Skip to main content

वांग्याचे भरीत... (खांदेशी)

लेखक योगिता_ताई यांनी बुधवार, 02/07/2008 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्य : हिरवी मोठी वांगी - ४ जाड मिरच्या - ५ ते ६ (चवीनुसार) लसुण पाकळ्या - ८ ते १० कांद्याची पात बारीक चिरुन - १ वाटी शेंगदाणे - १ मुठ खोबरे काप - आवडीनुसार कोथिंबीर - बारीक चिरुन आवडीनुसार तेल तळण्यासाठी फोडणी साठी - ओवा, मोहरी मीठ चवीनुसार कृती : प्रथम वांग्यास बारीक छेद देवुन गॅसवर खमंग भाजुन घ्यावेत. भाजलेली वांगी गार झाल्यावर त्याची साले व देठे काढुन घ्यावीत. वांग्याचा गर चांगला स्मॅश करुन घ्याव्या. मिरच्या कढईत थोडे तेल गरम करुन खमंग भाजुन घ्याव्यात. भाजलेल्या मिरच्या, कोथिंबीर, लसुण पाकळ्या एकत्र जाडसर भरडुन ठेचा करुन घ्याव्या. कढईत २ डाव तेल गरम करुन त्यात ओवा व मोहरीची फोडणी करावी. त्यात शेंगदाणे व खोबरे काप खमंग तळुन घ्यावे. त्यात कांद्याची पात घालुन तेल सुटेपर्य॑त परतावे. त्यात मिरचीचा ठेचा व स्मॅश केलेला वांग्याचा गर घालावा. चवीनुसार मीठ घालुन व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे. वरुन कोथिंबीर घालावी. वांग्याचे भरीत तयार!!!!....... हे भरीत गरम गरम पुरी किंवा कळण्याच्या भाकरी बरोबर एकदम झकास लागते.

वाचने 14282
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

वांग्याचं भरीत म्हणजे आमचा वीक प्वाईंट! योगिताताई, सुरेख पाकृ! येऊ द्या अजूनही... तात्या.

पण मी कांदा, कोथिंबिर घालून साधी फोडणी देऊन करते..लसूण, दा. कूट नाही घालत...आता हे ट्राय करेन.... एक्स्पर्ट लोकांनो..अमेरीकेत वांगं भाजायच्या काही ट्रीक्स आहेत का? मी कन्वेंशनल ओव्हन मधे भाजते...पण ते पॅन सॉलीड खराब होतं आणि डिसपोसेबल पॅन घेतलं की ते फाटून तेल खाली गळतं मी हल्ली मेटल पॅन मधे डिसपोजेबल पॅन ठेवून भाजते पण वेळ लागतो फार्....तापमान काय ठेवायचं असतं? मी ३०० ठेवते... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by कुंदन

बरं झालं सांगितलं आता तेच करेन ट्राय करताना... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

मी गेल्याच आठवड्यात एका मित्राकडे वांगी आउटडोअर ग्रिलवर (कोळश्याच्या) भाजलेली पाहिली, मस्त वासही लागतो कोळश्याचा. विद्युत ग्रिलवर देखील चांगली भाजता येतील असं वाटतं.

In reply to by बहुगुणी

चिकटली नाहीत का ती ग्रील ला? अख्खं भाजलं की काप करुन? मी तुकडे केलेल्या सगळ्या भाज्या टाकते ग्रील वर पण अख्खं वांगं नाही टाकून पाहिलं कधी... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by वरदा

भाजण्यापूर्वी वांग्याला मस्तपैकी तेलाचा हात लावून डायरेक्ट गॅसवरच भाजायचे. मध्यम आंचेवर आधी तळाकडून भाजत शेवटी देठाकडे भाजावे म्हणजे वांगे फिरवायला सोपे जाते.

In reply to by प्रभाकर पेठकर

पण गॅस नाही ना... इलेक्ट्रीक शेगडी आहे...ती पण सिरॅमिक्...कॉईल सुद्धा नाही.... नुसती दिसायला पॉश पण स्वयंपाक करायला एक्दम थर्ड क्लास.... फुलके पण नाही करता येत्..कंपल्सरी घडीची पोळी खावी लागते....:( "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

खानदेशी वांग्याच्या भरीत - मस्त पाककृती योगिता ताई. धन्यवाद! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

Varda, Me every alternate week bharit karto. Adhi vangyala madun chirto aani tyala gode tel lavto. Conventioal oven madhe jee steel chi plate aste, tyachavar aluminium chi foil lavun, vangyacha sapat bhag khali karun tyavar thevto. Conventional oven che temperature 450 C var thevto, va madhun madhun vange shijle ki nahi te pahato. Generally 15-20 minute lagtat. Oven var avalambun aahe. Ya regular microwave oven madhe hi bhajale jatat. Mazyakade GE cha small microwave aahe, tychat 25 minute lagtaat.

In reply to by खादाड_बोका

बोकेराव, प्रतिसाद मराठीत लिहिलात तर मेहेरबानी होईल! आपला, (मराठी) तात्या.

In reply to by खादाड_बोका

मी आता ट्राय करेन नक्की..मीही कन्वेंशनल मधे करुन पाहिलं होतं पण एकतर मेटल चं भांडं असेल तर ते काळं पडतं आणि डिसपोझेबल असेल तर ते फाटून जातं असले उद्योग झाले...पण मी खूप कमी ३००-३५० वर ठेवलं होतं आता ४५० वर ठेवून पटकन झाल्यावर कदाचित प्रॉब्लेम कमी येईल...धन्यु! आता मराठीत लिहायला माझी एक ट्रिक...जसा आपण उच्चार करतो ना तस्संच टाईप करुन पहा...जसं म्हणाल ना जोडाक्षर तसंच जोडून पहा...आणि रोज ४-५ ओळी लिहायची सवय केली की ८ दिवसात नक्की पटापट लिहिता येईल नक्की... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

तात्या प्रयत्न करतो पण खुप वेळा पाहीजे तो शब्द लिहील्या जात नाही. तेव्हा कनटाळुन (|: ईग्रजीचा वापर करणे सोपी जाते. मी मराथी मधे पोस्ट करायचा पुर्ण प्रयत्न करीन. क्शमा असावी ;)

वरदा ताई, अमेरीकेत तुम्ही वांगी भाजु शकत नाही, त्यापेशा आपला भारत चांगला.

In reply to by मी खवय्या

आणि अमेरिका यात आपल्या आपल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत हो दादा...कशाला त्यात शिरा..यावरची चर्चा अगदी चावून चोथा झालेय.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

वाव.............. तोडाला पाणी सुट्ले............................

मस्त झालं पण मी दाण्याचं कूट घातलं. आख्खे शेंगदाणे दाताखाली नाही येत का याची कल्पना आली नाही. माझ्याकडे गॅस आहे त्यावर वांगं अर्थातच व्यवस्थित भाजता येतं. पूर्वी कॉईल होती त्यावर किंवा सिरॅमिक प्लेटवर इंडीयन स्टोरमध्ये फुलके भाजण्यासाठी ग्रील मिळते ते ठेवावे आणि त्यावर वांगे भाजावे. ते ही व्यवस्थित भाजता येतं. मी बरेचदा भरीत करते. चांगलं होतं.

In reply to by प्रियाली

ताई, जसे आपण पोह्यांमध्येही कधी कधी आख्खे शेंगदाणे टाकतो , त्याप्रमाणे या भरीतात पण आख्खे शेंगदाणेच टाकतात. छान लागतात तसेही ...

कधी खायला मिळणार आम्हाला काय माहीत!

वा व्वा...पाकृ वाचके तोंड को पाणी सुट्या... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

पाकृ अतिशय सुंदर. कंवेन्शनल ओवनमध्ये ३५० डिग्रीला साधारण ४०-४५ मिनिटे लागतात. वांग्याला किंचित तेलाचा हात लावायचा आणि छेद देऊन त्यातच काही लसूण पाकळ्या घुसवायच्या. म्हणजे वांग्याबरोबर लसूणदेखिल चांगला भाजून निघतो. आणि छान चव लागते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

योगिताताई, कळण्याच्या भाकरीबद्दल जरा लिहाहो. खुप दुवा मिळेल (मिपा वर आधिच असेल तर क्षमस्व).