मोबद्ला

भावना कल्लोळ's picture
भावना कल्लोळ in जे न देखे रवी...
15 Feb 2013 - 3:06 pm

नमस्कार, मिपा वर माझे हे पहिले लेखन आहे, तरी तुमच्या प्रतिक्रिया, सुचना चे स्वागत.

साभार : गारवा

आज काम जरा जास्त आहे असे रोज ऑफिसात गेल्यावर वाटते, लंच टाईम पर्यंत खपून सुद्धा टेबलावर एवढे काम साठते ,

तरी बोटे चालतात, डोके मात्र चालत नाही, back ground मध्ये घरच्या कामाशिव्या काही चालत नाही,

तितक्यात नवऱ्या चा फोन येतो, संध्याकाळी बिर्याणी कर म्हणून हुकुम सोडून जातो, रागाचा माझ्या हि तिथेच असाच पारा चढतो ,

मन हे नुसते घडाळ्याच्या का ट्या वर सैरा वैरा पळत सुटते, ५.११ च्या लोकाल साठी मी हि जीव घेऊन धावत सुटते ,

लोकल पकडून शुरू होतो कामाच्या आखणीचा खेळ, विचार करता करता घरी पोहचून मी वाजवते घराची बेल,

दरवाजा उघडता पिल्लू येते धावत, पायाला मिठी मारून करते गोड माझे स्वागत, घेता त्याला मिठीत सर्व शीण जातो निघून,

पापे त्याचे घेऊन सज्ज होते मी कामाला, कारण असा कामाचा मोबदला फक्त मलाच मिळणार असतो.

भावनाकल्लोळ

विडंबन

प्रतिक्रिया

इनिगोय's picture

15 Feb 2013 - 3:08 pm | इनिगोय

आता जमलं. 'भावनाकल्लोळ' हा शब्द लिहायला. :)

भावना कल्लोळ's picture

15 Feb 2013 - 3:13 pm | भावना कल्लोळ

नाही हो मला मिपा वर मराठी मध्ये टंकताच येत नाही हे मी gmail वर टाइप करून इथे टाइप करून इथे टाकले आहे

हा धागा बघा त्यासाठी. आणि थेट लेख टाकण्याआधी सराव म्ह्णून काही काळ इतरत्र प्रतिसाद देऊन बघा. नक्की जमेल.

इनिगोय's picture

15 Feb 2013 - 3:45 pm | इनिगोय

लिंक राहून गेली.

(कृपया स्वसंपादनाच्या सुविधेचं मनावर घ्या हो..)

दादा कोंडके's picture

15 Feb 2013 - 6:26 pm | दादा कोंडके

मी gmail वर टाइप करून इथे टाइप करून इथे टाकले आहे

इथे टाइप करायचं होतं तर मग जीमेलवर टाइप का केलं होतं? 'इथे ताइप करून इथे' म्हणजे परत कुठे टाइप केलं होतं?

दादा कोंडके's picture

15 Feb 2013 - 6:28 pm | दादा कोंडके

५.११ च्या लोकाल साठी मी हि जीव घेऊन धावत सुटते

कुणाचा जिव घेता तुम्ही?

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2013 - 3:14 pm | संजय क्षीरसागर

तुमच्या प्रतिक्रिया, सुचना चे स्वागत.

नोकरी सोडा किंवा नवर्‍याला बिर्याणी सोडायला सांगा.

पैसा's picture

15 Feb 2013 - 3:17 pm | पैसा

साभारःगारवा काय आहे?

आता : तुमच्या प्रतिक्रिया, सुचना चे स्वागत.

कवितानागेश's picture

15 Feb 2013 - 4:11 pm | कवितानागेश

अरे, ये गारवा नही जानती | :D

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Feb 2013 - 5:57 pm | श्री गावसेना प्रमुख

गारवा हा मराठी पाउस गाण्यांचा अल्बम
त्याचच विडंबन वाटतय
उन जरा जास्त आहे दर वर्षी वाटत, भर उन्हात पाउस घेउन आभाळ मनात दाटत.

भावना कल्लोळ's picture

15 Feb 2013 - 3:36 pm | भावना कल्लोळ

@ संजय,आजच्या नौकरी करणाऱ्या स्त्रीयाच्या बाबतीतला एक छोटासा अनुभव व्यक्त केला आहे, मध्यमवर्गीय कुटुंबाना दोघांनी नौकरी करणे गरजेचे झाले आहे, तरी पण आभार तुमच्या सल्ल्यासाठी.
@ ज्योती, मी कदाचित चुकीची असेन पण मला हे गारवाच्या कवितेवरून सुचले म्हणून साभार असे लिहिले आहे, मी पूर्ण नवीन आहे या आंतरजालीय विश्वात म्हणून काही चुका झाल्यास माफी असावी.

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2013 - 3:41 pm | संजय क्षीरसागर

मला वाटलं तुमचाच प्रश्न आहे.... मग टाइपिंगची प्रॅक्टीस घरच्याघरी बराह पॅडमधे करता येते.

वेल्लाभट's picture

15 Feb 2013 - 3:39 pm | वेल्लाभट

अप्रतिम मांडणी झाली आहे विचारांची. त्यातील राग, तळमळ, आनंद समजता येणारा आहे.

पोस्ट आवडली !

जेनी...'s picture

15 Feb 2013 - 3:45 pm | जेनी...

छान लिहिलयस गं :)

होइल सवय हळुहळु मराठिची :)... डोन्ट वरी .... आम्हि आहोत ना ;)

अभ्या..'s picture

15 Feb 2013 - 6:00 pm | अभ्या..

डोन्ट वरी .... आम्हि आहोत ना

=)) =)) =)) =))=))=))

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2013 - 6:03 pm | संजय क्षीरसागर

उचलायला.

प्रसाद१९७१'s picture

15 Feb 2013 - 3:50 pm | प्रसाद१९७१

"मला पण खुप खायची आहे बिर्याणी, मला आज उशीर होणार आहे तर तूच करुन ठेव" असे नवर्‍याला सांगावे. आणि खरच उशीरा जावे. जर त्यानी करुन ठेवली असेल तर पुढल्या वेळेला तुम्ही करा, नाहीतर फाट्यावर मारा असले हुकुम.

जेनी...'s picture

15 Feb 2013 - 3:52 pm | जेनी...

बाप रे ! :(
असं एकदम बोलुन टाकल्यावर नवरा रागवणार नै का ओ काका ?? :(

प्रसाद१९७१'s picture

15 Feb 2013 - 3:55 pm | प्रसाद१९७१

रागवणारा असेल तर बदलुन टाका नवरा. :-)

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2013 - 3:59 pm | संजय क्षीरसागर

आहे त्या नवर्‍यावर.

जेनी...'s picture

15 Feb 2013 - 4:00 pm | जेनी...

असं हो काय काका :(
शी बै ... असले कसले सल्ले देताय तुम्हि :(
मला त बै कै सुचेचना :-/

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2013 - 4:10 pm | संजय क्षीरसागर

त्या इथे टायपिंगची प्रॅक्टीस करतायत

नानबा's picture

15 Feb 2013 - 4:51 pm | नानबा

मस्त लिहीलय... अजून अजून लिहीत राहा... मराठी टंकलेखनासाठी बराहा पॅड वापरा... खूप मस्त टंकता येतं मराठीत...
पुन्हा कवितेबद्दल - भावना मस्त आल्यात. (मुंबईकर स्त्रीची काम आणि घरकाम मधील दगदग उत्तमरीत्या जाणवली.) :)
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.. :)

भावना कल्लोळ's picture

15 Feb 2013 - 5:09 pm | भावना कल्लोळ

धन्यवाद