टप टप टप...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
6 Jul 2012 - 12:16 pm

पाऊस थांबून खरं तर बराच वेळ झाला
घराचे छत अजूनही गळतेय
टप टप टप...
---------------
तुला निरोप देऊन परतलो
तसाचं बसून आहे बराच वेळ
चंद्राने आपले साम्राज्य वाढवायला सुरवात केली
टिपूर चांदणे पसरत गेले
ते डोळ्यात उतरतांना कां कुणास ठाऊक
पण एक आवाज कानात घुमतोय
टप टप टप...
--------------
बाजुच्या खोलीतला तुझा वावर तसा अजुनही तस्साचं
बुद्धीचे मनाशी वाद सुरु झाले
एक म्हणे तु नाहीस, अन् एक तु आहेस..
खिडकीच्या काचेवर परत तोच पाऊस..
टप टप टप...
--------------
तुझा आवाज घरभर दाटून राहीलाय
कोपर्या-तल्या उदबत्तीच्या सुवासासारखा
जाणवतोय.. पण हातात सापडत नाहीये
तेवढ्यात तुझ्या आवाजाला छेद देऊन
खिडकीच्या काचेवर परत तोच पाऊस..
टप टप टप...
--------------
हे वेदनेचे सत्र थांबवायला हवं
अनाहूतपणे कानावर हात ठेवले
एवढ्यात त्या मफलरचा स्पर्श
किती प्रेमाने विणले होतेस तू..
कितीही अडवलं तरी काही थेंब पडलेच
गहिर्याण डोहातल्या पाण्यावर
टप टप टप...
--------------
आजकाल आकाशात चंद्र अवतरला तरच
हे घर उजेडाचे अस्तर पांघरतं
नाहीतर आहेच..
खिडकीच्या काचेवर तोच पाऊस..
टप टप टप...
--------------
खुप सन्नाट्टा होता त्या रात्री
ना कुठेही आवाज, ना कुणाची चाहूल
खुप शांत वाटत होते त्या रात्री
कुठून तरी एक टिटवी त्या शांततेला
एक मोठ्ठी भेग पाडून गेली
संवेदनेला जाग आली
चंद्र खाडीच्या पाण्याला ओढतो
तसा परत तुझ्या खोलीकडे ओढला गेलो
पावले त्या खिडकीकडे वळली
किती रात्री त्याच चंद्राला न्याहाळत गेल्या
अनवधानाने खिडकी उघडली
तर
बाहेरच्या टाकीवर परत एकदा तोच पाऊस
टप टप टप...
--------------
घराचे गळकं छत
आकाशातला चंद्र
डोळ्यातले चांदणे
खिडकीच्या काचेवरचा पाऊस
अन्
तुझे डोळे..
सग्गळं सग्गळं
...
टप टप टप...

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०६\०७\२०१२)

करुणमुक्तकरेखाटन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

6 Jul 2012 - 12:26 pm | प्रचेतस

खूपच छान.

रम्यगूढार्द्रोदास कविता... छान...

कविता आवडली :)
"हातातला तुझ्झा चिमुकला हात
तुझ्यासारखाच अवखळ पाउस
रस्त्यावरच्या साचलेल्या पाण्यात तु मुद्दामुन मारलेली उडी
तुझ्या गालावरचे निखळ न खोड्कर हास्य
सावरता तुला , हुलकावणारी छत्री
तुझ्या न माझ्या डोकयावर पडणारे..
थेंब टपोरे टप..टप...टप " :)

जाई.'s picture

6 Jul 2012 - 12:47 pm | जाई.

सुंदर रचना

गोंधळी's picture

6 Jul 2012 - 12:48 pm | गोंधळी

छान.

कवितानागेश's picture

6 Jul 2012 - 12:52 pm | कवितानागेश

नावावरुन बालकविता असेल असे वाटले ( म्हणून आनंदानी उघडली! :) )
अतिशय उदास, पण सुंदर अभिव्यक्ती.

चौकटराजा's picture

6 Jul 2012 - 1:25 pm | चौकटराजा

टिपूर चांदणे पसरत गेले
ते डोळ्यात उतरतांना कां कुणास ठाऊक
पण एक आवाज कानात घुमतोय
टप टप टप...

बाकीच्या कडव्यात पावसाची उपस्थिती( विरहाची ) या ना त्या स्वरूपात आहे.या कडव्यात चांदणे आहे. हा टप टप
आवाज कशाचा ??? बाकी काव्य उत्तम !

अक्षया's picture

6 Jul 2012 - 2:21 pm | अक्षया

छान लिहिली आहे कविता..:)

हि कवीता वाचुन एक जुने गाणे आठवले

ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता..

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jul 2012 - 2:23 pm | अत्रुप्त आत्मा

अवडला

मेघवेडा's picture

6 Jul 2012 - 3:07 pm | मेघवेडा

छान. मुक्तक आवडलं.

शुचि's picture

6 Jul 2012 - 6:58 pm | शुचि

छान.

अमितसांगली's picture

7 Jul 2012 - 8:46 am | अमितसांगली

सुंदर....

किसन शिंदे's picture

9 Jul 2012 - 4:41 am | किसन शिंदे

अरे व्वा मिका!! बरेच दिवसांनी लिहते झालात.

मलाही आधी बालकविताच वाटली. :)