[नवी कल्पना] संगणकाच्या SMPS मधून वीज वापरा

पुष्कर जोशी's picture
पुष्कर जोशी in जनातलं, मनातलं
22 Sep 2012 - 6:50 am

मी BSNL Brodband ४-५ वर्षा पासून वापरीत आहे... माझ्याकडे Type 1 मोडेम आहे ... साधारण महिन्या पूर्वी मोडेम चे अडाप्टर जळले ... ठीक आहे ना इतके वर्ष चालले बरेच आहे ....

मग मी BSNL च्या कार्यालयात गेलो म्हटले कि original घ्यावे त्रास नको .. तर तिथे कळले कि आता हे लोक मोडेम विकतच नाहीत ते सरळ म्हणाले कि बाजारातून घ्या ... बाजारात शोध घेतल्यावर कळले कि अडप्टर सामान्य नाही जरा वेगळे आहे 10 V 550 mA .. त्यामुळे मला चटकन मिळेना ... आणि ब्रांडेड तर नाहीच नाही ....

मग आठवले कि आपल्या कडे जुनी सोल्ड्रिंग गन आहे आपण कोणे एके काळी electronics चे विद्यार्थी होतो .. म्हटले चला आता प्रयोग करुयात आपण स्वतः का काही करु नये...

पण जमतय का ? वेळ कुठाय ? आणि काम कोण करणार ... ती पुस्तके शोधा आणि वाचा ...! :( परंतु मोडेम शिवाय कसे ना ... तर उठलो आणि शोध शोध सुरु केली तर मला जुने SMPS सापडले ..

जुने SMPS

ह्यात कळाले की १२ वोल्ट सहज मिळु शकतात ... आणि Diode ०.७ वोल्ट खातो बरोबर मग ३ डायोड वापरलेकी झाले ना ... १२ - (०.७ x ३) = ९.९ झाले ... सोबत एक फ्युज (जो मी नंतर बसवला).....

आता १ महिन्या पासून माझा मोडेम कोणत्याही अडाप्टर शिवाय काम करीत आहे ....

ह्याने २ फायदे झाले ...

१. आता मोडेम चालू बंद करण्याची आवश्यकता नाही ...
२. वीज बचत ...

अवांतार :
नवीन मिसळपाव वर फोटो कसे डकवायचे ..?
लेखन विषय निवडता येत नाही हो ... आणि एडीटींग टूल बार पण दिसत नाहीये ...

हे ठिकाणमाहिती

प्रतिक्रिया

पुष्कर जोशी's picture

22 Sep 2012 - 6:58 am | पुष्कर जोशी

मी google मराठी input वापरतो शुद्धलेखनाचा त्यास नाही (ह्यात भ्रमण ध्वनी प्रमाणे शब्दकोश आहे)... पण जेव्हा गमभन मध्ये मराठी निवडलेले असेल तर तेव्हा browser /मिपा अडकते (hang होते.) गमभन चालू बंद करण्याची काही सोय आहे काय ..?

किसन शिंदे's picture

22 Sep 2012 - 7:06 am | किसन शिंदे

शिर्षकाचा आणि लेखाचा काहीच संबंध लागत नाहीये.

कि माझाच काहीतरी घोळ झालाय.?

५० फक्त's picture

22 Sep 2012 - 8:54 am | ५० फक्त

मला वाटतं मिपावरचं बहुतेक पहिलेंच डु इट युवरसेल्फ, धन्यवाद. चांगला उपाय आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Sep 2012 - 9:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एस एम पीएस मधे कोणत्या वायरांमधून डायोडकडे जाणारी वायरं जोडायची.
पण मला आपली खटपट स्पेशल आवडली. अभिनंदन आणि आभार.

-दिलीप बिरुटे

मन१'s picture

22 Sep 2012 - 9:04 am | मन१

काहीतरी तोडायचं, कशाला तरी जोडून पहायचं अशा खटापट्या स्वभावाचा उत्तम नमुना.

प्रभाकर पेठकर's picture

22 Sep 2012 - 9:28 am | प्रभाकर पेठकर

एका नविन संशोधकाची बीजे आपल्या प्रयत्नात दिसत आहे. धडपडत राहा.
पहिल्याच यशस्वी प्रयोगा बद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

नितिन थत्ते's picture

22 Sep 2012 - 10:04 am | नितिन थत्ते

छान लेख.

>>वीज बचत.

येथे चक्कर/झीट आल्याची स्मायली कल्पावी.

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Sep 2012 - 10:11 am | श्री गावसेना प्रमुख

पण एक प्रॉब्लेम आहे,तो असा कि जास्तीच वोल्टेज तुम्ही कमी केल्याने डायोड जळुन जातील,
वाट्ल्यास हात लाउन बघा.

कवितानागेश's picture

22 Sep 2012 - 10:24 am | कवितानागेश

फ्युज ५ अँपीअरचा वापरला का?

बहुगुणी's picture

22 Sep 2012 - 2:13 pm | बहुगुणी

मला इलेक्ट्रॉनिक्स मधलं ढेकुळ कळत नाही हे आधीच सांगतो! तरीदेखील, तुम्ही हेच लिखाण पाचच दिवसांपूर्वी इतरत्र करून, इतरांच्या सूचनांनुसार सर्किट मध्ये बदल करून (मला वाटतं फ्यूज टाकणं हा एक बदल) मग इथे माहिती दिली आहे, त्यामागची धडपड आवडली. बचतीची कल्पना नक्कीच स्वागतार्ह आहे, पण त्या धाग्यात इतर तज्ञांनी लिहिलेले धोके नेमके काय आहेत, आणि ते कसे टाळले (किंवा टाळता येणार नाहीत) याचंही विवेचन देता आलं, आणि detailed circuit diagram दिलीत तर, ज्यांना इलेक्ट्रॉनिक्स कळतं आणि आवडतं, अशा इथल्या इतरांना उपयोगाचं ठरेल असं वाटतं.

जाता जाता:
१. SMPS चा हा असाच वापर Data Centers मध्ये already केला जातो असं या दुव्यावरून वाटलं, कितपत related आहे माहीत नाही कारण मी त्या संस्थळाचा सदस्य नाही. तुमच्या पुढील खटपटीस शुभेच्छा, just stay safe while experimenting with electricity, there is no saying 'sorry' after an accident that causes fire, burns or loss ;-)

२. एक बाळबोध शंका: SMPS हे उपकरण तसं (अ‍ॅडाप्टरपेक्षा) महाग असतं ना? (आणि चित्रावरून मला वाटतं अ‍ॅडाप्टरपेक्षा मोठंही असतं); मग तुमच्याकडे एक स्पेअर उपलब्ध होतं हा मुद्दा सोडला तर ज्यांना अ‍ॅडाप्टर टाळून SMPS घ्यायचा आहे ते महाग/ अडचणीचं नाही का ठरणार? आणि बचत असलीच तरी ती फारशी होणार नसेल तर झुरळ मारायला तोफ आणली असं तर नाही ना होणार ;-)

बाकी या धाग्याच्या निमित्ताने 'मिसळपाव' वर असे आणखी 'आपली आपण धडपड' (do it yourself :-) ) धागे यावेत हीच अपेक्षा.

मन१'s picture

22 Sep 2012 - 2:21 pm | मन१

तुम्ही दिलेल्या दुव्यातील आंग्ल भाषेतील धागाही ह्याच प्राण्यानं लिहिलाय.

म्हणूनच मी म्हंटलंय ना " तुम्ही हेच लिखाण पाचच दिवसांपूर्वी इतरत्र करून,"... इतक्या थोड्या दिवसांत चिकाटीने बदल करून (फ्यूज टाकून) उपकरण आधिक चांगलं केलं आणि मग इथे माहिती दिली याचं कौतुक वाटलं...

दादा कोंडके's picture

22 Sep 2012 - 3:03 pm | दादा कोंडके

प्रयोग आवडला.

परवा माझ्या लॅपटॉपचा अडाप्टर अचानकच गचकला. "एक-दोन तासात दुरुस्त करून आणेन" असं बायकोला टेचात सांगून दुसर्‍याच दिवशी अति-आत्मविश्वासाने ऑफीस मध्ये अडाप्टर घेउन गेलो. त्याचा केस मोल्डेड असल्यामुळे उघडायलाचा काही द्रविडी प्राणायाम करावे लागले. डीसी वोल्टीज आणि ग्राउंड याशिवाय बोर्डवर जाणारी तिसरी वायर बघितल्यावरच शंकेची पाल चुकचुकली. आंजावर थोडी शोधाशोध केल्यावर त्या अडाप्टरवर पावर सप्लाय शिवाय एक डिजीटल कोड जनरेटर असतो. हा कोड एनक्रिप्टेड असून लॅपटॉपला फक्त जेन्युन (म्हणजे त्या कंपनीनेच तयार केलेल्या) अडाप्टर ओळखण्यासाठी उपयोग होतो असं कळलं. त्यात आणखी एक गोची म्हणजे तो प्रत्येकवेळी बदलत रहातो आणि कमीत कमी १०२४ वेळा तरी रिपीट होत नाही.

शेवटी डेलला शिव्या घालून २४ ओयरोचा अडाप्टर अ‍ॅमॅझोनवरून मागवला! :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Sep 2012 - 7:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्याही लॅपट्पचा अडाप्टर लटकला होता. अडाप्टरकडून लॅपटॉपकडे जाणारी एक वायर आतल्या आत कटली होती. अडाप्टर उघडायचं काम लैच अवघड आहे. शेवटी फोडून काढला आयड्या आयड्याने. आणि कट असलेले वायर सोल्ड्रिंगने जोडले पुन्हा चिकटपट्टीने अडाप्टरचा डबा फीट करुन वापर सुरु केला आहे. सतराशे रुपये वाचवले पेक्षा दुरुस्त झाल्याने खूपच आनंद झाला. फोडलेले अडाप्टर आपल्या दर्शनासाठी :)

अडाफ्टर.

दादा कोंडके's picture

25 Sep 2012 - 9:57 pm | दादा कोंडके

खूप वेळी इले़ट्रॉनिक्स वस्तू लूज कनेक्षन, ड्राय सोल्डरींग, कपॅसिटर (फुगणे/फुटणे) मुळे बंद असतात. हे आपण घरच्या-घरी दुरूस्त करू शकतो.

लॅपटॉप चे अडॅप्टर हे डिंकाने चिकटवलेले/सील केलेले असतात... त्याला उघडवण्यासाठी गॅप मध्ये थोडं पेट्रोल सोडावं जेणेकरून डिंक dissolve होतो...
-श्रेयस कुळकर्णी

पिंगू's picture

22 Sep 2012 - 3:11 pm | पिंगू

सही रे. व्होल्टेज कमी करण्यासाठी डायोड वापरतात, हे शिकलो होतो आणि तेव्हा असे काही धमाल किडे केले होते.

बघूया वेळ मिळाला की एखादा प्रयोग करुन इथे डकवेन.. :)

पुष्कर जोशी's picture

25 Sep 2012 - 6:03 pm | पुष्कर जोशी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे : एस एम पीएस मधे कोणत्या वायरांमधून डायोडकडे जाणारी वायरं जोडायची.

SMPS चा फोटो डकवला आहे त्यात सगळे रंग आणि volt, current सापडले त्यानुसार पिवल्याला १२ v आणि २५ A असे सापडले ... तर CD ROM / HDD साठी असलेल्या केबल मधून वीज घेतली ...

श्री गावसेना प्रमुख, : पण एक प्रॉब्लेम आहे,तो असा कि जास्तीच वोल्टेज तुम्ही कमी केल्याने डायोड जळुन जातील,
वाट्ल्यास हात लाउन बघा.

हे डायोड प्रथम गरम झाले होते पण आता एकदम थंड आहेत ... : प्रश्न स्मायली : मला वाटते फ्युज लावल्याने ?

लीमाउजेट : फ्युज ५ अँपीअरचा वापरला का?

माझा मूळ अडप्तर ५५० mA चा होता म्हणून ५०० mA = ०.५ A चा फ्युज वापरला ....

बहुगुणी : एक बाळबोध शंका: SMPS हे उपकरण तसं (अ‍ॅडाप्टरपेक्षा) महाग असतं ना? (आणि चित्रावरून मला वाटतं अ‍ॅडाप्टरपेक्षा मोठंही असतं); मग तुमच्याकडे एक स्पेअर उपलब्ध होतं हा मुद्दा सोडला तर ज्यांना अ‍ॅडाप्टर टाळून SMPS घ्यायचा आहे ते महाग/ अडचणीचं नाही का ठरणार? आणि बचत असलीच तरी ती फारशी होणार नसेल तर झुरळ मारायला तोफ आणली असं तर नाही ना होणार

अहो आम्ही दुसया SMPS चा वापर फक्त रंग आणि voltage बघण्या पुरता केला. जो SMPS CPU ला वीज पुरवतो तोच वापरला आहे.. झुरळा साठी तोफ नसून ...एका दगडात २ पक्षी ... हो ...

बहुगुणी : म्हणूनच मी म्हंटलंय ना " तुम्ही हेच लिखाण पाचच दिवसांपूर्वी इतरत्र करून,"... इतक्या थोड्या दिवसांत चिकाटीने बदल करून (फ्यूज टाकून) उपकरण आधिक चांगलं केलं आणि मग इथे माहिती दिली याचं कौतुक वाटलं...

धन्यवाद ...

@ मनोबा, पेठकर काका - :) धन्यवाद ...

@ पिंगु : येउद्या ....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Sep 2012 - 7:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

SMPS चा फोटो डकवला आहे त्यात सगळे रंग आणि volt, current सापडले त्यानुसार पिवल्याला १२ v आणि २५ A असे सापडले ... तर CD ROM / HDD साठी असलेल्या केबल मधून वीज घेतली ...

माहितीबद्दल आभार. काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे.

-दिलीप बिरुटे

सोत्रि's picture

25 Sep 2012 - 8:03 pm | सोत्रि

मस्त आयड्या.

इलेक्ट्रोनिक्सला असूनही पाॅवर इलेक्ट्रोनिक्स कधीच झेपले नाही. ECC नावाचा विषय कसाबसा पास झालो होतो. मग 'अरे तु डिजीटल इलेक्ट्रोनिक्सवाला आहेस' अशी स्वतची समजूत घालायचो त्याची आठवण झाली. :-D

-(डिजीटल) सोकाजी

श्रेकु's picture

8 May 2018 - 6:56 pm | श्रेकु

मस्त प्रोजेक्ट आहे...
पण, कॉम्पुटर मधला SMPS हा ह्या जॉब साठी Overkill झाला... सध्या 12V च्या अडॅप्टर ला डायॉड लावले असते तरी चालले असते...
आणि अजून एक... डायॉड लावून 0.7×3=2.1V आणि 2.1V×500mA=1W वाया जाणार.
त्यापेक्षा SMPS मध्ये आधीच +5V आणि -5V रेल असतात.
5- (-5V)= 5+5=10V रेडिमेड मिळेल. डायॉड वापरायची गरजच नव्हती :D

आणि बहुतांशी अडॅप्टर हे रिपेअर केले जाऊ शकतात. त्यातला एकतर fuse गेलेला असतो किंवा आतले कपॅसिटर गेलेले असतात....

पुष्कर जोशी's picture

12 Jun 2023 - 6:11 pm | पुष्कर जोशी

वेगळा adaptor नवीन कशाला विकत घ्यायचा ? कम्प्युटर मध्ये जो आहे तोच वापरायचा की !!

धर्मराजमुटके's picture

12 Jun 2023 - 10:14 pm | धर्मराजमुटके

प्रोजेक्ट ची कल्पना आवडली पण २०१२ च्या अ‍ॅडाप्टरचे आता प्रयोजन राहिले नाही. आता ९९ टक्के मॉडेम, राऊटर ९ वोल्ट किंवा १२ वोल्टचे (550 mA ते 1.5-2.00 Amp च्या रेंजमधे ) आहेत. तुमच्या प्रोजेक्ट मधे सगळ्यात कच्चा दुवा आहे तो म्हणजे ती डीसी पीन. ह्या पीन चांगल्या प्रतिच्या न मिळाल्यास मागील / पुढील सगळ्या सर्कीट ची वाट लावतात. अर्थात तुम्ही फ्युज लावला आहेच म्हणा.