खरडवह्या.. एक अनमोल ठेवा.

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
13 Sep 2012 - 7:52 pm

हे सर्व लिखाण खरेतर काथ्याकुटात टाकावे, का जनात-मनात तेच कळत नाही. म्हणाले तर ह्यावरती चर्चा होऊ देखील शकेल. पण मंडळाने निर्णय घेतलाच असेल तर त्यावर चर्चा नको म्हणून सरळ जनात-मनात लिहून फक्त भावना मोकळ्या करत आहे.

दिनांक १५/०९/२०१२ रोजी मिसळपाव वरील सर्व सदस्यांच्या खरडवह्या आणि मिपाचा खरडफळा मोकळा केला जाईल. त्यापूर्वी आपल्या खरडवहीत काही महत्त्वाचे असेल तर कृपया त्याची प्रत साठवून ठेवावी. तसेच यापुढे सुद्धा मिसळपाववर महत्त्वाची अथवा संवेदनशील माहिती ठेवू नये ही विनंती.

स्वगृहात हे वाचले आणि काळजात लख्खकन वीजच चमकली बघा.

'आपल्या खरडवहीत काही महत्त्वाचे असेल तर कृपया त्याची प्रत साठवून ठेवावी' असे देखील लिहिलेले दिसले. काय सांगू ह्यांना ? अहो खरडवहीतील प्रत्येक खरड आणि खरडच महत्त्वाची आहे हो माझ्यासाठी. मिपाची खरडवही म्हणजे आमचा सर्वात मोठा वीक पॉइंट. ही खरडवही आणि ह्यातील प्रत्येक खरड म्हणजे जणू हृदयात ठेवलेल्या एखाद्या चांदीच्या पेटीतील गुलाबाच्या पाकळ्याच आहेत म्हणा ना.

मिपावरती आल्या आल्या पहिली ओळख झाली ती खरडवहीचीच. मग हळूहळू खरडवही आणि खरडफळा म्हणजे 'घरी नसू तेव्हा संपूर्ण वेळ पडीक राहण्याचे ठिकाण' बनले. खरडवहीसम्राट धमालपंतापर्यंत आमची मजल नाही, पण तरी देखील खरडवही आणि तिच्यातील जुन्या खरडी शिवाय आमच्या जीवाला चैन नाही. अगदी ह्या खवसाठी 'खव उचकपाचक मंडळ' स्थापन करेपर्यंत आमची मजल गेली म्हणजे विचार करा. साल्या ह्या सगळ्या खरडवह्या म्हणजे मिपाचा इतिहास आहे. काही मोजक्या जुन्या जाणत्यांच्या खरडवह्या म्हणजे मिपाइतिहासातील वेद आहेत म्हणाले तरी चालेल.

हे लिखाण ह्या सगळ्या खरडवह्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी करतो आहे. मिपावरती आल्यापासून माझ्या आठवणीप्रमाणे तरी आजवर फक्त ३ खरडी माझ्या खरडवहीतून उडवल्या गेल्या आहेत. एकदा आमच्या नानबाने चुकीचा कोड टाकल्याने सगळ्याच खरडी स्क्रोल व्हायला लागल्या तेव्हा, एकदा एका संपादक काकांनी स्वत: टाकलेली खरड स्वतःच उडवली तेव्हा आणि एकदा इंट्याच्या विनंतीवरून त्याने माझ्या खवत खरडी मधून दिलेला त्याचा नंबर उडवला म्हणून. अन्यथा माझ्या खरडवहीतून एकाही खरडीला कधी हद्दपारी मिळालेली नाही. ह्या खरडवह्यांवरती आमचे नितांत प्रेम आहे हो. ह्या खरडवहीत काय नाहीये ? अगदी प्रत्येक मिपाकांडाची नोंद इथे सापडेल. लष्कर-ए-खरडाची स्थापना असो, किंवा शेकडा खेकड्याचा उगम असो. आज जेव्हा ह्या घटनांवरती भाष्य होते तेव्हा संदर्भासाठी नवीन सदस्य कुठला आधार घेणार माहिती घ्यायला ? मिपावरचा प्रत्येक वाद इथल्या खरडवह्यांतून चर्चीला गेलेला आहे. अगदी राजा आणि वहिदाच्या भांडणापासून ते श्रीमती म्हणावे, सौ म्हणावे का कुमारी म्हणावे ह्या वादापर्यंतचा वाद असो, किंवा कधी काळी कोणा कोणाच्या रंगलेल्या आदल्या रात्रीच्या मैफिलींची चर्चा असो... फक्त इथे आणि इथेच त्यांना पुन्हा पुन्हा उजाळा मिळत राहतो.

आजही खरडवहीचे कुठलेही जुने पाने पान उघडले तरी वेळ कसा जातो कळत नाही. त्या खरडीच्या काळातल्या दिवसांच्या आठवणी सरता सरत नाहीत. ह्याच खरडवहीच्या एकाच पानावरती, मी एका खाली एक अशा अदिती आणि नैनीच्या खरडी ह्याची देही ह्याची डोळा पाहिलेल्या आहेत, कुठल्याश्या पानावरती आमच्या सर्किट काकांनी दिलेला दणका अनुभवलेला आहे, मध्येच काही पानांवरती आमच्या कर्तृत्वामुळे तात्याला एक मिपाकर आणि मालक म्हणून कशी शरम आली ह्याचे तात्याने केलेले वर्णन आहे, कुठे आमच्या झकासरावांनी केलेली ह्या पुतण्याची चौकशी आहे, तर कुठे प्रभुगुर्जींच्या क्रिप्टिकने उडवलेली दांडी आहे....

दर चार पाना आड मी, नान्या, डान्या, धम्या ह्यांनी उधळलेल्या गुणांच्या आंबट गोड आठवणी देखील आहेत. पार तिकडे खालच्या अंगाला सखाराम गटणे देखील डोकावतो आहे. कधी काळी आमचे सहज मामा खरडी देखील लिहायचे ह्याचे पुरावे आता कुठून आणणार ? दोन दोन पाने घासुगुर्जींशी केलेल्या खरड कुस्त्या आता पुन्हा कधी वाचायला मिळणार ? आमच्या ब्रिटिश टिंग्याचे 'कृपया भोकात जावे' आणि निळ्याचे 'प्लीज फक ऑफ' पुनर्वाचनाचा आनंद आता कसा मिळवून देणार ? एकाच पानावरती विष्णू - लक्ष्मी, शंकर - पार्वती, राम -सीता अशा श्री व सौ जोड्यांच्या खरडी पुन्हा कधी दिसतील का ? आजकाल फक्त जुन्या खरडींमधून भेटणारे लिखाळ भावजी, शाल्मलीतै, भाग्यश्रीतै, मनीष, घाटावरचे भट पुन्हा भेटतील का ? प्राजुतैचा केलेला छळ पुन्हा अनुभवात येईल का ?, दीड शहाणे असल्याच्या थाटात कोदाला मारलेल्या पिंका पुन्हा चमकतील का ?

हॅलोविन आणि पिडाकांची मते आता पुन्हा कुठे वाचायला मिळणार ?, जागुतैने खरडीमधून फक्त पेश्शल म्हणून दिलेली वाटणाची पाकृ ठसका कधी लावणार ?, अदिती अवखळकर पाटील आणि इतर सिंड्रेलाच्या बहिणींच्या हलकट खरडी आता पुन्हा कधी डोळ्यात सलणार ? हजारो नावे ..नावे घ्यावीत तेवढी कमी आहेत. तरी अजून रामदास काका, बिपिनदा, श्रामो ह्यांच्या खरडप्रकल्पांची व्याख्या इथे घेतलेलीच नाही. पुप्याच्या अर्ध कच्चा बुधवारच्या कविता आठवलेल्याच नाहीत. टार्‍याची सर्कस अजून चालू केलेलीच नाही. किती प्रचंड मोठा आनंदाचा ठेवा आहे हा. हा असा नका हिरावून घेऊ. वाटल्यास माझे मिपावरचे सगळे लिखाण उडवा.. प्रतिसाद उडवा. पण ती खरडवही मात्र आहे तशीच रसरसलेली ठेवा येवढीच विनंती.

माझ्या खवत आजवर जवळजवळ ओळखीतल्या प्रत्येक मिपाकराचा वावर झालेला आहे. ह्या ठेव्याबद्दल मी त्या सर्वांचाच आभारी आहे. अनावधानाने कुणाचे नाव राहिले असल्यास क्षमस्व.

वावरमौजमजाविचारप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

13 Sep 2012 - 8:17 pm | कवितानागेश

हम्म..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Sep 2012 - 8:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे

भावनेशी प्रचंड सहमत आहे.
मिपा व्यवस्थापनाला विनंती आहे की शक्यतो खरडी उडवू नयेत. त्यासाठी काही तांत्रिक मदत हवी असेल तर सांगा. कुवतीप्रमाणे प्रयत्न करू. जागेची अडचण असेल तर पाहिजेतर इथून निघून गेलेल्या सदस्यांच्या खरडी आर्कइव्ह करा.
बघा, कसे जमते ते.

तरीही करणार असाल तर दिलेली मुदत खूपच कमी आहे. वाढवता येईल का ?

प्रचंड सहमत. इतका मस्त टीपी होतो खरडी वाचून, प्लीज नक्का ना हो डिलीट करू. मिपाइतिहासातील अनमोल घटना आहे ती :)

लिखाणात्यल्या भावनांशी सहमत आहे.

पैसा's picture

13 Sep 2012 - 9:05 pm | पैसा

सहमत.

नावातकायआहे's picture

13 Sep 2012 - 10:19 pm | नावातकायआहे

जरी माझ्या खरडवहीत दुष्काळ असला तरी इतरांच्या खरड वहीची उचका पाचक, प्रतिसाद,बर्‍याचदा 'हेल्दि' टी. पि. होता आणि आहे..
आता 'संदर्भ ' कसे शोधायचे?

निवेदिता-ताई's picture

13 Sep 2012 - 10:33 pm | निवेदिता-ताई

सहमत.....:)

पियुशा's picture

14 Sep 2012 - 11:31 am | पियुशा

येस्स.......... पराशी १०००० वेळा सहमत !!!!!
माझी खरडवही हा माझ्यासाठी एक अनमोल ठेवा आहे , मि.पा.वरचा जास्ती वेळ मी खरडा़खरडी करण्यातच सत्कारणी लावला आहे किती जणांशी बोलले मैत्री झाली ह्याच खव तुन , किती धिंगाणा घातला , किती लोकांच्या डो़क्याला शॉट लावला, किती लोकांनी आपुलकिने "हे कर ते नको करुस" असे प्रेमळ सल्ले दिले ,किती लोकांनी टोमणे मारले ;)

कित्येक वेळा मी माझ्या जुन्या खरडी वाचत बसते , जाम मजा येते . कधी हळवी होते ,कधी काही लिहायला हुरुप येतो तो याच खरडीमुळे :)
वाटल्यास प्रत्येकाने नको असलेल्या खरडी स्वतः च उड्वण्याची सुविधा द्या, पण संपुर्ण खरड्वही नका हो रिकामी करु ,कससच होइल एकदम,पाटी कोरी झाल्यावर :(

मी-सौरभ's picture

13 Sep 2012 - 8:52 pm | मी-सौरभ

पराशी पूर्ण सहमत आहे....

पराशेटः आता ख्.व. वाचवा संघ चालू करावा लागणार आहे तुला...

अन्या दातार's picture

13 Sep 2012 - 8:54 pm | अन्या दातार

परा, विमे, सौरभशी बाडीस.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2012 - 9:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रकाटाआ

निखिल देशपांडे's picture

13 Sep 2012 - 9:16 pm | निखिल देशपांडे

खरडवहीचा मृत्युलेख आवडला..
जुन्या खरडी... आता त्यातले काय साठवायचे काय नाही.
मिपावर एका दिवसात माझे खरडव्हीचे ११ पाने भरले होते.
मिपा प्रशासन खरडवहीचा बॅकप घेण्ण्यासाठी काहि सोय देउ शकते का?

(८९९७ खरडींचा मालक) निखिल देशपांडे

तू म्हणतोयस तसं होतय खरं!
मी नुकतीच ८५ पाने उडवली त्याला साडेआठतास लागले. सगळं संपल्यावर मागची चार वर्षे एकदम पुसली गेल्याचे भान आले. काय काय आठवत होते खरडी उडवताना. काहीवेळा हसून पुरेवाट झाली होती तर कधी कोणी निवर्तल्याच्या बातमीने मी स्वातीताईला आणि तिने मला भावनाविवश होऊन केलेल्या खरडी होत्या. माझ्या आणि प्राजुच्या सांकेतिक शब्दातल्या खरडी होत्या. मला बरेच महिने इतराच्या खरडवह्या उचकता येतात हेच माहित नव्हते (मिपावर खरडवही आहे हेच मुळात माहित व्हायचे होते). नंतर समजल्यावर सगळे जण बिझी असतात, कोण कश्याला आपल्या वह्या वाचतय असं वाटायचं. "माझ्याशी मयत्री " वाल्या खास खरडीही होत्या. ;) अमोल आणि मोदकानं तर घराच्या अंगणात खेळावं तसा दंगा घातला होता तिथं. ;) तुमच्याकडे आज वांग्याची भाजी आहे असे कोणीतरी सांगितल्यावर मला आश्चर्य वाटले होते. मीच ते प्राजु किंवा स्वातीताईला लिहिल्यामुळे समजले होते. ;) आणखीही सिझनल खरडी होत्या. त्यात तुमच्याकडे बर्फ किती, उन्हाळ्यात तापमान तर पावसाळ्यात पाऊस असेही संदर्भ होते. खरडवहीनं त्याअर्थी बरेच पावसाळे पाहिले होते. :)
उचकपाचक मंडळात मात्र आज्याबात विंट्रेष्ट नव्हता. मलाही इतरांच्या वह्या दिसतात का एवढ्यासाठीच एकदा पाहिल्या होत्या, अन्यथा फारसे नाही.
असो. चालायचच.

मोदक's picture

14 Sep 2012 - 2:33 am | मोदक

"जुन्या खरडी गेल्या तर गेल्या, किती दिवसातून आपल्याच खरडवहीच्या तिसर्‍या व चौथ्या पानापेक्षा पुढे जायची वेळ येते..?" असा प्रॅक्टीकल विचार करून मिपावरची सूचना वाचून सोडून दिली होती. पण..

लीलाधराने रोज खवत येवून "सुसका ऽ ऽ ऽ ऽ ळ "अशी दिलेली बांग, त्यावर आणखी ४ जणांना दिलेल्या शुभेच्छा.. पुढे अवांतर होवून सुदुपार, सुसंध्याकाळ, सुरात्र.. नंतर आणखी अवांतर होवून सुप्रीदुपार आणि सुप्रीरात्र अशा वेळीअवेळी येणार्‍या आणि केलेल्या खरडी..

पैसाताई बरोबर मारलेल्या कोकणाच्या गफ्फा..

दरवेळी नवीन दृष्टीकोन दाखवणार्‍या पेठकर काकांबरोबरच्या चर्चा..

रेवती आज्जी, 'दिपीकामय' अमोल आणि पैसाताई यांच्याबरोबरच्या खरडी... अशक्य आणि अवर्णनीय.
रोज कोण कुणाचा नावाने कुणाच्या खरडवहीत काय लिहीतो आहे हे चारपाच खव उचकल्याशिवाय कळायचेच नाही. :-D

चौराकाकांनी फावल्या वेळात काढून दिलेले मोदकाचे चित्र...

सूर्यपुत्राने केलेली टायपींग मिष्टेक आणि 'मोदक' चे झालेले "मादक".
हे नवीन नाव तर अजूनही चिकटून बसले आहे.

खवतून मिळालेले बरेच मित्र, वल्ल्या, झेलेश, सागर PDY सारखे ट्रेकींगप्रेमी, प्यारेकाका, ५०, पेठकर काकांसारखे 'मोठे' लोक.. सगळ्या आज्ज्या, काकवा... मैत्रीणी (या मैत्रीणी तर अगदी मोजक्याच आहेत, पण त्या लै लोकांच्या डोळ्यावर येतात! :-D)

या आणि अशा अनेक आठवणी कधीच पुसल्या जाणार नाहीत...

(सहज चेक केले तर माझ्या खवत पहिली खरड पर्‍याचीच आहे.. मंदाकिनीच्या संदर्भात. ;-))

चौकटराजा's picture

14 Sep 2012 - 8:06 am | चौकटराजा

मैत्रीणी (या मैत्रीणी तर अगदी मोजक्याच आहेत, पण त्या लै लोकांच्या डोळ्यावर येतात!
त्या जळणार्‍या पैकी मी एक,चायला साठ वर्षात एकही मैत्रिण नाही अशी अवस्था असल्यावर मादकावर
सॉरी मोदकावर म्या जळणार नायतर काय ?

छ्या.....................(आता स्पष्टीकरण का देताय)......... संदर्भ वल्लिदा> बरोबरची आपली धावती भेट...

राजेश घासकडवी's picture

13 Sep 2012 - 10:48 pm | राजेश घासकडवी

स्वगृहात हे वाचले आणि काळजात लख्खकन वीजच चमकली बघा.

अगदी हेच म्हणायचं होतं. मिपाची खरडवही म्हणजे माझ्या मिपावरच्या वावराची नोंद आहे. दंगा करायला मी इथेच शिकलो. अनेक लोकांची आयडी म्हणून ओळख लेखनातून झाली तरी प्रत्यक्ष व्यक्ती म्हणून ओळख व्हायला खरडवह्यांतूनच सुरूवात झाली.

मला तर असं वाटतं की कोणी जर बसून खरडवह्यांचं नीट संकलन केलं तर अत्यंत मनोरंजक साहित्य निर्माण होईल. हा ठेवा नष्ट करून टाकायचा या कल्पनेनेच काहीतरी हरवल्यासारखं वाटतं.

मिपा व्यवस्थापनाने खरडवह्या साफ करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा ही मनापासून विनंती. किमान तात्पुरती मुदत तरी वाढवून द्यावी.

श्रावण मोडक's picture

13 Sep 2012 - 11:11 pm | श्रावण मोडक

खरडवह्या डीलीट कशा होतात? ंमार्ग काढा. तोवर बाकी 'प्रगती' थांबली तरी चालेल. :-)-

पिवळा डांबिस's picture

13 Sep 2012 - 11:17 pm | पिवळा डांबिस

पराशी १००% सहमत आहे.
अहो खरडवह्या आणि खरडफळा हे वरण-भाताच्या सुग्रास जेवणातल्या तूप आणि लिंबासारखे अनुक्रमे आहेत...
दिसायला क्षुल्लक वाटतात पण त्यामुळेच त्या पदार्थाला ती चव येते...

उद्या खव गेल्या तर मग श्रामो, बिका यांनी सांडलेले अतिरिक्त ज्ञानकण आम्ही वेचायचे कुठे?
पाकक्रियाप्रेमी सभासदांच्या एकमेकांना केलेल्या खरडी वाचून आम्ही स्वतःची करमणूक करून घ्यायची कशी?
विमे निरनिराळ्या गळवांची एसेसमेंट कशी करतात ते समजायचं कसं?
नंदनच्या कोट्या... ते सोडा, त्याला दोन पेग पाजून रात्रभर ऐकता येतील,
पण नाना, परा, धम्या या दूरवरच्या लाडक्यांची मुक्ताफळं वाचायची कशी?

आता मिपावर सक्रिय नसलेल्या आमच्या जुन्या मित्रांच्या (तात्या, टार्‍या, आणि सर्किटराव!! त्यांना विसरून कसं चालेल?) आता खरडीच तेव्हढ्या राहिल्यात की!!

अगदीच वाटलं तर फारतर खरडफळा साफ करा, पण खरडवह्या साफ नका करू बाबा!!!
एकवेळ लिंबू पिळल्याशिवाय वरण-भात खाऊ पण तुपाच्या धारेशिवाय?
छे! ते कसं जमायचं हो?
:)

मी इथे नविन असताना ,मिपाकराना जास्त ओळखत नव्हती ,खरडवहिचि आणि माझी ओळख दातारांच्या आन्याने करुन दिली . मग हळु हळु बरेच खरडी मित्र झाले त्यात वल्ली ,आन्या ,मोदक ,लीलाधर ही मोजकीच नावं माझ्या खरडवहित
जास्त यायची ,मग मीच इथे केलेल्या लिखानावर उगा कुणितरी येऊन पिंका टाकुन जायचं ..तर कुणाला
माझ्या खरडवहित मुलांचीच वर्दळ का बॉ ? असे प्रश्न पडु लागले . ह्म्म त्यात आघाडीवर असणार नाव म्हणजे आपले प्यारे १ काका ....त्यांची नी माझी धुमशान माझ्याच खरडवहित . त्याना मी प्रेमाने चंकी पांड्ये म्हटलेलं त्याना आवडलं नव्हतं , मोदका चं आणि माझं नेमकं काय चालु आहे ,ह्याचा शोध घेत फिरायचे ते .. मीच माझी खरडवहि आठवण येइल तेव्हा वाचायची ...
असाच एकदा फिरत फिरत ,हा पर्‍या पण आला होता ...जाम धुर निघाला होता ,म्हणे " तुझ्या खरडवहित तरुन पोरांची
गर्दी बघुन कससच होतय " ..
त्याला म्हटल तुमच्या खरडवहिकडनच मार्गदर्शन घेतलय .."
फक्त पन्नास ह्यांच्यावर राग धरुन त्यांच्याच एका कवितेवर विडंबन लिहिण्याचा असफल प्रयत्न आणि त्यासाठी मदत करणारे माझे गुर्जी अत्रुप्त आत्मा ह्या आठवणीहि खरडवहि जपून आहे ..
विश्वनाथ मेहेंदळे उर्फ विमे ह्याना उगाच जाउन खरडवहित " हाय विशु " करुन यायच मग त्या मागे दोन चार जणं तरी तो शब्द उचलतात हे माहित ,त्यामुळे मुद्दाम करायचं ..
नैनीलाहि एकदा असच जुळ्या भावांशी लग्न करु ह्यावरुन छेडलं होतं ,तिने तर माझी खरडच उडवली \(
आमुश्या पोर्णिमेला पैसा तै पण खरड टाकुन जायची ...मजा यायची .

सगळ्याच खरडी माझ्यासाठी अनमोल आहेत .
उडवल्या असतिल तर त्या फक्त मोदकाच्या खरडी ,तेहि तोच उडव म्हणुन सांगायचा ..अन्यथा नाहि ..
खरडफळ्यावर टाकलेल्या कवितांसाठी " छन लिहिलियेस" ह्या कमेंट पन खरडवहित मिळालेल्या आहेत ..
नवीन ओळख ,जुनी खुन्नस ,बरेच लेख आणि बर्र्‍याच आठवणी .मी इथे नविन ,माझ्यासाठी ही शिदोरिच ..
उडवु नका .....एवढच म्हणायचं होतं .

मृगनयनी's picture

13 Sep 2012 - 11:44 pm | मृगनयनी

मस्त लेख रे पर्या!!.. जुण्या आथवणी जागुरुथ होतात... या खरडींमुळे..
माझ्या बर्‍यापैकी सगळ्या खरडी (काही जेन्युइन अपवाद सोडून) मी मोरपीसासारख्या जपूण ठेवल्यात.. अगदी सखाराम गटणे'च्या देखील!!! =)) =))

आजही खरडवहीचे कुठलेही जुने पाने पान उघडले तरी वेळ कसा जातो कळत नाही. त्या खरडीच्या काळातल्या दिवसांच्या आठवणी सरता सरत नाहीत. ह्याच खरडवहीच्या एकाच पानावरती, मी एका खाली एक अशा अदिती आणि नैनीच्या खरडी ह्याची देही ह्याची डोळा पाहिलेल्या आहेत,

डोळे पाणावले!!!!... या खरडींचा तू एक स्नॅप्शॉट घेऊन ठेव.. उगीच नन्तर सम्पादकीय कारवाईत काही झाले.. तर एक प्रुफ राह्तो आपल्याकडे!!!! =)) =)) ;) ;)

नैनीलाहि एकदा असच जुळ्या भावांशी लग्न करु ह्यावरुन छेडलं होतं ,तिने तर माझी खरडच उडवली Angry

हे पू SSSSSSSSSSSSSSSSS.. जस्ट चील्ड!!.. अ‍ॅकचुली काही गोष्टी आणि काही माणसे यांच्याबद्दल मी खूप पझेसीव्ह आहे.. आणि काही गोष्टी व काही माणसे माझ्याबद्दलही पझेसीव्ह आहेत.. त्यामुळे ती खरड मला उड्वावी लागली... आणि बहुधा माझा तेव्हा सात्विक-पावित्र्य सप्ताह चालू होता!!!! ;) ;) ;)

पण जेव्हा मी मूडमध्ये होते.. तेव्हा सेक्सी धाग्यांवरती तुला उचित प्रतिसाद द्यायला मी कुठलीही कसर बाकी ठेवली नव्हती गं!!!! ;) प्लीज ट्राय मी टू अनडर्स्टॅन्ड!!!! :)

टवाळ कार्टा's picture

13 Sep 2012 - 11:50 pm | टवाळ कार्टा

तु मिपाची "विराट कोहली" आहेस ;)

किसीकी चन्द सासें
महका देती है सारा जहां
किसीकी चंद सासें
दहका देती है सारा जहां.
वो दहक कर महका दे
वो सासें आज कहांहै
उम्र गुजर जाती है
उन सासों मे
जो महक कर दिल को दहका देती है.

या काव्याचा पिडा यांनी कोणाच्या तरी (बहुतेक विजुभाऊ) यांच्या खवत केलेला अनुवाद -

कुणाची चांदणी सासू
बहकू देते सार्‍या जणां
कुणाची चांदणी सासू
दणका देते सार्‍या जणां...
जी दणका देऊन मणका मोडेल
अशी सासू आज आहेच कुठे?

असं मस्त मस्त वाड्ग्मय तुम्ही नामशेष करणार? :(

पिवळा डांबिस's picture

14 Sep 2012 - 2:25 am | पिवळा डांबिस

बघा, खुद्द मी हे लिहून विसरून गेलो होतो, पण हिला अजून आठवण आहे!!!
:)
नीलकान्तराव, आतातरी पटलं का खरडवह्यांचं महत्व?
खरडवह्या साफ करणं म्हणजे मिपारूपी अश्वाची आयाळ कापून टाकण्यासारखं आहे हो!!

>>या काव्याचा पिडा यांनी कोणाच्या तरी ...
आणि शुचि, माझे आवशी, अगो पिडा नाय गो, पिडां, पिडां!!!!!
अनुस्वार महत्वाचा आहे.
जसे 'चाचा' आणि 'चांचा'!!!!
:)

आणि शुचि, माझे आवशी, अगो पिडा नाय गो, पिडां, पिडां!!!!!
अनुस्वार महत्वाचा आहे.

=)) =)) खरय :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 Sep 2012 - 10:19 am | विश्वनाथ मेहेंदळे

आणि त्यांना "पिडा"च म्हणायचे असेल तर. ;-)

Nile's picture

13 Sep 2012 - 11:51 pm | Nile

व्हाट द fcuk!!!

बाकी पर्‍या माझं नाव विसरलास रे!! ;-)

नंदन's picture

14 Sep 2012 - 12:42 am | नंदन

लेखात आणि प्रतिसादांत व्यक्त केलेल्या भावनांशी सहमत आहे. पराच्या लेखामुळे खरडवह्यांत घातलेल्या अनेक धूमशानांची आठवण जागी झाली आणि अंमळ नव्हे तर तुडुंब हळवा झालो. (खरडवह्या ह्या मिपाकरांसाठी बटाट्याची चाळ अधिक जयप्रभा स्टुडिओ आहेत, असलं दवणीय वाक्य टाकण्याचा मोह येथे आवरला आहे)

जागा कमी पडत असेल तर पुणेकर वि. भायल्लें, निवासी वि. अनिवासी, भारत दीड महिन्यांत महासत्ता होणार की पावणेदोन?, साडेतीन मिनिटांत दम मटन बिर्याणी, विचारजंत वि. हिंदुत्ववादी आणि तत्सम धाग्यांना तिलांजली द्यावी, अशी एक नम्र आणि अनाहूत सुचवणी.

रेवती's picture

14 Sep 2012 - 12:55 am | रेवती

साडेतीन मिनिटांत दम मटन बिर्याणी
खी खी खी.
आधी चुकून 'साडेतीन मिनिटात टनाटन बिर्याणी' असं वाचलं.

चालायचंच रे पर्‍या...
बदल हा निसर्गाचा नियम आहे.

(७६७७ खरडींवाला) प्रभो

* माझं पण नाव नाही. ;)

सहज's picture

14 Sep 2012 - 6:57 am | सहज

ज्यांनी खरडवह्यात संसार मांडले होते त्यांचे काय होणार, अनुष्कावैनी, काजलवैनी, बेलाभाभी कुठे जाणार???

खरडवह्यांच्या आब्यासासाठी जगन्नाथ चक्करशेठ शिष्यवृत्ती सुरु करायचा मानस होता.

बाकी जागा कमी पडत असेल तर नंदनने सुचवलेल्या उपायाशी सहमत.

असो संमं सैफ अलि खान उवाच - आगे बढते है ना सोनु, एक फ्रेश स्टार्ट लेते है|

इरसाल's picture

14 Sep 2012 - 9:13 am | इरसाल

ज्यांचा दिवस फक्त आणी फक्त खव उचकपाचक करण्यात (आणी लावालाव्या करण्यात) जायचा त्यांची पंचाइत होणार असे दिसतेय.

स्पा's picture

14 Sep 2012 - 9:22 am | स्पा

लोकांना इतके भावनिक झालेले पाहून डोळे पाणावले
असो...

निलकांतच्या निर्णयाशी सहमत ..
खरडवह्या ठेवल्या तरी आणि उडवल्या तरी

Nile's picture

14 Sep 2012 - 10:06 am | Nile

मी तर म्हणतो जागा कमी पडत असेल तर लोकांची खाती सुद्धा उडवायला हरकत नाही. वरच्या दोघांपासून सुरू करा.

स्पा's picture

14 Sep 2012 - 10:10 am | स्पा

हॅ हॅ
तिकडे चैन पडत नाहीये का
असो

Nile's picture

14 Sep 2012 - 10:21 am | Nile

असे भावनिक होऊ नका. रुमाल द्या रे कुणीतरी यांना शेंबुड पुसायला.

स्पा's picture

14 Sep 2012 - 10:23 am | स्पा

भावनिक..
ख्या ख्या
आता असोच =))

इरसाल's picture

14 Sep 2012 - 10:52 am | इरसाल

आमेन.

करा चैन..........

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2012 - 9:52 am | ज्ञानोबाचे पैजार

खरड वह्या हा ऐतिहासिक ठेवा आहे. या जर नष्ट झाल्या तर तुकोबाला गाथा बुडाल्यावर जेवढे दुखः झाले होते त्या पेक्षा जास्त क्लेश आम्हाला होतील. २०० वर्षांनी आमचे पणतु किंवा खापर पणतु जेव्हा येथे येतील त्यांना आपल्या पुर्वजांचा समॄध्द वारसा कसा कळावा? महाराष्ट्र शासनाचे सांस्कॄतीक मंडळ यात तातडीने लक्ष घालेल अशी अपेक्षा करतो.

सुहास..'s picture

14 Sep 2012 - 9:52 am | सुहास..

अरे रे , च्यायला "झेड्यांच्या चड्ड्या " बी जाणार की काय ?

आम्हा उचक-पाचक वाल्यांची करमणुक कशी व्हायची आता

ऋषिकेश's picture

14 Sep 2012 - 10:05 am | ऋषिकेश

अरेरे! मी थेट Track पान उघडत असल्याने हे माहितच नव्हतं :(

वर अनेकांनी लिहिलं आहेच, त्याला अनुमोदन.. वह्या उड्वण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा

किंवा, शक्य असल्यास खरडवह्यांना सरसकट डिलिट करण्यापेक्षा मंडळींनाच आपणहुन काहि खरडी उडवायला सांगा. प्रत्येकाने २५% खरडी उडवल्या तरी बरीच जागा निर्माण व्हावी

च्यायला ही एक निव्वळ अफवा ठरावी अशी प्रार्थना करतो..

बाकी खरडवह्यामध्ये मी एम लिंबूटिंबूच आहे बरं का.. पण खरडवहीमध्ये बरेच छान मित्र मिळाले..

मदनबाण's picture

14 Sep 2012 - 11:45 am | मदनबाण

४ वर्षांचा इतिहास क्षणात पुसला जाणार ! :(
खरं तर मोकळेपणाने गप्पा मारायची,हाय हॅलो करायची उत्तम सुविधा म्हणजे खरडवही ! :)
इतक्या वर्षात किती जणांशी या खरड वहीच्या माध्यमातुन परिचय झाला ते आता मलाच ठावुक नाही,त्यासाठी जुनी पाने परत चाळावी लागतील ! पण यापुढे ते शक्य होणार नाही.
या खरडवहीमुळे अनेकां बरोबर उत्तम मैत्रीचे सुर जुळले,मला आधी माझी खरडवही कोणी येउन वाचत असेल असं वाटलच नव्हतं ! माझ्या वहीत कोण बरं आणि का डोकावेल ? असा विचार मनात होता,पण तो चुकीचा होता हे नंतर कळलेच ! ;)
मी इतरांच्या खरड वह्यांमधे डोकवाडोकवी तशी कमीच केली,नंतर नंतर तर पूर्णपणे बंदच केली... पण एकंदर कोणाचे टाके कोणाशी आहेत हे कळायला मात्र बरीच मदत झाली,आणि त्याचा फायदा देखील झाला. ;)
असो... मिपा अपग्रेड होत आहे याचा फार आनंद आहे,आत्ता पर्यंत अनेक बदल पाहिले आणि हा बदल देखील उत्तम असेल आणि त्याचे स्वागत आहे.
तरी सुद्धा खरडवहीतील नोंदी अबाधित रहाव्यात असे कुठेतरी वाटते...

जाता जाता :--- हा धागा वाचला जातोच आहे तर एक सुचना करावीशी वाटत आहे,ती म्हणजे मुख्य पानाच्या तळाशी पूर्वी पुढची पाने पाहण्याची सोय होती,ती आता नाही ! त्यामुळे बरीच गैरसोय होते... मागच्या पानावर गेलेले लेख पटकन पाहता येत नाहीत.या बद्धल काही उपाय योजला गेल्यास आनंद होईल.

नन्दादीप's picture

14 Sep 2012 - 5:36 pm | नन्दादीप

<<जाता जाता :--- हा धागा वाचला जातोच आहे तर एक सुचना करावीशी वाटत आहे,ती म्हणजे मुख्य पानाच्या तळाशी पूर्वी पुढची पाने पाहण्याची सोय होती,ती आता नाही ! त्यामुळे बरीच गैरसोय होते... मागच्या पानावर गेलेले लेख पटकन पाहता येत नाहीत.या बद्धल काही उपाय योजला गेल्यास आनंद होई<<>>

+१

शिल्पा ब's picture

14 Sep 2012 - 11:07 am | शिल्पा ब

हं...आम्हाला कोणी अन आम्ही कोणाला फारसं कै खरडत नसल्याने कै फरक पडत नै...शिवाय आम्ही इतके भावनिक वेग्रे नैत.
बाकी चालु द्या.

मन१'s picture

14 Sep 2012 - 11:42 am | मन१

पहिल्या वाक्याशी सहमत.
(चारेक वर्षात इनमिन तीन चार पानेच खरडी कमावू शकलेला)

मन१'s picture

14 Sep 2012 - 11:42 am | मन१

पहिल्या वाक्याशी सहमत.
(चारेक वर्षात इनमिन तीन चार पानेच खरडी कमावू शकलेला)

झकासराव's picture

14 Sep 2012 - 11:17 am | झकासराव

लेख उत्तम आहे. :)

माझीही शॅम्पेन's picture

14 Sep 2012 - 11:20 am | माझीही शॅम्पेन

खरड वह्या फारश्या कधी वापरल्या नाहीत किवा चाचपल्या नाहीत त्यामुळे काहीच फरक पडला नाही :)
,
प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीना शेवट आहे , कोणीही फारस मनावर घेवू नये
.
शेवटी हे सगळ आभासी जग आहे मित्र-मैत्रिणीनो , खराडी गेल्या बाराच्या भावात तरी मित्र थोडीच उडवले जाणार आहेत :)

खराडी बाराच्या नाही ओ, हल्ली पाच - साडेपाचच्या हजार स्वेअर फुट च्या भावात चालली आहे.

माझीही शॅम्पेन's picture

15 Sep 2012 - 11:31 am | माझीही शॅम्पेन

ओह ! ऐकावे ते नवलच :)

आता आम्हालाही हि फायदेशीर गुंतवणूक हवीशी वाटणे स्वाभाविक आहे !!

रणजित चितळे's picture

14 Sep 2012 - 12:17 pm | रणजित चितळे

आपली खरडवही वाचायलाच पाहिजे. ;-)
माझी खरडवही इतकी रंगीबेरंगी नाही :-(

अभ्या..'s picture

14 Sep 2012 - 12:50 pm | अभ्या..

आत्ताच कुठं खरडी येऊ लागल्या की..
काय चांगलं म्हणून बघवत नाही बघा यांना. :-(
एक तर येवढी लिहायची प्रॅक्टीस झाली होती तोपर्यंत अशी गेम करता का?
(सदागोपन रमेश ला जेवढी काळजी स्वतःच्या क्रिकेट रेकॉर्ड ची तेवढीच मला माझ्या खव ची)

इरसाल's picture

14 Sep 2012 - 2:07 pm | इरसाल

तो भोकर्‍या डोळ्यांचा विकेटकीपर गचकला काय?
कोण तो साबा करीम का काय त्याचे नाव. नाय म्हटलं तुम्ही त्याची पदवी काढुन ह्याला देवु र्‍हायले.

इरसाल's picture

14 Sep 2012 - 4:14 pm | इरसाल

डआकाटा

ऋषिकेश's picture

14 Sep 2012 - 1:03 pm | ऋषिकेश

अरे वा! नुकतीच पहिल्या पानावर ही महत्त्वाची सुचना बघितली की हा निर्णय मागे घेण्यात आला आहे:

महत्वाची सुचनादिनांक १७/०९/२०१२ रोजी मिसळपाव.कॉम भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री १२.०० वा. विश्रांती अवस्थेत जाईल. व परत दि. १८/०९/२०१२ रोजी मध्यरात्री १२.०० वा. परत सक्रिय होईल. या दरम्यान मिसळपाव उपलब्ध नसल्यामुळे सदस्यांना होणार्‍या त्रासाबद्दल मिपा व्यवस्थापन दिलगीर आहे.
तसेच यापुर्वी दिलेल्या सुचनेत खरडवह्या मोकळ्या करणार असल्याचे सांगीतले होते. मात्र तसे न करण्याचे ठरले आहे. शक्यता अशी आहे की १९/०९/२०१२ नंतर काही दिवस खरडवहीची सोय उपलब्ध नसेल. काही दिवसानंतर ती पुर्ववत होईल. - नीलकांत

नीलकांत आणि सगळ्या टिमचे मनःपूर्वक आभार

बॅटमॅन's picture

14 Sep 2012 - 1:08 pm | बॅटमॅन

हुश्श्श्श्श्श्श तेच्यायला!!!!!!!! बहुत आभार सर्व तांत्रिकांचे :)

तिमा's picture

14 Sep 2012 - 1:21 pm | तिमा

'परा' शराचा विजय असो.

स्पंदना's picture

14 Sep 2012 - 1:29 pm | स्पंदना

चला!
परा जिंदाबाद!

नि३सोलपुरकर's picture

14 Sep 2012 - 1:53 pm | नि३सोलपुरकर

ब्रावो परा.
आभारी आहे ,
पर्‍याचा - विषय उत्तमरित्या मांडल्याबद्दल आणी संमंचा सुसंगत निर्णय घेतल्याबद्दल.

निवेदिता-ताई's picture

14 Sep 2012 - 2:14 pm | निवेदिता-ताई

परा - झिंदाबाद

५० फक्त's picture

14 Sep 2012 - 2:15 pm | ५० फक्त

चला बला टळली,

चौकटराजा's picture

14 Sep 2012 - 3:05 pm | चौकटराजा

नीलकांताच्या सरकारने खरडवहीवरची " सबसिडी" चालू ठेवायचा निर्णय घेतलेला दिसतोय ! निळूभ्हौ
आभारी आहोत.

हल्ली खरडणं फारसं होत नसल्याने विशेष फरक पडणार नाही असं वाटतंय. हेच जर दीडेक वर्षांपूर्वी झालं असतं तर कदाचित सगळ्यांसारखंच हळहळलो असतो. दृष्टांत मिळाल्यानंतर खरडवहीतही रमावंसं वाटलं नाही.

मन१'s picture

14 Sep 2012 - 6:17 pm | मन१

आपलाही हरकारिया होउ शकतो ह्याची जाणीव झाली का सूडा?

मदनबाण's picture

14 Sep 2012 - 4:54 pm | मदनबाण

धन्यवाद नीलकांत. :)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Sep 2012 - 5:42 pm | परिकथेतील राजकुमार

जेनी...'s picture

14 Sep 2012 - 6:23 pm | जेनी...

आण्णा ,भारी रे ....!! :D

तरुणी ह्रुदयसम्राट ह्यासोबत ,तरुणींचे स्फुर्तीस्थान हे पद पण पायजेलाय ..

तरुणींचे स्फुर्तीस्थान ,स्पा..स्पा ..स्पा :D

स्पा's picture

14 Sep 2012 - 6:38 pm | स्पा

ऑ?

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Sep 2012 - 7:18 pm | बिपिन कार्यकर्ते

म्हणजे साइझ झीरो साठी स्फुर्ती घेण्यासाठी रे! ;)

स्पा's picture

14 Sep 2012 - 7:21 pm | स्पा

=)) =)) =))

मेलो मेलो

जेनी...'s picture

14 Sep 2012 - 9:58 pm | जेनी...

आक्शी आक्शी :D

अत्रुप्त आत्मा's picture

14 Sep 2012 - 6:46 pm | अत्रुप्त आत्मा

.............
तरुणी ह्रुदयसम्राट ह्यासोबत ,तरुणींचे स्फुर्तीस्थान हे पद पण पायजेलाय ..

तरुणींचे स्फुर्तीस्थान ,स्पा..स्पा ..स्पा>>>>

हा परा काय करेल सांगता येत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Sep 2012 - 6:43 pm | अत्रुप्त आत्मा

कं...पू...भाजी अवडली बर्र का...!!! ;)

बॅटमॅन's picture

14 Sep 2012 - 7:57 pm | बॅटमॅन

आयला मस्त!!!! _/\_

नंदन's picture

14 Sep 2012 - 10:41 pm | नंदन

पराण्णांचा विजय असो!

विकास's picture

14 Sep 2012 - 11:40 pm | विकास

एकदम मस्त झाले आहे! खरडवही उचक पाचक मंडळ व खरडवही इतिहास संशोधन मंडळाचे अभिनंदन!

श्रावण मोडक's picture

16 Sep 2012 - 10:09 am | श्रावण मोडक

या फलकामध्ये एकाही पाशवी शक्तीचा उल्लेख नाही हे पाहून शरम वाटली. नवा फलक बनवून स्त्रियानी पुढे आले पाहिजे.

जेनी...'s picture

16 Sep 2012 - 10:12 am | जेनी...

खरय खरय ..
पराण्णा ..तुमी स्त्रीयांसाठी खास फलक बनवा वो ...

त्यात आमची स्फुर्तीस्थानं मात्र आम्हाला हवी तीच आणी तेहि पूरुषच असतिल ह्याकडे नीट लक्षं द्या म्हणजे झालं .:P

:D

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Sep 2012 - 1:09 pm | विश्वनाथ मेहेंदळे

त्या साठी फोटो लागतील. ते कोण पुरवणार?

जेनी...'s picture

16 Sep 2012 - 4:02 pm | जेनी...

:(

चिंतामणी's picture

16 Sep 2012 - 4:31 pm | चिंतामणी

बोलती बंद झाली का ग.

सूड's picture

17 Sep 2012 - 8:51 am | सूड

हा हा हा !!

जेनी...'s picture

17 Sep 2012 - 9:26 am | जेनी...

आलेच ह्या ह्या ह्या करत .\(

बॅटमॅन's picture

17 Sep 2012 - 11:52 am | बॅटमॅन

हा हा हा हा

झकासराव's picture

17 Sep 2012 - 12:16 pm | झकासराव

जबरी :)

प्यारे१'s picture

14 Sep 2012 - 7:46 pm | प्यारे१

च्यायला....

मरा ठी संस्थळ कसं चालवायचं ते आमच्या कांताला विचारा.....!

एक गुगली टाकला नि १७६० विके टा निघाल्या. ;)

श्रावण मोडक's picture

14 Sep 2012 - 11:20 pm | श्रावण मोडक

कांताच्या गुरूंचं काय करायचं?