रवीतेज

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in कलादालन
25 Jun 2012 - 3:27 am

दिवे आगर
कास तलाव
सेंट पॉल
सेंट पॉल
सेंट पॉल
सेंट पॉल
हडसन, विस्कॉन्सिन
हडसन, विस्कॉन्सिन
खडकवासला
सॅन फ्रान्सिस्को
मोरो रॉक, कॅलिफोर्निया

प्रेरणा - इयत्ता नववीच्या कुमारभारतीमधील काकासाहेबांचा पाठ (मी पाहिलेला सूर्यास्त).

चित्रांची अनुक्रमणिका:
१) दिवे आगर, कोकण - जून २००७
२) कास तलाव, सातारा जिल्हा - मार्च २००४
३, ४, ५, ६ व ७) सेंट पॉल, मिनेसोटा येथील माझ्या घराची बाल्कनि - मे, जून २०११
८ व ९) हडसन, विस्कॉन्सीन येथील सेंट क्रॉय नदी -ऑक्टोबर २०११
१०) ओळखा पाहू कुठे आहे हे? - ऑक्टोबर २००७
११) सॅन फ्रान्सिस्को - ऑक्टोबर २००८
१२) मोरो रॉक, सेकोया राष्ट्रीय उद्यान, कॅलिफोर्निया -सप्टेंबर २००८

छायाचित्रण

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

25 Jun 2012 - 4:50 am | मराठमोळा

वा वा फोटु एकदम मस्त..
पहिला फोटु पाहुन मनात आलंच होतं की दिवे आगार चा असेल म्हणून आणि खाली वाचलं तर तेच निघालं..
बाकी तो सॅन फ्रँसिस्को वाला फोटु "फिशरमन्स वार्फ" वरुन घेतलाय का?

श्रीरंग_जोशी's picture

25 Jun 2012 - 5:09 am | श्रीरंग_जोशी

धन्यवाद ममो!

सॅन फ्रँसिस्को वाले छायाचित्र कॉयट टॉवरवरून काढले आहे.

खालून तिसरे नाही ओळखू शकलात? तुम्ही तेथे नक्कीच गेला असाल.

मराठमोळा's picture

25 Jun 2012 - 5:52 am | मराठमोळा

अच्छा..
>>खालून तिसरे नाही ओळखू शकलात? तुम्ही तेथे नक्कीच गेला असाल
नाही बुवा. अवघड आहे.. तसं मग खडकवासला / नाशिकचं ओझरखेड/ ऊटीचा तलाव यापैकी काहीतरी असावं

श्रीरंग_जोशी's picture

25 Jun 2012 - 5:57 am | श्रीरंग_जोशी

जरा वाट पाहूया इतर कुणी सांगू शकतं का?

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jun 2012 - 9:18 am | ज्ञानोबाचे पैजार

जोशी सर,
खालुन तिसरा शिवाजी सागर अर्थात कोयना धरणाच्या पाण्याचा फोटो आहे का?

श्रीरंग_जोशी's picture

25 Jun 2012 - 9:25 am | श्रीरंग_जोशी

पैजारबुवा - कृपया सर म्हणू नका हो. श्रीरंग / रंगा / रंग्या / श्री यापैकी काहीही म्हणू शकता...

(आदेश बांदेकर ताक धिना धीन इष्टाईल मध्ये) उत्तर चुकलेलं आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jun 2012 - 9:47 am | ज्ञानोबाचे पैजार

जोशी सर,
थोडा चुक्याच, पानशेत चा तलाव आहे तो नक्कीच
(म्हणु द्या हो जोशीसर, त्या मागे बर्‍याच आठवणी आहेत आमच्या. अर्थात तुम्हाला आवडत नसेल तर नाही म्हणणार)

श्रीरंग_जोशी's picture

25 Jun 2012 - 11:27 am | श्रीरंग_जोशी

सर एकतर गुरुजनांना म्हणावे अथवा कर्माने किंवा वयाने ज्येष्ठ व्यक्तींना म्हणावे. मी कशातच बसू शकत नाही.
विशेषकरून तर इथे तर एवढी मोठी माणसे आहेत की आपल्यासारख्यांचे नशीब त्यांचा सहवास लाभतोय.
त्यामुळे कुणी सर असे संबोधले तर कानकोंडे वाटणारच.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jun 2012 - 6:51 am | अत्रुप्त आत्मा

वाहव्वा! क्या फोटू, क्या फोटू ,लाजवाब!

५० फक्त's picture

25 Jun 2012 - 7:25 am | ५० फक्त

मस्त खुप छान आहेत फोटो आणि आवडीचा विषय फोटोंचा धन्यवाद.

पैसा's picture

25 Jun 2012 - 8:23 am | पैसा

सगळे फोटो आवडले.

चित्रगुप्त's picture

25 Jun 2012 - 9:05 am | चित्रगुप्त

विशेषतः अगदी खालच्या फोटोत वरच्या गडद निळ्या रंगापासून हळूहळू खालच्या पिवळ्या-नारिंगी-तपकिरी रंग-छटांपर्यंत होणारे बदल खूपच भावले.

श्रीरंग_जोशी's picture

25 Jun 2012 - 10:00 am | श्रीरंग_जोशी

हे ठिकाण म्हणजे एक डोंगराएवढा उंच खडक आहे.त्यावर चढून जाण्यासाठी जिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सूर्यास्ताच्या वेळी पोचलात तर सूर्यदेवाच्या कृपेने फारच रम्य सोहळा बघायला मिळतो.

प्रचेतस's picture

25 Jun 2012 - 9:15 am | प्रचेतस

अप्रतिम फोटो.
आवडले.

अक्षया's picture

25 Jun 2012 - 9:40 am | अक्षया

अप्रतिम फोटो :)
खुप आवडले..

छान आहेत सगळे फोटु!
खालुन तीसरा मानस, मुळशी किँवा गोवा???
(सगळे मटके मारलेत ;-))

श्रीरंग_जोशी's picture

25 Jun 2012 - 11:12 am | श्रीरंग_जोशी

मटके चुकलेत, पण जवळपास आहात त्यामुळे पुन्हा एकदा प्रयत्न करा...

एमी's picture

25 Jun 2012 - 11:41 am | एमी

अर्रर्र चुकले मटके : - (
लोणावळा?? गणपतीपुळे??
अजुनच दुर गेले का?? हे हे हे

श्रीरंग_जोशी's picture

25 Jun 2012 - 11:44 am | श्रीरंग_जोशी

उत्तर खरंच सोपे आहे, त्यामुळे फार लांब जाऊ नका...

खडकवासल्यावरून घेतलेला आहे फोटो.

श्रीरंग_जोशी's picture

25 Jun 2012 - 12:06 pm | श्रीरंग_जोशी

वल्ली -एकदम अचूक उत्तर दिलंत.

वर ममोंनीही दिलं होतं पण ते ३ पैकी १ असं होतं. त्यामुळे खात्रीशीर अचूक उत्तर देणारे तुम्ही पहिलेच.

पुण्यात राहणाऱ्या वयाने व मनाने तरुण असणाऱ्यांसाठी हे प्रिय असे स्थळ आहे.

प्रचेतस's picture

25 Jun 2012 - 12:11 pm | प्रचेतस

:)

प्राजु's picture

25 Jun 2012 - 11:24 am | प्राजु

अफाट!! :)

नन्दादीप's picture

25 Jun 2012 - 12:16 pm | नन्दादीप

खतरनाक छायाचित्र.......!!!
लय भारी.

तर्री's picture

25 Jun 2012 - 12:25 pm | तर्री

खूप छान.

अमृत's picture

25 Jun 2012 - 1:06 pm | अमृत

सोबतीला तुमचा(तुझा म्हटलं तर चालेल?) मिपावरील 'यत्र तत्र सर्वत्र' संचारपण आवडला :-) ;-)

अमृत

श्रीरंग_जोशी's picture

25 Jun 2012 - 8:21 pm | श्रीरंग_जोशी

अवश्य मित्रा, 'तू' असे म्हंटलस तर आनंदच वाटेल.

बॅटमॅन's picture

25 Jun 2012 - 1:34 pm | बॅटमॅन

सर्व फोटो लै भारी आहेत. क्षणभर नाव वाचून धागा तेलुगु हीरो रवीतेजा बद्दल आहे की काय, असे वाटले :)

श्रीरंग_जोशी's picture

25 Jun 2012 - 10:14 pm | श्रीरंग_जोशी

शीर्षक काय द्यावे यावर विचार करत असताना, 'हा खेळ सावल्यांचा' हे गाणे आठवले.

~ हा चंद्र ना स्वयंभू रवीतेज वाहतो हा, ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा..

वाह, काय गीत आहे!!
मला तरी हेच शीर्षक समर्पक वाटले.

रा. रा. चित्रपट पहावा लागल्यामुळे रवीतेजाबद्दल बराच संताप निर्माण झालाय...

बॅटमॅन's picture

26 Jun 2012 - 10:54 am | बॅटमॅन

शीर्षक समर्पक आहेच. रवीतेजाबद्दल माझे मत "एक अभिजात पानपट्टी हीरो" असे आहे ;)

श्रीरंग_जोशी's picture

26 Jun 2012 - 11:06 am | श्रीरंग_जोशी

काय ढांसू विशेषण आहे, वाह!!

मानले तुम्हाला!!

जागु's picture

25 Jun 2012 - 2:33 pm | जागु

सुंदर.

सूड's picture

25 Jun 2012 - 6:39 pm | सूड

लै भारी !!

मराठे's picture

25 Jun 2012 - 8:48 pm | मराठे

मस्त आलेत फोटू!

जाई.'s picture

25 Jun 2012 - 9:58 pm | जाई.

छानच आहे फोटो

छान फोटो.
विविध रंगांची उधळण असलेले ३ ते ९ फोटो जास्त आवडले.

श्रीरंग_जोशी's picture

26 Jun 2012 - 1:31 am | श्रीरंग_जोशी

मलाही ते अधिक आवडतात. क्र. २ तर साध्या रीळवाल्या कॅमेऱ्याने काढून नंतर स्कॅन (मराठी शब्द?) केलेला आहे.

माझ्या अनुभवानुसार, अमेरिकेत भारतापेक्षा अधिक सुंदर सूर्यास्त दिसतात. कदाचित कर्कवृत्तापासून अधिक उत्तरेला असल्याने वगैरे असावे. काही महिन्यांपूर्वी जालावर कुणीतरी मराठीत नॉर्वेच्या सूर्यास्ताचे अप्रतिम वर्णन लिहिले होते. तो देश तर उत्तर धृवाच्या अधिकच जवळ आहे.

तरी देखील ३ ते ९ मध्ये एक खडकवासल्याचा आहेच :-).

प्र.का.टा.आ.

श्रीरंग_जोशी's picture

26 Jun 2012 - 9:01 am | श्रीरंग_जोशी

सर्व प्रतिक्रियांबद्दल आपले मनापासून आभार. धागा प्रकाशित करताना खालील छायाचित्र नेमके राहून गेले.

"अंताकडे निघालेल्या सूर्यनारायणाचे तेजोमय रूप पाहून मला वाटले की कर्तृत्ववान माणसे सूर्याप्रमाणेच माध्यान्हीच्या काळात प्रखर तेजाने तळपत असली तरी अडचणीच्या समयी त्यांचे तेजस्वी रूप बघण्यासारखे असते. "

धाग्यात उल्लेखलेल्या काकासाहेब गाडगीळांच्या पाठात वरील वाक्य होते. ही शब्दरचना मी माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर जुळवली आहे त्यामुळे जशीच्या तशी नाहीये. पण हे वाक्य माझ्यासाठी आजही तेवढेच प्रेरणादायक आहे जेवढे प्रथम वाचल्यावर होते.

शुचि's picture

26 Jun 2012 - 6:04 pm | शुचि

अफाट सुंदर वाक्य!!!

अक्षया's picture

26 Jun 2012 - 9:21 am | अक्षया

अतिशय सुंदर फोटो..आणि वाक्यही.. :)

दिपक's picture

26 Jun 2012 - 11:18 am | दिपक

श्रीरंगराव फोटो आवडले.

सुधीर's picture

26 Jun 2012 - 1:42 pm | सुधीर

सगळेच फोटो छान! वरून ५वा आणि खडकवासलाचा विशेष आवडला.

शुचि's picture

26 Jun 2012 - 6:04 pm | शुचि

क्या बात है!!!

मोदक's picture

29 Jun 2012 - 12:45 am | मोदक

मस्त फोटो.. :-)

आता आय एस ओ १२००० पर्यंत सेन्सेविटी असणारे कॅमेरे आलेयत. त्यामुळे लो लाईट फोटो
ही रेखीव यायला मार्ग मोकळा झाला आहे. सूर्यास्त व सूर्योदयाचा सुंदर फोटो हा अप्राप्य राहिलेला नाही. तेंव्हा यात आता थीम महत्वाची रहाणार आहे यापुढे .आपले पहिले दोन फोटो हे सामान्यतः कोणीही काढू शकतो असे आहेत. पण बाकीचे फोटोत आपण एकेक इतर विषयही घेतला आहे. काहीत एकटा ढग, काहीत सिटी स्काय लाईन, काहीत हिल स्केप ,त्यामुळे हे सर्व फोटो काहीतरी बोलतात आपल्याशी. हे आपले यश आहे.

कारण आता तांत्रिक गुण सर्वांच्याच फोटोत येणार आहेत. बोलणारे फोटो हा येणारा जमाना आहे. आपल्या या धाग्याला मी " बोलकी क्षितीजे" असे नांव देतोय. रंगा खुष ?

श्रीरंग_जोशी's picture

29 Jun 2012 - 5:30 am | श्रीरंग_जोशी

चौरा सर - आपल्या वस्तुनिष्ठ प्रतिसादाबद्दल आपले मनापासून आभार मानतो.
हो या क्षेत्रात खूपच शिकणे बाकी आहे अजून. आपले मार्गदर्शन मिळाल्यास आनंद होईल.

चौकटराजा's picture

29 Jun 2012 - 9:57 am | चौकटराजा

रंगा फोटूग्राफर, आम्ही मार्गदर्शन काय करणार कप्पाळ ? आमचीच फोटूग्राफी अजून अडखळत चालू आहे. त्यातील एक फोटो डकवतोय. हा बोलका वाटतो का ब्वॉ ?

श्रीरंग_जोशी's picture

29 Jun 2012 - 10:24 am | श्रीरंग_जोशी

चौरा - सही आहे हे छायाचित्र. छायाचित्रातील व्यक्ती जर गतिमान असतील तर छायाचित्रकाराच्या नाकी ९ येतात.

स्पा's picture

29 Jun 2012 - 8:21 am | स्पा

वा कसले क्लास फोटु आहेत.

शेखरमोघे's picture

25 Jun 2016 - 10:27 am | शेखरमोघे

फोटू आणि शीर्षक दोन्हीही आवडले!

हा धागा अद्याप पाहिला नव्हता. सुंदर छायाचित्रे आहेत. चौरांनी काढलेला सूर्यास्ताचा लहान मुलांचा फोटोही सुरेख आहे.

महासंग्राम's picture

25 Jun 2016 - 4:56 pm | महासंग्राम

वाह २,३,४ या फोटोमधले रंग अतिशय सुरेख, कोणता कॅमेरा वापरलात. आणि शक्य असल्यास exif दिलेत तर अजून अभ्यास होईल आमच्या सारख्या शिकाऊ विद्यार्थ्यंचा

श्रीरंग_जोशी's picture

27 Jun 2016 - 10:09 am | श्रीरंग_जोशी

नव्याने प्रतिसाद देऊन प्रोत्साहन देणार्‍या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

मंदार - दुसरा फोटो २००४ साली साध्या रोलवाल्या कॅमेर्‍याने काढलेला आहे. प्रिंटेड फोटो स्कॅन करून तो अपलोड केला होता. तीसरा व चौथा फोटो कॅनॉन पॉवरशॉट एसएक्स ३० आयएस या पॉइंट अ‍ॅन्ड शूट (झूम) कॅमेर्‍याने काढले आहेत.

त्यांचे EXIF खालीलप्रमाणे

  • f/5 1/1000 ISO80
  • f/5 1/1000 ISO250

बादवे छायाचित्रणाच्या बाबतीत मी देखील शिकाऊ विद्यर्थीच आहे.

रमेश आठवले's picture

25 Jun 2016 - 8:30 pm | रमेश आठवले

फार सुरेख फोटो. हा धागा निसटला होता. आत्ताच पाहिला. -वसंतरावांच्या तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज -ची आठवण झाली.
https://www.youtube.com/watch?v=C0uSv5FUni0

पद्मावति's picture

26 Jun 2016 - 1:06 am | पद्मावति

सुंदर छायाचित्रे!

Jack_Bauer's picture

26 Jun 2016 - 3:06 am | Jack_Bauer

खूप सुंदर फोटो आहेत.

चांदणे संदीप's picture

26 Jun 2016 - 6:53 am | चांदणे संदीप

पुलंच्या चालीवर, "क्यामेऱ्यात मज्जा आहे हो तुमच्या!"

Sandy

सस्नेह's picture

27 Jun 2016 - 11:12 am | सस्नेह

अतिशय सुरेख फोटो.

समीरसूर's picture

28 Jun 2016 - 12:17 pm | समीरसूर

सुरेख फोटो! आणि वाक्य लाजवाब!