निर्माल्य

आज माझ्या डायरीत
केविलवाणं झालेलं
एक गुलाबाचं फूल सापडलं..
तुझ्या वाढदिवसाला घेतलेलं
आता बरचसं हिरमुसलेलं

डायरीच्या
त्याच दोन पानांवर दिसले
आठवणींच्या शिंतोड्यांसारखे
उमटलेले गुलाबी ठिपके

खिडकीबाहेर दिवसा मोहवणार्‍या
नेहमीच्याच गुलमोहराने
रात्री सावल्यांचे भेसूर आकार
नाचवावेत तसे...

आपल्या आठवणींच्या जणू
तशाच सावल्या झाल्या आहेत
आणि नातंही
त्या गुलाबासारखं....

वाहिलेल्या दुर्वांचं शेवटी
निस्तेज निर्माल्यचं होतं ना गं,
कालच्या पूजेची
अस्पष्ट आठवण करुन देणारं!

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
मोगरा फुलला दिवाळी अंक २०११ आणि माझ्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

काव्यरस: 
लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

आवडली..

(विरहगीते / कविता आवडणारा) चिगो

चिगो..

|| कौन कहता है, के आसमां में सुराख नही होता?
इक पत्थर तो तबियत से उछालों , यारों ||

छान लिहिताय. कविता आवडली.

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||

छान !
आवडली रचना.

परांतर :- 'मोगरा फुलला' मध्ये 'निर्माल्य' प्रासिद्ध झालेले बघून अंमळ हसू आले. smiley

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

बॅटांतरः परांतराशी सहमत.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

र॑चना आवडली....

...................................................................................................................
माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे तर घामाच्या धारांनी.

विशेषतः "कालच्या पूजेची, अस्पष्ट आठवण करुन देणारं!" ह्या ओळी भावल्या.
इथे पूर्वी 'पूजेची' झालेली सांगोपांग चर्चा आठवली smiley

खिडकीबाहेर दिवसा मोहवणार्‍या
नेहमीच्याच गुलमोहराने
रात्री सावल्यांचे भेसूर आकार
नाचवावेत तसे...

मनाला फारच भिडण्यार्‍या ओळी..

छान आहे संपूर्ण कविता.

वाहिलेल्या दुर्वांचं शेवटी
निस्तेज निर्माल्यचं होतं ना गं,

आवडली.

=====================================
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|

सारी सारी धरा । खंगाळुन झाली ।
कोरडॆ चातक । ठायी ठायी ॥
- प्राजक्त देखमुख.
उफ़्फ़... ये गालिब!!