जयविजय

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
2 Feb 2013 - 3:08 pm

"ओ दादा येऊ का आतमदे" अगदी टिपिकल बार्शी टोनमध्ये आवाज आला.
आधी कुठेतरी पाहिल्यासारखा वाटणारा चेहरा, साधे कपडे आणि हातात एक पिशवी.
"जरा काम होतं फ्लेक्सचं. जास्त नाय ३० फुटाच हाय पन आरजंट पायजे"
मला अजूनही आठवत नाहीये याला कुठं पाह्यलय मी.
"जय्विजय पायजेत छापून ७ फूटाचे दोन"
"दुपारी जेवायला गेलेले डीटीपी ऑपरेटर अजून आले नाहीत. बसा जरा."
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जयविजय
डोळ्यासमोर उभे राहिले बार्शीतले वाडे, मोठमोठे दरवाजे, दारावर लग्नप्रसंगी रंगवले जाणारे भालदार चोपदार म्हणजेच बार्शीच्या भाषेत जयविजय. चार पाच रंगाने भरलेल्या वाट्या आन तीनच ब्रश घेऊन तासाभरात घ्रराचे लग्नघर करणारा पेंटर. तो तास आणायसाठी मात्र पत्रिका छापायला देतानाच त्याला आमंत्रण द्यावे लागे. लग्न अगदी तोंडावर आले की आम्ही बच्चे कंपनी त्याच्या मागावर सुटायची. दुकानी, त्याच्या घरी आणि तो काम करत असलेल्या घरी अशा सगळीकडे चकरा झाल्यावर हा कलाकार सापडायचा तानाजी चौकात देशीच्या गुत्त्यावर.
"सकाळी येतो म्हणून सांग काकांना" एवढाच निरोप घेऊन आम्ही घरी परतायचो.
"येईल रे, कुठे जातोय पळून, बँकेचा थकबाकीदार आहे तो", वडीलांचा दांडगा विश्वास.
त्यामुळेच कदाचित दुसर्‍या दिवशी दारात बघावे तर त्याने रंग कालवायला सुरुवात केलेली असायची. पट्टी नाही, मोजमाप नाही, स्केच नाही पण दोन्हीकडेचे जयविजय अगदी मिरर इमेज असायचे. सुरुवातीला फिकट गुलाबी रंगात थोडीशी पिवळी छटा असणारा त्वचेचा रंग, लगेच पिवळ्या शेंदरी रंगात पितांबर आणि दागिने, जांभळ्या रंगाचा शेला आणि लाल कटीवस्त्र. सुरुवातीला नुसतेच रंग दिसत. काळा रंग निषिध्द असे म्हणून गडद तपकिरी रंगाचा लहान ब्रश एकदा फिरायला लागला की पाहता पाहता चित्र सजीव होई. एक पाय गुडघ्यात वाकवून हाती तिरपा दंड घेतलेले, अगदी देवासारखे देखणे मुकुटधारी जयविजय. बार्शीत श्री भगवंताचे मंदिर असल्याने पहिल्यापासूनच दरवाजावर भालदार चोपदार नव्हेत तर जयविजयच. खाली लफ्फेदार सही ठोकेस्तोवर घरातून चहा आलेला असायचा. चहा आणि बिदागी घेऊन तो जायचा पण माझे निरिक्षण काही संपायचे नाही.
चाटे गल्लीतल्या त्याच्या दुकानासमोर उभारणे म्हणजे सुध्दा मौज असायची. शेजारी महाराष्ट्र ब्रास बँडवाल्यांची प्रॅक्टीस चालू आणि त्या तालावर इकडे दुकानाचे बोर्ड रंगवणे मी तासनतास बघत राहायचो. लस्सीचा ग्लास हातात घेतलेला अर्नोल्ड पासून चहा पिणार्‍या अमिताभ पर्यंत सगळे हुबेहुब उतरलेले असायचे. चित्रकलेच्या वहीत बर्‍याच प्रयत्नानंतर जमलेले जयविजय घेऊन एकदा त्याला दाखवावे वाटे पण त्याच्या तिरसटपणाची भितीही वाटायची
एक रविवारी मात्र सकाळी सकाळी तो दारात उभा होता, चेहर्‍यावर अत्यंत अजिजी आणि आपली रंगीबेरंगी सायकल घेऊन.
तासभर माझ्या वडीलांचे हप्ते न चुकवण्याचे आणि दारु न पिण्याचे उपदेश ऐकून तो निघणार इतक्यात मी माझे जयविजय त्याला दाखवले.
"चांगलं काढताव पण मोठं झाल्यावर सायब व्हा बँकेतलं, तुमच्या वडलासारखं."
एवढेच बोलून गेला.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज पट्कन तेच जयविजय एका कागदावर काढून स्कॅन करुन पीसीवर त्यात रंग भरायला १५ मिनिटे खूप होती.
"आमचे वडील पण शेम आस्लंच जयविजय काढायचे बघा. बार्शीत पेंटर होते, गेले १० वर्शाखाली"
"आणि तुम्हाला नाही का येत मग पेंटींग?" बँकेतल्या साहेबाच्या मुलाचा निरर्थक प्रश्न
"नाही जमत, वडीलानी पतसंस्थेत लावलय नोकरीला. आता घरात आरजंट लग्न ठरलय. मोकळं दार कसं ठेवायचं म्हणून तर हे फ्लेक्स लावतो दारावर"

साहित्यिकप्रकटन

प्रतिक्रिया

मस्त लिहिलं आहे पण शेवट एकदम गुंडाळला असं वाटलं.

आदूबाळ's picture

2 Feb 2013 - 3:22 pm | आदूबाळ

एक नंबर! आवडलं!

अत्रुप्त आत्मा's picture

2 Feb 2013 - 3:27 pm | अत्रुप्त आत्मा

छान झालय....पण लै लवकर संपलं नाटक..असं झालं

स्पंदना's picture

2 Feb 2013 - 4:53 pm | स्पंदना

त्याच्या कलाकारीन तुम्हाला खुप काही दिलं, पण त्याच्या पोटान कधीच त्या कलेच कौतुक त्याच्या मनी नाही उतरु दिलं>
मस्त अमिना!

श्रिया's picture

2 Feb 2013 - 4:57 pm | श्रिया

छान लिहिले आहे.

वर्णन मस्तच!! शेवट बरेच काही सांगून गेला. बाकी मिरजेत उगारे आर्ट्सच्या कमानीसुद्धा लै भारी असायच्या आणि असतातही.

पैसा's picture

2 Feb 2013 - 8:20 pm | पैसा

आणखी लिहीत जा रे!

श्रीरंग_जोशी's picture

2 Feb 2013 - 8:34 pm | श्रीरंग_जोशी

शीर्षक वाचून वाटले एखाद्या बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रपटगृहाची कथा असावी.

भावस्पर्शी चित्रण. जयविजयचे एखादे चित्र पाहायला मिळाल्यास मोदकावर तूप ओतल्यासारखे वाटेल.

प्रचेतस's picture

2 Feb 2013 - 11:28 pm | प्रचेतस

>>>जयविजयचे एखादे चित्र पाहायला मिळाल्यास मोदकावर तूप ओतल्यासारखे वाटेल.

=))
तुपाने माखलेला मोदक डोळ्यांसमोर आला.

अभ्या..'s picture

2 Feb 2013 - 11:38 pm | अभ्या..

तुपाने माखलेला मोदक डोळ्यांसमोर आला.

खरं तर जयविजयपेक्षा हेच सोपे जाईल काढायला. मोदक अगदी घाटदार काढू पण ते माखलेले तूप आहे की अजून काही, हे चित्रात कसे समजणार? ;)

प्रचेतस's picture

2 Feb 2013 - 11:48 pm | प्रचेतस

अगागागागागा, मोदकाला आता घाटदार पण करायलास... =))

अग्निकोल्हा's picture

2 Feb 2013 - 8:53 pm | अग्निकोल्हा

पन पब्लिक भारी म्हंतय मनजे मस्तच असनारं! असु... लित र्‍हा!

मुक्त विहारि's picture

2 Feb 2013 - 9:04 pm | मुक्त विहारि

आवडले...

इनिगोय's picture

2 Feb 2013 - 11:20 pm | इनिगोय

मस्त रे अभि.. पहिलंच लेखन आवडलं. येऊदेत असे अजून अनुभव.

भौसाहेब,आवडला तुमचा लेख बरंका!

अब्या ते जयविजय पहायची खुप इच्छा आहे .
जिवंत लिहिलयस .... पण जयविजय दाखव्ना ... पहायचे आहेत
कसले असतात ते . प्लिझ .

चौकटराजा's picture

3 Feb 2013 - 5:52 am | चौकटराजा

अबू , हे पेटिंग वाटलं नाही पण खूप वेळा चित्रकाराची स्केचबुक पहाण्यात मजा असते. हे स्केच मला आवडलं बादवे तुझ्याकडे मोठ्या पन्ह्याचे प्रिंटिंग मशीन आहे काय? आमच्या येथील एका नगरसेवकाला साठ फूट बाय साठ फूट चा त्याच्या नातवाचा फ्लेक्स करायचा आहे.नातवाचा पहिलाच मासिक वाढदिवस आहे म्हणे !

किसन शिंदे's picture

3 Feb 2013 - 7:28 am | किसन शिंदे

चांगलंच लिहतोस कि रे. लेख वाचून ते जय विजय पाहायची तीव्र इच्छा झालीय.

विश्रांतीचा फायदा असाही होतो आहे म्हणजे तर. :)

मस्त रे, जय विजय बार्शीचे आणि सोलापुरच्या बालाजीच्या देवळातले दोन्ही आठवले. खुप छान लिहिलं आहेस.

लीलाधर's picture

3 Feb 2013 - 10:51 am | लीलाधर

वाचण्यात आले आहे. लय भारी जमलय रे :))

क्रान्ति's picture

3 Feb 2013 - 11:45 am | क्रान्ति

आवडलं लेखन. खेड्यांत अजूनही असे 'जयविजय' दिसतात वाड्यांच्या, देवळांच्या प्रवेशद्वारावर.

अभ्या..'s picture

3 Feb 2013 - 11:49 am | अभ्या..

सर्वांना धन्यवाद.
प्रतिसाद आणि चित्रे सोडून माझे हे पहिलेच लिखाण. अगदी आयुष्यातील पहिलेच म्हणले तरी चालेल. सगळ्यांनी कौतुक केले, त्यातल्या त्यात मिपावरचे कौतुक म्हणजे अगदी क्रिटीक्स कॅटेगरीत अ‍ॅवार्ड मिळाल्यासारखे. त्यामुळे खूप खूप आभार.
बाकी ब्याटम्यानाप्पाचे उगारे आर्टस माझे अगदी खास मित्र. त्यांची पेंटींग अफलातूनच आणि वंशपरंपरागत सुध्दा.
@चौराकाका, एवढा मोठा पन्हा नाही ओ. १०.५ फूट होते कसेबसे पण पेस्टींग करुन देऊ ६० फूट.
@गिल्फुकाका, तुम्ही लिहित रहा एवढे म्हणले तेच समजले ;) तुमच्याएवढे व्यासंगी मला नाही जमणार लिहायला.
पैसातै, अपर्णातै, यशोधरातै, इन्नातै, श्रीयातै या सगळ्या ताया आणि बाकीच्या दादा लोकांचे मनापासून आभार.
पूजाला एक जयविजयची जोडी पाठवून देण्यात येईल. :)

शुचि's picture

3 Feb 2013 - 2:38 pm | शुचि

लेख आवडला.

हे

आहेत का जय विजय?

अभ्या..'s picture

3 Feb 2013 - 5:25 pm | अभ्या..

हो शुचितै असेच असायचे जयविजय पण शैली जरा वेगळी.
हे मी काढलेल्या चित्रात सुध्दा मूळ चित्रातला जो गोडवा आम्हाला जाणावायचा त्याच्या निम्मा सुध्दा नाही. :(
तरी ज्यांना अगदीच माहित नाहीत त्यांच्यासाठी. :)
jayvijay
जयविजय अत्यंत सुंदर आणि अलंकारीक रुपात बार्शीच्या श्री भगवंत मंदिराच्या दरवाजावर तैलरंगात रंगवलेले आहेत. घरावर रंगवलेले साधे आणि कमी अलंकृत असायचे.

भारी बे अभ्या. बार्शीचं कुठलं देऊळ म्हंतोय्स मी नाही बगायला ते, पण मिर्जंला किल्ला भागात एक नरसिंहाचं देऊळ हाये, आता पाडून नविन करायलेत पुन्ना. आदीच्या देवळाच्या भाएरच्या भिंतीवर जयविजय लै मस्त होते. जिल्बी चौकातून फुडं ग्येलो की आधी काशीविश्वेश्वर अन मंग व्यंकोबाचं देऊळ लागतं तिथेही हे जयविजय एग्जॅक्ट सेम फार्म्याटमंदी हैत. भारी बे एकच नंबर, त्यानिमित्तानं जुण्या आटवनी ताज्या झाल्या. :)

प्रचेतस's picture

4 Feb 2013 - 9:39 am | प्रचेतस

हे बघ रे लै जुने असलेले जय विजय
a

भारी रे. त्रिशुंड गणपतीच्या प्रेमात पडलोय आता आपण! :)

प्रचेतस's picture

4 Feb 2013 - 11:39 am | प्रचेतस

खी खी खी.
त्रिशुंड नाय रे हे.
मोरगावचे हे एक अतिशय दुर्लक्षित असे जुने शिवमंदिर आहे.

बॅटमॅन's picture

4 Feb 2013 - 11:53 am | बॅटमॅन

अर्र तेच्या. :P लै भारी बे पण.

दादा कोंडके's picture

3 Feb 2013 - 3:03 pm | दादा कोंडके

पट्टी नाही, मोजमाप नाही, स्केच नाही पण दोन्हीकडेचे जयविजय अगदी मिरर इमेज असायचे.

अगदी खरं. आजुबाजूच्या शुभविवाह लिहिलेल्या घरात बिन्धास्तपणे जाउन आम्ही लहानपणी 'फरक ओळखा' खेळायचो. आणि शेवटी कंटाळून एक या बाजूला उभा आहे आणि एक त्या बाजूला उभा आहे हा फरक सांगत असू. :)

आणि शाळेतून घरी येताना वाटेत पाट्या रंगवणार्‍या पेंटरच्या दुकानासमोर उभं राहून 'स-'र' च्या गाठी गिरवताना बघायला गंमत यायची. क्याड आणि रेडीयम आलं आणि ती मजा गेली. :(

अभ्या अनुभवलेखन जमलय रे पण लेख लै लवकर उरकला
बोल्ले तो मुन्नभाई स्टाईल
"रुम अभी शुरु नै हुवा के लगेच्च खतम हो गया ;)"

ह भ प's picture

3 Feb 2013 - 4:20 pm | ह भ प

जितक्या सहज बासुंदीची वाटी पीत पीत रहातो अन लक्षात येतं की अर्र संपली वाटतं..पण मन तृप्त झालेलं असतं.. अगदी तसं वाटलं.. मस्तच.. बाकी 'जयविजय'चा फटू पायजे व्हता राव..

बार्शीला जीवलग मित्राच्या मामाच्या घरी जाईन तेव्हा नक्की बघेन.. अन तानाजी चौकसुद्धा बघेन.. ;)

प्रभाकर पेठकर's picture

3 Feb 2013 - 4:26 pm | प्रभाकर पेठकर

मस्तं आहे लेखन. शेवट जरा झटपट आटपल्यासारखा वाटला खरा. पण, लेखनातून जो परिणाम साधायचा होता तो साधण्यात यश मिळाले आहे.

वेताळ's picture

3 Feb 2013 - 6:21 pm | वेताळ

एकदम मस्त.... पुर्वी पेक्षा आताच्या काळात अंगभुत कौशल्याला खुप मागणी आहे.पुर्वी आमच्या इथे जे पेंटर काम करायला २० -३० रुपये घेत होते त्याची मुले लॅपटॉप वर काम करतात.मोठमोठी रंगवायची कंत्राटे घेतात.

सस्नेह's picture

3 Feb 2013 - 7:40 pm | सस्नेह

अभ्या लेखनाची कला कधी शिकलास ?

हे लेखन नजरेतून सुटलं होतं. जयविजय हा शब्द आला आणि सगळं मनाला भिडलं. आज्जी हाच शब्द वापरायची, भालदार चोपदार नाही. लेखन फार आवडलं. लेखनाचा शेवट काहीबाही वाटायला लावणारा आहे.

जोशी 'ले''s picture

4 Feb 2013 - 7:47 am | जोशी 'ले'

मस्त रे अब्या साॅरी अभ्या ...छान लिहलय,
जय विजय हे विष्णु च्या दरबाराचे व्दारपाल ना? बहुतेक मंदिरां बाहेर पाहिलिय अशी चित्रे
ते चित्र जरा मुळ लेखात टाकता आलं तर बघ

नगरीनिरंजन's picture

4 Feb 2013 - 8:24 am | नगरीनिरंजन

छानच लिहेले आहे!
अजून येऊ दे.

स्पा's picture

4 Feb 2013 - 9:24 am | स्पा

अमिना,

आवडलं .. मस्तच लिहील आहेस पण लवकर संपवलंस, अजून मोठं चालले असते

सोत्रि's picture

4 Feb 2013 - 9:40 am | सोत्रि

लै भारी बे अभ्या!
भावस्पर्शी, मस्तच.

-(मामाच्या वाड्यावर जयविजय असलेला) सोकाजी

कवितानागेश's picture

4 Feb 2013 - 10:06 am | कवितानागेश

छानच लिहिलय. आवडलं.
अवांतरः आमच्या शाळेत वर्गाबाहेर उभे केलील्या मुलांना जयविजय म्हणायचे. :प

अत्रुप्त आत्मा's picture

4 Feb 2013 - 11:45 am | अत्रुप्त आत्मा

@ मुलांना जयविजय म्हणायचे.>>> =)) आणी मुलिंना काय म्हणायचे??? ;-)

इरसाल's picture

4 Feb 2013 - 5:11 pm | इरसाल

जया-विजया

चावटमेला's picture

4 Feb 2013 - 10:11 am | चावटमेला

छान लेख. सांगलीत लहानपणी गांव भागातील जुन्या वाड्यांच्या दरवाज्यांच्या बाजूला असेच जय विजय पाहिल्याचे आठवतात.विशेष म्हणजे प्रत्येक वाड्याची ष्टाईल वेगळी वाटायची. कदाचित क्लायंट च्या रिक्वायरमेंट नुसार कस्टमाईझ केलेले असतील :)

नि३सोलपुरकर's picture

4 Feb 2013 - 11:30 am | नि३सोलपुरकर

लेखणी पण मस्त चालवतोय की रे (ब्रशचा महीमा पाहिलाच आहे आम्ही) .
छान लिहलेस, आमच्या गल्लीतील जुने वाडे आणी जोडबसवण्णा चौकातील हाटेल आठवले बघ." लस्सीचा ग्लास हातात घेतलेला दिलिपकुमार पासून चहा पिणारा अमिताभ "

ही हाटेलं म्हंजे मेहबुब आणि नंतर आलेलं नकी. खालच्या मजल्यावरुन वर लस्सी घ्यायला बांधलेली लिफ्ट आणि गोल प्लॅस्टिकच्या भांडयात ठेवलेले ७ ग्लास पाणी, मग नंतर चहा आणि क्रिमरोल. आता पण सोलापुरात गेलो की प्रत्येक वेळी तिथं जाउन येतो. आठवणीसाठी धन्यवाद.

अंत्रोळीकरांच्या दवाखान्यासमोर यल्लादासींच्या दुकानात २-२ तास काढलेला मी..

नि३सोलपुरकर's picture

4 Feb 2013 - 3:04 pm | नि३सोलपुरकर

५० भाऊ : एकदम करेक्ट

या एकदा सोलापरात, लस्सी चा सिझन सुरु होतोय टाकूया एखादी चक्कर मेह्बुबला.
बाकी यल्लादासीं बद्दल म्या पामराने काय बोलावे ....गेले ते दिवस

अभ्या..'s picture

4 Feb 2013 - 3:12 pm | अभ्या..

५० दादा, नितिन एकदा सोलापूर कट्ट्याचा गांभीर्याने विचार करा रे. नुसत्या लस्सीचा करु पण कट्टा करू.
बाकी यल्लादासी अजून आहेत, जुन्याच सिग्नेचरने फ्लेक्स छापतात कन्ना चौकात.

नि३सोलपुरकर's picture

4 Feb 2013 - 3:28 pm | नि३सोलपुरकर

अभ्या,
कट्ट्याला माझे पुर्ण अनुमोदन आहे आणी ५० भाऊंनी ठरवल्यास हे जमेल असे वाटते,५० भाऊंनी गांभीर्याने विचार करावा ही विनंती.
बाकी यल्लादासी आहेतच :हो मा़झी थोडीफार ओळ्ख आहे त्यांच्याकडेही चक्कर टाकता येईल.

फेब्रुवारीचा चवथा शनिवार, २३ तारीख सकाळी सकाळी ८ वाजता, श्री. सिद्धेश्वराच्या देवळात भेटु, बोला कोण कोण येणार ते.?

मग सुधा इडली मध्ये इडली आणि मैसुर मसाला खायला जाउ, आणि नंतर मस्का स्लाईस.

अभ्या..'s picture

4 Feb 2013 - 3:44 pm | अभ्या..

बोला कोण कोण येणार ते.?

मी SSSSSSS

नि३सोलपुरकर's picture

4 Feb 2013 - 3:48 pm | नि३सोलपुरकर

मला दुसरा किंवा तिसरा शनिवार/रविवार जमेल.

प्रभो's picture

6 Feb 2013 - 10:58 am | प्रभो

मी पण ट्राय करतो :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Feb 2013 - 11:15 am | विश्वनाथ मेहेंदळे

पुरेसे आधी न कळवल्याने येऊ नाही.

टुल्ली

एक जयविजयची जोडी पाठवून देण्यात येईल........छान आहेत हो ि च त्र ...आम्हाला पण मिळाली तर आनंदी आनंद!! फार आवडलं लेखनही ,...........

गणामास्तर's picture

4 Feb 2013 - 12:07 pm | गणामास्तर

मस्त रे..लहानपण आठवले.
तुझ्याकडे कुठल्या घराच्या भिंतीवर रंगवलेले जयविजय असतील तर फटू टाक ना.

आनंद घारे's picture

4 Feb 2013 - 2:54 pm | आनंद घारे

पट्टी नाही, मोजमाप नाही, स्केच नाही पण दोन्हीकडेचे जयविजय अगदी मिरर इमेज असायचे.
संगणकाने हे काम आता अगदी सोपे केले आहे.
लेख थोडक्यात पण छान आहे. जय विजय, भगवंताचे दशावतार आणि गजेन्द्रमोक्षाची कथा यांच्यात काही तरी कनेक्शन आहे. कोणी ते सांगू शकेल का?

तर्री's picture

4 Feb 2013 - 3:26 pm | तर्री

जबरी आवडले .

विसुनाना's picture

4 Feb 2013 - 4:07 pm | विसुनाना

लै लांबड लावली न्हाई ते बरं झालं.
रोल रिव्हर्सलचा शेवटी असा कंडका पाडल्यानं कथेचा हिसका बसला.

कथा आवडली.

विसुनाना's picture

4 Feb 2013 - 4:17 pm | विसुनाना

लहानपणी वाड्याच्या दरवाजाच्या बाजूंना हे उभे असत.
jay vijay

अभ्या..'s picture

4 Feb 2013 - 4:30 pm | अभ्या..

विसुनाना धन्यवाद.
रोल रिव्हर्सल. अगदी हेच.
आणि योगायोग बघा साधन सुध्दा मिळाले मिरर इमेजचेच. जयविजय.
तुम्ही खाली दिलेलेच चित्र अगदी.

निवेदिता-ताई's picture

4 Feb 2013 - 6:39 pm | निवेदिता-ताई

आम्च्या इथेही राममंदिरात पाषाणाचे जयविजय उभे आहेत.......

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Feb 2013 - 6:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या, पहिलं वाहिलं लेखन मस्त झालंय. कमी शब्दात पेंटरची आयुष्य डोळ्यासमोर उभं राहीलं.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

थोडं लिहायचं पण मस्त लिहायचं.

-दिलीप बिरुटे

मालोजीराव's picture

4 Feb 2013 - 6:59 pm | मालोजीराव

|| अंबरीश वरद श्री भगवंत ||

सिद्धार्थ ४'s picture

5 Feb 2013 - 2:04 am | सिद्धार्थ ४

वाचून एकदम मामाच्या वाड्यात समोर उभा आहे असे वाटत होते. (बार्शी माझे आजोळ, बार्शी मधले एकदम मोठे प्रस्थ) आता मामा हि नाही, आजोबो आणि मोठी आई हि राहिली नाही. माझी आई गेल्या वर तर बार्शी आता २/३ वर्षातून एकदा जातो. बालपणी संपूर्ण एप्रिल आणि मे बार्शीला पडीक असायचो. रात रात भर सायकल भाड्यानी घेऊन फिरवणे, त्राक्टेर, बैलगाडी तून शेतावर जाणे... गेले ते दिन गेले. :(

पिवळा डांबिस's picture

5 Feb 2013 - 2:36 am | पिवळा डांबिस

अभ्याभाऊ, तुमचं लेखन आवडलं.
तुमच्या लिखाणातला नायक बँकेतल्या साहेबाचा मुलगा झाला जयविजय काढणारा, आणि पेंटरचा मुलगा झाला पतसंस्थेत काम करणारा...
नशिबाचा खेळ!!!

अभ्या..'s picture

5 Feb 2013 - 2:44 am | अभ्या..

पिडाकाका तो नायक मीच. :)
फरक इतकाच की अडाणी असून तो रंगाच्या तीन चार वाट्या आन तीन ब्रशात हे सारं उभं करायचा.
मला त्यासाठी ५ वर्षाची डीग्री, दोन तीन डिप्लोमा करुन एक फ्लेक्स प्रिटींगचं युनिट टाकावं लागलं.

ए अब्या ... पिडाकाका नाहित ते ..
पिं पिं लिहि ... पि वर अनुस्वार ... पिंडा ...
पिंडा काका .......

कैपण लिवतो .... :-/ केस केली मग ???? :-/

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Feb 2013 - 11:20 am | विश्वनाथ मेहेंदळे

डां डां लिहि ... डा वर अनुस्वार ... पिडां ...

कैपण लिवते .....

अभ्या..'s picture

5 Feb 2013 - 2:55 am | अभ्या..

पूजा
प्राजुतैने काका केलेल्या पिडाकाकांचे एकेक जबरी प्रतिसाद न लेखन वाचूनच तर मी मिपावर आलेलो आहे.
त्यांचे नाव चुकायचे नाही माझ्याकडून. चुकले तरी ते केस करणार नाहीत.
अजून दोन दिवस त्यांच्याच देशात आहेस. तूच सांभाळून राहा.

जेनी...'s picture

5 Feb 2013 - 3:05 am | जेनी...

अरे हो रे माझच चुकलं :(
मी त्यांना पिंडाकाकाच म्हणायची ... :(
सॉरी हं काका ... :(

नंदन's picture

5 Feb 2013 - 2:57 am | नंदन

लेखन आवडलं. पिडांकाकांनी म्हटल्याप्रमाणे कामांची झालेली 'मिरर इमेज' अदलाबदल आणि पिढ्यानपिढ्या हे बदल तटस्थपणे पाहणारे जय-विजय हे नेमक्या शब्दांत उतरले आहे.

प्रभो's picture

6 Feb 2013 - 10:58 am | प्रभो

भारी रे!

रुमानी's picture

6 Feb 2013 - 11:39 am | रुमानी

छान झालाय लेख आणि जयविजय हि
आवडले.

नाना चेंगट's picture

6 Feb 2013 - 11:49 am | नाना चेंगट

लेखन आवडले.

फार उत्कृष्ट लिहीलं आहेस रे. आणि गुंडाळल्यासारखं काही नाही. या लिखाणाच्या काँपॅक्टनेसमधेच सगळी ताकद आहे..

आता खफ आणि प्रतिक्रियांसोबत असेच उत्तम धागेही लिहायला लागावे ही विनंती..

अभ्या..'s picture

6 Feb 2013 - 7:35 pm | अभ्या..

गविराज, आपण विनंती करुन लाजवू नये. तुमच्या प्रतिसादाची वाट बघत तर हा धागा १०० वेळा उघडला असेल.
कौतुलाबद्दल अत्यंत आभार. :)
गेलं वर्षभर खफ खरडून हा एक धागा लिहिला आहे, हेच प्रमाण कायम ठेवण्यात येईल असे मी वचन देतो. ;)
.
तरीही सर्व जेष्ठश्रेष्ठ मिपाकरांनी कौतुक केले, प्रतिसाद दिले, नवीन माहिती शेअर केली याबद्दल सर्वांनाच खूप खूप धन्यवाद. :)

यशोधरा's picture

7 Feb 2013 - 5:08 pm | यशोधरा

अभ्या, मला वाटलं मात्र हं शेवट थोडासा गुंडाळल्यासारखा. एकदम वाचता वाचता अचानक संपल्यासारखं वाटलं मला. :) तुझी लिहिण्याची पद्धत एकदम सुरेख आहे, समोर बसून गप्पा केल्यासारखी, लिहित रहा म्हणजे अजून खुलत जाईल लिखाण.

लिखाण मस्त वाटलं म्हणून आवडलेलं आणि थोडं फार खटकलेलंही म्हणून मुद्दाम सांगितलं, टीका नव्हे ती. तसे घेऊ नयेस, ही विनंती :)

अभ्या..'s picture

7 Feb 2013 - 5:24 pm | अभ्या..

अर्थात यशोतै, तुम्ही सांगितलेले अर्थातच खटकलेले नाही मला. उलट इथल्या प्रत्येक प्रतिसादातून मला आपुलकीच जाणवलेली आहे. अनुभव, सराव आणि शब्दसंग्रह कमी पडतो माझा हे मला पण कबूल आहे. अजून बरेच लिहायची गरज आहे तेंव्हा कुठे संपवायचं आणि कसं संपवायचं हे कळत जाईल. अशा प्रतिसादाचा तोच तर फायदा होइल.
एखादी गोष्ट लवकर संपू नये असे वाटणे ही सुध्दा छानच प्रतिक्रिया आहे माझ्यासाठी. तेंव्हा थँक्स अ लॉट्ट :)

यशोधरा's picture

7 Feb 2013 - 5:38 pm | यशोधरा

गुड, छान वाटलं तुझी पोस्ट वाचून :) उगाच हस्ते परहस्ते (की पोस्टी, परपोस्टी? :P ) गैरसमज नको म्हणून सांगितले :) पुढील लिखाणाची वाट बघते.

आटोअपशीर आणि म्हणुनच दिर्घकाळ लक्षात लाहिल असे लेखन.
उगाच ड्वायलागबाजी टाळलीत त्ये ब्येस केलेत!

साबु's picture

7 Feb 2013 - 5:50 pm | साबु

आयला...अभ्या एका रात्रीत स्टार झाला की...सगळ्या मान्यवरानी कौतुक केलय.लिखाण आवडले हे वेगळे सान्गणे न लगे.
बाकी जय्-विजय ची एक कथा ऐकण्यात आली की.. हे विष्णुचे द्वारपाल ..कधीकाळि कोण्या एक रुषीला ह्यानी विष्णुकडे जाउन दिले नाही म्हणुन त्याने ह्याना शाप दीला की तुम्हाला विष्णुचा सहवास मिळ्णार नाही...त्यानी क्षमा याचना केल्याव्र उशाप दिला कि तुम्हि तीन युगे विष्णुचे शत्रु व्हाल व सदैव त्यच्या जवळ जायचा प्रयत्न कराल..
म्हणुन ते रावण्-कुम्भकर्ण, कन्स्-शिशुपाल आणि हिरण्यकश्यपु- ? म्हणून जन्माला आले आणि विष्णुला भेटण्यासाठी निरनिराळ्या कारवाया करत राहिले...

म्हणजे हे सगळे आधीच ठरले होते...पुर्वनियोजित होते..

बोका-ए-आझम's picture

30 Oct 2015 - 12:09 am | बोका-ए-आझम

हे पहिलं लिखाण आहे? एकदम मातब्बर आहे. मस्तच!

रातराणी's picture

30 Oct 2015 - 8:12 am | रातराणी

मस्त लिहिलय! आवडलं!

शिव कन्या's picture

31 Oct 2015 - 12:28 am | शिव कन्या

कालौघात नाहीसे होऊ पाहणारे, मुलतानी मातीच्या पार्श्वभूमी वरचे जयविजय हुबेहुब उभे केलेत.
पेंटर चुटपूट लावून गेला.

शिव कन्या's picture

31 Oct 2015 - 12:29 am | शिव कन्या

कालौघात नाहीसे होऊ पाहणारे, मुलतानी मातीच्या पार्श्वभूमी वरचे जयविजय हुबेहुब उभे केलेत.
पेंटर चुटपूट लावून गेला.

हेमंत लाटकर's picture

1 Nov 2015 - 3:13 pm | हेमंत लाटकर

मस्तच रे अभ्या. हाताने काढलेले स्केचेसचा धागा काढ. आम्हाला तुझ्यातला चित्रकार कळेल.

आज आपल्या एका मिपाकराच्या लग्नघरावर मी काढलेले जयविजय लागले.
j

कोल्लापूर? त्योच का त्यो? ओळखीचं घर वाटत आहे.
अभिनंदन रे!