टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
लग्नाआधी नि लग्नानंतर !
राम राम मंडळी --'शादी से पहले और शादी के बाद' ह्या माझ्या हिंदी कवितेचा मराठी अनुवाद 
-------------------------------
लग्नाआधी हाती हात
शब्दांमधे मधुर मिठास
फोनवर बोलणं तासनतास
भेटल्यावरही रोजचं खास ..१
आकाशीचा रंग निळा
वा असो घनघोर वर्षा
कप कॉफीचा, एक छोटासा
दोन जीवांना हो पुरेसा ..२
लग्न होता सारे संपले
तिचे 'ना' केवळ नाव बदले
संध्याकाळी येतो घरी मी
घेऊनिया भाजीचे ओझे ..३
तसे एकांती बोलतो अजूनि
वेळेचा ना हिशोब ठेवूनि
घरखर्च नि 'फी' पोरांची
जमा संपते चुटकीसरशी ..४
मात्र आटलं प्रेम नाही
पण सांगाया वेळ नाही
करता संवाद नजरेतूनी
शब्दांचा फुका खेळ नाही ..५
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

हिंदी जास्त आवडली
पहिली वाचली म्हणून असेल, पण मुळातली हिंदी जास्त आवडली.
हेच,
हेच म्हणतो...!
तात्या आणि मिसळपाव
आवर्जून कळवल्याबद्दल धन्स ! साधारणपणे असं नेहमीच होतं की आधी जे वाचतो / पाहतो ते मनात जास्त ठसतं
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------