चावडीवरच्या गप्पा

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
21 Jun 2012 - 12:27 pm

' 'हा चक्क अन्याय आहे', सकाळी सकाळी तणतणत नारुतात्यांनी चावडीवर हजेरी लावली. नेहमीचे सिनियर सिटीझन्स आधच हजर होते.

'काय झाले?', कोणीतरी विचारले.

'अरे त्या बिचार्‍या संगगम राजीनामा द्यावा लागला, त्यांनीच स्थापन केलेल्या पक्षातुन, हे काही ठीक नाही! हे तर त्या स्टीव्ह जॉबसारखे झाले', नारूतात्या.
(हा नारुतात्यांच्या नातवाने आणलेले स्टीव्ह जॉबचे आत्मचरित्र त्यांनी नुकतेच वाचल्याचा परिणाम होता.)

'कोssण हा शिंचा संगमाsss', घारुअण्णा अस्लखित चिपळुणी अंदाजात विचारते झाले.

'हाच तर प्रॉब्लेम आहे, इथे उपेक्षितांवर अन्यात होत असताना, उपेक्षित कोण हेच माहिती नसणे हा बहुजनांवरचा अन्याय पुरातन आहे', इति कट्ट्याचे बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

'साहेबांशी घेतलास पंगा, भोग म्हणावे आता आपल्या कर्माची फळे', शामराव बारामतीकरांनी साहेबांच्या प्रति असलेली त्यांची निष्ठा व्यक्त केली.

'अरे काय तुमचे साहेब, ज्याच्या मांडीला मांडी लावून नव्या पक्षाची स्थापना केली साधी त्याच्या मनातली ईच्छा समजू नये त्यांना?' नारुतात्यांनी त्यांचा मूळ मुद्दा पुन्हा हिरिरीने मांडला.

'महत्वाकांक्षा सर्वांनाच असते हो, पण ती साहेबांच्या महत्वाकांक्षेच्या आड येणे म्हणजे साक्षात आत्महत्याच हो, दालमिया आठवतोय का?', शामराव बारामतीकर.

'अहो कोण हा संगमा, कर्तुत्व काय ह्याचे?', घारुअण्णांचे पालुपद.

'अहो प्रखर राष्ट्रवाद दाखवून सोनियाला विरोध करून तिला पंतप्रधान होऊ दिले नाही हे कर्तुत्व काय कमी आहे का?', भुजबळकाका.

'त्यात त्याचे कसले आलेय कर्तुत्व? तिचा कात जीव वर आला होता! तसेही काही न करता पैसा ओरपायला मिळणार, सत्ता तशीही ताब्यात, कशाला व्हायचे पंतप्रधान!', घारुअण्णांचे तर्कशास्त्र.

'झाले ह्यांचे सुरु, अहो मुद्दा काय, तुम्ही बरळताय काय? विषय आहे सगमांचा', नारुतात्या.

'अरे! पण त्या शिंच्याला राष्ट्रपती व्ह्यायची खाजच का म्हणतो मी?', घारुअण्णा.

'सोनियाच्या विरूद्ध लढायला सगळेच उतरले पण त्यांना फक्त कपडे सांभाळावे लागले. अहो साहेबांना त्यांनी पक्ष काढायला मदत केली पण मलई सगळी साहेबांनी खाल्ली.
हेच खरे दु:ख दुसरे काय! त्यात आता प्रतिभाताईंच्या जगप्रवासाच्या खर्चाचे आकडे प्रसिद्ध झाले आणि फिरले डोळे त्याचे. हाय काय आन नाय काय.

चोर सगळे लेकाचे. सर्वसामान्य जनता होरपळतेय त्याचे कोणाला काही आहे? जो तो आपली तुंबडी भरण्याच्या मागे. त्या ममताला प्रणब मुखर्जी नको, कारण एक बंगाली, दुसर्‍या पक्षाचा, सर्वोच्च स्थानावर येऊन त्याने डो़यावर मिर्‍या वाटायला नको. देशाचे कोणाला काही पडले आहे?', इतकावेळ शांत बसलेले सोकाजीनाना.

'अहो पण राष्ट्रपती होऊन परदेशी व्यक्तींना देशात कोणतेही पद भुषबता येऊ नये असा वटहुकुम जारी करायचा छुपा हेतु असेल त्यांचा', घारु अण्णांचा स्वन्पाळु आशावाद.

'घंटा वटहुकुम काढता येतोय! आपल्या देशात राष्ट्रपती पद हे रबर स्टँप टायपाचे पद आहे. खुप काही जबाबदार्‍या पण पावर काही नाही!

उगाच नाही अब्दुल कलामांनी नकार दिला पुन्हा राष्ट्रपती होण्याचा, एवढा मोठा, सर्वोच्च मान कोणी असा सुखासुखी सोडेल काय?
तेव्हा ह्या फुकाच्या बातां सोडा आणि चहा ऑर्डर करा! चला!!', इति सोकाजीनाना!

ह्याला सर्वांनी दुजोरा दिला आणि चहाची ऑर्डर दिली.

मौजमजाप्रकटनविचारमतमाध्यमवेध

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

21 Jun 2012 - 12:33 pm | मृत्युन्जय

आत्ताच ब्लॉगवर वाचला. तोच विचार करत होतो की मिपावर कसा नाही हा.

अरे हापिसात मिपा ब्लॊक आहे, त्यामुळे मोबाइलवरुन कसरत करावी लागते.हा धागा इथे कसा टाकला ते माझे मलाच माहिती.

-( कसरतपटू) सोकाजी

दादा कोंडके's picture

23 Jun 2012 - 1:00 am | दादा कोंडके

जेन्युन प्रश्न पडलाय की शालजोडीतले मारलेत हे कळायला अजून काही मिपावरचे पावसाळे बघायला पाहिजेत! :)

श्रीरंग_जोशी's picture

21 Jun 2012 - 12:34 pm | श्रीरंग_जोशी

सोत्रि -इतके तात्काळ भाष्य, राजकीय घडामोडींवर. मानले बुवा!!

याचा पुढचा भागही नक्कीच काढावा लागणार आपल्याला त्यावेळी चावडीऐवजी रात्री उशीराची ओली मैफिल वापरण्यात यावी अशी नम्र सूचना.

विनीत संखे's picture

21 Jun 2012 - 2:27 pm | विनीत संखे

असेच म्हणतो...

टवाळ कार्टा's picture

21 Jun 2012 - 4:13 pm | टवाळ कार्टा

ओल्या मैफीलीमधे इतरही "चांगले" "विषय" असतात ;)

अमितसांगली's picture

21 Jun 2012 - 1:30 pm | अमितसांगली

चोर सगळे लेकाचे. सर्वसामान्य जनता होरपळतेय त्याचे कोणाला काही आहे? जो तो आपली तुंबडी भरण्याच्या मागे. त्या ममताला प्रणब मुखर्जी नको, कारण एक बंगाली, दुसर्‍या पक्षाचा, सर्वोच्च स्थानावर येऊन त्याने डो़यावर मिर्‍या वाटायला नको. देशाचे कोणाला काही पडले आहे?'

'घंटा वटहुकुम काढता येतोय! आपल्या देशात राष्ट्रपती पद हे रबर स्टँप टायपाचे पद आहे. खुप काही जबाबदार्‍या पण पावर काही नाही!

सह्मत....

ऑ? अहो पण सगंमा बाईंची माफी मागायला तयार आहेत की आणि हे काय एवढ्यातच गप्पा संपल्यात?

अमृत

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jun 2012 - 2:17 pm | परिकथेतील राजकुमार

थोडक्यात आणि मार्मिक. आवडले एकदम.

ह्या निमित्ताने मिपावरचे काही जुने चावडीचे धागे आठवले. ;)

संजय क्षीरसागर's picture

21 Jun 2012 - 4:18 pm | संजय क्षीरसागर

थोडक्यात पण छान जमवलय

पैसा's picture

21 Jun 2012 - 6:38 pm | पैसा

सोत्रिअण्णा, झक्क जमलंय. या गप्पा अशाच चालू ठेवा!

मुक्त विहारि's picture

21 Jun 2012 - 7:00 pm | मुक्त विहारि

प्रतिसाद बराच मोठा झाला , म्हणून काही दिवसांनी लेखच टाकीन म्हणतो.

अगदी "शिनीअर सिटीझन्स च्या" बैठकीत बसल्याचा भास झाला ..... छान लेखन.

छान !

पण बारामतीकर लय छुपे रुस्तम आहेत हो. तेच संगमांना सांअगणार तुम्ही पक्षाबाहेरुन लढा आम्ही मदत करतो, निवडुन आले की परत पक्षात बांधील.
नाहि निवडुन आले तरी सोनियांना आम्ही तुम्हाला मदत केली नंतर चे काय ते तुम्हाला बघावेच लागेल.
असा डावपेच..

संगमा पण खुष .. सोनिया पण खुष.
संगमा पडले तरी सगळे पैसे , गरज बारामतीकरांचीच ( इच्छा हि बारामतीकरांचीच हो ... )