टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ
प्रेषक II राजे II ( शुक्र, ०६/२७/२००८ - १०:०४) .

१९७१ च्या भारत पाक युध्दाचे नायक पद्मविभूषण फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ ह्यांचे आज सकाळी निधन झाले... !
यांना विनम्र श्रध्दांजली !!
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


पराक्रमी
पराक्रमी वीरास सलाम...
टीव्हीवरती १९७१ चे त्यांचे भाषण दाखवले काल...
"एफ यू डोण्ट सरेंडर, यू विल बी किल्ड मर्सिलेसली" अशा अर्थाचे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
श्रध्दांजली
ह्या परमवीरास,
आमची श्रध्दांजली!
प्रशांत
फिल्ड
फिल्ड मार्शल सॅम मानकेशॉ यांना मानाचा मुजरा
१९७१ च्या युध्दा संबंधी तत्कालिन परिस्थितीचे / युध्दाचे वर्णन कुणी बुजुर्ग मिपाकरांनी लिहिले तर वाचायला आवडेल..
माझीही आदरांजली.
फिल्ड मार्शल माणेकशॉ ह्यांना माझीही विनम्र आदरांजली.
१९७१ च्या युद्धात पराक्रम गाजवणार्या जखमी सैनिकांना इस्पितळात भेटायला आलेल्या माणेकशाँचे प्रत्येक सैनिकाला विचारलेला "कितनी गोली खाई?" हा प्रश्न आणि त्यानंतर त्या जवानाने दिलेल्या उत्तरावर (दो गोली,तीन गोली वगैरे) "शॉब्बॉस" असे म्हणणे मी आजही विसरू शकत नाही. साक्षात सरसेनापती आपली खुशाली विचारायला जातीने हजर असलेला पाहून त्यावेळचे त्या जखमी सैनिकांच्या चेहर्यावर उठलेले कृतकृत्यतेचे भावही हृदयस्पर्शी होते. ह्या गोष्टी विसरण्यासारख्या नसतातच मुळी.
धन्य ते सरसेनापती आणि धन्य ते जवान!
हे सर्व आम्हाला त्यावेळी घरबसल्या दाखवणार्या दूरदर्शनलाही मनापासून धन्यवाद!
त्यांच्याबद्दलची माहिती येथे वाचा.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
श्रद्धांजली
कायम नाव ऐकत आलो आहे... माझी पण फिल्डमार्शलना विनम्र श्रद्धांजली.
बांगलादेशचे युद्ध १९७१ साली पाकीस्तानविरुद्ध जिंकले, १९७३ साली निवृत्त झाले पण स्वतःच्या अभूतपूर्व यशाचा नंतरच्या ३ दशकाहूनही अधिक काळात कधी गैरफायदा घेतल्याचे (राजकारणात पडून वगैरे) ऐकले नाही... अशी माणसे विरळच.
विनम्र आदरांजली
फिल्ड मार्शल माणेकशॉ ह्यांना माझीही विनम्र आदरांजली.
जबरदस्त!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
पोलादी पुरूष हरपला
सॅम बहाद्दूर माणेकशॉ हे डेहराडून येथील इ॑डियन मिलिटरी ऍकाडमीच्या पहिल्या म्हणजेच पायोनियर बॅचचे स्नातक होते. एक्काहत्तरच्या युद्धात त्या॑नी पाकिस्तानी फौजेचा धुव्वा उडविला! एकाच वेळी दोन आघाड्या॑वर (पाकिस्तान व पूर्व पाक तथा बा॑ग्लादेश) लढण॑ सोप॑ नव्हत॑, शिवाय पॅटन रणगाड्या॑चा दरारा आणि अमेरिकेच्या सातव्या आरमाराची भीती! पण माणेकशा॑नी शिताफीने दोन्ही आघाड्या॑वर फत्ते केली.
सॅमबहाद्दूरना माझा सलाम!
'सॅम बहादूर' ना माझी श्रद्धांजली!
१९७१ चे बांगला युद्ध हा अनेक अर्थांनी भारताच्या इतिहासातला मानाचा तुरा आहे.
इंदिरा गांधींच्या कारकीर्दीतला हा सर्वोच्च बिंदू मानायला हरकत नाही. देशाचे नेतृत्त्व कणखर आणि धाडसी निर्णय घेणारे असेल तर काय होऊ शकते ह्याचा तो उत्तम पुरावा होता.
(१९६२ च्या चीन युद्धात त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहेरुंच्या मवाळ आणि कचखाऊ धोरणाची परिणती लाजिरवाणा पराभव स्वीकारण्यात झाली त्यापासून इंदिराजी शिकल्या होत्या हे नक्की!)
सॅम माणेकशा हे त्या युद्धावेळी सरसेनापती होते. असामान्य नेतृत्त्वगुण दाखवत त्यांनी युद्धाला योग्य दिशा दिली आणि देशाच्या हितासाठी जे योग्य त्या निर्णयात सत्ताधीशांसमोर न झुकणे हे तत्त्व त्यांनी मोठ्या बाणेदारपणे पाळले.
सैन्यदलाच्या अत्यंत वेगवान आणि धूर्त हालचाली करुन त्यांनी अमेरिकी पॅटन रणगाड्यांच्या जोरावर माज करणार्या पाकिस्तानी सैन्याला आणि नेतृत्त्वाला धूळ चारली.
भारताच्या लष्करी इतिहासात जे दोनच फील्ड मार्शल्स होऊन गेले त्यातले पहिले सॅम माणेकशा आणि दुसरे होते फील्ड मार्शल के.एम.करिअप्पा! तांत्रिकदृष्ट्या फील्ड मार्शल कधीही निवृत्त होत नाही, त्याच्या मृत्यूपर्यंत तो पदावर असतो. ह्या गोष्टीचे भान त्यांनी कधीही सोडले नाही. सवंग राजकारण, आपल्या पदाला अशोभनीय ठरेल, देशाला लाजिरवाणे वाटेल असे कोणतेही कृत्य त्यांच्या हातून घडले नाही. मागच्याच वर्षी करण थापरच्या 'कॉफी विथ करण' ह्या कार्यक्रमात पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आयूब खान यांचे सुपुत्र गोहर आयूब खान यांनी सॅम माणेकशांचे नाव न घेता काही संदर्भ देऊन राळ उडवली होती की 'पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताच्या एका सेनापतीने पाकिस्तानला युद्धातले काही प्लॅन्स विकले होते.' त्या आचरट प्रकारावर भरपूर टीका होऊन लोकांनी तो प्रकार हाणून पाडला. त्याहीवेळी हा फील्ड मार्शल धीरगंभीर आणि उदात्तच राहिला. त्यांनी कोणत्याही प्रकारे ह्या अश्लाघ्य गोष्टीचा प्रतिवाद करुन त्यांचे तत्त्व सोडले नाही!
तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे काय असते ह्याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते.
बर्याच वर्षांपूर्वी एका मॅनेजमेंट ट्रेनिंगमधे मी सहभागी झालो होतो त्यावेळी सॅम माणेकशा यांच्या एका भाषणाची ध्वनिचित्रफीत आम्हाला दाखवली होती. अत्यंत स्फूर्तिदायक भाषण कसे असते ह्याचा तो उत्तम नमुना होता. चित्रफितीतच ते एवढे विलक्षण प्रभावी होते की प्रत्यक्ष आघाडीवर जवानांसमोर किती प्रेरणादायी असतील ह्याची कल्पनाच केलेली बरी!
देशाच्या ह्या महान सुपुत्राच्या स्मृतीला माझे शतशः प्रणाम!
चतुरंग
माझी ही विनम्र श्रध्दा॑जली.
फिल्ड मार्शल माणेकशॉ ह्यांना माझीही विनम्र आदरांजली.
देशाच्या मुकुटातील अनेक हिर्या पैकी एक हिरा असा उल्लेख करावा लागेल.
घ्या इथे विश्रांती ...!!!
फील्डमार्शल माणेकशाँचे नाव आमच्या आधीच्या पिढ्याही खूप आदराने घ्यायच्या.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
ओ कॅप्टन! माय कॅप्टन!!
या पोलादी पुरूषाचे भाषण प्रत्यक्ष ऐकण्याचे दुर्मिळ भाग्य मला लाभले आहे....
मनावर कोरला गेला आहे तो प्रसंग!!!!
अत्युत्कृष्ट सेनानी, निर्भय निस्पृह व्यक्ती आणि प्रखर विनोदबुद्दी असलेला प्रभावी वक्ता!!!
मी त्यांना कधीच विसरू शकत नाही!!!
एक्झल्ट, ओ शोअर्स ऍन्ड रिंग, ओ बेल्स,
बट आय, विथ मोर्नफुल थ्रेड
वॉक द डेक माय कॅप्टन लाईज,
फॉलन कोल्ड ऍन्ड डेड!!!
-वॉल्ट व्हिटमन
जनरल, आय सॅल्यूट दी.....
मुजरा..
मानाचा मुजरा..!
(नतमस्तक) तात्या.
सॅमबहाद्द
सॅमबहाद्दूरा॑नी एकाहत्तर साली केलेले सुप्रसिद्ध भाषण कुठे मिळेल? परवा टिव्हीवर दाखविले म्हणे, माझे हुकले..