प्रयाग राज कुंभ मेळा :भारताचा अक्षय गौरव

प्रयाग राज कुंभ मेळा :भारताचा अक्षय गौरव.-डॉक .संजय होनकळसे
drsanjayhonkalse@gmail.com

भारत भूमीत क्वचितच असं कुणी असेल कि ज्याने कुभ मेळ्य़ा बद्दल ऐकल नसेल.साऱ्या जगात कुंभ मेळा एक आश्चर्य जनक उत्सव आहे, ज्यात भारतीय समाज,संस्कृती,धर्म ,वैविध्य संपूर्णपणे समन्वित असत,अस मानल जात. या व्यतिरिक्त कुंभ मेळा आज प्रचंड आर्थिक उलाढालीच, अभ्यासाच ,संशोधनाच साधन व व्यवस्थापनाचा उत्कृष्ट उदाहरण आहे. मी स्वतः माझ्या व्यवस्थापनशास्त्राच्या प्रत्येक वर्गात पंढरीचीवारी, कुंभ मेळा यावर व्यवस्थापन, जागतिक वित्तीय उलाढालीच माध्यम,व Mega/Macro Managementचा उत्कृष्ट नमूना यावर प्रोजेक्ट घेत असतो.कुंभ मेळा आज जगातील प्रचंड आर्थिक उलाढाल असलेल आश्चर्य जनक भारतीय सांस्कृतीच पारंपारिक संम्मेलन आहे , आणि म्हणूनच भारताचा अक्षय गौरव आहे.खरतर अध्यात्मिकांक (Spiritual Quotient )जर स्वीकारला व विकसित केला तर व्यक्तिमत्व विकास व व्यवस्थापन उत्कृष्टपणे साधला जाऊ शकतो या ठाम मताचा मी आहे व त्यानुसार मी त्यावर एक पुस्तक पण लिहिले आहे जे अमेरिकेत प्रकाशित झले आहे MANAGEMENT BY SPIRITUAL QUOTIENT :THE POWER OF FAITH .PUBLISH AMERICA PUBLICATION )

हे अस जागतिक दृष्ट्या आश्चर्य असलेल मेळा , संमेलन भरण्याचे स्थळ ना कुण्या दिग्विजयी राजाची वा शासकीय राजधानी असते ना एखादे वाणिज्य प्रधान ऐश्वर्य नगर असते ते असते भारतातील प्रमुख,पवित्र तीर्थ क्षेत्र होत.तसेच हे संमेलन भरण्याचा समय राजकीय वा सामाजिक आधारावर निर्धारित नसतो तर शास्त्रोक्त पद्धतीनुसार खगोलीय ग्रह,राशी, नक्षत्र,यांच्या विशिष्ट संयोगाधरीत असते.याचा उद्देश भौक्तीक,अध्यात्मिक प्रगती ,व शाश्वत जगत कल्याण साध्य करणे हे आहे. भारतवासी किती धार्मिक व भावूक आहेत याच सर्वोत्तम प्रमाण कुंभ मेळा आहे.जगात कुठेही अशा प्रकारचा व इतका भव्य दिव्य मेळा नाही. याच्या भव्यतेची कल्पनाही इतर राष्ट्र करू शकत नाही.एवढेच नव्हे तर हा मेळावा भरवण्यात ना कुणी उद्योजक,ना आव्हाहन कर्ता, ना संवाद दाता ,ना सभापती ना सभा,ना संचालक वा संचालन,कुठल्याही आमंत्रणवा निमंत्रणाशिवाय आज करोडो भाविक,भारतीय , अनिवासी भारतीय,व परदेशी कुंभ मेळ्याला अत्यंत श्रद्धापूर्वक हजर राहतात व धर्मामृताचा आस्वाद घेतात.या मुळे महाकुंभाला आता " जगत कुंभाचे" (GLOBAL VILLAGE चे) स्वरूप प्राप्त झाले आहे .:"जेथे कैक जण विविध भाषा, संस्कृती,धर्म ,विविध विचारधारा असलेले भाविक एकत्र येतात, कैक जण तर कल्पवास (मेळाव्याच्या ठिकाणी कमीत कमी चाळीस दिवस निवास,साधना, जप तप ,अनुष्ठान करणे).या शतकात तर अनेक परदेशी साधक अत्यंत भाऊक पणे व श्रद्धापूर्वक वर्दी लावतात याचा प्रस्तुत लेखक साक्षीदार आहे.या सर्वामुळे एकजूटतेचा अभाव असलेली"dying race ""म्हणून भारतास हिंणवनाऱ्याना तोंडात बॉट घालण्यास भाग पाडतात.

कुंभ मेळ्याचा उल्लेख गरुड पुराण( I -२४०,)रामायण (III ३४-३७),महाभारत( I -२५)ई. मध्ये आढळतो . पौराणिक कथेनुसार एकदा दुर्वास ऋषींनी इंद्राला अमरावतीत (स्वर्गाच्या राजधानीत)भेट देऊन त्याला वैजयंतीमाळ दिली पण त्यास महत्व न देत ती माळ इंद्राने ऐरावत या आपल्या हत्तीच्या गळ्यात घातली ती त्या ऐरावताच्या पायाखाली तुडवली गेली .हे समजल्यावर दुर्वास कोपित झाले व त्यांच्या शापामुळे इंद्राला लक्ष्मीची अवकृपा होऊन दारिद्र्य आले तेंवा इंद्राने महलक्षमी अष्टक रचून लक्ष्मीची कृपा प्राप्त केली व त्यामुळे पुनर्वैभव प्राप्तीसाठी हिमालयाच्या उत्तर क्षीरसागरात सागर मंथनाची तयारी झाली . त्यानुसार स्वयं विष्णूने कूर्मरूप धारण करून मंदार पर्वताला पाठीवर घेऊन, वासुकीरूपी दंडाने मंथन /चर्वण करून पुष्पक, पारिजात, कौस्तुभ, विष, व अमृतकुंभ घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. त्या अमृतावर हक्क दाखवण्यासाठी सूर असुरांत द्वंद निर्माण झाले ते बारा दिवस ,देवांचे बारा दिवस म्हणजे पृथ्वीवरील बारा वर्ष,चालले. त्यादरम्यान इंद्रपुत्र जयंत तो अमृत कुंभ घेऊन पळाला त्या दरम्यान त्यातील अमृत काही प्रमाणात चार दिवसात चार ठिकाणी पृथ्वीवर सांडले त्या चार ठिकाणी तेंव्हापासून कुम्भ पर्व साजरे केले जाते. ती चार ठिकाणे म्हणजे १- हरिद्वार, २- प्रयागराज , ३-उज्जैन, व ४-नासिक.देवांचे बारा दिवस म्हणजे मानव्सामाजाचे बारा वर्ष , म्हणून दर बारा वर्षांनी त्या त्या ठिकाणी कुंभ भरतो सूर्य, चंद्र, व गुरु अमृतकुंभाचे रक्षण करण्याचे कार्य करीत होते म्हणून हे ग्रह जेंव्हा विशिष्ट राशींमध्ये संयोग करतात तेंव्हा ,बारा वर्षांनी, कुंभ मेळा भरतो.
असा संयोग यावर्षी तीर्थराज प्रयाग येथे होत आहे व येथील त्रिवेणी संगमात हा मेळा जानेवारी १४ ते मार्च १० २०१३ या ५५ दिवस भरत आहे. कुंभ पर्व पौराणिक काळापासून जरी साजरे केले जात असले तरी १० व्या शतकात आदि शंकराचार्य यांनी याचे संघटन केले व मेळ्यास संघटनात्मक स्वरूप प्राप्त करून दिले .त्यांनी साधूंचे संघटन केले व कुंभ मेळ्यास प्रतिष्ठा व संघटनात्मक रूप दिले व पुढे हे संमेलन परिपुष्ट होत जाऊन त्याला आजचे महत्व व कीर्ती प्राप्त होउन त्याने विश्वस्वरूप प्राप्त केले आहे .म्हणून या कुंभ पर्वत हजोरो साधू संत यांना दीक्षा दिली जाते, भ्रमाचारी साधू यांना नागा दीक्षा दिली जाते

प्रयाग येथे त्रिवेणी संगमामुळे येथील कुंभ पुण्यतर मानला आहे माघ महिन्यात चंद्र सूर्य मकर राशीत राशीत असता सूर्य,चंद्र , गुरु यांच्या इलेक्ट्रो-मग्नेटिक तरांगामुळे त्रिवेणीतील पाणी charged होऊन त्याचे फायदे मिळतात,ठराविक खगोलीय परीस्तीतीत (astronomical situations मुळे )असे electro -magnetic तरंग तयार होतात हे आजच्या शास्त्रीय संशोधनात सिद्ध झाले आहे व त्याच्या परिणामांचा अभ्यास पण होत आहे हे बुद्धीजीवी बुद्धिवादी प्रभुती लक्षात घेतीलच. त्यातूनही याखागोलीय संयोगात मकर सूर्य संक्रमण, मौनी अमावस्या, वसंत पंचमी, व महाशिवरात्र या दिवसांत खगोलीय वातावरण अधिकच भरलेले असते असते त्यावेळी पूर्वापार राजे ,महाराजे स्नान करीत असत त्याला शाही स्नान म्हणतात आजच्या युगात राजेशाही जरी लुप्त झाली असली तर्री यादिवासातील स्नानास आजही शाही सणांच म्हणतात.आज या स्नानाचा मानं साधू संत ,सिद्ध महात्मे घेतात .मुहूर्ताच्या वेळी सर्वसाधूंचे त्यांच्या आखाड्यानुसार मिरवणूक काढून वाजत गाजत स्नान होते (आदि शंकराचार्य यांनी सर्व साधू संत
यांचे विविध आखाड्यान मध्ये विभाजन केले,असे आज जवळ जवळ १४ आखाडे आहेत)तसेच संत, महात्मे , यति, किन्नर,सिद्ध, महात्मे या पर्वत एकत्र येतात .जग पर्सिद्ध सिद्ध महावतार बाबाजी( जे परमहंस योगानंद यांच्या "Autobiography of yogi :(मराठीत योगी कथामृत) या जग प्रसिद्ध पुस्तक्द्वारे जगापुढे आले ,ज्यांनी पंतजल योगाचे,आजचे प्रचलित स्वरुप याचे,पुनर रोपण केले,(REF:"महावतार बाबाजी":डॉक संजय होनकळसे:गुरुतत्व प्रकाशन,कोल्हापूर.)यांनी युक्तेश्वर(परमहंस योगानंद यांचे गुरु ) यांना याच कुंभ मेळ्याच्या १८९१ च्या पर्वात दर्शन व उपदेश केला . "तीर्थे कुर्वन्ति साधक: " . आज कित्येक लोकांना येथे गलिच्छ पण जाणवते तसाच काहीसे मत युक्त्श्वारांचे होते त्या बद्दलचे संभाषण व बाबाजींचा उपदेश वाचण्यासारखा आहे जिज्ञासूंनी तो वरील पुस्तकात जरूर वाचवा .प्रस्तुत लेखकांस हरिद्वार,प्रयाग, नासिक व उज्जैन येथ असे शाही स्नान घेण्याचे भाग्य लाभले आहे
आज या पर्वामुळे व भारतातील संत महात्मे, सिध्द गुरु,अवतार या मुले भारत आज देवभूमी, पुण्यभूमी epitome of world म्हणून आधात्मिक जगतात मान मिळवून आहे. quantum physics मुळे आज अध्यात्म व शास्त्र यातील दरी कमी होऊ पाहत आहे , देव कण (god particles ) यांचे अस्तित्व आज जग मान्य करीत आहे.अश्या पर्वत, अग्निहोत्र पद्धतीने केलेल्या सोमयाग,वाजपेय यज्ञात असे देवकण निर्माण होत असतात. भारतातील महाराष्ट्रातील संत जयंत आठवले यांच्या शरीरातून देवकण प्रसूत झाले आहेत जग व शास्त्रज्ञ आज ते स्वीकारीत आहेत पहा http://www.spiritualresearchfoundation.org/articles/id/spiritualresearch... या विषयावर डॉक. दुर्गेश सामंत व श्रीमती अंजली गाडगीळ यांनी पुणे येथील MIT येथ भरलेल्या ‘Indian Aerobiological Society’ १७ व्या अधिवेशनात संशोधन पत्रिका सादर केली आहे विशाज्ञानाद्धाराच साधन होत आहे. व भारतास मार्ग प्रदीपक बनवीत आहे.विषयांतराचे धारिष्ट्य करण्याचे कारण हेच कि देवत्वाची संकल्पना आता SCIENCE हि मान्य करीत आहे. science हि देवत्वाचं अस्तिव आजही स्वीकारू शकत नसले तरी नाकारू शकत नाहित हे बुद्धिवादी पण बुद्धिमान व्यक्तींनी लक्षात घाव्ये.याचाही पाया भारतातील बोस यांनी गेली शतकाच्या सुरुवातीला घातला हेही महत्वाचे.
( Bose theory of God Particles )
या सर्वामुळे भारत आज मानव जातीच्या विविध समस्यांचे समाधान स्थान बनत आहे.व नित्य आत्मा व अनित्य शरीर या देव दानव रुपी संग्रामातून, आत्म मंथनातून विवेक जागृत करणार अस हे कुंभ पर्व आत्म ज्ञान उद्धाराच साधन होत आहे. व भारतास मार्ग प्रदीपक बनत आहे
dr sanjay honkalse

--
dr.sanjay honkalse.

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

जाता आले नाही निदान पुढचा कुंभमेळा नशिकला भरणार आहे त्याला हजर राहण्याचा प्रयत्न करु.

- गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर सोमवारी
मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर संगमवारी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर महाकुंभ पर्वाला सुरुवात झाली. संगमावर
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने संगमावर स्नान केले. स्वामी चिदानंद सरस्वती
यांच्या विशेष पूजा कार्यक्रमात शिल्पा सहभागी झाली. त्यानंतर नैनी घाटावर
विशेष पूजाही शिल्पाने केली.
.

सुप्रसिद्ध मोडेल व स्टार पुनम पांडेने डुबकी मारली कुंभमेळ्यात
.

अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन - आस्था आणि श्रद्धेच्या महाकुंभमेळ्यावर 'डान्स फिव्हर' हावी झाला आहे.
श्रद्धाळू ते साधू-संत सर्वजण भक्तीमध्ये तल्लीन होऊन नाचत आहेत. काही
आखाड्यांमध्ये प्रोफेशनल डान्सर आपला जलवा दाखवत आहेत. डान्सची जादू सर्वात
जास्त कृष्ण भक्तीचा पर्याय मानणा-या इस्कॉन समुदायातील विदेशी भक्तांवर
दिसून येत आहे.

अनेक विदेशी भक्त कुंभमेळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहेत. आगामी
काळात ड्रीम गर्ल हेमामालिनी कुंभमेळ्यात आपले नृत्य सादर करण्याची शक्यता
वर्तविण्यात येत आहे.
..

सामाजिक प्रबोधन
गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वती नद्यांच्या संगमावर श्रद्धेचा पूर वाहत आहे,
तर दुसरीकडे प्रयागच्या या धर्म नगरामध्ये सामाजिक कार्यही उत्साहात पूर्ण
केले जात आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी आता साधू-संतानी पुढाकार घेतला आहे.
संगमावर पोहचलेले एक महात्मा गंगेला प्रदूषणापासून दूर ठेवण्यासाठी आणि या
नदीला 'ग्रीन कुंभ'चा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जल संरक्षण आणि
गंगेच्या निर्मळ प्रवाहासाठी संगमावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे. या देशी बाबाच्या विदेशी भक्तांनी पर्यावरण जागृतीसाठी
'हरित समाधी' घेतली आहे.

यांच्या संकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल. जोशी सहभागी झाले होते.
धर्म..श्रद्धा..आधुनिकता..व प्रबोधन ....क्या बात है

गंगा, यमुना आणि लुप्त झालेल्या सरस्वतीच्या संगमावर पवित्र
स्नानासाठी सोमवारपासून सुरू झालेल्या कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातील लाखो
भाविकांनी गर्दी केली होती. हा कुंभमेळा म्हणजे जगातील सर्वात मोठा धार्मिक
महोत्सव ठरला आहे

.

.

जमेल तशी धाग्यात भर घालुन सजवण्यात येईल

धाग्यात भर घाला. माहितीपूर्ण लेखनाबरोबर काका, काही पुरुष मंडळीही आली असेल ना कुंभमेळ्याला
त्यांचीही चित्र डकवा बरं का.... :)

-दिलीप बिरुटे

काही पुरुष मंडळीही आली असेल ना कुंभमेळ्याला
त्यांचीही चित्र डकवा बरं का.... :)

काही आच्रट प्रतिक्रिया येण्याआधी हे वाक्य पटकन संपादित करा पाहू. ;)

सहमत. ;)

डॉक्टर काका अकुना पूरुष मंडळी लाभत नैत आय मीन दीसत नैत ...
त्यांचा काय दोष बिचार्‍यांचा ..

त्यापेक्षा तुम्ही वेगळा धागाच का नाही काढत?.

डॉक्टर साहेब, आपल्या लेखातील मतांचा आदर करतो. आपण कुंभमेळ्यातील व्यवस्थापन यावर संशोधन करता आपलं पुस्तकही प्रकाशित झालं आहे, आपल्या कामाचं कौतुक वाटतं. कोणत्याही संशोधनाच्या कामाला वेळ द्यावा लागतो आणि काम प्रामाणिक असेल तर काम करणार्‍याला निष्कर्ष मांडतांना काहीएक आनंद मिळत असतो, तो आनंद आपण नक्कीच घेत असाल. आपण आपल्या आवडीचे काम करता प्राचीन परंपरा, व्यवस्थापन, वगैरे याचंही कौतुक वाटलं.

बाकी, >>>>प्रयाग येथे त्रिवेणी संगमामुळे येथील कुंभ पुण्यतर मानला आहे माघ महिन्यात चंद्र सूर्य मकर राशीत राशीत असता सूर्य,चंद्र , गुरु यांच्या इलेक्ट्रो-मग्नेटिक तरांगामुळे त्रिवेणीतील पाणी charged होऊन त्याचे फायदे मिळतात,ठराविक खगोलीय परीस्तीतीत (astronomical situations मुळे )असे electro -magnetic तरंग तयार होतात हे आजच्या शास्त्रीय संशोधनात सिद्ध झाले आहे

हेही काही पटत नाही. कसले इलेक्ट्रॉ-मॅग्नेटिक तरंग आणि कसलं काय असं वाटतं. हे सर्व माणसाच्या श्रद्धांवर अवलंबून आहे. कुंभमेळ्यांमुळे मानवाचा विकास होईल, माणसांच्या विविध समस्या सूटतील हे तर अजिबात न पटणारे आहे.

साधू ,त्यांचे आखाडे, एकेकाचे हट्ट, एक एकाचे मान-पान, काय काय असतं आणि काय काय नाही. कालच कोणत्या तरी वाहिनीवर कोणत्या तरी अमूक अमूक वर्षापूर्वीच्या आखाड्याची परंपरा आणि आता त्या आखाड्यात नव्या पिढींची संख्या कमी व्हायला लागली असून बरेच साधू गृहस्थाश्रमाकडे वळले वगैरे चालू होतं. असो. आपल्या विचारांना, आपल्या कामाला, आणि कुंभमेळा वगैरे मला काही अगदी तपशिलवार माहिती नसल्यामुळे आपल्या श्रद्धेला नमस्कार करतो आणि थांबतो.

-दिलीप बिरुटे

माघ महिन्यात चंद्र सूर्य मकर राशीत राशीत असता सूर्य,चंद्र , गुरु यांच्या इलेक्ट्रो-मग्नेटिक तरांगामुळे त्रिवेणीतील पाणी charged होऊन त्याचे फायदे मिळतात,ठराविक खगोलीय परीस्तीतीत (astronomical situations मुळे )असे electro -magnetic तरंग तयार होतात हे आजच्या शास्त्रीय संशोधनात सिद्ध झाले आहे>>>> हे हास्यास्पद विधान आहे. दुर्लक्ष करणे

अहो हास्यास्पद कसं म्हणता..? आता तर पुणे मुंबई एक्सप्रेसवे वरचे अपघातही भूगर्भातल्या लहरींच्या मानवी शरीरातल्या लहरींशी मेळामुळे किंवा मेळ बिघडल्यामुळे होतात असं संशोधन पुढे आलं आहे..

सायन्स आहे हो त्यामागे... ;)

नाशिक मध्ये होणाऱ्या "कुभ मेळ्याला" सिहास्त पर्वणी म्हटले जाते - कुंभ मेळा प्रयागचाच.
कारण गुरु "सिंह " राशीत असतो. सध्या गुरु कुंभ राशीत आहे आणि म्हणून कुंभ मेळा.

गुरु ग्रह प्रत्येक राशीत एक वर्ष असतो. म्हणजे पूर्ण राशिचक्र फिरावयास त्याला बारा वर्षे लागतात.दर बारा वर्षांनी कुंभ राशीत गुरु आला की प्रयागला कुंभमेळा भरतो.त्यानंतर तीन वर्षांनी हरिद्वार,सहा वर्षांनी त्र्यंबकेश्वर,(सिंहेत गुरु )नऊ वर्षांनी उज्जैन आणि पुन्हा बारा वर्षांनी प्रयाग असे हे चक्र असते.म्हणजे या प्रत्येक ठिकाणी दर बारा वर्षांनी मेळा भरतो.सिंहस्थाचे दक्खनवर होणारे परिणाम म्हणजे सिंहस्थाच्या आगेमागे जवळजवळ सहा महिने लग्नमुहूर्त नसतात.

प्रयाग येथे त्रिवेणी संगमामुळे येथील कुंभ पुण्यतर मानला आहे माघ महिन्यात चंद्र सूर्य मकर राशीत राशीत असता सूर्य,चंद्र , गुरु यांच्या इलेक्ट्रो-मग्नेटिक तरांगामुळे त्रिवेणीतील पाणी charged होऊन त्याचे फायदे मिळतात,ठराविक खगोलीय परीस्तीतीत (astronomical situations मुळे )असे electro -magnetic तरंग तयार होतात हे आजच्या शास्त्रीय संशोधनात सिद्ध झाले आहे व त्याच्या परिणामांचा अभ्यास पण होत आहे हे बुद्धीजीवी बुद्धिवादी प्रभुती लक्षात घेतीलच

का हो कुंभमेळा नाशिक,उज्जैन आणि हरिद्वारलाही भरतो ना?तिथे तर त्रिवेणी संगम नाही ना? तरीही तिथे असाच फायदा होतो का?आणि हजारो वर्षांपूर्वी त्रिवेणी संगमाचे पाणी आता आहे त्यापेक्षा खूपच स्वच्छ असावे असे वाटते.आता तिथे मरणाची घाण असते.अशा घाणीत तुमचे तरंग आले तरी ते पळून जातील. चाळीस दिवस कामधंदा सोडून तिथे तळ ठोकणारे रिकामटेकडे लोकही असतीलच. उगीच विज्ञानाच्या नावावर अशा रिकामटेकडेपणाचे समर्थन का करता?

देवकण ऊर्फ ढेकूण तर सीओईपी हाष्टेलात इतके तयार व्हायचे, कुणाला पत्त्याच नसायचा त्याचा. जागरण आणि गेमसत्र तसेच स्नानपराङ्मुखता या गुणांनी पावन झालेल्या शरीरात आणि सह्याद्रीच्या कडेकपार्‍यांप्रमाणेच शयनस्थान, भित्तिकादि पवित्र ठिकाणच्या गुहांमध्ये हे देवकण ऊर्फ ढेकूण लपलेले असायचे. एकदा का गेमसत्र संपले आणि अभियंते महात्मे निद्राधीन झाले, की या देवकणांचे अस्तित्व प्रत्ययाला यायचे. त्यांच्या स्पर्शाने शरीरात जी आग पेटायची तिचे वर्णन तरी काय करू महाराजा!!

या विषयांतराचे प्रयोजन इतकेच की लोकांना कळावे, कितीही मूड असला तरी देवकणांच्या कृपेमुळे जी तल्लीनता येते ती अजून कशानेही येणे शक्य नाही. हे कपार्‍यांमध्ये राहणारे सूक्ष्म महात्मे नक्कीच निद्रोद्धारकाचे काम करतात, त्याची जाणीव लोकांमध्ये येणे गरजेचे आहे.

-इंजिणेर कळकटसे.

आणि अकुकाका तो ठरकपीडिया बंद करा बघू लौकर!!

ड्रीम गर्ल हेमामालिनी कुंभमेळ्यात आपले नृत्य सादर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ईशा देवलच्या मुलीची ड्रीम गर्ल व्हायची वेळ आली आता. आणि त्यात ती स्नानात तल्लीन पूनम.
गोडाऊन मध्ये आध्यात्म वगैरे असले तरी शोरुमचा डिस्प्ले चुकला राव.

व्यर्थ गेला तुका ,व्यर्थ ज्ञानेश्वर
संतांचे पुकार, वांझ झाले
रस्तोरस्ती साठे, बैराग्यांचा ढीग
दंभ शिगोशीग, तुडुंबला
बँड वाजविती, सैंयामिया धून
गजांचे आसन, महंता‌सी
आले खड्ग हाती, नाचती गोसावी
वाट या पुसावी, अध्यात्माची
कोणी एक उभा, एका पायावरी
कोणास पथारी, कंटकांची
असे जपीतपी, प्रेक्षकांची आस
रुपयांची रास, पडे पुढे
जटा कौपिनांची, क्रीडा साहे जळ
त्यात हो तुंबळ, भाविकांची
क्रमांकात होता, गफलत काही
जुंपते लढाई, गोसव्यांची
साधू नाहतात, साधू जेवतात
साधू विष्ठतात, रस्त्यावरी
येथे येती ट्रक, तूप साखरेचे
टँकर दुधाचे, रिक्त तेथे
यांच्या लंगोटीला, झालर मोत्याची
चिलीम सोन्याची, त्याच्यापाशी
येथे शंभराला, लाभतो प्रवेश
तेथे लक्षाधिश, फक्त जातो
अशी झाली सारी, कौतुकाची मात
गांजाची आयात, टनावारी
तुज म्हणे ऐसे, मायेचे माइंद
त्यापाशी गोविंद, नाही नाही.

- कविवर्य कुसुमाग्रज

तुमच्या मोह न आवरण्यामुळे चांगली आणि चपखल रचना वाचायला मिळाली .
धन्यवाद .

__/\__

'अप्रतिम' कविता डकवल्याबद्दल धन्स.

-दिलीप बिरुटे

एकदम मस्त काव्य आहे. येथे डकवल्याबद्दल धन्यवाद!

डॉक्टर साहेब, मिपावर बर्‍याच दिवसांनी अध्यात्मिक विषयावर एक सुंदर लेख लिहिल्याबद्दल मी आपले आभार मानतो.

तुम्ही स्वतः तुमच्या व्यवस्थापनशास्त्राच्या प्रत्येक वर्गात पंढरीचीवारी, कुंभ मेळा यावर व्यवस्थापन, जागतिक वित्तीय उलाढालीच माध्यम,व Mega/Macro Managementचा उत्कृष्ट नमूना यावर जो प्रोजेक्ट घेत असता त्याची पीपीटी ईमेल करु शकाल का?

>> खरतर अध्यात्मिकांक (Spiritual Quotient )जर स्वीकारला व विकसित केला तर व्यक्तिमत्व विकास व व्यवस्थापन उत्कृष्टपणे साधला जाऊ शकतो या ठाम मताचा मी आहे.
मी ही सहमत आहे. बुद्ध्यांक आणि भावनांक हे जरी पाश्चिमात्यांनी शोधले असले तरी अध्यात्मिकांक ही भारताची जगाला देणगी ठरेल. याचं काही पेटंट वगैरे घेता येईल का?

तुम्ही जे एक पुस्तक लिहिले आहे जे अमेरिकेत प्रकाशित झले आहे ते अ‍ॅमॅझॉनवर मिळते का? (बहुतेक फ्लिपकार्टवाले अ‍ॅमॅझॉनकडून पुस्तकं विकत घेतात आणि भारतात विकतात. त्यामुळे कदाचित आम्हाला तुमचं हे पुस्तक भारतात फ्लिपकार्टवर मिळू शकेल.)

कुंभमेळ्याचं ग्रह, तारे आणि राशी यांच्याशी नातं आपण इतक्या छान शब्दांत मांडलं आहे. तसेच कुंभमेळ्याचे पुराणांतील संदर्भ तर अभ्यासूंसाठी मेजवानीच आहे. (एक शंका: गरुड पुराण कुणी गचकलं की नंतरच्या बारा दिवसात वाचतात ना? ईतर वेळी वाचू नये का?)

प्रयाग येथे त्रिवेणी संगमामुळे येथील कुंभ पुण्यतर मानला आहे माघ महिन्यात चंद्र सूर्य मकर राशीत राशीत असता सूर्य,चंद्र , गुरु यांच्या इलेक्ट्रो-मग्नेटिक तरांगामुळे त्रिवेणीतील पाणी charged होऊन त्याचे फायदे मिळतात,ठराविक खगोलीय परीस्तीतीत (astronomical situations मुळे )असे electro -magnetic तरंग तयार होतात हे आजच्या शास्त्रीय संशोधनात सिद्ध झाले आहे व त्याच्या परिणामांचा अभ्यास पण होत आहे हे बुद्धीजीवी बुद्धिवादी प्रभुती लक्षात घेतीलच.

अगदी अगदी.

>>त्यातूनही याखागोलीय संयोगात मकर सूर्य संक्रमण, मौनी अमावस्या, वसंत पंचमी, व महाशिवरात्र या दिवसांत खगोलीय वातावरण अधिकच भरलेले असते.
हे तर खासच. पण मग यात एकादशी आणि चतुर्थी का नाहीत? या दोन तिथ्याही खुप महत्वाच्या आहेत ना.

योगी कथामृत खुप छान पुस्तक आहे. मी ही वाचलंय. पण एका गोष्टीचं वाईट वाटतं की एव्हढा मोठा महात्मा उचाचच तिकडे अमेरिकेला गेला. आपल्या देशात ते राहीले असते तर आपल्या देशवासियांना केव्हढा फायदा झाला असता. असो. हा माझ्यासारख्या माणसाचा क्षुद्र विचार झाला. खरं तर "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती" म्हणतात तेच त्यांनी आचरणात आणलं.

गॉड पार्टीकल्स आणि क्वांटम फिजिक्सच्या उल्लेखाने या लेखाला नक्कीच चार चांद लागले आहेत.

भारतातील महाराष्ट्रातील संत जयंत आठवले यांच्या शरीरातून देवकण प्रसूत झाले आहेत जग व शास्त्रज्ञ आज ते स्वीकारीत आहेत पहा http://www.spiritualresearchfoundation.org/articles/id/spiritualresearch...

शरीरातून देवकण प्रसूत करणार्‍या संताच्या ताकदीची जाणीव करुन देण्यासाठी चक्क फ्लॅश मुव्ही वापरला आहे त्या वेबसाईटवर. माझ्यासारख्या साधकाला हे रुचलं नाही.

असो. तुम्ही वेळात वेळ काढून नक्की उत्तर दया. तेव्हढेच चार ज्ञानकण वेचता येतील आम्हा पामरांना.

इतक्या सुंदर लेखाला वाचक प्रतिसादकांनी उपेक्षिलेले पाहून वाईट वाटले.

शिवाय एक मिपाकर म्हणून शरम पण वाटली असेल ना हो?

तसेच हा लेख वैदिक पद्धतीने अंड न घालताही लिहीता आला असता असे सुद्धा वाटले असेल.

आत्म मंथनातून विवेक जागृत करणार अस हे कुंभ पर्व आत्म ज्ञान उद्धाराच साधन होत आहे. व भारतास मार्ग प्रदीपक बनत आहे

शरीर `दानव' आहे आणि त्याचा आत्मरूपी देवाशी `संग्राम चालला आहे' हे आपलं संशोधन आहे काय?

आत्ममंथनातून विवेक जागृत कसा होतो? आत्ममंथनावर आपले काय संशोधन आहे ? कुंभमेळ्यात ते कसं होतं? विवेक जागृत होणं म्हणजे नक्की काय? तो कुंभस्नानामुळे कसा जागृत होतो?

`कुंभमेळा भारतास मार्गप्रदीपक होतो आहे' म्हणजे काय? आतापर्यंत एकूण किती कुंभमेळे झाले आणि त्याचा राष्ट्रप्रदीपक म्हणून काय उपयोग झाला ?

फक्त शिल्पा शेट्टी आणि पूनमनेच संगमावर स्नान केल्याची छायाचित्रे पाहिली आणि मन निराशेने भरुन आले. आपल्या अभिनेत्रींमधील धार्मिकता कमी होतेय का? (अण्णा! बघताय ना?) की कुंभमेळ्याचे पुरेसे ब्रँडिंग झालेले नाही?

-पुष्कळदा सांगूनही अनेक स्पर्धक अद्याप छायाचित्र स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. यापुढे समूहचित्रे विशेषतः स्नानापूर्वी/नंतर साधूंसमवेतची चित्रे पाठवू नयेत. अशी चित्रे नजरबाद केली जातील. पूनम पांडेचा फोटो स्पर्धेत पुढच्या फेरीत पाठवण्यात येत आहे आणि शिल्पाचा फोटो बाद ठरवला जात आहे.-
-साप्ताहिक 'नेत्रसुख' कुंभ-चित्र स्पर्धा संयोजन समिती- :))

पूनम पांडे नी नेहमी पेक्षा १० पट जास्त कपडे घातलेले आहेत?

ती आंघोळीच्या वेळेलाच कपडे घालते. ;)

निसर्गाने कपडे दिलेच नाहीत. लाज-लज्जा असल सगळं मानवनिर्मीत आहे. हे मनाचे खेळ आहेत.. त्याग करायला पण .. लागते.. punam

-इती पुनम पांडे.

आत्मतत्त्व स्थिर, अपरिवर्तनीय आणि व्यापक आहे त्याचं कोणत्याही प्रकारे मंथन किंवा शुद्धीकरण होऊ शकत नाही याची आपल्याला कल्पना आहे काय?

तुम्ही जर वरील विधानचा प्रतिवाद करू शकला नाहीत तर कुंभस्नान व्यर्थ असून तुमचं सर्वसंशोधन निराधार आहे असा निष्कर्ष निघेल.

हे राम... आता काय होईल ?? %)

ते उत्तर देऊ शकले नाहीत किंवा त्यांनी ते टाळलं तर सं.मं. काय करेल? आणि त्यांना किती वेळ द्यायचा? कारण इतकं संशोधन केलंय म्हटल्यावर त्यांचा डेटाबेस तयार हवा.

अहो, हा विनोदी प्रतिसाद होता. चर्चा, वादविवाद यांना संपादक मंडळाची कसली हरकत असणार? आणि वादातील सर्व पार्ट्यांची तयारी कितपत आहे किंवा त्यांचा टर्न अराउंड टाईम काय असावा यावर भाष्य किंवा अ‍ॅक्शन घेण्यात संपादकमंडळ काय करणार?

अशा लेखनाबाबत सं.मं चा दृष्टीकोन काय असेल?

हा लेख देशातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मान्यताप्राप्त सोहोळ्याविषयी संशोधकानं केलेलं भाष्य आहे. आणि सोहोळ्याचा जनमानसावर परिणाम घडवण्यासाठी ते केलं गेलं आहे. प्रतिसाद येवोत न येवोत असंख्य लोक ते वाचातायेत. अशा परिस्थितीत संकेतस्थळाच धोरण काय असेल?

>> हे राम... आता काय होईल ??
काहीच होणार नाही. डॉक. संजय होनकळसे बहूधा संशोधनात खुपच व्यस्त असावेत. त्यामुळे मिपावर एकदा लेख टाकला की ते त्या लेखाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. ते वेळात वेळ काढून मिपावर लेख टाकून ज्ञानामृताचे चार थेंब आपल्याला पाजतात हेच आपलं भाग्य समजायचं.

काश, डॉक. संजय होनकळसे भी खिंड लडाते... ;)

व्यतिरिक्त कुंभ मेळा आज प्रचंड आर्थिक उलाढालीच, अभ्यासाच ,संशोधनाच साधन व व्यवस्थापनाचा उत्कृष्ट उदाहरण आहे. मी स्वतः माझ्या व्यवस्थापनशास्त्राच्या प्रत्येक वर्गात पंढरीचीवारी, कुंभ मेळा यावर व्यवस्थापन, जागतिक वित्तीय उलाढालीच माध्यम,व Mega/Macro Managementचा उत्कृष्ट नमूना यावर प्रोजेक्ट घेत असतो.>>> प्रचंड मोठा उकिरडा तयार करणे ही तुमच्या मताने मोठी प्रोजेक्ट असावीत.

नाशिक चे लोक तर कुंभमेळ्याच्या दिवसात नाशिक सोडुन जायचा बेत करत असतात.

पुण्यभूमी epitome of world म्हणून आधात्मिक जगतात मान मिळवून आहे. quantum physics मुळे आज अध्यात्म व शास्त्र यातील दरी कमी होऊ पाहत आहे , देव कण (god particles ) यांचे अस्तित्व आज जग मान्य करीत आहे.>>> लेखक महाशय तुम्ही स्वता:च्या नावापुढे डॉ असे लावता आहात. पण तुम्ही नक्कीच विज्ञानाच्या आजुबाजुला फिरकत नसणार, किंवा तुमची पदवी तुम्हाला नागा आखाड्यानी दिली असणार.
अहो god particles हे असेच दिलेले नाव आहे, ते सुद्धा गमतीत आणी प्रसार माध्यमांनी.
तुम्हाला पुन्हा पहीली मधे प्रवेश घेउन शाळा शिकवायला पाहीजे.

अ‍ॅड्मिन - मला माहिती आहे, मी personal comments केल्या आहेत. पण तुम्ही असे लेख आधी संपादीत केले पाहिजेत.

:(

हा लेख तद्दन भिकार आहे. उडवून टाका.

लेख भिकार आहे हे कुणी ठरवायचे आणि भिकार लेख उडवायचे हे तरी कुणी ठरवायचे रे ??

डॉ. "पाचकळशे" यांनी =))

मला लेखातुन माहिति मिळलि त्याबद्दल आपला आभारि आहे.
मानसाच्या प्रत्येक क्रुतितुन देशाचे कल्यान झाले पाहिजे असे काहि नाहि आहे...
कोनि मक्का इथे जातो कोनि वेटिकन सिटि तर कोनि कुम्भ इथे...

मागे एका धागा आल होता ..
www.misalpav.com/node/22359

त्यात दिलेल्या दुव्यावरील फोटो शिल्पा शेट्टी, पूनम पांडे यांनी बघितले नसावेत!!

गॉड पार्टिकलचा, गॉड फादरचा अथवा गॉड झिलाचा गॉडशी कसलाही संबंध नाही हो!

ह्म्म... हल्ली कुंभ मेळाव्यात एकसे एक बाबा मंडळी पाहायला मिळतात. यातल्या काही बाबा मंडळींची नावे सुद्धा अगदी अल्टीमेट असतात्.उदा. हिरोहोंडा बाबा, मोबाईल बाबा, हॅलिकॉप्टर बाबा !

प्रतिसाद मार्मिक आहे म्हणून म्हटलं. :)

हा प्रतिसाद मला असल्यास, तो मला समजला नाही.
बाकी ज्या बाबां विषयी मी लिहले आहे त्याचे फोटु तुम्हाला पहायला मिळतील.
http://daily.bhaskar.com/article/MK-NE-mahakumbh-sadhus-with-queer-names...
वरती अकुंनी ज्या ललनांचे फोटो टाकले आहेत,त्या फोटोंचा मूळ स्त्रोत हीच साईट आहे.

बाणा, अजून येऊ दे रे फोटो कुंभमेळ्याचे.

Copy of 1449_7
बर्फानी बाबा. मु.पो.हरयाना. निरंजनी आखाडा. [माहिती आणि छायाचित्र सौजन्य]

इलेक्ट्रो-मग्नेटिक तरंग आणि त्रिवेणीतील पाण्याने महाराजांचा रंग बदलला की काय ? [सॉरी हं डॉक्टरसाहेब]
(महाराज मला क्षमा करा हं)

-दिलीप बिरुटे

महाकुंभ ही फोटोग्राफर मंडळींच्या दॄष्टीने देखील पर्वणीच म्हणायला हवी.
या कुंभपर्वातील फोटोंचे काही दुवे इथे देतो.
http://www.boston.com/bigpicture/2013/01/maha_kumbh_mela.html

http://indiatoday.intoday.in/gallery/mahakumbh-naga-sadhus-kumbh-mela-ma...

http://www.telegraph.co.uk/news/picturegalleries/worldnews/7222387/pictu...

http://www.independent.co.uk/news/world/asia/in-pictures-indias-maha-kum...

बाणा, फोटो भारीच आहेत. महाकाली बाबा, स्नानं, नखं वाढलेले बाबा, शेकोटीला गळ्यात पाय अट्कून हात पाय शेकणारे बाबा, आणि गंगेच्या प्रवाहात घसरुन जीवावर बेतलेले बाबा हे सर्व चमत्कारिक आणि........ असो. भावना नको कोणाच्या दुखवायला. :)

बाणा, नाश्कात कुंभमेळा होईल तेव्हा जाऊ आपण हा सोहळा बघायला आणि भरपूर फोटो काढू या भव्य सोहळ्याचे.

-दिलीप बिरुटे

तू नांवे दिलेल्या बाबांवर मार्मिकमध्ये एक लेख आला होता नुकताच. आणि मार्मिकचा फॅनवर्ग वेगळा आहे म्हणून. :)

बाणा, नाश्कात कुंभमेळा होईल तेव्हा जाऊ आपण हा सोहळा बघायला आणि भरपूर फोटो काढू या भव्य सोहळ्याचे.
नागा साधु प्रसन्न होवोत आणि तसा योग जुळुन येवो ! ;)
मला नक्कीच आवडेल तुमच्या बरोबर भटकंती करायला आणि फोटु काढायला. :)

@धन्या
अच्छा,असं हाय काय ! मला मार्मिकच्या लेखा बद्धल ठावूक नव्हते म्हणुन माझा बल्ब पेटला नाही. :)

हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे

आत्मतत्त्व स्थिर, अपरिवर्तनीय आणि व्यापक आहे त्याचं कोणत्याही प्रकारे मंथन किंवा शुद्धीकरण होऊ शकत नाही याची आपल्याला कल्पना आहे काय?

तुम्ही जर वरील विधानचा प्रतिवाद करू शकला नाहीत तर कुंभस्नान व्यर्थ असून तुमचं सर्वसंशोधन निराधार आहे असा निष्कर्ष निघेल.

हा निष्कर्ष योग्य ठरतो.

वरील कोणत्याही विधानांचा दाखला न देता देखील कुंभमेळा ही निरर्थक अध्यात्मिक प्रक्रिया आहे हे निश्चीतपणे सांगून माझा या पोस्टवरचा सहभाग संपवतो.

डॉक. संजय होनकळसे मिपावर एकदा लेख टाकला की त्याकडे पुन्हा ढुंकूनही पाहत नाहीत. त्यामुळे तुम्ही काहीही निष्कर्ष काढला तरी त्यांना शष्प फरक पडत नाही.

त्यांचं आडनांव होनकळसे आहे, होनसाळे नाही. :)

आत्मतत्त्व स्थिर, अपरिवर्तनीय आणि व्यापक आहे त्याचं कोणत्याही प्रकारे मंथन किंवा शुद्धीकरण होऊ शकत नाही याची आपल्याला कल्पना आहे काय?

आत्मतत्त्व स्थिर, अपरिवर्तनीय आणि व्यापक आहे हे अजिबात पटतं नाही. सविस्तर समजवाल काय ? विनंती करतो.

आधी तुम्ही आम्हाला आत्मतत्व म्हणजे काय ते समजावून सांगा. आमची तिथपासून बोंब आहे. :)

आणि सगळ जग इतकं प्रवाही असताना नेमकं तेच कसं स्थिर, अपरिवर्तनीय वगैरे आहे ?

त्यांचं संशोधन आणि हा लेख ज्या मुद्यावर आहे त्याविषयी लिहून कुंभस्नानाची व्यर्थता दाखवून देणं इतकाच प्रतिसादाचा हेतू होता. त्यांच्या प्रतिसादावर ती उत्तरं येऊ शकली असती पण आता ते विषयांतर होईल.

जे मुद्दे तुम्ही डॉ. होनकळसेंच्या प्रतिसादानंतर मांडणार होतात ते मुद्दे तुम्ही आता तुमच्या एका प्रतिसादात सलग लिहा.

आणि हो, सुरुवात आत्मतत्व म्हणजे काय इथपासून करा. :)

आता `आत्ममंथन कसं होतं' हे होनकळसे लिहीत नाहीत तोपर्यंत `आत्मतत्व म्हणजे काय' वगैरे लिहीण्यात मला स्वारस्य नाही.

डोक्यावर हात मारुन घेण्याची स्मायली कल्पावी.

ही घे. : |

:|

बरं आता असं समजुया कुंभस्नानाने उच्चमेचा रवी दक्षिणेत चक्रि होउन व्ययतेला उदान असताना स्वस्थानी पुनरोक्त ठरत असल्याने क्रुतीला समभाग बऊन वसिस्ठा अप्सित श्रुमायाक्ताने अप्रस्तुत ठेऊन आप्तिस्त्राव शुध्दतेतुन क्लिकर्श, मिकर्श, व परामर्श यांयांसखोल नादन व्युरक्तो आत्ममंथन होतं असं होनकळसे (अथवा मी )म्हणत आहे. यावर तुम्हाला काय म्हणाय्चे आहे ते सांगायला सुरुवात करा व आमच काय चुकतय ते हि सांगा ? शुभ काम मे देरि क्यों ?

आमच्या माहितीनुसार मराठी, संस्कृत आणि हिंदी या तीनच भाषा देवनागरी लिपी वापरतात. तुम्ही वर देवनागरी लिपीत लिहिलेली काही वाक्ये कुठल्यातरी चौथ्या भाषेतील दिसतात. कुठली आहे ही भाषा?

सप्तम स्थानातील रवीला वैतागलेला,
धनंजय होनसागर

धनाजीराव मला क्षमा करा.

संशोधन होनकळसेंचं, त्यांनी स्वतः चार वेळा कुंभस्नान केलंय, वेगवेगळे दाखले दिलेत तेच प्रतिवाद करू शकतील.
त्यांना ओपन इनवीटेशन दिलंय त्यामुळे माझ्या तयारीचा प्रश्न नाही.

तस्मात डोक्यावर हात मारून किंवा मतीगुंग करणारे असे प्रतिसाद :

कुंभस्नानाने उच्चमेचा रवी दक्षिणेत चक्रि होउन व्ययतेला उदान असताना स्वस्थानी पुनरोक्त ठरत असल्याने क्रुतीला समभाग बऊन वसिस्ठा अप्सित श्रुमायाक्ताने अप्रस्तुत ठेऊन आप्तिस्त्राव शुध्दतेतुन क्लिकर्श, मिकर्श, व परामर्श यांयांसखोल नादन व्युरक्तो आत्ममंथन होतं

देण्यापेक्षा होनकळश्यांना पाचारण करा!

आत्मतत्त्व स्थिर, अपरिवर्तनीय आणि व्यापक आहे त्याचं कोणत्याही प्रकारे मंथन किंवा शुद्धीकरण होऊ शकत नाही याची आपल्याला कल्पना आहे काय?

हे तुम्हिच होनकळसेंना सार्वजनीक रित्या म्हटलयं (व्यनी/खरड न्हवे).. बरोबर ? याचा अर्थ तुम्हाला आत्मतत्व माहित आहे.. बरोबर ? मग ते सांगा म्हटल्यावर होनकळसे हवेतच कशाला ?

तस्मात डोक्यावर हात मारून किंवा मतीगुंग करणारे असे प्रतिसाद :

का तुम्हाला आत्मतत्व म्हणजे जे काय आहे, ते सांगण्यापेक्षा होनकळसेंना चुकिचे ठरवण्यात जास्त रस आहे ? तसं असेल तर स्पष्ट बोलावे. _/\_