आज माझ्या मुंजाला, झोप का येत नाही?

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
11 Feb 2013 - 3:51 pm

पिंपळाच्या झाडाला, खवीस तो लटके बाई
आज माझ्या मुंजाला, झोप का येत नाही?

प्रेत जळते स्मशानी ,लाकडे हि जळु लागली
फुले कण्हेरीची ,रास गावर्‍याची हि पेटू लागली

आक्रंदती सारे सगे सोयरे,मोकलली धाय ही
फुटेल केव्हा कवटी ,काळजी त्यांना लागली

जमले खवीस कृत्या ,नाचतो ब्रह्मसमंध
उठेल माझा मुंजा, नका असे नाचू अंधाधुंद

आवाज झाला मोठा ,फुटली असेल कवटी
भेटण्यास त्या आत्म्याला, पळाली बघा सटवी

avi

वावर

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

11 Feb 2013 - 4:10 pm | श्री गावसेना प्रमुख

पिंपळाच्या झाडाला, खवीस तो लटके बाई
आज माझ्या अकुला, झोप का येत नाही?

प्रतीसाद मिळाले ,व्यनि ही झाले
काथ्या कुटुन झाला ,अकु पळुन गेला
तरीही शांतता नाही जिवाला.

म्हणुनी म्हणतो ह्या मुळेच अकुला झोप येत नाही
आज माझ्या अकुला, झोप का येत नाही?

परिकथेतील राजकुमार's picture

11 Feb 2013 - 4:12 pm | परिकथेतील राजकुमार

भेटण्यास त्या आत्म्याला, पळाली बघा सटवी

आत्मा ह्यांची प्रतिक्रिया वाचण्यात उत्सुक.

पक पक पक's picture

11 Feb 2013 - 11:05 pm | पक पक पक

:bigsmile:

अमोल केळकर's picture

11 Feb 2013 - 4:43 pm | अमोल केळकर

हा हा हा मस्तच :)

अमोल केळकर

धन्या's picture

11 Feb 2013 - 5:04 pm | धन्या

अजून येऊदया.

पैसा's picture

11 Feb 2013 - 5:43 pm | पैसा

पण सध्या तुम्ही आत्मुसची आठवण परत परत का काढताय ब्वॉ?

सूड's picture

11 Feb 2013 - 6:29 pm | सूड

पण अकुकाकांनी येवढं लिहायचे कष्ट घेतले हेही नसे थोडके.

मुक्त विहारि's picture

11 Feb 2013 - 6:54 pm | मुक्त विहारि

झक्कास..

बाबा पाटील's picture

11 Feb 2013 - 7:07 pm | बाबा पाटील

एक नंबर.....

पण सटवी ब्रम्हदेवाची बायको ना? मग त्या देवीला या भूताखेतांत आणून कशाला बसवलं हो?

चांगला प्रयत्न.

प्रसाद गोडबोले's picture

11 Feb 2013 - 7:55 pm | प्रसाद गोडबोले

पोटेन्शियल आहे तुमच्यात !! लेखनाकडे जरा गांभीर्याने लक्ष द्या .( गंभीर लेखन करा असे नाही , विनोदी काथ्याकुट ञाकणार असाल तरीही सीरीयस्ली लिहा )

"काकुंचा सल्ला"
- राष्ट्रकाकु गिरीजा

अत्रुप्त आत्मा's picture

11 Feb 2013 - 8:16 pm | अत्रुप्त आत्मा

@भेटण्यास त्या आत्म्याला, पळाली बघा सटवी>>> =)) अस्सें क्कांय??? =)) नेमकें आमच्या वाडीत आंलेत कांय? थांबा, अता तुमच्या मागे भुतावळ लावतो. http://www.sherv.net/cm/emoticons/horror/scared-ghost-smiley-emoticon.gif

@अता सटवी शोधणे आले.... http://www.sherv.net/cm/emoticons/horror/heart-eyes-ghost-smiley-emoticon.gif

प्रचेतस's picture

11 Feb 2013 - 8:31 pm | प्रचेतस

अता सटवी शोधणे आले....

शोधलीत म्हणे तुम्ही.

गणामास्तर's picture

11 Feb 2013 - 8:33 pm | गणामास्तर

शोधलीत म्हणे तुम्ही.

सटवी सापडल्याबद्दल हाबिनंदन हो बुवा..

पैसा's picture

11 Feb 2013 - 8:34 pm | पैसा

म्हणजे आम्ही वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा उपयोगी पडल्या तर!

अत्रुप्त आत्मा's picture

11 Feb 2013 - 8:48 pm | अत्रुप्त आत्मा

न...........ही........... http://www.sherv.net/cm/emoticons/no/funny-ghost-says-no-smiley-emoticon.gif ईईईईईईईई ,,, ये सब झुठ है..........!!!

नाय हो पैसाताई...ख्वॉटं बोल्तात...चावट हायत ही मुलं... =)) आणी तो अगोबा...आगलाव्या अगोणकर... दुष्ट आहे =))

स्पंदना's picture

12 Feb 2013 - 5:51 am | स्पंदना

हो ना! हे असल खोट नाट ऐकुन लायनीतल्या सटव्या पळुन जायच्या म्हणते मी.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Feb 2013 - 10:27 am | अत्रुप्त आत्मा

@लायनीतल्या सटव्या पळुन जायच्या म्हणते मी.>>> हे यमराज.....!!! आमच्या मागे लाइन???http://www.sherv.net/cm/emoticons/horror/vampire-fang-smiley-emoticon.gif या पेक्षा दुसरं कल्पनातीत स्वप्न रंजन या इहलोकात असू शकतं काय??? http://www.sherv.net/cm/emoticons/horror/dracula-smiley-face-emoticon.png

स्पंदना's picture

12 Feb 2013 - 10:40 am | स्पंदना

का नाही?

आप तो फुल बिछाते हो अतृप्तजी !

अत्रुप्त आत्मा's picture

12 Feb 2013 - 11:22 am | अत्रुप्त आत्मा

शेवटचा प्रतिसाद............. :-)

@आप तो फुल बिछाते हो अतृप्तजी ! >>>http://www.sherv.net/cm/emoticons/smile/free-happy-smile-smiley-emoticon.gif लेकिन... उस के उपर से ,अपने लिये चलकर कोइ नही आता...

Nile's picture

12 Feb 2013 - 6:38 am | Nile

आज माझ्या मुंजाला, झोप का येत नाही?

अहो, त्याने हडळ पाहिली असेल!!

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.... संपादन संपादन.
सवयीप्रमाणे आम्हाला वाटलं एकोळी कौल काढला का काय, म्हणून काय लिहलं ते वाचलंच नाही!

नाखु's picture

12 Feb 2013 - 10:16 am | नाखु

अकुंच्या धाग्यात "जीव" आहे का हे माहित नाही पण "आत्मा" जरूर आहे..
अवांतर : बुवांच अभिनंदन..
अति अवांतर : वल्लिदांनी दिली म्हणजे ही बातमी "खात्रीशीर" मानावी काय?

अत्रुप्त आत्मा's picture

12 Feb 2013 - 11:42 am | अत्रुप्त आत्मा

@अवांतर : बुवांच अभिनंदन.. >>> बोंबला तिच्यायला...! अहो नाही हो नाही...! सटवाईची आन..तस काय बी न्हाई ...!
@अति अवांतर : वल्लिदांनी दिली म्हणजे ही बातमी "खात्रीशीर" मानावी काय?>>> http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif वल्लीदांबद्दल आम जनतेला असलेली खात्री पाहून......... वारलो