सोने

सोने

अघटित घडले त्या बाजारी जेव्हा पडले सोने
शेती फुलले , जमिनीमध्ये आहे दडले सोने!

जरी भाजले तरी राहते कसे बरे हे तसेच सोने?
कळेल का मज असे कोणत्या मुशीत घडले सोने?

निघून गेली कष्टामध्ये सगळी वर्षे आणिक-
आयुष्याच्या संध्याकाळी मग सापडले सोने!
(नॉर्थ ड्कोटा येथे एका वृद्ध जोडप्याच्या मागील अंगणात खनिज तेल सापडले:) आणि ते कोट्याधीश झाले या बातमीवर आधारित)

चकाकणारे सारे खरेच नसते येथे सोने
अंधार्‍या रात्री एकाकी हळूच रडले सोने

स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे -
कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने

चकाकणारे

चकाकणारे सारे खरेच नसते येथे सोने
अंधार्‍या रात्री एकाकी हळूच रडले सोने
स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे -
कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने

हे छान Smile

सोन्याची वेगवेगळी रूपे

आणि रूपके आवडली.

छान कविता

सोन्याची वेगवेगळी रूपे आणि रूपके आवडली.

असेच म्हणतो !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान..

छानच आहे काव्य. आवडलं!

तात्या.

स्पर्श

स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे -
कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने

व्वा सुंदर..

(५० तोला चा भाव काय होईल) या विचारात पडलेला
मदनबाण.....

स्पर्श

स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे -
कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने

हे फार आवडलं Smile
बाकी रुपके मस्ता या धनंजय यांच्या विचारांशी सहमत

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

छान कविता!

रुपके वापरण्यातली कल्पकता आवडली! Smile

चतुरंग