आयडीया ३जी सेवा तक्रार - सल्ला हवाय

मी काही महिन्यांपूर्वी आयडिया ची ३जी सेवा (८५० रुपये मासिक शुल्क आणि ३ जीबी वापर मर्यादा) ऍक्टिवेट करण्यासाठी विनंती केली.दुसऱ्या दिवशी कस्टमर केअर एक्झिकेटिव्ह ने मला ती सेवा ऍक्टिवेट झाल्याचे सांगितले आणि मी इंटरनेट वापरायला सुरुवात केली , पण मिळत असलेली सर्विस अतिशय खराब होती . ७.१ mbps चा स्पीड सांगून ३ mbps पण स्पीड मिळत नव्हता , डाटा अपलोड करताना तासंतास वाट बघावी लागत होती , ह्या दरम्यानच्या काळात आयडिया कस्टमर केयर ला तक्रार केली पण काहीच सेवा दिली गेली नाही, अखेर काही दिवसांनी बिल भरायला पत्र आले तेव्हा मी स्पष्ट सांगितले कि माझी सर्विस नीट करा आणि मग पैसे घ्या, पण तसे काही झाले नाही आणि काही दिवसांनी माझे कनेक्शन बंद झाले , त्या नंतर देखील मी काही वेळा आयडिया कस्टमर केयर ला फोन केले पण काही प्रतिसाद मिळाला नाही ,

आता मला बिल भरण्यासाठी कायदेशीर कारवाईची धमकी दिली जात आहे , तरी ह्या विषयी मी कोठे तक्रार करू शकतो तसेच असा अनुभव ह्या पूर्वी कोणाला आला आहे का ह्या विषयी सल्ला हवा आहे .....

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

७.१ एमबीपीएस च्या पुढे जो छोटा तारा असतो ना, तो खूप महत्वाचा असतो. आयडियाचे तारे कुठे मिळाले नाहीत. व्होडाफोनचे तारे येथे आहेत. आयडियाचेही साधारण असेच असतील. बाकी कायदेशीर बाबी वैग्रे माहिती नाहीत, पण ३००-४०० पर्यंतच्या बिलाचा फारसा फॉलोअप घेतला जात नाही, असा वैयक्तिक अनुभव आहे.

७.१ एम बी हे सांगणे म्हणजे एखाद्या हाय वे वरुन २०० किमी स्पीडचे वाहन जाऊ शकते असेम्हणन्यासारखे असते... प्रत्यक्षात तितक्या स्पीडने जायला कुणाला मिळत नाही.

********************

तुम्ही कुठल्या गावात आहात? तुमच्या गावात आय्डिया ३ जी आहे का? तुमच्या गावातच जर २ जी असेल, तर तुम्ही ३ जी चा रिचार्ज करुन फायदा होत नाही... तुमच्या गावात ३ जी आहे का हे आधी पहा.... कस्टमर केअरला फोन करुन विचारा तुमच्या गावात ३ जी आहे का?

गावातच ३ जी नसेल तर २ जीचे रिचार्ज २०० -३०० ला होते, ते घेऊन गप्प बसा..

********************

७.१ mbps चा स्पीड सांगून ३ mbps पण स्पीड मिळत नव्हता ,

माझ्या माहीती नुसार ७.१ mbps ची बँड्विड्थ अलोकेट केली गेली तर त्याच्या १०% अ‍ॅक्चुअल डाउनलोड स्पिड मिळातो. थोडक्यात ३ mbps न्हवे तर कीमान सरासरी ७५०kbps च्या आसपास जरी स्पिड मिळाला असेल तुम्ही खुष रहा. तसेच ३ mbps म्हणजे ३२५kbps च्या आसपास प्रत्यक्ष डाउनलोड स्पिड मिळणार समजावे. हे १०% गणित सोपं पडतं आपला प्लान व्यवस्थीत काम करत आहे की नाही हे समजायला.

We are who we are!

जोडणीचा वेग हा mbps/kbps मध्ये दाखवला / मोजला/सांगितल जातो. तर डाऊनलोडचा वेग हा KBps असतो. म्हणून हा १०% (खरंतर १२.५smiley चा फॉर्म्युला!!
उदा. ५१२ kbps च्या लाईनवर सरासरी ६०-६५ KBps डाऊनलोड स्पीड भेटतो.

8 bits = 1 Byte

512 Kbps = 64 kBps