मिपा नाबाद ५ !

तर्री's picture
तर्री in जनातलं, मनातलं
16 Aug 2012 - 8:49 pm

माझ्या प्रोफाइल मध्ये कालावधी ४ वर्षे ४७ आठवडे दाखवतो आहे. म्हणजे मिपाला पाच वर्षे होत आली किंवा झाली !
हे म्हणजे एखाद्या जिंदादिल मित्राचे अचानक साठीशान्तीचे निमंत्रण यावे तसे आहे. मस्ती करता करता ५ वर्षे लोटली पण !
मधल्या काळात मिपाची भावंडे निघाली हे समजले पण आपला जीव येथेच रमतो. दोन द्याव्या दोन घ्याव्या आणि मज्जेत राहावे तर मिपा वर!
मिपा बाल्यावस्थेतून शैशवात पाउल ठेवते होते आहे. हे शैशव सदा सर्वकाळ राहावे. भांडणे भरपूर होवू देत पण ती परत एक होण्यासाठी!
वैदिक पुरोगामी भांडणे , रामायण महाभारतात सेक्सी कोण , इंच इंचाचे हिंदुत्व आणि मोकल्या हया दिशा सारखे सदा बहार , नेहमीचे यशस्वी लेख तर कधीही वाचून मनाचा ताण हलका करावा असे अभिजात!

तर ५ वर्षाबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन ! चला सुरु करा ५ वर्षाचा “पंच”नामा !

मौजमजासद्भावना

प्रतिक्रिया

विकास's picture

16 Aug 2012 - 8:52 pm | विकास

अजून चार आठवड्यांनी पाच वर्षे पूर्ण होतील!

पैसा's picture

16 Aug 2012 - 9:11 pm | पैसा

मिपासोबत तुमचंही अभिनंदन! मिपाचा वाढदिवस १महिना आधीच सुरू झाला की!

संपादकपदासाठी इच्छुकांनी त्वरीत नावनोंदणी करावी अशी झायरात द्यावी काय? आधीच्या संपादकांनी पाठ मार खाऊन अगदी मऊ झालिये आता. ;)

पैसा's picture

16 Aug 2012 - 9:13 pm | पैसा

नाव नको! ज्यांना ज्यांना मी विचारलं ते त्या दिवसापासून गायब होतात!

मन१'s picture

16 Aug 2012 - 9:26 pm | मन१

संपादक होण्यासाठी नक्की कुठली अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट वगैरे द्यावी लागते का ह्याची विचारपूस करावी म्हणतो.
एझ्कॅक्टली संपादक कुणाला करतात?

दादा कोंडके's picture

16 Aug 2012 - 11:54 pm | दादा कोंडके

अ‍ॅप्टीट्यूड च्या ऐवजी चुकून अ‍ॅटीट्यूड वाचलं. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Aug 2012 - 9:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आधीच्या संपादकांनी पाठ मार खाऊन अगदी मऊ झालिये आता.

काय डोळ्यात पाणी आणनारा विषय काढला. पाचव्या वर्षात पदार्पण करतांना नव नव्या भिडुंना संधी मिळालीच पाहिजे. नीलकांत, कर बाबा मोकळं आता. फक्त मला चावडीत यायचे अधिकार तेवढे राहु दे. :)

-दिलीप बिरुटे

कपिलमुनी's picture

17 Aug 2012 - 12:38 pm | कपिलमुनी

लहानपणी वर्गातल्या सर्वात वांड आणि धटिंगण मुलास मॉनिटर बनवायचे त्याची आठवण झाली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Aug 2012 - 9:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, चक्क पाच वर्ष पूर्ण होतील. श्री गणेश चतुर्थीला आमच्या मित्रानं निरोप टाकला बिरुटेशेठ आपलं मिसळपाव सुरु होतंय, चला घ्या सदस्यत्व आणि मजा करा. आता पाचव्या वर्षात पदार्पण करतांना नीलकांत , प्रशांत, आणि त्यांच्या टीमने सालं आपल्याला या मिपाचं लै वेड लावलं आहे. असो, जसं आठवेल तसं लिहीन.

मिपावर सालं आपलं लै म्हणजे लै प्रेम आहे, बस्स इतकंच. :)

-दिलीप बिरुटे

मिपावर सालं आपलं लै म्हणजे लै प्रेम आहे, बस्स इतकंच.

व्हय! व्हय!! व्हय!!!

मदनबाण's picture

16 Aug 2012 - 9:31 pm | मदनबाण

माझ्या माहिती नुसार गणेश चतुर्थीला मिपाची सुरुवात झाली ! ( चूक असेल तर क्षमस्व !)
सध्या माझ्या प्रोफाईल मधे 4 वर्षे 25 आठवडे असा कालावधी दिसत आहे.

इतक सुंदर संखेस्थळ स्थापन करणार्‍या तात्यांना आणि ते इतके सुंदरपणे सांभाळणार्‍या निलकांतला धन्यवाद. :)

जमल्यास इथेही टिचकी मारुन पहा :-
मराठी संकेतस्थळे

(बिल्ला क्रमांक ५७४) :)

तुषार काळभोर's picture

16 Aug 2012 - 10:27 pm | तुषार काळभोर

http://www.misalpav.com/node/11
१४-१५ सप्टेंबरच्या मध्यरात्री..

डावखुरा's picture

16 Aug 2012 - 11:02 pm | डावखुरा

खरंच मिपाला तोड नाहीय..अनेक मित्र मिळालेत..

अत्रुप्त आत्मा's picture

16 Aug 2012 - 11:24 pm | अत्रुप्त आत्मा

अभ्या..'s picture

17 Aug 2012 - 12:42 am | अभ्या..

मी नवीन आहे पण जीव जडला आहे मिपावर.
मनापासून शुभेच्छा.

मी_आहे_ना's picture

17 Aug 2012 - 9:45 am | मी_आहे_ना

अरे वा! मिपाची अशीच भरभराट होत राहो...आणि आम्हाला असेच वाचन-खाद्य मिळत राहो!

पुण्याचे वटवाघूळ's picture

17 Aug 2012 - 9:55 am | पुण्याचे वटवाघूळ

मिसळपाव लवकरच पाचवा वाढदिवस साजरा करणार हे वाचून खूप बरे वाटले. गेल्या जवळपास अडीच वर्षांपासून मी सदस्य आहे पण मला पहिल्यांदा संगणकावर मराठी लिहिता येत नसल्याने आणि अजूनही मुद्दे तितकेसे नीट मांडता येत नसल्यामुळे मी जास्त वाचायचेच काम केले. गेल्या अडीच वर्षांत अनेक चांगल्या लेखकांचे लेखन वाचायला मिळाले आणि त्यातून माझेही जीवन समृध्द झाले. एखाद्या दिवशी मलाही त्यांच्याप्रमाणेच लिहिता येईल अशी स्वप्ने मी नेहमीच बघतो.

मिसळपावला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अशीच वाटचाल चालू राहो ही सदिच्छा.

स्पा's picture

17 Aug 2012 - 10:10 am | स्पा

अरे वा..
या "पंचमी" निमित्त एक महा कट्टा गम्पतीत भरवावा असे सुचवतो :)

नाना चेंगट's picture

17 Aug 2012 - 10:32 am | नाना चेंगट

चिअर्स !!

धनुअमिता's picture

17 Aug 2012 - 11:24 am | धनुअमिता

मिपाला पुढील वाटचालीला अनेकोनेक शुभेच्छा.

HAPPY BIRTHDAY MISALPAV IN ADVANCE

सुधीर's picture

17 Aug 2012 - 12:33 pm | सुधीर

पुढील वाटचालीस शुभेच्छा! (गणेश चतुर्थी हाच मिपाचा वाढदिवस समजतो, कारण ती तारीख आठवत नाही).

आदिजोशी's picture

17 Aug 2012 - 12:58 pm | आदिजोशी

आमच्या वेळी हे असं नव्हतं. च्यक च्यक... सालं पूर्वीचं मिसळपाव नाही राहिलं.

ऋषिकेश's picture

17 Aug 2012 - 1:55 pm | ऋषिकेश

क्या बात है! पाच वर्ष होत आली सुद्धा!!
(माझ्यासकट) सर्व मिपाकरांचे अभिनंदन! :)

मराठी आंतरजालावर मैलाचा दगड ठरलेलं हे संस्थळ असेच बहरत राहो ही सदिच्छा!

दिपक's picture

17 Aug 2012 - 2:19 pm | दिपक

सर्वांना शुभेच्छा. मिपाची भरभराट अशीच होऊदे :)

बिल्ला नं

मनीषा's picture

17 Aug 2012 - 2:50 pm | मनीषा

अभिनंदन मिपा ..

आणि Thank you very much !!

विदेश's picture

17 Aug 2012 - 5:24 pm | विदेश

"मिसळपाव"ने बर-वाईट लिहिण्याची , चांगल-चुंगल वाचण्याची , उत्तमोत्तम प्रतिसाद मिळवण्याची -
संधी दिल्याबद्दल मिपाचे आभार मानणे, हे कर्तव्य आहे ..
मिपाचे येणा-या वाढदिवसानिमित्त अभिनंदन करणे हा हक्क आहे --
अ भि नं द न !!!