खजुराहो

प्रोजेक्ट मेघदूतच्या निमित्ताने मध्य भारत पालथा घालताना आमच्या ग्रुपने खजुराहोलाही भेट दिली. वल्लीचा लोणी-भापकरचा धागा वाचताना प्रतिसादात आलेल्या खजुराहोच्या उल्लेखामुळे खजुराहोची अधिक माहिती व्हावी यासाठी हा धागा काढत आहे.
खजुराहो येथील मंदिरांची बांधणी इ.स. ९५० ते इ.स. ११५० या दरम्यान चंदेल राजांनी केली. खजुराहोचा त्या काळचा परिसर हा अत्यंत दुर्गम व जंगलाने वेढलेला असा होता. परचक्रांपासून या मंदिरांना अनायासेच संरक्षण मिळत असल्याने आजपर्यंत ती (त्यामानाने) सुस्थितीत आहेत. मंदिरांचे एकूण ३ गट आहेत (दक्षिण, पूर्व व पश्चिम); पैकी वेळेअभावी फक्त दक्षिण भागातील मंदिरांना भेट देता आली. एक गट बघण्यासाठी कमीत कमी एक दिवस लागतो. प्रत्येक मंदिर हे कोणत्या ना कोणत्या तरी देवतेस समर्पित केले आहे. चला बघूयात काही प्रकाशचित्रे:

ही तर फक्त झलक आहे. अजून मंदिरांचे डिटेल्स बघायचे बाकी आहेत बर का!


हे चंदेल राज्याचे राजचिन्ह असावे असा अंदाज आहे. दक्षिण विभागात अनेक ठिकाणी हे शिल्प बघायला मिळते. मंदिराच्या चारही कोपर्‍यात आढळते.
७ घोडदळ

८ हत्तीदळ व सेवक

९: स्तंभ

१०: यक्षांनी तोलून धरलेले छत

११: सभामंडपातील घुमटात असलेले नक्षीकाम

प्रत्येक मंदिरातील घुमटात वेगवेगळे नक्षीकाम केलेले आढळते.
१२: अजून एक घुमट

१३: बाहेरील बाजूस खांबांवर असणारे चिन्हः

१४: कलाकुसरयुक्त दरवाजा

आता वळूयात इतर शिल्पांकडे. खजुराहो हे जरी मैथुन शिल्पांसाठी ओळखले जात असले तरी इतर शिल्पेही प्रचंड सुंदर आहेत. मैथुन शिल्पे संख्येने कमी आहेत. फारफार तर १०-१५% असतील. पण त्याची इतकी हवा होण्याचे एक कारण म्हणजे मैथुनाविषयी असलेला समाजाचा दृष्टीकोन. एक टॅबू म्हणून बघितले जाणे याउपर त्याचे कारण मलातरी वाटले नाही.
मैथुन शिल्पांची जागाही ठरलेली आहे. सभामंडप व गर्भगृह यांना जोडणार्‍या भागातच ही शिल्पे कोरली आहेत. इतर कोणत्याही ठिकाणी तशी शिल्पे दिसत नाहीत.
१५: अष्टभुज गणपती:

१६: यज्ञवराह शिल्प

१७: जोत्यावरील नक्षीकामः

१८: देवादिकांची प्रमाणबद्ध शिल्पे:

१९:

कळसापर्यंत अशीच प्रमाणबद्ध शिल्पे पाहून डोळे दिपले नाहीत तरच नवल. २ शिल्पांमध्ये काही म्हणजे काहीही फरक दिसत नाही. आज जग सिक्ससिग्मा-सिक्ससिग्मा म्हणून नाचतंय; त्या काळात अशी कोणती सिस्टीम असावी? हे सर्व काम मानवी हातांनी! काय ते कौशल्य, चिकाटी! खरंच आपण प्रगती केली म्हणजे नक्की काय केलं? हा प्रश्न घेऊनच मी बाहेर पडलो.

प्रतिक्रिया

निव्वळ अप्रतिम रे. १-४ मधील मंदिरे मस्त दिसताहेत एकदम. ७-८ मधले सैनिक खरे जिवंत वाटताहेत तर १२ मधील घुमट म्हंजे अगदी युरोपियन ष्टैल!!!! त्यातली ती पानाची कलाकुसर लै लै लै आवडल्या गेली आहे.

बाकी खजुराहोमध्ये फक्त १०-१५ टक्के शिल्पेच संभोगशिल्पे आहेत ही माहिती नव्याने कळाली. आणि हे प्रोजेक्ट मेघदूत काय आहे?

अन्याराव काय बोलू लका आता?
भारी म्हंजे आता अजून काय?
१ लंबर फोटू.
प्रोजेक्ट मेघदूत म्हणजे काय आषाढस्य प्रथम दिवसे करत करत कालीदासाचे मेघाची टूर रिपिट मारली की काय? ;-)

सुंदर फोटो.
हे प्रोजेक्ट मेघदूत काय आहे, याची माहितीपण द्याना जरा.
मध्य-भारतातल्या आणखी कोणकोणत्या जागा बघितल्यात? ओरछा, पचमढी, मांडव, महेश्वर, भीमबेटका ?

मस्त रे, १५ ऑगस्टला सिन्नर मधल्या शिवगोंडेश्वरला गेलो होतो, तिथं सुद्धा अशाच प्रकारची देवळं आहेत,

(आता वाहत्या गंगेत हात धुवुन घेण्यासाठी तिथले फोटो टाकुन चार कौतुकाचे प्रतिसाद पदरात पाडुन घ्यावेत झालं.)

१९७९ मधे मी एकटाच खजूराहो येथे सतना पन्ना मार्गे गेलो होतो. काही गंमतीशीर गोष्टी या निमित्ताने आठवल्या.
१. पुणे ते जबलपूर भाडे रूपये पंचावन्न इतके होते.
२. जबलपूर ते खजूराहो हे एस टी प्रवासाचे भाडे रूपये १८ .
३. खजोराहोला " भारत सरकारका अंगिकृत व्यवसाय म्हणून स्वस्तात असेल या अंदाजाने हॉटेल चंदेला त गेलो तर त्यावेळी रूम भाडे रूपये अडीचशे होते. बापरे म्हणून बाहेर पडलो.
४. सरकारी डोर्मिटरीमधे २४ तासाला रूपये ५ या दराने राहिलो.
५. जबल्पूर येथे परांजपे लॉजचे भाडे दिवसाला दॉर्मिटरी साठी रूपये ३ होते.
६. खजुराहो येथे सायकल ५० पैसे तासाने घेतली व पाच तासात सारे खजुराहो सायकलवरून पाहिले.
येथे रामदास स्वामी यानी स्थापिलेला मारूती पाहिल्याचे पुसटसे आठवते.

फोटो खूपच छान टिपले आहेस.

१० व्या फोटोतले छत तोलून धरताना होत असलेल्या कष्टाचे भारवाहक यक्षांच्या चेहर्‍यावरील भाव तर अगदी जिवंत आहेत.

१८ व्या फोटोतील व्यालाच्या डोक्यावर असलेली कमानदार पिंपळपानाकृती रचना थेट बौद्ध लेण्यांशी साध्यर्म दाखवणारीच.

मैथुन शिल्पांची जागाही ठरलेली आहे. सभामंडप व गर्भगृह यांना जोडणार्‍या भागातच ही शिल्पे कोरली आहेत.

ही शिल्पे पाहूनही विचलित न होता जो गर्भगृहात जाईल तोच खरा योगी अशी काहीशी संकल्पना.

प्रत्येक मंदिर हे कोणत्या ना कोणत्या तरी देवतेस समर्पित केले आहे.

नेमक्या कुठल्या देवतांना ही मंदिरे समर्पित आहेत?
शिव, विष्णू, देवी
का
इंद्र, अग्नी, वरूण, यम आदी वैदिक देवताही आहेत?

बाकी इतकी जुनी मंदिरे असूनही बर्‍यापैकी सुस्थितीत आहेत हे आपले सुदैवच.

चित्रात दाखवलेले यक्ष हे खरच भार तोलुन आहेत की फक्त प्रतिकात्मक म्हणुन त्यांची योजना असते ?

प्रतिकात्मक.

मुळात भारवाहक यक्ष कोरण्याची ही पद्धत बौद्ध लेण्यांतून आलेली आहे. अनेक बौद्ध लेण्यांत यक्ष कोरलेले दिसतात, भारवाहक आणि द्वारसंरक्षक अशा दोन्ही मुद्रांमध्ये.

हिंदू मंदिरांत आणि लेण्यांमध्ये यक्षांपेक्षा यक्षिणी जास्त आढळतात.

धन्यवाद

@ बॅटमॅन, चित्रगुप्त, अभिजीत, ५० फक्त, चौराकाका: प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. :)
@ वल्ली: ही मंदिरे विविध देवांना समर्पित आहेत. काही विष्णुला, काही शिवाला तर एक मंदिर चक्क सूर्याला समर्पित केले आहे. आजवर ही मंदिरे सुस्थितीत राहिली कारण ही जागाच मुळी दुर्गम होती.

प्रोजेक्ट मेघदूतबद्दल काही नियतकालिकांमधून लिखाण झाले असले तरी पुन्हा एक लेख लिहायचा विचार आहे. त्यात मी सविस्तरपणे बोलेन.

दातार साहेब आतातरी लिवा कि प्रोजेक्ट मेघदूत बद्दल... नियतकालिकांमधले लेख आणि first hand information यात फरक अस्तो राव...

फोटो अप्रतिमच. विशेषतः तिसर्‍या आणि शेवटच्या फोटोत मंदिराचा जो भाग दिसतो आहे, तो वेड लावणारा आहे. काय ते तपशील, आणि किती तो डौल! एकेक मूर्ती म्हणजे कैक तास पहावी अशी दिसतेय. खजुराहोचे ते १०-१५% फोटोच फार चर्चिले जात असल्याने हे सगळे सौंदर्य थोडे दुर्लक्षितच राहते.

प्रोजेक्ट मेघदूत बद्दल काही दिवसांपूर्वी वाचण्यात आलं होतं. तुझ्या लेखनातून येणारे भौगोलिक उल्लेख पाहता, हे तेच असावं अशी खात्री वाटते आहे.
तसं असेल, तर लवकरच एका सुंदर आणि माहितीपूर्ण लेखाच्या प्रतिक्षेत आहे... :) जरूर लिही, अर्थात परवानग्या वगैरेची भानगड (असलीच तर) सांभाळून.

झक्कास. इतके दिवस खजुराहो म्हणजे जिथे नजर टाकाल तिथे मैथुन शिल्पे असेच वाटत होते. तुझा धागा वाचुन नसते गैरसमज दूर झाले.

सुंदर!!!

अन्याभो,
निव्वळ अप्रतिम आणि हे प्रोजेक्ट मेघदूत काय आहे?

मेघदूत वरिल लेखाच्या प्रतिक्षेत आहे.

हे पाहा प्रकल्प मेघदूत वर मटा मध्ये आलेली माहिती.
मटा म्हणतो -

मान्सूनच्या आगमनापूवीर्च्या घटनांपासून ते तो बरसताना निसर्गात, समाजात होणारे बदल आणि माघारी फिरल्यानंतर समोर येणारे परिणाम या सर्व घटनाक्रमाचा अभ्यास करण्यासाठी 'प्रोजेक्ट मेघदूत'

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10022531.cms

येथे वैश्विक वाचा- ते निघाले होते मॉनसूनच्या मागावर...
http://vaishwik.blogspot.com.au/2011/05/blog-post_12.html?spref=tw

मस्त फोटो दातार साहेब, विशेषतः प्रकाशचित्र क्र. ११, १२ आणि १४. कलाकुसर / कोरीवकाम अप्रतिम आणि ते तितक्याच सुंदरतेने आपण छायाचित्रित केले आहे. प्रोजेक्ट मेघदूतविषयी आणखी सविस्तर वाचायला आवडेल.

अप्रतिम.

जबरी फोटू... :)

तो यज्ञवराह...जवळनं घेतलेला फोटू नैय्ये का....? :( असेल तर टाका ना...!

मस्तच आहेत फोटो. :)

बाकीची छायाचित्रे कुठे आहेत..? तिथे अजूनही बरीच काही शैक्षणिक आणि माहितीपूर्ण शिल्पे आहेत असे आम्ही ऐकून आहोत..

मी जेव्हा जेव्हा हि जुनी मंदिरे बघतो तेव्हा तेव्हा मला या एक त्या काळातील वाहने वाटतात जे खूप लांबून आले आहेत व त्यांना अजून खूप लांब जायचे आहे आणि त्या वाहानाच्या चारी बाजूने भरपूर इंधन साठे असलेले शेपण अस्त्र आहेत. हि खरीच माझी कल्पना आहे का कदाचित हे खरे हि असेल. कारण आकारावरून आपण त्याचा वापर कशासाठी होत असेल हे आपण आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर कितेक वेळा अनुमान लावत आलो आहेच ना.

फोटो आणि मोजक्याच पण नेमक्या शब्दात केलेले लेखन दोन्ही मस्तच!

फोटो खूपच सुरेख आहेत. पहिल्या पाच फोटोत दिसणारा मंदिरांचं सौंदर्य शब्दातीत आहे. जमल्यास त्यांच्यासोबत थोडी माहिती दिली तर आवडेल.

विस्तारभयास्तव काही फोटो टाकले नव्हते. ते इथे देत आहे.
१. यज्ञवराहः

(छायाचित्र सौजन्यः वल्लभ जोशी)
२. यज्ञवराहाच्या अंगावरील नक्षीकामः

३. सात घोड्यांच्या रथासह आदित्य:

४. अर्वाचीन मंदिर. यावर हिंदू, बौद्ध (पॅगोडा) व इस्लामी वास्तुशास्त्राचा प्रभाव लगेच कळून येतो. पहिला घुमट इस्लामी वास्तूपद्धतीनुसार, दुसरा घुमट पॅगोडासारखा व तिसरे शिखर हिंदू वास्तूशैलीप्रमाणे बांधले आहे.

यज्ञवराह लैच भारी रे.

+१.

लैच जबरा आहे यज्ञवराह.

यज्ञवाराह बद्दल

अहो पण खजुराहो येथे अजूनही काही छान छान शिल्प आहेत ना..?.. ;)

हो.. :)

खजुराहो विषयीचा गैरसमज दूर झाला.
छायाचित्रे पाहून "भेट" द्यायलाच हवी ही भावना प्रबळ झाली आहे.
वर्णन जरा अजून सविस्तर चालले असते .
कोणीतरी ती - तशी "दृष्टी" असलेला सोबत घेवूनच ही शिल्पकला पाहायला हवी.
मोघल - परकीयांनी हया सुंदर ठेव्याची नासधूस केली नाही हे नशीब !
आणि परकीय म्हणजे मोघल असे स्पष्ट लिहावे !

खजुराहो विषयीचा गैरसमज दूर झाला.
छायाचित्रे पाहून "भेट" द्यायलाच हवी ही भावना प्रबळ झाली आहे.
वर्णन जरा अजून सविस्तर चालले असते .
कोणीतरी ती - तशी "दृष्टी" असलेला सोबत घेवूनच ही शिल्पकला पाहायला हवी.
मोघल - परकीयांनी हया सुंदर ठेव्याची नासधूस केली नाही हे नशीब !
आणि परकीय म्हणजे मोघल असे स्पष्ट लिहावे !

मस्त सफर घडवलीत, सगळे फोटो मस्त, धन्यवाद शेयर केल्याबद्दल...

+१००

अन्याबा, शक्य तितकं लवकर राहिलेली देवळं बघून ये. आणि मेघदूत प्रकल्याबद्दल विचारलं तर एकदा लिंका चिकटवल्या होत्यास, त्या ऐवजी एखादा छानसा लेख येऊ दे!

खजुराहो दर्शन बसल्या बसल्या घडवून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद :)

उत्तम माहिती व छायाचित्रे !!

उत्तम

खजुराहो शिर्षक वाचून थोडा भीत भीत धागा उघडला पण तु टाकलेल्या या अप्रतिम प्रकाशचित्रांमुळे सगळे गैरसमज दुर झालेत. :)

मी जेंव्हा १९७९ मधे तेथे गेलो होतो त्यावेळी काही मंदिरांमधे पुनः स्थापनेचे काम चालू होते. कारागीर उन्हात दगडातून शिल्प घडवण्यासाठी कार्यरत होते. फोटो क्र १७ मधील जोत्याचे काम हे २० व्या शतकातील आहे अशी माझी जवळ जवळ खात्री आहे. आता मी जेंव्हा खजुराहोचा परिसर गुगल अर्थ मधून पाहिला त्यावेळी खजुराहो १००० टक्के बदललेले दिसत आहे. खुजुराहोला कामशिल्पे आहेत व ते जरा आडजागी आहे म्हणून ते टाळण्यात मतलब नाही. सतना पन्ना असे करीत गेल्यास मस्त जंगलातून गाडी
जाते. कांदेराय महादेव चे देऊळ तर अप्रतिम आहे. पुणे येथून झाशी येथे गेल्यास तेथूनही खजुराहो येथे
जाण्यास बसेस आहेत.
भारतीय मनास खजुराहो, वेरूळ, पत्तडकल ऐहोळ, बदामी, हलेबीडू सोमनाथपूर कोणार्क, भुवनेश्वर, श्रवणबेळगोळ, त़ंजाउर, जोधपूर, जयपूर, जेसलमेर, मामल्लपूर व अबू ही दृष्टीतीर्थे आहेत.

खजुराहो, आता 'भारत दर्शन्'च्या यादीत समाविष्ट केले आहे. धन्यवाद आणि सुंदर छायाचित्रांबद्दल अभिनंदन.

निव्वळ अप्रतिम हो सरकार.

दिल गार्डन गार्डन एकदम.

मस्तच एकदम

खजुराहो बद्दल एकलं होतं पण येवढे फोटो प्रथमच पाहिले. शिल्पकलेची स्तुती करायला शब्द अपुरे आहेत. धन्य ती शिल्पकला अन तुमचे फोटोही!

:)

यज्ञवराह, गणेश शिल्प काय दिसताहेत अन्या.

मस्त. ३ नंबरचा फॉटो एकदम मस्त.

फार आवडल अगदी शब्द सुचत नाहीत इतक. या वेळी आले की मुद्दाम खजुराहो पाह्यल जाईल. दृष्टी बदलुन टाकलीत पुरी.

सगळ्यांशी सहमत.

मस्तच लिहीले आहेस!

काही फोटोंबद्दल आ'भारी' आहोत. :)

अन्या जबरी फोटू रे
वर्णन आवडले