रेषेवरची अक्षरे २०१२: अंक पाचवा

मेघना भुस्कुटे's picture
मेघना भुस्कुटे in जनातलं, मनातलं
8 Nov 2012 - 7:41 pm

नमस्कार!

’रेषेवरची अक्षरे’चा पाचवा अंक सादर करताना फार आनंद होतो आहे.

मराठीतल्या निवडक ब्लॉगनोंदी प्रकाशित करण्याचा हा उपक्रम राबवताना आम्ही बेहद्द मजा केली. एकमेकांना नवनवीन ब्लॉगांबद्दल सांगितलं. नोंदी निवडताना हमरीतुमरीवर येऊन भांडलो. कंटाळा येईस्तोवर चर्चिलपणा केला. नवनवीन प्रयोग करून पाहिले. काही जमले, काही फसले. पण सगळ्यांत जास्त महत्त्वाचं काय असेल, तर या माध्यमातून लिहिलं जाणार ललित आणि तरुण मराठी मनापासून एन्जॉय केलं. यंदाच्या अंकावर काम करताना इथे साचत गेलेला निरुत्साह आम्हांलाही स्पर्शून गेला, ’या माध्यमाचं काय होणार’ असे तद्दन संमेलनीय गळे आम्हीही काढले नि तरी ’आपण अंक काढायचा, काय व्हायचं ते होवो’ या निष्कर्षावर येऊन आपल्या असुधारणीयपणाबद्दल एकमेकांना टाळ्याही दिल्या. तरीही मजा आलीच! अंक वाचताना मराठी ब्लॉगांच्या भवितव्याची ही चिंता तुम्हांलाही थोडी सतावो आणि तरी तुम्हांला अंक वाचताना भरपूर मजा येवो, हीच शुभेच्छा!

काहीही चुका मिळाल्या, सुधारणा सुचवाव्याश्या वाटल्या, शिव्या-ओव्या द्याव्या-गाव्याश्या वाटल्या, तरी निःसंकोच कळवा!

दिवाळी तुम्हां सर्वांना आनंदाची आणि नेहमीप्रमाणेच सकस साहित्याची जावो. भेटत राहू. :)

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

मेघना भुस्कुटे's picture

8 Nov 2012 - 7:44 pm | मेघना भुस्कुटे

संपादनाची सोय गावंना!
ही ब्लॉगची लिंकः http://reshakshare.blogspot.in/

अरे वा.
अंक उतरवून घेतला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2012 - 8:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अ सॅन मॅन, मेघना, संवेद, ट्युलिप, सर्वप्रथम तुमचं मनापासून अभिनंदन. अभिनंदन यासाठी की रेषेवरची अक्षरं हा एक जालीय उद्योग शब्दप्रयोगाबद्दल क्षमा असावी पण ज्या चिकाटीनं तुम्ही मंडळी ब्लॉगवरच्या नव्या आणि उत्तम ललित लेखनाचा शोध घेता त्याचं सालं मला कौतुक आहे. ब्लॉगवरच्या लेखनाचं असं आहे की एकदा लेखन टाकलं की किती हिट्स मिळाल्या आणि आल्याच आपल्या दोस्तमंडळीच्या प्रतिक्रिया तर ब्लॉग लेखकाला आकाश ठेंगणं होतं. लेखनात सातत्य नसतं. स्मरणरंजनात गुरफटुन गेलेले लेखन. वगैरे. ब्लॉग लेखनाचं आयुष्याचं वर्तुळ तिथेच पूर्ण होतं. आपण मात्र त्यातुन उत्तमातलं उत्तम ललित लेखन निवडण्याचा प्रयत्न केला असणार आहे. लेखन वाचायचं. एकमेकांच्या पसंतीला उतरतील असे त्याचे काही निकष ठरवायचे आणि त्यातून निवडक लेखन वाचकांसमोर मांडायचं. हा रिकामा उद्योगच नाही का ! संपादकीय मधुन ते उत्तम उतरलं आहे, संपादकीयही अगदी सहज नभ उतरु आले प्रमाणे उतरलं आहे. शब्दांच्या बोजडपणाचा अट्टाहास नाही, त्यामुळे एक वाचक म्हणुन मला संपादकीय भावलं. फक्त असं वाटलं साधारणतः किती ब्लॉग चाळले-वाचले एक संख्या अपेक्षित होती, असे वाटले. असो, बाकी लेखन वाचुन प्रतिसाद देईनच, तो पर्यत आपल्या रेषेवरची अक्षरेंच्या संपादक मित्राच्या चिकाटीसाठी एक जालीय वाचक म्हणुन आमचीही एक कौतुकाची पोच.

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Nov 2012 - 8:44 pm | बिपिन कार्यकर्ते

अतोनात कौतुक वाटत आहे!

छान अंक आहे. काही कथा आधी वाचनात आलेल्या पण पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेल्या.

मेघना आणि इतर सर्व संपादकांचे अभिनंदन आणि पुढील वर्षांसाठी शुभेच्छा!

आदूबाळ's picture

9 Nov 2012 - 2:53 am | आदूबाळ

मेघना, अंक आवडला. अज्ञानाबद्दल क्षमा असावी, पण आधीच्या अंकांचे दुवे द्याल का?

सुहास झेले's picture

9 Nov 2012 - 3:19 am | सुहास झेले

या दिवाळी अंकाचा नियमित वाचक आहे मी.... त्यामुळे हा अंकही उत्तम असेल याची खात्री आहे.

अंक डाऊनलोड केलाय. आता वाचायला घेतो :) :)

छान झालाय अंक. सगळा नाही वाचला अजून पण वाचीन.

अमृत's picture

9 Nov 2012 - 11:06 am | अमृत

अंक डाऊनलोड केला आहे.मांडणी आवडली बाकी निवांत वाचून प्रतिक्रिया कळविल.

अमृत

गणपा's picture

9 Nov 2012 - 1:16 pm | गणपा

अंक आवडला.
ओघवतं संपादकीय सुरेख उतरलय.

किसन शिंदे's picture

10 Nov 2012 - 6:11 pm | किसन शिंदे

वाचायला घेतलाय.