बोगदा

बोगद्यामध्ये कितीही अंधार असला
तरी त्याच्या दोन्ही तोंडाशी उजेड असतोच
एकाबाजूने येणारा अन्
दुसर्‍याबाजुने जाणारा
.
मी बर्‍याचदा जाणार्‍या उजेडाकडे उभा राहतो
विरुद्ध दिशेला
.
येणार्‍या उजेडाचा अवखळपणा सोसत नाही आजकाल
नाही, अजून काही मी वयोवृद्ध वगैरे नाही झालोय
बरगड्यांच्या सापळ्यात धडधडणारे हृदय अजूनही
न करकरता बिनविरोध चालू आहे
.
पण तरी जाणा-या उजेडाचे मृदुमुलायम अस्तर
अंगावर वाहण्याची चटक लागलीये आता
.
बोगद्यातील कळकभिन्न अंधार अन्
डोळ्यांपुढे काजवे चमकवणारा "येणारा उजेड"
या दोघांना ओलांडून येणारा
अनुभवाची शाल पांघरलेला
"जाणारा उजेड" तसे खूप काही शिकवून जातो, नाही?

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
२६/०६/२०१२

काव्यरस: 
लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

फारच सुंदर. मी ही कविता आधी आपल्या ब्लॉगवर वाचली होती. तेव्हाच आवडली होती.

बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला
केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी

मुक्तक आवडलं

पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|

आयुष्याबद्दलचा एक वेगळा विचार फार सहजपणे मांडलाय या कवितेतून...

थोडा थोडा कळ्या मेरेकु,
म्हणजे तुम्ही येणार्‍या उद्याकडे न पहाता आजमधे पहाता/जगता आणि आजचा अनुभव काहीतरी शिकवुन जातोय
असं काही आहे का ते smiley

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

असचं काहिसं...

=====================================
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|

आम्ही सध्या लेखणी म्यान केली आहे.
उफ़्फ़... ये गालिब!!

अरे... सुंदरच आहे रे..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

छान

***
आमच्याकडे कशावरही, कोणावरही, कितीही पिंका टाकून मिळतील.

मस्त लिहिले आहे ...

बर्याच दिवसानी आलात?

-
शब्दमेघ .. एक मुक्त.. स्वैर.. स्वछंदी जीवन
"पारिजातकाचे आयुष्य लाभले तरी चालेल , पण लयलुट करायची ती सुगंधाचीच "

बोगद्यापलिकडचा उजेड दिसायला लागला.
मुक्तक छान आहे.