आता नेमके शिवसेनाप्रमुख कोण आहे?

वेताळ's picture
वेताळ in काथ्याकूट
26 Nov 2012 - 10:16 am
गाभा: 

मा.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्याच्या मृत्यु पश्चात शिवसेनेचे प्रमुखपद आता कुणाकडे आहे? कारण मा.उध्दव ठाकरेसाहेब हे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष होते आहेत व राहतील असे दिसते.मा.खा. संजयजी राऊतजी हे गेली तीन चार वर्षे सामनात बाळासाहेबाच्या नावाने डरकाळ्या फोडत आहेत.तसेच त्यानी महाराष्ट्रात कोणी राहावे हे देखिल ठरवले आहे.साहेबाच्या पार्थिवाला खांदा देखिल कुणी द्यावा ह्यावर त्यानी चिंतन केले होते.त्यामुळे ते आता शिवसेना प्रमुखपदाचे प्रमुख दावेदार आहेत.तसेच कोकोप्रि मा.मनोहरजी जोशीसर हेदेखिल आजकाल डरकाळ्या फोडण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखवत आहेत व आपण पण शर्यतीत आहोत हे त्यानी सुचवले आहे.तसेच बाळशिवसेना बंद करुन युवाशिवसेनेची ज्याच्यासाठी स्थापना केली गेले ते युवक नेते मा. आदित्य ठाकरेदेखिल प्रौढ शिवसेनेचे नेत्रुत्व करण्यास उत्सुक आहेत.पुढे रामदासजी कदम व इतर देखिल शिवसेनाप्रमुख होवु शकतात.
अजुनतरी आपण शिवसेनाप्रमुखाच्या स्मारकाला विरोध केला नसल्यामुळे महाराष्ट्रात राहु शकतो. त्यामुळे आपण पण कोणाला शिवसेनाप्रमुख करावे हे सुचवु शकतो ह्यासाठी ही चर्चा आहे.तर आपण मिपाकर म्हणुन शिवसेनाप्रमुखपदासाठी नावे सुचवा.

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

26 Nov 2012 - 10:22 am | श्री गावसेना प्रमुख

ते पद रिक्त ठेवावे,
त्या लायकीचा कोणीही नाही व त्या पदाचा वकुब कोणालाही सांभाळता येनार नाही
असे माझे तरी मत आहे

अमितसांगली's picture

26 Nov 2012 - 10:40 am | अमितसांगली

+१

अविनाशकुलकर्णी's picture

26 Nov 2012 - 10:25 am | अविनाशकुलकर्णी

१३ वा संपेपर्यंत धिर धरा...

अविनाशकुलकर्णी's picture

26 Nov 2012 - 10:25 am | अविनाशकुलकर्णी

१३ वा संपेपर्यंत धिर धरा...

श्री गवसेना प्रमुख यांच्याशी सहमत..ते पद संभाळण्या साठी जी योग्यता हवीये ती सध्या तरी कोणाच कडे नाही ....
ते पद रिक्त च ठेवावे...कमीत कमी त्या रिक्त पदाकडे बघून बाकी सगळे त्या योग्यतेला पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील ..

बाकी एक सुचवायचं...मा . शिवसेनाप्रमुख यांचा मृत्यु नाही तर निधन असा शब्द वापरावा...बाकी काही नाही तर वयाने तरी ते मोठे च होते त्यांना आदराने संबोधा ...कमीत कमी अपेक्षा आहेत ...

अमोल खरे's picture

26 Nov 2012 - 11:24 am | अमोल खरे

तुम्हाला काय करायचाय कोण शिवसेनाप्रमुख आहे म्हणुन ?? त्यांचे विचार अंमलात आणलेत तरी खुप आहे.

चेतन माने's picture

26 Nov 2012 - 2:07 pm | चेतन माने

शिवसेनाप्रमुख हे पद नसून ती एक पदवी आहे आणि फक्त एकाच माणसाची ........................... साहेब !!!!

आशु जोग's picture

26 Nov 2012 - 10:26 pm | आशु जोग

सगळे प्रतिसाद वाचले.
जणू एक स्पर्धा चालू आहे. चांगलं, फार चांगलं, फार फार चांगलं,

ग्रेट, एकमेवाद्वितीय इ विशेषणे लावायची.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

27 Nov 2012 - 12:58 pm | घाशीराम कोतवाल १.२

वेताळ राव अहो जरा शांत बसा राव उगा कशाला फुकाचे धंदे करताय ?
अहो शिवसेना प्रमुख एकच होते मा बाळ केशव ठाकरे नंतर कोण होइल ते शिवसेना पक्षाचे पुढारी ठरवतील
तुम्ही का उगाचा हाताच कंडु शमवताय घेण ना देण उगाच कंदिल लावुन येण