दिलखुश क्रंच (गोजिरवाण्या घरातली बाळं)

जयवी's picture
जयवी in पाककृती
5 Feb 2013 - 12:48 pm

साहित्य :

१. तीळ – अर्धा किलो
२. गूळ – अर्धा किलो पेक्षा थोडा कमी
३. डिंक बारीक तुकडे – ५ टेबल स्पून
४. जाड पोहे – अर्धी वाटी
५. वेलदोड्याची पूड - १ टीस्पून
६. तूप

कृती :
१. तीळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घेतले.
२. मग तीळ मस्त खमंग, गुलाबीसर रंगाचे होईस्तोवर भाजून घेतले आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून काढून घेतले. मिक्सरमधे बारीक करतांना थोडा वेळ जास्त फिरवलं त्यामुळे तीळाचं छानपैकी तेल निघून तीळाचा ओलसर गोळा झाला.
३. गूळ बारीक किसून घेतला.
४. तूपात डिंक आणि पोहे फुलवून घेतले.
५. मग तीळाचं कूट, गूळ , तळलेला डिंक, तळलेले पोहे, वेलदोड्याची पूड हे सगळं एकजीव केलं.
६. गोल आकार देऊन वर हलवा लावून “दिलखुश क्रंची बॉल्स” तयार केले.

सजावट :

१. आधी बारीक नूडल्स वाफवून घेतल्या. मग एका छोट्या चाळणीत त्याला बाऊल सारखा आकार देऊन तेलात तळून घेतलं. चाळणीतून बाहेर काढल्यावर तयार झालं घरटं.
२. वरच्या “दिलखुश क्रंच” चे चपटे ओव्हल गोळे बनवले. त्यावर लवंगीचे डोळे, पिस्त्याच्या कापाचे नाक आणि बदामाच्या कापाचे ओठ केले. बेकींग कप्स ची टोपी करुन ती टूथपीक ने प्रत्येक गोळ्याच्या डोक्यावर घातली. आधी तयार केलेल्या घरट्यात ही गोजिरवाणी बाळं ठेवली.
३. एका ट्रे मधे माती घालून त्यात मूग, मोहरी पेरली. हे झालं घराचं अंगण. त्यावर फुलांचे वाफे आणि मिर्च्यांचं कुंपण तयार केलं. अंगणात नूडल्सचं घरटं आणि घरट्यात “दिलखुश” गोजिरवाणी बाळं !!!

A

प्रतिक्रिया

स्मिता.'s picture

5 Feb 2013 - 3:30 pm | स्मिता.

खाद्य पदार्थाची अशी सजावट एकदम अफलातून आहे. मस्तच!

मस्तच जयवी ताई... सजावट पण भन्नाट. :)

ऋषिकेश's picture

5 Feb 2013 - 3:38 pm | ऋषिकेश

नंतर अशी गोंडस बाळं खाऊन टाकलीत? ;)

बाकी सजावट आवडली

सुहास झेले's picture

5 Feb 2013 - 3:39 pm | सुहास झेले

सहीच....सजावट तर निव्वळ अप्रतिम :) :)

दादा कोंडके's picture

5 Feb 2013 - 3:40 pm | दादा कोंडके

गोजिरवाणी बाळं बघून तोंपासु! पण खाण्याआधी त्यांचे डोळे काढावे लागतील. :D

अत्रुप्त आत्मा's picture

5 Feb 2013 - 3:48 pm | अत्रुप्त आत्मा

@त्यांचे डोळे काढावे लागतील. smiley>>> __/\____/\____/\__

फोटो पाककृतीमधे डकवला आहे.

पाकृ छान आहे. पण गोंडस बाळं म्हटल्यावर खाववेल असं वाटत नाही... गोंडस बाळांनाच खायला देता येतील.. :)

तिमा's picture

5 Feb 2013 - 4:04 pm | तिमा

तुमच्या कलाकृती आणि पाकृही आवडली.
काही लोकांना कलाकुसर, पाकनिष्णात, काव्यातली गती,सगळं देतो नं देव ! कौतुक आहे तुमचं!

निवेदिता-ताई's picture

6 Feb 2013 - 5:57 pm | निवेदिता-ताई

असेच म्हणते......................:)

जयवी's picture

6 Feb 2013 - 6:20 pm | जयवी

:)

किती कला आहेत ग तुझ्या अंगात ? ;)
थोड्या मला उधार दे ना ;)
झक्कास जमलिये :)

मस्त सजावट!!

सानिकास्वप्निल's picture

5 Feb 2013 - 7:31 pm | सानिकास्वप्निल

अगं किती गोंडस दिसतायेत बाळं
सुंदर सजावट व पाकृ पण छान :)

रेवती's picture

5 Feb 2013 - 8:35 pm | रेवती

चांगली पाकृ आणि सजावट. अभिनंदन जयवीताई.

फारच छान अन डोकेबाज कलाकृती.

दिपक.कुवेत's picture

6 Feb 2013 - 12:01 pm | दिपक.कुवेत

गोजिरवाण घर, घरातली बाळं, बाजुची सजावट.....सगळ एकदम हुच्च! मेहनतीच सार्थक न झालं तर नवल! पुनश्च अभिनंदन

कच्ची कैरी's picture

6 Feb 2013 - 5:33 pm | कच्ची कैरी

गोंडस बाळं फारच आवडलीत ,उत्कृष्ट सजावट
http://mejwani.in/

तहे दिल से शुक्रिया यारो :)
सुखावलेय हे सांगायलाच हवं का ;)

मदनबाण's picture

6 Feb 2013 - 6:26 pm | मदनबाण

अरे वा... अभिनंदन ! :)

II श्रीमंत पेशवे II's picture

7 Feb 2013 - 10:13 am | II श्रीमंत पेशवे II

जानेवारी मध्ये हे अपलोडवल असत तर संक्रांति निमित्त नवीन प्रकार करता आला असता, पण पाकृ वरून तरी छान झाले असावेत. आवडलं एकदा नक्की ट्राय करेन.

गौरीबाई गोवेकर's picture

7 Feb 2013 - 1:11 pm | गौरीबाई गोवेकर

आटीस्टच आहेस अगदी. मस्तच.

विलासिनि's picture

7 Feb 2013 - 2:41 pm | विलासिनि

खूपच छान पाककृती व तिचे सादरीकरण.