किल्ले शिवनेरीचे दु:ख ...

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
28 Jan 2013 - 8:46 pm

--

-


--

--

पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे शिवनेरी किल्ला आहे.
हा किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान.

अगदी अलिकडेपर्यंत सारे ठीक होते.
शिवनेरी किल्ला घनदाट जंगलाने वेढलेला होता
वरून येणार्‍याला खालून चढणारा मनुष्य दिसू नये इतकी दाट झाडी होती

जुन्नरकडून वडजकडे किल्ल्यासमोरून जाणारा जो एस टी चा रस्ता आहे तिथपासून शिवनेरीचे तारेचे कुंपण सुरु होत असे.
या काळात बिबट्याचा वावर इथे असे. जागोजागी तशा पाट्याही लावलेल्या असत.

या काळात शिवनेरी किल्ल्याला एक शान होती.

पुढे काय झाले कुणास ठाऊक. शिवनेरीची ही तारेच्या कुंपणाची हद्द कमी करण्यात आली.

शिवनेरीला आत ढकलण्यात आले.

भोवतीचा सगळा चढ सपाट करण्यात आला. प्लॉट पाडण्यात आले.
बंगले उभे राहू लागले, हॉटेले उभी राहीली. या हॉटेलांमधे हिंदीतले मोठमोठे स्टार्स कामानिमित्त निवास करू लागले.
उरलेल्या रिकाम्या प्लॉटवर मालकांनी आपल्या नावाचे बोर्ड लावले.

शिवनेरीवर येणार्‍या डोळस लोकांची संख्याही बहुधा कमी झाली. कुणालाच शिवनेरीचे हे विद्रुपीकरण खुपेना,
कुणालाच शिवनेरीचे तोडलेले लचके दिसेनात.

शिवनेरीलाही एक ऐट आहे, त्यालाही एक सौंदर्य आहे.

किल्ल्यासमोर उभे राहीले की ते नजरेत भरते.

पण

या विद्रुपीकरणानंतर शिवनेरीचा एक आख्खाच्या आख्खा फोटो घेणे मुश्कील होऊ लागले आहे.
या इमारती आणि हॉटेले मधे येतात.

सोबत काही फोटो दिलेले आहेत. ज्यांनी शिवनेरी सुस्थितीत असताना पाहीला आहे
त्यांना आत्ताच्या स्थितीचे गांभीर्य लक्षात येइल.
(ज्याला खरेच आस्था आहे त्याने प्रत्यक्ष जाऊन पाहावे म्हणजे नीट कल्पना येइल.)

- एक शिवप्रेमी मावळा

मांडणीविचार

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

28 Jan 2013 - 9:06 pm | यशोधरा

आई गं :(

महेश हतोळकर's picture

28 Jan 2013 - 9:09 pm | महेश हतोळकर

शिवनेरी काढा आणि इतर कोणतेही नाव घाला. लेखातील एक अक्षरही बदलायची गरज पडणार नाही.

मुक्त विहारि's picture

28 Jan 2013 - 9:11 pm | मुक्त विहारि

आणि कूणाकडे दाद मागणार?

आजानुकर्ण's picture

28 Jan 2013 - 9:16 pm | आजानुकर्ण

फारच वाईट. शिवनेरीचाही पन्हाळा होत आहे. :(

अग्निकोल्हा's picture

28 Jan 2013 - 9:50 pm | अग्निकोल्हा

मुंबैत हेरिटेजची जि अवस्था आहे ते बघता बघता आता सगळ्या जाणिवाच सुन्न पडल्यात असं वाटतं.

आशु जोग's picture

28 Jan 2013 - 10:40 pm | आशु जोग

कुणाला काही माहीत असेल, जाणवले असेल तर बोला

सगळीकडे असेच आहे हे ऐकण्यासाठी नव्हे तर शिवनेरीबाबत जाणीव व्हावी

आणि त्या संदर्भात जाणकारांचे काही मार्गदर्शन मिळावे यासाठी काही हा धागा लिहीला आहे

आशु जोग's picture

28 Jan 2013 - 11:21 pm | आशु जोग

एक गोष्ट ध्यानात घ्यावी
पहील्या फोटोमधे या बिल्डींगा होत आहेत त्या शिवनेरीभोवती नसून शिवनेरीच्याच भागावर किंवा चढावर होत आहेत.
आजूबाजूचा सगळा भाग सपाट आणि अचानक किल्ला जमिनीला काटकोनात असे होत नाही

या लोकांनी बाजूचा भाग अगदी सपाट केला आहे

कसा करता येइल या लोकांना दंड !

यशोधरा's picture

29 Jan 2013 - 9:11 am | यशोधरा

कुंपणच शेत खात आहे अशी परिस्थिती आहे. त्या त्या भागातील राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय आणि त्यांचेही लागेबांधे असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नसाव्यात. वर्तमानपत्रांमधून देता येईल. एखाद्या चॅनेलने जर प्रकरण लावून धरले तर थोडाफार आवाज होईल.

स्पंदना's picture

29 Jan 2013 - 8:59 am | स्पंदना

तुमची तळमळ कळली.
पण इथे धाय मोकलुन रडलं तरी कुणी ऐकायला उरलं नाहीय्ये! कुणाला सांगायच? हॉटेलवाला म्हणणार कार्पोरेटरला विचारा, अशी लांबच्या लांब रांग लागेल या भ्रष्टाचार्‍यांची. मला वाटतय एक करता येइइल. वर्ल्ड हेरीटेज जस असत तस शिवराय हेरीटेज व्हावं म्हणौन रान उठवता येइइल का?

आशु जोग's picture

29 Jan 2013 - 11:56 pm | आशु जोग

aparna akshay

तुम्ही म्हणता तसे रान उठवता येइल,
शिवनेरीला धक्का लावलेला आम्हाला सहनच होत नाही

चुकीची,मुर्खपणाची पण दुसरी बाजु मांडायचा दुबळा प्रयत्न समजा, उगा भांडायला येवु नये.

जर महाराजांच्या विचारांना आज कुणी किंमत देत नाही, त्यानुसार चालत नाही,त्यांचा आणि त्यांच्या विचाराचा, त्यांचा तसबिरीचा उपयोग मुठभर लोकांची तुंबडी भरणा-या राजकारणासाठी होतो आहे, तर मग वस्ती योग्य जागेची वणवण असताना, गेलाबाजार २-४% लोकांकरिता किमती मौल्यवान व अमुल्य जागांचं अशा पद्धतीनं वस्तियोग्यकरण होत असेल तर त्यात फार काही वावगं आहे का ?

उगा युरोप्,अमेरिकेचे,रशिया,चीनचे दाखले देउ नयेत, त्यांचे प्रश्न वेगळे त्यांची उत्तरे वेगळी असणार आहेत.

राज्यस्थानातले जुने किल्ले आणि राजवाडॅ, व्यावसायिक तत्वावर हॉटेल म्हणुन चालवले जातात तेवढेच ठिक तग धरुन आहेत. इथलं माहितीतलं उदाहरण जाधवगढ, सासवडजवळ.

आशु जोग's picture

29 Jan 2013 - 11:57 pm | आशु जोग

५० फक्त

हवेतल्या गप्पांपेक्षा एकदा पाहून या, विचार करा !

विटेकर's picture

29 Jan 2013 - 3:31 pm | विटेकर

आशु .
खरतरं सगळ्या जगण्यावरच विकृतीचा हल्ला झालाय ... कुठे कुठे आणि कशा कशाची दाद मागणार ?
होईल .. या ही गोष्टीची सवय होईल !
असले सारे वि़कृतीकरण " इंडियात " होते .. भारतात नाही असे म्ह्ट्ले की सारे चवताळून अंगावरच येतील.

आशु जोग's picture

29 Jan 2013 - 11:53 pm | आशु जोग

तोच तर प्रॉब्लेम आहे ना !

आम्हाला नाही ना सवय होत असल्या गोष्टींची

आणि

स्वस्थही नाही बसवत.

धन्या's picture

30 Jan 2013 - 12:42 am | धन्या

तुमची कळकळ/हळहळ/तळमळ समजण्यासारखी आहे. परंतू हे सारं मिपावर व्यक्त करुन काय मिळणार? अजून चार लोक तुमच्या कळकळ/हळहळ/तळमळ करण्यात सामिल होतील. पुढे काय?

तुम्ही म्हणताय तसे रान उठवायचे असेल तर ही चुकीची जागा आहे. :)

चला, माझी आता उत्तरायणमधील "रान हे उठले उठले, मुक्त आभाळ झाले" हे गाणं ऐकायची वेळ झाली आहे.

टवाळ कार्टा's picture

30 Jan 2013 - 1:43 am | टवाळ कार्टा

:(

मोठे विद्रूप दृष्य आहे. डोळ्याना आणि मनाला त्रास होतो. पण मला प्रश्न पडतो- एरवी मोठ्या मोठ्या गप्पा मारत मोठा शिवप्रेमाचा उमाळा आणणारे ते हरामखोर संभाजी "बी" ग्रेड वाले किंवा पुरुषोत्तम खेडेकर प्रभृति मराठा महासंघवाले आता कुठे गेलेत? आता हाणा म्हणावं ही घरं बांधणार्‍या लोकांच्या डोक्यावर काठ्या.

अमोल केळकर's picture

30 Jan 2013 - 9:57 am | अमोल केळकर

आपले नशीब अजून गडावर इमारती झालेल्या नाहीत

अमोल केळकर

हा प्रश्न मोठा गंभीर आहे नि तो भावनिक देखील आहे

शिवाजी महाराजांचे केवळ नाव वापरून राजकारण करणार्‍यांना दूरच ठेवायला हवे.

बदलत्या काळानुसार सर्व काही जैसे थे राहील अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. तरीसुद्धा होणार्‍या बदलात काही तारतम्य असावे.
जो समाज आपला इतिहास विसरतो, त्याचे अधःपतन होते असे म्हणतात.
आपला हा अनमोल ऐतिहासिक ठेवा जतन करणे जरूरी आहे.

यावरून आठवले : प्रतापगडावरची अफजलखानची कबर खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली जाते.. परंतु पाचाड गावात असलेली जिजाऊंची समाधी अति वाईट अवस्थेत आहे.

> जो समाज आपला इतिहास विसरतो, त्याचे अधःपतन होते असे म्हणतात

खरे आहे

विद्रूपीकरण थांबले पाहीजे