त्यात चिंचेचा कोळ व चवीप्रमाणे मीठ घालून, झाकून उकळू द्यावे.
वरुन कोथींबीर घालावी व गॅस बंद करावा.

.

बुट्टीत तेल गरम करुन मोहरी, हींग व कढीपत्त्याची फोडणी करावी.
ही फोडणी तयार रस्समवर ओतावी व झाकून १० मिनिटे तसेच ठेवावे.

.

साहित्य इडियाप्पमः

२ वाट्या तांदळाची पीठी
२ वाट्या पाणी
१ टेस्पून तेल
चिमूटभर मीठ

.

पाकृ:

पातेल्यात पाणी, मीठ व तेल एकत्र करुन उकळी आणावी.
उकळी आली की त्यात तांदळाची पीठी घालून चांगले ढवळावे.
गॅस बंद करुन , झाकून तसेच १५ मिनिटे ठेवावे.
उकड हलकी गरम असतानाच ताटात किंवा परातीत काढावी व तेल-पाण्याच्या हाताने चांगली मळून घ्यावी.
चांगली मळून त्याचे उंडे तयार करुन घ्यावे.
इडलीपात्राला व सोर्‍याला (चकलीचा साचा) तेलाचा हात फिरवून घ्यावा.
सोर्‍यात बारीक भोकांची जाळी लावून घ्यावी.
तयार उंडा त्यात घालून, इडलीपात्राच्या प्रत्येक गोलात, गोलाकार शेवया पाडून घ्याव्या.

.

इडली स्टँड इडलीच्या कुकरमध्ये किंवा प्रेशर कुकरमध्ये ठेवून १५-२० मिनिटे वाफवून घ्या. (प्रेशर कुकर वापरणार असाल तर शिट्टी लावायची नाही)
वाफवलेले इडियाप्पम ५ मिनिटे गार होऊ द्या,
हलक्या हाताने सर्व्हींग प्लेट्मध्ये काढून घ्या व गाजर रस्समबरोबर सर्व्ह करा.

.

नोटः

इडीयाप्पम तुम्ही सांबार, नारळाची चटणी, एग करी किंवा व्हेज स्ट्यु बरोबर ही सर्व्ह करु शकता.
आवडत असल्यास इडलीपात्राच्या प्रत्येक गोलात थोडा ओला नारळ घाला व त्यावर शेवया पाडून घ्या.
अशा पद्धतीने तुम्ही नाचणीच्या पिठाचे ही इडीयाप्पम बनवू शकता.

प्रतिक्रिया

हे नारळाच्या दुधात अगदीच झकास लागतात.

पैसा's picture

22 Feb 2013 - 10:15 pm | पैसा

जरा आधी का नाही टाकलीस पाकृ? मी आताच उकडीच्या भाकर्‍या करून खाल्ल्यात!

बॅटमॅन's picture

22 Feb 2013 - 10:18 pm | बॅटमॅन

मायला, सानिकातैंच्या घरच्यांची काय चंगळ असेल नै???? रोजच चैन. शिकरण अन मटार उसळ पण इतक्या पद्धतीने बनवत असतील काय माहिती =)) फटू बगूनच खपल्या गेलो आहे हेवेसांनल.

प्रचेतस's picture

22 Feb 2013 - 10:30 pm | प्रचेतस

काय फोटू आलेत राव.

चिंतामणी's picture

22 Feb 2013 - 11:03 pm | चिंतामणी

त्या भाग्यवान माणसाला (म्हणजे कोण हे सांगायची गरज नसवी) भेटव.

त्याचा मला हेवा वाटतो.

एकदम बाडीस.

देव्हार्‍यात जशी अन्नपूर्णा देवी असते तशी मिपावर सानिका आहे.
फोटू आणि पाकृ फारच आवडले.

चिंतामणी's picture

22 Feb 2013 - 11:00 pm | चिंतामणी

काय छान उपमा दिली आहेस.

सुरेख पाकृ.

नेहमीप्रमाणे.

मुक्त विहारि's picture

22 Feb 2013 - 10:48 pm | मुक्त विहारि

तुमच्या पाक-क्रुती वाचणे आणि बघणे बंद केले आहे...

किलमाऊस्की's picture

22 Feb 2013 - 11:01 pm | किलमाऊस्की

वर म्हट्ल्याप्रमाणे कोकणात नारळाचं दुध घालून खातात. हा प्रकार पण करून पाहीन.
आम्ही हे असं करतो. याला शिरवळे म्हणतात.

https://lh5.googleusercontent.com/-jtcfCTZlAJE/USerHu-LtqI/AAAAAAAAA3s/uWlumW2fAF0/w756-h764-p-o-k/385439_322351141116014_1244383245_n.jpg

चिंतामणी's picture

22 Feb 2013 - 11:06 pm | चिंतामणी

जेवण झाल्यावर किती अत्याचार होत आहेत.

सूड's picture

22 Feb 2013 - 11:23 pm | सूड

शिरवाळी करताना उकडीचे मुटके उकळत्या पाण्यात सोडतात आणि उकळत असताना एकदा पाण्यावर तरंगायला लागले की शिजले असं समजायचं. मग सोर्‍यात घालून त्याच्या शेवया पाडायच्या. हे त्यामानाने सोप्पंय. नुसत्या उकडीवरच आटपलंय.

शिरवाळी करताना उकडीचे मुटके उकळत्या पाण्यात सोडतात आणि उकळत असताना एकदा पाण्यावर तरंगायला लागले की शिजले असं समजायचं. मग सोर्‍यात घालून त्याच्या शेवया पाडायच्या. हे त्यामानाने सोप्पंय. नुसत्या उकडीवरच आटपलंय.

वर तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले तर पुन्हा शेवया वाफवायची गरज नसते.
माझी आई तांदळाच्या पीठाचे नुसते उंडे तयार करते मग तुम्ही सांगितले तसे पाण्यात शिजवून घेते , असे केल्याने सोर्‍यातून शेवया पाडल्यावर पुन्हा वाफायची गरज नसते.

कोकणात आमच्याकडे वर दिल्या पाकृप्रमाणे शेवया इडल्यांप्रमाणे गोलाकार पाडून न घेता हळदीच्या पानावर पाडून घेतल्या जातात व त्या पानासकट वाफवल्या जातात. ह्या शेवया नारळाच्या रसाबरोबर किंवा आमरसाबरोबर खायला देतात :)

सानिकास्वप्निल's picture

23 Feb 2013 - 12:47 am | सानिकास्वप्निल

माझी आई तांदळाच्या पीठाची नुसती उकड काढून उंडे तयार करते मग तुम्ही सांगितले तसे पाण्यात शिजवून घेते , असे केल्याने सोर्‍यातून शेवया पाडल्यावर पुन्हा वाफायची गरज नसते.

किलमाऊस्की's picture

23 Feb 2013 - 1:02 am | किलमाऊस्की

नाचणीच्या पण होतात अशा पण तांदळाची सर नाही त्याला.

"कोकणात आमच्याकडे वर दिल्या पाकृप्रमाणे शेवया इडल्यांप्रमाणे गोलाकार पाडून न घेता हळदीच्या पानावर पाडून घेतल्या जातात व त्या पानासकट वाफवल्या जातात. ह्या शेवया नारळाच्या रसाबरोबर किंवा आमरसाबरोबर खायला देतात."
कोकणातल्या का तुम्ही, मग बरोबर!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Feb 2013 - 3:28 pm | विश्वनाथ मेहेंदळे

सूड चे खरेच कौतुक वाटते, तो अशा टिप्स देतो तेव्हा :-)

तर्री's picture

22 Feb 2013 - 11:07 pm | तर्री

अफलातून पाकृ . फोटोत समाधान मानून घेतले गेले आहे. जय हिंद .

अभ्या..'s picture

23 Feb 2013 - 12:24 am | अभ्या..

नेहमीप्रमाणेच. पाकृ, फोटो आणि प्रेझेंटेशन लाजवाब.
तुझ्याकडे जेवढ्या पाकृ आहेत तेवढे नवनवीन कौतुकाचे शब्द पण नाहीत आमच्याकडे :(

मीनल's picture

23 Feb 2013 - 3:29 am | मीनल

हे फोटो घरी दाखवायला नकोत. लगेच फर्माईश होईल आणि वर शिव्या की तू असले काही करतच नाही.

प्यारे१'s picture

23 Feb 2013 - 5:11 am | प्यारे१

सानिकाला तुरुंगात टाका!

कसल्या अफलातून रेसिपी देतेस गं !!!!!!
फोटो तर अगदी क्लासिक !!

परिकथेतील राजकुमार's picture

23 Feb 2013 - 11:10 am | परिकथेतील राजकुमार

We Live In The Era Of सानिकास्वप्निल.

सस्नेह's picture

23 Feb 2013 - 1:43 pm | सस्नेह

इतक्या देखण्या पदार्थाला 'इडियाप्पम' असले येडचापसारखे नाव का ठेवले समजत नाही...

स्मिता चौगुले's picture

26 Feb 2013 - 12:26 pm | स्मिता चौगुले

:) असेच म्हणते

गणपा's picture

23 Feb 2013 - 3:05 pm | गणपा

झक्कास.

दिपक.कुवेत's picture

23 Feb 2013 - 3:25 pm | दिपक.कुवेत

छान पाकृ आणी फोटो नेहमीप्रमाणेच

क्रान्ति's picture

23 Feb 2013 - 4:05 pm | क्रान्ति

खास पाकृ आणि फोटो!

तुझी स्तुती करायला शब्द तोकडे पडतात बाकि पाकृ नेहमीप्रमाणेच छान

स्मिता शितूत's picture

23 Feb 2013 - 8:43 pm | स्मिता शितूत

देव्हार्‍यात जशी अन्नपूर्णा देवी असते तशी मिपावर सानिका आहे.
अगदि बरोबर आमच्या डाएट्चे तीन तेरा वाजतात ग ......सानिका ताई

सानिकाला किती नावे ठेवणार तुम्ही लोक.

आणी वरील पाकृमधे " डाएट्चे तीन तेरा वाजण्यासारखे" काय आहे ते जरा विस्कटुन सांग.

Mrunalini's picture

24 Feb 2013 - 1:52 am | Mrunalini

मस्त पाकृ... आवडेश. ;)

सोनलि's picture

24 Feb 2013 - 2:54 am | सोनलि

छान दिसते आहे करुन बघते :)

सेरेपी's picture

26 Feb 2013 - 2:26 am | सेरेपी

हे चायनीज राईस नूडल्स (सेलोफेन) वापरून करता येइल का? सोर्या नाहिये :(

सानिकास्वप्निल's picture

26 Feb 2013 - 3:39 am | सानिकास्वप्निल

सेलोफेन वापरुन कसे लागेल माहित नाही, त्या शिजवायला ही वेळ लागतो असे ऐकले आहे :(
ट्राय करुन बघा.
मागे एकदा मैत्रीणीने फालुदा बनवताना सेलोफेन वापरल्या होत्या.

स्पंदना's picture

26 Feb 2013 - 7:12 am | स्पंदना

गुपित फुटल सानिका!
तुझ्याकडे अलिबाबाचा दिवा आहे, तू चुकुन त्यातच रसम भरलस तेंव्हा दिसला आम्हाला.

तों. पा. सु.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 Feb 2013 - 7:34 am | विश्वनाथ मेहेंदळे

अलिबाबाचा दिवा

तुमच्या कडे पंचतन्त्राची वेगळी प्रत दिसते आहे. Standard प्रतीत हा उल्लेख नाही ;-)

स्मिता चौगुले's picture

26 Feb 2013 - 12:31 pm | स्मिता चौगुले

मस्तच सानिकाताई.. प्रेझेन्टेशन खरच खूप आवडल, विशेशतः ते सहित्य प्रमाण दा़खवण्यासाठी वापरलेली युक्ती.. मस्तच

कसली जबरी पाककृती आहे. सध्या तरी पाककृती बघूनच समाधान करायला लागेल.. :(

- पिंगू

त्रिवेणी's picture

26 Feb 2013 - 8:13 pm | त्रिवेणी

सानिकाजी पाकृ बरोबर एक धागा तुम्ही तुमच्या टापटीप तसेच निगुतीने स्वयंपाक कसा करावा या विषयी टाका.

सूड's picture

26 Feb 2013 - 8:52 pm | सूड

हा अजूनही न सुटलेला प्रश्न आहे.

स्मिता शितूत's picture

27 Feb 2013 - 11:43 am | स्मिता शितूत

कारण सानिका ताईंचे पदार्थ इतके सुदंर असतात कि तेच करून खावेसे वाटटात आणि मग डाएट्चे खल्ले जात नाहि.....

पियुशा's picture

28 Feb 2013 - 10:37 am | पियुशा

वॉव !!!

कच्ची कैरी's picture

4 Mar 2013 - 12:26 pm | कच्ची कैरी

इडीयाप्पाम बघून कुरडयाची आठवण झाली .बाकि पाककृती नेहमीप्रमाणेच झक्कास !!
http://mejwani.in/