टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
माझी कविता
प्रेषक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( शुक्र, ०७/०४/२००८ - २२:३१) .
प्रयत्नही करुनही जमत नाही कविता
तेव्हा होणारा वैचारिक मनस्ताप
माझ्या अहंकाराला डिवचतो.
ही अस्वस्थता कोसळत जाते,
तिन्ही सांजेला.
धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन
कवितेला बिलगुन चालतांना
कोणताच विचार मला सुचत नाही.
ऐनिलिसिस करता येत नाही
गुदमरलेल्या श्वासांचा.
आभाळ भरुन आल्यावर
मी डोकावून पाहतो,
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात
दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत,
माझी कविता एकाकी असते.
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


ह्म्म
शेवट अतिशय आवडला.
सोनाली
शेवटी
अथक भरुन आलेल्या आभाळाने स्वत:चेच वजन असह्य होऊन बेधुंद कोसळणार्या पावसाच्या रुपाने जमिनीवर धाव घ्यावी तशी, बिरुटे साहेबांच्या काव्य प्रतिभेने मिपावर धाव घेतली!!
छान मुक्तछंद साधलाय प्रा.डॉ. अजून कविता येऊदेत.
चतुरंग
माझी कविता एकाकी असते.
डॉ.दिलीपजी,
वैचारिक मनस्ताप जेव्हा अहंकाराला डिवचतो
त्याच वेळी अश्या कवितेची निर्मीती होते.
स्वानुभव
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
आवडली.
कविता आपोआपच झरते. झरते तेव्हा एकाकीच असते. त्या झर्याचा झुळझुळ आवाज ऐकून पांथस्थ येतात आणि तृप्त होऊन जातात.
लै भारी...
बिरुटेसाहेब,
लै भारी कविता केली आहे राव तुम्ही! आशय जबर्या आहे...
कविता खूप आवडली. अजूनही लिहा बिरुटेशेठ! अगदी भरभरून...!
आपला,
(प्राध्यापक बिरुट्यांचा विद्यार्थी) तात्या.
माझा प्रतिसाद
प्रयत्नही करुनही समजत नाही कविता
तेव्हा होणारा निर्मळ आनंद
माझ्या आयुष्याला सुखावतो.
ही मंगलता बहरत जाते,
अनंत काळापर्यंत.
सुखाने लपेटलेल्या आयुष्यातुन
कवितेला लाथाडून चालतांना
एकदा तरी विचार घोळुन जातोच
ह्या गुदमरवणार्या कविंचे काय करायचे?
अजुन सुख गोळा करुन आल्यावर
मीच मला समजावतो
रंजले, गांजले, रोगी
पिडीत, पछाडीत व इतर
सगळ्यांची काळजी घेणारेय
वेलूचे मनोगत, तात्याबाचा मिपा
तु लेका निवांत रहा..
सुंदर कविता !!! :)
सहजा, असा बदला घेतला तर
प्रयत्नही करुनही समजत नाही कविता
तेव्हा होणारा निर्मळ आनंद
माझ्या आयुष्याला सुखावतो.
ही मंगलता बहरत जाते,
अनंत काळापर्यंत.
अरे, मग काय कवींनी कविताच करु नये.
कोणी कविता करुन सुख मिळवतो कोणी अलिप्त राहुन !!!
सुखाने लपेटलेल्या आयुष्यातुन
कवितेला लाथाडून चालतांना
एकदा तरी विचार घोळुन जातोच
ह्या गुदमरवणार्या कविंचे काय करायचे?
कविंना माफ कर !!!
अजुन सुख गोळा करुन आल्यावर
मीच मला समजावतो
रंजले, गांजले, रोगी
पिडीत, पछाडीत व इतर
सगळ्यांची काळजी घेणारेय
वेलूचे मनोगत, तात्याबाचा मिपा
तु लेका निवांत रहा..
दोस्ता एकवेळ निवांत राहता येईल, वेदनेपासून अलिप्त नाही !!!
जाने भी दो यारो...
अहो सर - अर्थ पोहचला... पण मला विचाराल तर तुम्ही साधे सरळ लिहिता तेव्हा शब्द आणि गोडी मनात तासनतास गुणगुणत राहते.
(अकव्य)लव्य
काय लिहू
काय लिहू !!
मस्त वेदना व्यक्त झाल्या आहेत... छान कविता....
स्वगतः राजे आपले एक एक मित्र ह्या कवितारोगामुळे अस्वस्थ आहेत... त्यां सर्वांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना करावयास हवी आपल्याला ! बेचारी काल यशो ह्या रोगाची बळी होती... आज सर देखील ..... वाईट वाटतं .. असे मोठ मोठे लेखक अचानक चार ओळीच्या कविता करतात तेव्हा
राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
आवडली
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात
दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत,
माझी कविता एकाकी असते.
या ओळी खास आहेत.
अगदी खरं..
>>माझी कविता एकाकी असते
नेहेमीच.
स्वानुभव.
चलबिचल
झपाटणारी कल्पना आहे, पण तिला मूर्त करायला समर्थ शब्द नाहीत. अशी घालमेल चितारली आहे बिरुटेसरंनी.
त्या अस्वस्थतेतून आणखी स्फुरण येत राहो!
छान
छान कविता, दिलीपजी...
सुन्न...
... करून जाणारी रचना...
अभिनंदन...
बर्याच काळानं मुक्तछंदात काही चांगलं वाचायला मिळालं...
अधिक मागणी करीत नाही. कारण हा मागणी तसा पुरवठा यातला प्रकार नाही.
कविता आवडली.
मुक्तछंदातली कविता आवडली. अशाच कविता येत राहू देत.
+१
छान, कविता आवडली.
आवडलं!
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात
दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत,
माझी कविता एकाकी असते.
क्या बात है!!!
मस्त!!!!
फारच छान!
ऐनिलिसिस करता येत नाही
गुदमरलेल्या श्वासांचा.
आभाळ भरुन आल्यावर
मी डोकावून पाहतो,
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात
दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत,
माझी कविता एकाकी असते.
फारच छान. खूप आवडले.
(एकाकी)बेसनलाडू
दर्द आहे...
सहि आहे.....