जलरंग... पोर्ट्रेटस् आणि फिगरेटिव्ज

एस's picture
एस in जनातलं, मनातलं
1 Aug 2012 - 10:54 pm

नमस्कार... मी सध्या जलरंग हे माध्यम वापरून चित्रे काढण्याचा प्रयत्न करीत आहे. मिपावर हे माझे पहिलेच लेखन आहे. तुमच्या प्रतिसादाची वाट पहात आहे. आवडले-न आवडले जरूर कळवा! :)

"शॅडोज् ऑन द बॅक"
Shadows on the back

"एथरियल ब्यूटि"
Ethereal Beauty

"वॉटरकलर न्यूड बॅक"
Watercolor Nude Back

"हर आयज्"
Her Eyes

रेखाटनप्रकटन

प्रतिक्रिया

खेडूत's picture

1 Aug 2012 - 11:10 pm | खेडूत

सुरेख!
दुसरे अंजेलिना आणि चौथं सोनाली कुलकर्णी - द्वितीय याना समोर ठेवून काढलय का? :)
किंवा एकूणच सगळी कुणा चित्रकाराच्या मूळ कलाकृती वरून घेतलीत?
काहीही असो, सर्व आवडली!

अर्धवटराव's picture

1 Aug 2012 - 11:30 pm | अर्धवटराव

रामसे ब्रदर्स च्या कुठल्याही टिपीकल (सॉ कॉल्ड) हॉरर फिल्म मधल्या बाईची चित्रे आहेत का हे? मंद उजेडात/मध्यरात्री नग्नावस्थेत शय्येवरुन उठणे, मग तसच आंघोळीला जाणे... आणि काहि तरी ढ्यांव ढ्यांव बघुन घाबरल्याचा अभिनय करणे... सर्वच मस्त जमलय.

अर्धवटराव

एस's picture

1 Aug 2012 - 11:31 pm | एस

"शॅडोज् ऑन द बॅक" हे आंतरजालावर रँडम प्रतिमाशोध घेऊन मिळालेल्या एका हाय-की प्रकाशचित्राचे जलरंगात केलेले चित्र आहे.
"एथरियल ब्यूटि" हे Miles W Mathis यांचे मूळ तैलरंगातील चित्र आहे. ते जलरंगात रंगवूनही मूळ परिणाम साधता येणे मला आव्हानात्मक वाटले म्हणून मी त्याचे जलरंगात रूपांतर केले.
"वॉटरकलर न्यूड बॅक" हे Kristina Havens यांचे चारकोलमधील चित्र आहे. मी ते जलरंगातही काढता येईल का हे पाहिले.
"हर आयज्" हेही असेच एका रँडम प्रतिमाशोधाने मिळालेल्या एका प्रकाशचित्रावरून केले आहे. मात्र मूळ चित्रातील काही गोष्टी मी टाळल्या आहेत, जसे की जाळीदार वस्त्र आणि तिचे स्मित. मी चित्राचा मूड काहीसा गूढ केला आहे.

जलरंगात जास्त करून निसर्गचित्रे रंगविली जातात. परंतु मला स्वतःला जलरंगात व्यक्तिचित्रे करणे जास्त आव्हानात्मक वाटतात.

कवितानागेश's picture

3 Aug 2012 - 4:38 pm | कवितानागेश

"एथरियल ब्यूटि" हे Miles W Mathis यांचे मूळ तैलरंगातील चित्र आहे. ते जलरंगात रंगवूनही मूळ परिणाम साधता येणे मला आव्हानात्मक वाटले म्हणून मी त्याचे जलरंगात रूपांतर केले.>
हे चित्र खरोखरच तैलरंगातले वाटतंय..
छान.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Aug 2012 - 12:16 am | अत्रुप्त आत्मा

शेवटचं लैच अवडलय......... :-)

अभ्या..'s picture

2 Aug 2012 - 12:31 am | अभ्या..

दुसरे ठिक. बाकी नाही आवड्ले. तुमची सही खूप आवडली.

चित्रगुप्त's picture

2 Aug 2012 - 1:35 am | चित्रगुप्त

जलरंगचित्रण म्हटले तर सोपे, म्हटले तर अवघड.
सुरुवात सोपी, जसजसे खोलात, सूक्ष्मात शिरावे, तसतसे अवघड होत जाते.
मला सर्वात 'एथरियल ब्यूटी' मधील प्रयोग आवडला. या चित्रात ज्या अगदी गडद जागा आहेत, त्यात आणखी काही बारकावे आहेत का, जे इथे दिसत नाहियेत? ओठांच्या आणि नाकाच्या मधला भाग जरा विचित्र वाटतो, तसेच नाक अगदी सरळ रेषेत कापल्यासारखे वाटतेय. अर्थात इथे न दिसणारे बारकावे मूळ चित्रात असू शकतात.

शॅडोज ऑन द बॅक मस्त.

एथिरीयल ब्युटी मध्ये नाकाजवळचा गाल फुगिर दिसण्याऐवजी चेपल्यासारखा दिसतो आहे.

विजुभाऊ's picture

2 Aug 2012 - 9:46 am | विजुभाऊ

एथिरीयल ब्युटी मध्ये नाकाजवळचा गाल फुगिर दिसण्याऐवजी चेपल्यासारखा दिसतो आहे
त्यामुळे काल त्या बै ची नवर्‍याबरोबर ज्याम हाणामारी झाली असावी अशी शंका येतेय.

आत्मशून्य's picture

2 Aug 2012 - 5:33 am | आत्मशून्य

ते शॅडोज् ऑन द बॅक मधे नक्कि कुठे शॅडोज बघायच्यात ? पाठीवर कैच दिसत नैयै.

जयंत कुलकर्णी's picture

2 Aug 2012 - 6:53 am | जयंत कुलकर्णी

खरे सांगायचे झाल्यास सर्व चित्रे चांगली आली आहेत. पहिल्य चित्रातील डाव्या हाताचा कोपरा काढणे अत्यंत आहे व रंगवणे त्याहून. चित्राचे जर उभे दोन भाग केले तर उजव्या भागात जरा गडबड उडालेली दिसते. कदाचित दुसर्‍या बैठकीत केले असावे.

दुसरे छान काढले आहे (मी मुद्दाम आले आहे असे म्हणत नाही. आले म्हटले की चित्रकाराच्या कष्टाला कमी किंमत दिल्यासारखे मला वाटते). मला तर डावीकडचा चेहरा काळा ठेवल्यामुळे चित्राला वेगळा परिणाम लाभला आहे असे वाटते.

तिसरे चित्र मला आवडले. फक्त उजव्या हाताचा पंजा जरा प्रमाणबद्ध असायला हवा होता असे वाटते. त्या स्त्रीच्या नाजूकपणाला तो शोभा देत नाही.

चवथ्या चित्रात बुब्बुळात आपण कमाल दाखविली आहे...............

You must keep painting.. BOL
मस्तच !

चवथ्या चित्रात बुब्बुळात आपण कमाल दाखविली आहे............... + १००,

खरंच, एवढं सोडुन मला चित्रातलं जास्त काही कळत नाही हे सांगुन आपली रजा घेतो.

चौकटराजा's picture

2 Aug 2012 - 8:00 am | चौकटराजा

चित्रकलेतील माझे सर्वात आवडते माध्यम . ( ज्यात मला फारसे काही आलेले नाही ). आपले मिपावर
सहर्ष स्वागत ! जलरंगात ग ना जाधव यानी व एम आर आचरेकरानी सर्व प्रकारचे काम केले आहे. सांप्रत मी मिलिंद मुळीक या इंजिनिअर चित्रकाराच्या प्रेमात पडलो आहे. आपण अधिका अधिक चित्रे सादर करण्यासाठी शुभेच्छा !

चित्रगुप्त's picture

2 Aug 2012 - 9:20 am | चित्रगुप्त

मला दोनदा त्यांना भेटायची संधी मिळाली होती, पहिल्यांदा मी इंदूरला आर्ट-स्कूल मधे शिकत असता पोर्ट्रेट च्या प्रात्यक्षिकासाठी आले होते. अवघ्या पंधरा मिनिटात तैल-रंगात केलेले अप्रतिम पोर्ट्रेट बघून थक्कच झालो होतो. काही काळाने मुंबईला त्यांच्या घरी त्यांची खूपशी निसर्ग-चित्रे बघायला मिळाली होती. सर्व चित्रे पाश्चात्य म्युझियम्स मधे असतात, त्या दर्जाची होती. त्या चित्रांचे पुढे काय झाले, आता कुठे आहेत, सुस्थितीत आहेत ना? असे प्रश्न या धाग्याच्या निमित्ताने पडले आहेत.

यशोधरा's picture

2 Aug 2012 - 9:02 am | यशोधरा

सुरेख जमली आहेत चित्रे.

प्रभाकर पेठकर's picture

2 Aug 2012 - 9:04 am | प्रभाकर पेठकर

चित्रकलेचे व्याकरण समजत नाही त्यामुळे, मला सर्वच चित्रे आवडली. 'अज्ञानात सुख असते' असे जे म्हणतात तसे असावे.

एखाद दोन नग्न पुरुषांची पाठमोरी चित्रे असती तर समतोल साधला गेला असता. समानतेचा जमाना आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Aug 2012 - 11:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रकलेचे व्याकरण समजत नाही त्यामुळे, मला सर्वच चित्रे आवडली.
अगदी अस्संच म्हणायचं आहे.

एखाद दोन नग्न पुरुषांची पाठमोरी चित्रे असती तर समतोल साधला गेला असता. समानतेचा जमाना आहे.

हाहाहा सहमत आहे. :)

-दिलीप बिरुटे

चित्र आवडली..
चुका काढणाऱ्या लोकांकडे लक्ष देत बसू नका..

जलरंगात व्यक्तिचित्र काढण्याचं धाडस केलंत हीच खूप मोठी गोष्ट आहे

सर्वच चित्रे आवडली आणी तिन नंबरच जरा जास्त आवडल, बाकी तुमची स्वाक्षरी सुध्दा खुप मस्त आहे.

--टुकुल

चौकटराजा's picture

2 Aug 2012 - 9:30 pm | चौकटराजा

पुण्यात सुधाकर खासगीवाले हे एक चित्रकार होते. त्यांची स्वाक्षरी साधारण अशीच होती.

एस's picture

2 Aug 2012 - 11:29 am | एस

सर्वांना धन्यवाद. सर्वांच्याच प्रतिक्रियांना उत्तर देणे शक्य नसले तरी काही मुद्दे येथे मांडतो.
मुळात जलरंग हे सर्वात अवघड माध्यम समजले जाते. कारण जलरंगांना त्यांचे स्वतःचे मत असते आणि जलरंगात चित्रकाराच्या हाती केवळ कागदावर रंग सोडणे व रंगांचे प्रवाह, त्यांची दिशा, एकमेकांत मिसळण्याचा किंवा एकमेकांमध्ये ढकलाढकली करण्याचा स्वभाव इ. ह्या गोष्टी नियंत्रित करणे एवढेच असते. जलरंगात एकदा झालेली चूक दुरूस्त करणे हे जवळजवळ अशक्य असते आणि त्यातही कागदाचा दर्जा, पाणी शोषून घेण्याची त्याची समान क्षमता, रंगांचा प्रवाहीपणा आणि वाळल्यानंतरही ताजं राहण्याची क्षमता इ. महत्त्वाचे ठरते. चित्रकाराच्या इच्छेस या माध्यमात सर्वाधिक मर्यादा येतात.
जलरंगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची तरल पारदर्शकता. त्याचमुळे हे माध्यम निसर्गचित्रणास सर्वाधिक अनुकूल आहे. मात्र व्यक्तिचित्रांसाठी या माध्यमाची निवड करणे चित्रकारासाठी फार आव्हानात्मक ठरू शकते. सूचकता म्हणजे जलरंग तर नेमकेपणा म्हणजे तैलरंग. मग जलरंग वापरूनही व्यक्तिचित्रांमध्ये आवश्यक असणारा नेमकेपणा साधता आला तर? याच दृष्टीने मी जलरंगांची निवड केली. (मात्र जलरंगातील सूचकतेचाच वापर करूनही फार वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिचित्रे काढता येतात. (Realistic Abstracts Portraits in Watercolors) )
वरील चित्रांची प्रकाशचित्रे भ्रमणध्वनीसंचाने काढली आहेत. त्यामुळे त्यात मूळ चित्रांचा परिणाम तितकासा आलेला नाही. उदा. एथरिअल ब्यूटि. तसेच इतर काही चित्रांमधील काही भाग जसेच्या तसे काढणे जलरंगांच्या मर्यादेमुळे शक्य झाले नाही व तसा उद्देशही नव्हता. (वापरलेला कागदाचा दर्जा आयात केलेल्या कागदाच्या तुलनेत सामान्य होता. पुढे जमल्यास आर्चिस्, विन्सर आणि न्यूटन वगैरेंचे कागद मागवेन.. :) )
मिलिंद मुळीक, सचिन नाईक व इतर कलाकारांची चित्रे मला खूपच आवडतात. विशेषतः मुळीक यांची शैली.

मुळीकांची चित्रं मलाही खूप आवडतात.
त्यांनी काढलेले एक अतिशय सुरेख पोर्ट्रेट माझ्या संग्रही आहे. (पेन्सिल माध्यम)

अजूनही येऊद्यात चित्रं.

नगरीनिरंजन's picture

2 Aug 2012 - 12:42 pm | नगरीनिरंजन

खूपच छान!

स्वानन्द's picture

2 Aug 2012 - 2:16 pm | स्वानन्द

अफलातून!!! सगळी चित्रे आवडली. सर्वात जास्त पहिले चित्र आवडले!!

प्रचेतस's picture

2 Aug 2012 - 4:29 pm | प्रचेतस

चित्रे खूपच छान.

'एथरियल ब्यूटि' खूपच सुरेख.

पैसा's picture

2 Aug 2012 - 9:51 pm | पैसा

जलरंगात चित्रं काढणं फारच कठीण. कारण त्यात एकदा काही चुकलं तर सुधारायला वाव नसतो. त्यात तुम्ही व्यक्तीचित्रं केलीत हे फारच मोठं. मोबाईलवरचे फोटो असूनही चित्रं चांगली आहेत हे कळतंय. चौथ्या चित्रातले डोळे खूपच आवडले. छान! आणखी येऊ द्या!

चिगो's picture

2 Aug 2012 - 11:42 pm | चिगो

सगळीच चित्रे सुंदर आहे. रँकींग द्यायची झाल्यास ( आमची लायकी नसतांनाही ;-) ) पहीले, तिसरे, दुसरे आणि त्यानंतर चौथे..

पिवळा डांबिस's picture

2 Aug 2012 - 11:48 pm | पिवळा डांबिस

स्वॅप्स,
तुमची जलरंगातील चित्रे आवडली.
चौथ्या चित्रातील स्त्रीचे डोळे (बुबुळं) खूप प्रभावी वाटली.
पहिल्या चित्रात जर डावीकडून प्रकाश येतोय असं मानलं तर त्या स्त्रीच्या डाव्या मांडीवर सावली बघायला किंचित विचित्र वाटली. पण मला चित्रकलेतलं फारसं ज्ञान नसल्याने चूभूद्याघ्या....

तुमच्या चित्रांबरोबरच तुम्ही केलेलं विश्लेषण विशेष आवडलं...

आणि तुमचं सिग्नेचर तर बेहद्द आवडलं!
------------------------------------------------------------------
"गरूडासारखे उडायची इच्छा असेल तर बदकांबरोबर पोहत बसण्यात वेळ घालवू नका."
"If you want to fly like eagle, don't waste your time swimming with ducks."
------------------------------------
क्या बात है!!!

एस's picture

3 Aug 2012 - 11:07 pm | एस

धन्यवाद... :)

पहिल्या चित्राबद्दल - आधी नमूद केल्याप्रमाणे हे चित्र एका हाय-की प्रकाशचित्रावरून बनवलेले आहे. त्यात ती मॉडेल एका शुभ्र गादीवर बसली आहे. माझ्या प्रकाशचित्रणाच्या ज्ञानानुसार मुख्य प्रकाशस्रोत डावीकडे समोर आहे (एक भलामोठा सॉफ्टबॉक्स) व परावर्तक किंवा दुय्यम सॉफ्टबॉक्स थोडा उजवीकडे. केशसंभारावर अजून एक प्रकाशझोत असावा. हाय-की (Hi-Key) म्हणजे खूपच ब्राईट व लो-की (Low-Key) म्हणजे खूपच डार्क. हाय-की असल्याने सावल्या फारशा नाहीत. केवळ तिची पाठ काहीशी सावलीत आहे व त्यावरही गादीवरून परावर्तीत होणारा प्रकाश पडत आहे. डावीकडे मांडीवर प्रकाश तसा आहेच. मागे बाजूला सावली आहे कारण तो भाग प्रकाशदिशेला काहीसा कोनात आहे. टाचेवरील छोटी सावली प्रकाशाची दिशा दर्शविते.
मी वापरलेला कागद थोडासा ब्लॉटिंग करणारा असल्याने शेड्स मधील ट्रान्झिशनस् तितक्या स्मूथ नाही आल्या व तिथे कडा निर्माण झाल्या आहेत. तरी मला हे चित्र व्यक्तिशः आवडते.

आणि स्वाक्षरी आवडल्याबद्दल आभार... ह्या स्वाक्षरीच्या वाक्याने मला वेळोवेळी मदत केलेली आहे. :)

पिवळा डांबिस's picture

4 Aug 2012 - 2:04 am | पिवळा डांबिस

तुमचं विवेचन समजण्यासारखं आहे. आता त्यादृष्टीने परत चित्र पाहिल्यावर ते पटतं.
अर्थात ते चित्र मलाही आवडलेलं आहे.
तुमची आणखी चित्रे पहायला आवडतील.

बॅटमॅन's picture

3 Aug 2012 - 12:10 am | बॅटमॅन

सर्व चित्रे आवडली. विशेष भारी ४थ्यातली बुबुळे. फारच मस्त आलीयेत!!!!!

संजय क्षीरसागर's picture

3 Aug 2012 - 12:32 am | संजय क्षीरसागर

दुसरही उत्तम
तिसर्‍या चित्रात प्रपोर्शन जमलेलं नाही
चवथ्या चित्रात जर तुम्हाला भय दाखवायचं नसेल तर डोळे सुरेख येऊन ही प्रयत्न फसलाय

तुम्ही चित्रकला शिकताय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, लगे रहो

अभ्या..'s picture

3 Aug 2012 - 1:11 am | अभ्या..

जलरंगातील चित्रे म्हणजे आमच्या कलानिकेतनचे(कोल्हापूर) वैशिष्ट्य. तिथे व्यक्तिचित्रे सुरुवातीस जलरंगातीलच असतात. तेथील गुरूजनान्चे म्हणणे "चित्र बघून चित्र काढू नका. ल्यान्ड्स्केपला निसर्गात जा. पोर्टेट्ला मोडेल बसवा. " आणि अ‍ॅनाटोमी मस्ट.

...चित्र (वा फोटो) बघून चित्र काढू नका. लँडस्केपला निसर्गात जा. पोर्टेट्ला मॉडेल बसवा. आणि अ‍ॅनाटॉमी मस्ट........
.......शंभर टक्के बरोबर.
हाच खरा मार्ग असतो चित्रकला शिकण्याचा.

मुळातच द्विमित असलेल्या फोटो वा चित्रावरून चित्र बनवणे, आणि त्रिमितीतील दृष्य बघून चित्रकला शिकणे, यात जमीन-अस्मानाचा फरक पडतो, खरी चित्रकला शिकणे त्यातूनच साध्य होते.
चित्रावरून चित्रे काढण्याची सवय लागली, की ती सोडवत नाही, आणि त्याशिवाय काही जमतच नाही, असे होऊन पुढे मार्ग खुंटतो.
माझ्याकडे शिकणार्‍यांचे मी आधी चित्रावरून चित्रे काढणे बंद करवतो. मंडळी नाराज होतात, सोडूनही जातात. पण त्यांचे खरे कल्याण त्यातच असते. ज्यांना समजते, ते शिकतात.

एस's picture

3 Aug 2012 - 10:28 pm | एस

चित्रगुप्त सरांशी सहमत आहे.

सौरभ उप्स's picture

3 Aug 2012 - 11:02 am | सौरभ उप्स

छान, जलरंगात portrait करताय इट्स good. पहिल्यात anatomy उत्तम जमलीये.. बाकी ३ ठीक वाटले...

शुचि's picture

3 Aug 2012 - 7:05 pm | शुचि

सेन्श्युअल!!!

एस's picture

3 Aug 2012 - 10:31 pm | एस

धन्यवाद...
शुचिजी, अतिशय नेमक्या शब्दात वरील चित्रांचा गाभा मांडलात... मला सेन्शुअलिटि च अपेक्षित होती.

पहाताक्षणी फक्त तोच शब्द मनात आला. :)

एस's picture

4 Aug 2012 - 1:20 am | एस

sen.su.ous/ˈsenSHooəs/
Adjective: 1. Relating to or affecting the senses rather than the intellect.
2. Attractive or gratifying physically, esp. sexually.

असा या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. पण मला तो फार मर्यादित वाटतो. निव्वळ शारीरिकच नव्हे तर बौद्धिक आकर्षणही तितकेच महत्त्वाचे वाटते मला. मिपावरच एक प्रसिद्ध धागा जवळजवळ अशाच विषयासंबंधी आहे. इथे मी केवळ इतकेच म्हणेन की हो, स्त्री च्या अभिजात सौंदर्याचीच प्रेरणा माझ्या खूपशा चित्रांमागे आहे व ते मी नाकारणार नाही.

चौकटराजा's picture

4 Aug 2012 - 6:53 am | चौकटराजा

विश्वातील सुंदर गोष्ट म्हणजे स्त्री ! सर्वात सुंदर म्हणजे वसुंधरा !

चित्रातलं फारसं कळत नाही पण छान वाटतायत. शेवटचा खूपच आवडला. पण का देव जाणे मला तिचे डोळे दोन वेगळ्या दिशांना बघतायत असं वाटतय. एक डोळा सरळ आणि दुसरा वर बघतोय असं वाटतय. बहुतेक सावलीचा परिणाम असावा.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Aug 2012 - 12:31 pm | बिपिन कार्यकर्ते

सु रे ख ! ! !

चिगो's picture

22 Jun 2015 - 8:21 pm | चिगो

सगळीच चित्रे सुंदर.. तिसरे बेस्ट..

पद्मावति's picture

22 Jun 2015 - 9:21 pm | पद्मावति

छान काढली आहेत. चित्रकलेविषयी माझं ज्ञान शून्य आहे. पण चांगले चित्र आणि वाईट चित्र मात्र नक्की कळते. त्यावरून सांगते कीं तुमची चित्रे उत्तम आहेत. खरोखर अप्रतिम. फक्त मला पर्सनली जरा जास्तं बोल्ड वाटली. अर्थात तुमची कला आणि हाताचे वळण वादातीत अस्सल सोने आहे हेही तितकेच खरे.

काव्यान्जलि's picture

25 Jun 2015 - 6:20 pm | काव्यान्जलि

सुन्दर.....

रातराणी's picture

25 Jun 2015 - 11:46 pm | रातराणी

अप्रतिम!! निव्वळ वेड आहे हे!