विक्रमादित्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Primary tabs

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
10 Jul 2012 - 3:21 pm

भारताच्या क्रिकट पंढरीत जन्मलेलं ५ फूट ४ इंच उंचीचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व. मुंबईचं 'खडूस' क्रिकेट नसानसांत भिनलेला - गार्नर, होल्डिंग, रॉबर्ट्स, मार्शल, लिली सारख्या भयावह बोलर्सच्या नजरेला नजर भिडवून बचावाची अभेद्य तटबंदी उभी करणारा लढवय्या. १९७१ च्या स्वप्नवत सुरुवातीनंतर विल्यम हॅरिस ह्या त्रिनिदादियन गायकाला:

It was Gavaskar
We real master
Just like a wall
We couldn't out Gavaskar at all, not at all
You know the West Indies couldn't out Gavaskar at all

ह्या ओळी लिहिण्यास प्रवृत्त करणारा कलाकार. भारतीय क्रिकेटला जिंकायला शिकवणारा धुरंधर. १९७१ च्या जॉर्जटाऊन कसोटी शतकापासून १९८७ च्या पाकिस्तानविरुद्धच्या त्या अविस्मरणीय ९६ धावांपर्यंत एकाहून एक सरस डावांची मेजवानी देणारा महान फलंदाज. क्रिकेट प्रशासक आणि समालोचक म्हणून आपल्या परखड वागण्या बोलण्यानी आम्हा क्रिकेटरसिकांचा स्वाभिमान जागृत ठेवणारा अभिमानी भारतीय.

विक्रमादित्य सुनील मनोहर गावसकर ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

क्रीडाशुभेच्छा

प्रतिक्रिया

सुनिल गावसकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पण इतका त्रोटक धागा तुमच्याकडून अपेक्षित नव्हता. गावसकरांच्या खेळ्यांवर एक तपशीलवार लेख येउ द्यात.

गणपा's picture

10 Jul 2012 - 3:27 pm | गणपा

काय रे हे?
चार ओळींतच आटोपलस?
जरा सविस्तर लेख येउ दे की. :)

लिट्ट्ल मास्टरला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

प्यारे१'s picture

10 Jul 2012 - 3:59 pm | प्यारे१

आयला,

कधी न मिळालेली सुट्टी, मूडमध्ये असलेली बायको, मस्त टीव्हीवर लागलेली मॅच, आवडत्या बॅट्समनचा आज धुमाकूळ घालायचा फॉर्म, पहिल्याच ओव्हर मध्ये दणादण दोन चार चौके अन....... तुफान पावसाला सुरुवात???????????

शेजारी पाजारी तोंड घालणारं कुणी नाही, गधेमजुरीची कामं संपवली आहेत, बॉस मीटींगला गेलाय नि तुमचा लेख म्हणून सावकाश वाचायला घेतला, अन लेख संपला???????????

एनीवेज

सुनिल गावसकर यांना वाढदिवसाच्या नि जे पी ना वाढीव लेखासाठीच्या हार्दिक शुभेच्छा!

मेघवेडा's picture

10 Jul 2012 - 4:14 pm | मेघवेडा

काय रे जेप्या? भर्कन उरकलास लेख. सविस्तर येऊ दी की.

'सनीभाय'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा. :)

बाकी तो कॅलिप्सो तर भारी आहे! विशेषतः

Bedi hear that he became a father
So he catch out Holford in the covers
But when Sobers hear he too had a son
He make duck and went back in the pavilion

हे भारीच!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

10 Jul 2012 - 4:15 pm | घाशीराम कोतवाल १.२

ये ना चॉलबे जे पी
चांगला मोठा लेख येउ द्यात बाकि ...
सुनिल गावसकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

रमताराम's picture

10 Jul 2012 - 4:25 pm | रमताराम

जेपीकडून एवढा छोटा लेख म्हणजे सेहवागने पहिली ओवर मेडन खेळून काढल्यासारखं वाटलं की वो.

माझ्या साठी अजूनही सुनील मनोहर गावस्कर हा भारताचा मी पाहिलेला सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. सचिन , राहुल जवळपास आहेत पण हा एकमेवाद्वितीय !
करियर च्या शेवटी शेवटी सुनील मद्रास ला #४ वर खेळायला आला तेंव्हा भारताचा स्कोर २ आउट ० होता. त्या दिवशी एका वृत्तपत्राचा मथळा होता :
सुनील #४ वर सलामीला !
हॅपी बर्थ डे सनी !

तिमा's picture

10 Jul 2012 - 8:20 pm | तिमा

कसोटी सामन्यासाठी असा भक्कम आणि शास्त्रशुद्ध क्रिकेट खेळणारा एकमेव सुनीलच!!!

चतुरंग's picture

10 Jul 2012 - 4:54 pm | चतुरंग

वाढदिवसाच्या शुभेच्छा! :)

विंडिज तोफखान्यासमोर हेल्मेट न घालता फक्त स्कलकॅप घालून उभे रहायचे हा प्रकारच त्याचा उत्तुंग आत्मविश्वास दाखवतो. सिंहाचं काळीज हवं राव असलं काही करायला.

त्याच्या खेळा व्यतिरिक्त तो मला भावतो त्याच्या अस्सल भारतीय अस्मितेकरता. कोणत्याही देशात असो. कोणा क्रिकेट समालोचकाने अथवा खेळाडूने भारतीय खेळाडूला किंवा भारताला उगाचच उणे दाखवले की ह्याने परखड शब्दात तिथल्यातिथे समाचार घेतलाच म्हणून समजा.

(सनीप्रेमी)रंगा

ता.क. पडजीभ खाऊन अडजीभ बोंबलत ठेवणार्‍या जेपीला सनीवर सविस्तर लेख लिहिण्याची प्रेमळ आज्ञा केली जात आहे! :)

तर्री's picture

10 Jul 2012 - 5:15 pm | तर्री

जे.पी. अपेक्षा भंग केला खरेच पण आपण सगळ्यांनी "सनी" चे किस्से ऐकवले तरी शतक सहज होईल. करुया का सुरवात ?
सनी एकदम हजर जबाबी आहे.
पत्रकार : सिनेमात काम करणार का? ( एकदा सपाटून मार खाल्ला होता)
सनी : मी सिने-सृष्टी वर नाराज आहे , सो काम नाही करणार .
पत्रकार : का नाराजी ?
सनी ; कालीचरण ने १०(क्ष) शतके काढली तुम्ही त्याच्या नावाने सिनेमा काढलात , विशीने १३ (क्ष) काढली , तर त्याच्या नावाने सिनेमा आहे. मी एवढी २३ (क्ष) शतके काढून तुम्ही माझ्या नावाचा सिनेमा नाही काढलात.
तो खूप "भारताभिमानी" आहे -त्याचा त्यालाखूप तोटा झाला आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jul 2012 - 5:40 pm | अत्रुप्त आत्मा

आम्च्या ल्हानपणीच्या देवाला....

बॅटमॅन's picture

10 Jul 2012 - 6:08 pm | बॅटमॅन

विक्रमादित्य सनी उर्फ गावश्याला वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा.

जे.पी.मॉर्गन's picture

10 Jul 2012 - 6:12 pm | जे.पी.मॉर्गन

पाकिस्तानात असताना एका पार्टी मध्ये आसिफ इक्बालनी सनीची ओळख नूरजहाँशी करून दिली.

आसिफः (नूरजहाँला) "मोहतर्मा - मीट सुनील, वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅट्स्मेन इन द वर्ल्ड"
नूरजहाँ: "मला झहीर अब्बास व्यतिरिक्त अजून कोणी महान फलंदाज माहिती नाही"
.
.
.
.
.
आसिफ (सुनीलला): "सनी, ह्या महान गायिका "मलिका-ए-तरन्नुम" - नूरजहाँ"
सुनीलः "मला लता मंगेशकर व्यतिरिक्त अजून कोणी महान गायिका माहिती नाही"

नाऊ दॅट्स सनी ! !

चिंतामणी's picture

10 Jul 2012 - 6:27 pm | चिंतामणी

सुनील मनोहर गावसकर ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

पैसा's picture

10 Jul 2012 - 8:27 pm | पैसा

सुनीलला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! त्याची साठी झाली तरी आम्हाला तो सनीच! लहान पोरासारखं निरागस हसू अजून त्याच्या चेहर्‍यावर येतं. खरा ग्रेट खेळाडू. संघाच्या भल्यासाठी त्याने सगळे फटके येत असून स्वतःच्या खेळाला लगाम घातला. हुक खेळता येऊ नये म्हणून त्याने स्पेशल ग्लोव्हस तयार करून घेतले होते. आणि खेळावर निष्ठा इतकी की परदेशातून कसोटी खेळून आल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी टीमबरोबर लोकलने सुद्धा प्रवास करून रणजी मॅच खेळायला हजर! रणजी मॅचेस सुद्धा तितक्याच गंभीरपणे खेळायचा.

सनीने खेळाडूंची संघटना तयार करायला मोठी मद्त केली आणि खेळाडूंना बोर्डाकडून मिळणारं मानधन वाढवून घेतलं. आताच्या खेळाडूंसारखा जाहिराती करताना कधी दिसला नाही. खिलाडूवृती इतकी की आउट झाल्यावर अंपायरकडे न बघता चालायला लागायचा. भारताच्या टीमला जरा बरे दिवस आले ते गावस्करचा टीममधे प्रवेश झाल्यानंतर. आताच्या खेळाडूंची बेशिस्त त्याला अनेकदा आवडत नाही आणि त्याना परखड बोल सुनवायला तो मागे पुढे बघत नाही. पण हा फटकळपणा अनेकाना न झेपणारा, त्यामुले त्याच्यापेक्षा कमी लायकी असणार्‍या बर्‍याच जणाना जे मानसन्मान मिळाले तसे त्याला मिळाले नाहीत. पण आमच्यासारख्या अनेकांसाठी गावस्कर हाच सर्वश्रेष्ठ भारतीय फलंदाज आहे. भारतीयच का? त्याला ज्या दर्जाच्या गोलंदाजीसमोर खेळावं लागलं तसं आणखी किती जण खेळलेत? अगदी बॉर्डर, सोबर्स झाले तरी त्याना त्यांच्या देशाच्या तोफखान्यासमोर खेळावं लागलं नाही. आताच्या भारतीय स्टार लोकांची बातच सोडा.

सनीभाई रिटायर झाल्यावर मी क्रिकेट बघणं जवळपास सोडून दिलं. पण तो कॉमेंटरी करत असेल तर मात्र जरा वेळ तरी आपसूक रिमोट बाजूला ठेवला जातोच! भारताच्या क्रिकेटमधे "सनी डेज" आणणार्‍या सनीला आयुष्याची शंभरी गाठण्यासाठी मनापासून शुभेच्छा!!

फारएन्ड's picture

10 Jul 2012 - 9:10 pm | फारएन्ड

हा मागचा आठवडा भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने मोठा दिसतो. धोनी, गांगुली आणि गावसकर, तिघांचे वाढदिवस.

बॅटमॅन's picture

11 Jul 2012 - 12:07 am | बॅटमॅन

हा मागचा आठवडा भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने मोठा दिसतो. धोनी, गांगुली आणि गावसकर, तिघांचे वाढदिवस.

धोनी????????? बासच.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Jul 2012 - 9:06 am | घाशीराम कोतवाल १.२

हा धोनी कोण आहे ?