कोसला २.०

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
10 Dec 2012 - 11:44 am

पुण्यात शिकायला आल्यावर होणारा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पाठीमागे लागणार व्यक्तिमत्व विकास किंवा पर्सनॅलिटी डेवेलपमेंट नावाच प्रकरण. कुठल्याही ब्राम्हण मध्यमवर्गीय घरातून आलेल्या पोराप्रमाणे माझया पण आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये शाखेवर जाणार्‍या, गर्व से कहो हं हिंदू है वाल्या, आय टि त करीयर करून फॉरिन ला जायची आकांक्षा बाळगणार्‍या आणि जगातील कुठल्याही सर्व चांगल्या गोष्टींबद्दल अपराध गंड बाळगणार्‍या मुलांचा भरणा होता. मी एकंदरच या सगळ्यांनमध्ये मिसफिट होतो.
हिंदू असण्याची लाज जरी नसली तरी अभिमान त्याहून पण नव्हता. आय टि मध्ये जायची इच्छा आणि कुवत पण गैरहजर होति. सगळ्यात महत्वाच म्हणजे कुठलाही अपराधीकभाव नाही आयुष्याबद्दल.आजूबाजूला हा असा सावळा गोंधळ असताना एकटे एकटे वाटणे ही नेहमीचीच गोष्ट. आपण इतरांपासून वेगळे आहोत अशी मनाची समजूत काढण्याचा यशस्वी प्रयत्न मी सुरूवातीला केला. नंतर त्यातला फोलपणा लक्षात आल्यावर तो पण मार्ग खुंटला. अशा मनस्थतीत असताना मला 'तो' भेटला. 'त्याने ' माझे स्वतहचाबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी आश्वासक मदत केली. मुखया म्हणजे 'ऑर्डिनरी' असण्यात काहीही गैर नाही असा दिलासा दिला.

गरवारे कॉलेज मध्ये आर्ट्स ला अड्मिशन घेतल्यावर लवकरच लेक्चर्स आणि लेकाचे प्राध्यापक कुणातच राम नाही हे माझया लक्षात आले . सोबत असणार्‍या इतराना पर्सनॅलिटी लवकर डेवेलप करण्याची घाई असल्याने ते चांगलेचुंगले कपडे घालून कॉलेज ला जात. मी कॉमर्स च्या टुकार पोरांसोबत हॉस्टेलच्या बाहेरच्या बाकवर बसून पोरि बघत असे. अशाच एका रम्य सकाळी अच्युत माझा हात ओढून पुगलीया सरांच्या लेक्चर ला घेऊन गेला. राहुल पुगलीया म्हणजे अफाट माणूस. पोरांमध्ये पॉप्युलर वगैरे वगैरे. अतिशय ओघवती शैली आणि भाषेवरील कमांड ही पुगलीया स्रांची खासियत.मध्येच क्लास चालू असताना त्यानी प्रश्न विचारला , " इथे बसलेल्यापैकी कोसला कोणी वाचली आहे?" एकदोघानि हात वर केले. "बस एवढेच?" पुंगलीया म्हणाले," कॉलेज ला जाणार्‍या प्रत्येकाने कोसला वाचणे महत्वाचे आहे." मग उरलेला तासभर कोसला आखयान चालू होते.कोसला शी पर्यायाने पांडुरंग सांगवीकर शी झालेला हा माझा पहिला हेल्लो.पण हे काही अखेरच नाही.

प्रत्यक्षात कोसला वाचायला मुहूर्त लागला तेव्हा आयुष्यात काही बर चालू नव्हते. बहुदा १८ वा जॉब सोडून मी घरी बसलो होतो. नुकताच एका प्रेमप्रकरणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्या सामन्यत्वाची जाणीव नुकतीच जाणवायला लागली होती.
लो एम इज क्राइम कॉंप्लेक्स मधूनबाहेर पडण्याची धडपड चालू होती. कुठलेही पुस्तक वाचताना किंवा चित्रपट पाहाताना त्यातल्या मुख्य व्यक्तिरेखेशी स्वताहाला आइडेंटिफाइ करण हा मला वाटत कुठल्याही मनुष्यप्राण्याचा स्थायिभाव असावा. मी पण असाच पांडुरंग सांगवीकर शी रिलेट झालो. त्याने असे काही गारुड केले की मी स्वताहला त्याच्याशी खूप आइडेंटिफाइ करायला लागलो. गावात असताना शाळेत शिकत असताना कुणाच्यातरी अनामिक दहशतिखाली गेलेले बालपण, पुण्याला शिक्षणासाठी केलेल बहिर्गमन, तिथे व्यक्तिमत्व मिळवण्यासाठी केलेले हास्यास्पद प्रयत्न, मग सगळ सोडून गावी येऊन एकदम खेडुत बनून राह्ण ह्या सगळ्या मधून मी पण गेलो असल्याने कोसला ही मला माझीच कहाणी वाटायला लागली. पण सगळ्यात महत्वाच म्हणजे कोसला आणि पांडुरंग ने मला घडवलेला आयुष्यातील निरंतन निरर्थकतेचा आणि आपण करत असलेल्या हजारो निरर्थक कृतींचा साक्षात्कार.

आतापर्यंत ज्या कोसला वाचलेल्याशी मी बोललो आहे त्या प्रत्येकाचा कोसलाचा अन्वयार्थ वेगळा आहे. कुणाला ती बहुजन समाजातल्या तरुणाची कथा वाटते, काहीना नेमाडेनची सेमी ऑटो बायोग्राफी तर काहीना चक्क सुहास शिरवालकर टाइप फन्नी कॉलेज स्टोरी वाटते. पण मला विचारल तर कोसला ही आयुष्याच्या निरर्थकतेची कहाणी.पुलनी त्यांच्या विख्यात प्रस्तावनेत म्हणल्याप्रमाणे कितीतरी अन्गानि ही कादमबरि हातात घेऊन खेळवावी. पण ही खरच आयुष्याच्या खानेसुमारीची कहाणी. पिढ्या न पिढ्या या निरर्थकतेच्या चक्रात झिजल्या. आपणही त्या चक्राचाच एक हिस्सा.

कोसला नंतर कमलेश वालावलकरच 'बाकी शून्या' वाचल. कोसलाचा प्रचंड प्रभाव असल्याने ते पण आवडल. माझया काही आवडत्या ब्लॉग पैकी एक म्हणजे अभिजीत बाठे चा ब्लॉग. त्यावर पण कोसला चा न पुसता येणारा ठसा. कोसला ने सगळाच प्रभावित केल. भावी आयुष्यातल्या आवडी निवडी पण. अजुन एक मजेशीर योगायोग म्हणजे कोसला मध्ये रमी जबलपुर ची असते आणि माझी बायको पण जबलपुर ची. आहे की नाही कमाल.

मला वाटत पांडुरंग सांगवीकर ही प्रवृत्ती आहे. आता पण फेस बुक वर गेलो की अनेक पांडुरंग सांगवीकर स्टेटस अपडेट करताना दिसतात. पांडुरंग आयुष्याच काय करायच हे ना उमजून पुढच आयुष्य खेडुत होऊन जगला, आम्ही या वैश्विक खेड्यात जगत् आहोत हाच फरक.

आता मी उदाहरणार्थ ३० वर्षाचा आहे. नौकरी, संसार, जबाबदार्या, समाज नावाच्या या जनावराशी रोज होणारा संघर्ष आणि मी 'सामान्य' आहे ही सालणारी भावना यानी मला पांडुरंग सांगवीकर च्या अजुन जवळ नेऊन सोडल आहे.ज्या अच्युत ने मला पुग्लीया च्या लेक्चर ला ओढत नेले होते तो आता आदिवासी पाड्यांवर काम करत आहे. पुग्लीया नि पण मध्यंतरी काही नंदुरबार च्या आदिवासी मूलाना स्वतःच्या घरी शिक्षण देण्यासाठी आणले. आणि मी? मीच तर आहे तो नेमाद्याचा शंभरातील ९९ मधला एक.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

इरसाल's picture

10 Dec 2012 - 11:58 am | इरसाल

साठी जागा राखुन ठेवत आहे.विचार काहीशे न पटणारे आहेत माझे कोसलाबाबत म्हणुन नंतर लिहीन.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Dec 2012 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार

पुंगलीया म्हणाले," कॉलेज ला जाणार्‍या प्रत्येकाने कोसला वाचणे महत्वाचे आहे."

हे वाचले आणि ड्वाले पाणावले.

तुमच्या सरांना आमचे शतशः प्रणाम.

प्रामाणिक मत :- " कॉलेज ला जाणार्‍या प्रत्येकाने 'दुनियादारी' वाचणे महत्वाचे आहे." असे आमचे प्रामाणिक मत आहे. बाकी 'बाकी शून्य' वैग्रे पेक्षा 'हैदोस' आणि 'गावरान मैना' वैग्रे जास्ती उत्तम सहित्य आहे असे देखील आमचे एक मत आहेच.

तुमच्याशी बाडिस व्हायची वेळ आलीच! सुशि आणि दुनियादारी काॅलेजात तर मस्टच. पण नंतरही कधीही मस्तच.

छोटा डॉन's picture

10 Dec 2012 - 1:16 pm | छोटा डॉन

प्रतिसादकाच्या 'बाकी शुन्य' च्या मताबद्दल असहमत.
लेखकाचा 'कोसला'बद्दलच्या मताबद्दल सहमत.

लेखकाला एक अनाहुत सल्ला, तुम्हाला 'कोसला' आवडले आहे आणि त्याने तुमच्यावर प्रभाव सोडला आहे असे वाटत असेल तर नेमांड्यांची पुढची पुस्तके वाचायला घ्या. 'चांगदेव चातुष्ट्य' म्हणजे उदारणार्थ महान आहे.
'हिंदु' बाबत तर बोलायलाच नको, आवश्य वाचा ...

- (नेमाड्यांचा फ्यान) छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

10 Dec 2012 - 2:51 pm | परिकथेतील राजकुमार

का आहे ते खुलासेवार वाचायला आवडेल.

छोटा डॉन's picture

10 Dec 2012 - 3:47 pm | छोटा डॉन

ओके ?
तुम्हाला खुलासेवार वाचायचे आहे का ? तूर्तास आम्ही 'बाकी शुन्य' का उत्तम आहे हे अगदी खुल्लासेवार लिहु, तसेही गेले २-२.५ वर्ष ते आमच्या अजेंड्यावर आहेच. ह्यानिमित्ताने ते कामही पुर्ण होऊन जाईल.
बाकी इतर पुस्तकांशी आमचा परिचय नाही, त्यामुळे तुलना जमणार नाही, क्षमस्व ;)

- (अ-तौलानिक) छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

10 Dec 2012 - 3:51 pm | परिकथेतील राजकुमार

आश्वासनक क्रमांक ब/१८/५/३७ १९९८७३४३२५९०३३४ बद्दल धन्यवाद.

बाकी आपण ज्यात लेखन करता त्याच पुस्तकांचा परिचय नाही म्हणता? ह्याला विनय म्हणावे का प्रसिद्धिपरा.ड््मुखता?

छोटा डॉन's picture

10 Dec 2012 - 3:59 pm | छोटा डॉन

आपले म्हणणे आम्हास निटसे समजले नाही, 'बाकी शुन्य्'बद्दल आम्ही काही काळापुर्वी (कदाचित ३-४ वर्षे झाली असावीत) एकदाच वट्टात भरमसाट लिहले होते, त्यानंतर लेखणी उचलल्याचे आठवत नाही.
बाकी आपण ज्या पुस्तकांचा उल्लेख करत आहात त्यांची नावे मी आत्ता इथे पहिल्यांदा वाचली, त्यामुळे ती पुस्तके वाचण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ( त्यात लेखन करणे शक्य आहे असे तुम्ही लिहले आहे त्याअर्थी ती ओपन बुक्स आहेत का अशी चौकशी करतो).

बाकी आश्वासन क्र. वगैरे मध्ये जोक होता का ? असल्यास मला समजला नाही. धन्यवाद

- छोटा डॉन

मालोजीराव's picture

10 Dec 2012 - 3:33 pm | मालोजीराव

'बाकी शून्य' वैग्रे पेक्षा 'हैदोस' आणि 'गावरान मैना' वैग्रे जास्ती उत्तम सहित्य आहे असे देखील आमचे एक मत आहेच.

प्रचंड अनुमोदन !

-अतिथी संपादक ;)

बॅटमॅन's picture

10 Dec 2012 - 3:55 pm | बॅटमॅन

नव्या युगातील मचाकला या हैदोस वैग्रेंच्या यादीतून वगळलेले पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Dec 2012 - 4:08 pm | परिकथेतील राजकुमार

मचाकची छापील आवृत्ती निघत नाही.
धन्यवाद.

हो माहिते ना ;) तशी तर मिपाची तरी कुठे निघते म्हणा! पण छापील साहित्य विरुद्ध आंजा साहित्य असा फाटा निगंल म्हणून आता गाऽप् चिप् बस्तो आप्ला =))

संजय क्षीरसागर's picture

10 Dec 2012 - 12:13 pm | संजय क्षीरसागर

हे क्रमशः आहे का?

लिहित रहा.

रुपल's picture

10 Dec 2012 - 1:17 pm | रुपल

:) .. छान लिहिला अहेस.

सोत्रि's picture

10 Dec 2012 - 3:23 pm | सोत्रि

सुंतर! झक्कास!!
पुलेशु
-(कोसला १.५) सोकाजी

कवितानागेश's picture

10 Dec 2012 - 3:57 pm | कवितानागेश

मला वाटत पांडुरंग सांगवीकर ही प्रवृत्ती आहे. आता पण फेस बुक वर गेलो की अनेक पांडुरंग सांगवीकर स्टेटस अपडेट करताना दिसतात. पांडुरंग आयुष्याच काय करायच हे ना उमजून पुढच आयुष्य खेडुत होऊन जगला, आम्ही या वैश्विक खेड्यात जगत् आहोत हाच फरक.>
सहमत. :)
मला कोसला आणि बाकी शून्य पुन्हा वाचावे लागेल असे दिसतय, मी सोडून बाकी सगळ्यांना या दोन्हीत साम्य आढळतय! 'बाकी शून्य'चा इम्पॅक्ट खूप जास्त होतो.
असो.
माझे वैयक्तिक मत मात्र अजूनही असेच आहे, की 'निरर्थक' काहीच नसतं... आपण निर्मळ दृष्टीच्या अभावामुळे 'अर्थ' बघू शकत नाही.

माझे वैयक्तिक मत मात्र अजूनही असेच आहे, की 'निरर्थक' काहीच नसतं... आपण निर्मळ दृष्टीच्या अभावामुळे 'अर्थ' बघू शकत नाही.

माझे वैयक्तिक मत असे, की सार्थ-निरर्थक या गोष्टी सापेक्ष आहेत :) असो.

कवितानागेश's picture

10 Dec 2012 - 4:20 pm | कवितानागेश

सेम पिंच!
म्हणूनच माझे वैयक्तिक (सापेक्ष) मत असे आहे की माझी वैयक्तिक मते अर्थपूर्ण आहेत आणि त्यापलिकडली मला न पटणारी ( पक्षी: न कळणारी!) मते निरर्थक आहेत. :D

बॅटमॅन's picture

10 Dec 2012 - 5:09 pm | बॅटमॅन

म्हणूनच माझे वैयक्तिक (सापेक्ष) मत असे आहे की माझी वैयक्तिक मते अर्थपूर्ण आहेत आणि त्यापलिकडली मला न पटणारी ( पक्षी: न कळणारी!) मते निरर्थक आहेत.

याच्याशी मात्तर पूर्ण सहमत!!!

पिंपातला उंदीर's picture

10 Dec 2012 - 4:01 pm | पिंपातला उंदीर

प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. मी मिसळ्पाव चा जुना वाचक. परिकथेतला राजकुमार, छोटा डॉन, सोत्रि हे माझे काही आवडते पोस्टर्स. त्यांच्या प्रतिक्रिया बघून आनंद झाला. चुका पोटात घातल्या जातील ही खात्री. : )

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Dec 2012 - 10:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

खरच पांडुरंग सांगवीकर ही व्यक्ति नसुन एक अस्वस्थ करुन सोडणारी विचारधारा आहे. कादम्बरी चा एक विशिष्ट असा अर्थ अजिबात निघत नाही. जसा तुमचा द्रुश्तिकोन असेल तसे अनेक अर्थ त्यतुन निघत जातात.

अर्धवटराव's picture

11 Dec 2012 - 10:31 am | अर्धवटराव

पु.ल. आमचे दैवत असण्याचे हे आणखी एक कारण. आपण सामान्य असण्याचा न्युनगण्ड तर सोडाच, उलट ते सेलीब्रेट करणं शिकवलं आमच्या गुरुदेवांनी. आपण कसेही असलो तरी एकमेवाद्वितीय आहोत, हे विश्व आपल्याशिवाय अपूर्ण आहे, व सामान्यत्व बहाल झाल्यामुळे विश्वाकार होणे प्रचंड सुलभ होतय या जाणिवा इतक्या एक्सायटींग आहेत कि ज्याचं नाव ते.
जय हो.

अर्धवटराव

पैसा's picture

12 Dec 2012 - 10:14 pm | पैसा

कथनातल्या पुस्तकांबद्दल प्रचंड प्रमाणात मतभेद असू शकतात. पण तुमचं स्वच्छ आत्मकथन आवडलं.

दादा कोंडके's picture

20 Dec 2012 - 4:33 pm | दादा कोंडके

मला सुद्धा 'कोसला' आणि 'बाकी शुन्य' खूप आवडलं होतं. क्वालेज लाईफ सुरू झाल्या-झाल्यात वाचलं होतं. खरं तर, एव्हड्या गुणी आणि हरहुन्नरी लोकांचे पुढे काहीच होत नसेल तर आपले हाल कुत्रं खाणार नाही असं वाटून अंमळ डिप्रेशन आलं होतं.

बाकी वपू त्याही वयात आवडायचे नाहीत. त्यांच्या काही काही कथेत येणारे बायकी संदर्भ (कुठल्याश्या कथेत अगदी अशक्य रसीक, आसक्त, अभिरुची संपन्न, हळवा वगैरे असणारा आणि संसाराची गोग्गोड स्वप्न बघणार्‍या माणूस पहिल्याच रात्री बायकोच्या कंबरेवरचे घट्ट परकर बांधल्यामुळे बोटभर जाडीचे काचून पडलेले वळ बघतो आणि त्याला वैराग्य येतं!) तर भयानक डोक्यात जायचे. :)

चाणक्य's picture

20 Dec 2012 - 5:22 pm | चाणक्य

अजुन न वाचल्याबद्दल कमीपणा वाटलेला आहे. लवकरच वाचण्यात येईल.

हेमंत लाटकर's picture

30 Sep 2016 - 8:48 am | हेमंत लाटकर

मस्त !

कोसला च्या धर्तीवर अरुण साधूंचं शोधयात्रा हि होतं.

कोसला कादंबरीत विचारला गेलेला एक महत्वाचा प्रश्न :
वर्ष वाया गेले म्हणून काय झाले?
अप्रतिम! त्या एका प्रश्नातच संपूर्ण कादंबरीचे सार एकवटले आहे.
आता वयाच्या 60 व्या वर्षी मला या प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित कळतो आहे. पण वयाच्या 25 व्या वर्षी मात्र माझीसुद्धा स्थिती पांडुरंग सागवेकरसारखीच होती. आपल्याला काहीच जमत नाही, आपण दिसायला सुद्धा अगदीच सुमार कुठे कुठे आपण टक्कर देणार! सगळीकड़ून पराभूत!
पण 2015 साली मी कोसला कादंबरी वाचली आणि मग माझ्या लक्षात आले की अरे आपण असे एकटेच नाही आहोत. प्रणाम नेमाडे सरांना! जे कोणाला नाही सुचले ते त्यांनी प्रकट केले आणि ते सुद्धा सन 1963 मध्ये! धन्यवाद नेमाडे सर.