तगमग

कधी समुद्रावर उगवणारा चंद्र पाहिला आहेस?
अलगद लाटांवर स्वार होत त्याचे पाउल पडतांना दिसते
हळू हळू चंद्र वर वर सरकत जातो...
टक लावून पाहिले तर असे वाटते की जणू लाटाच त्याला ह्ळू हळू आकाशात ढकलत आहेत
मग हलकेच तो वर वर सरकत जातो
पिवळसर फिकट दिसणारा मग सतेज कांतीने न्हाऊन निघतो
आणि आनंदाने लाटा चित्कार करु लागतात
डूलत डूलत चंद्र वर आकाशात येऊ लागतो आणि मग सरळ किनार्‍यावर बसल्या बसल्या त्याला पहाता येत नाही
हलकेच आपण मागच्या मागे लवंडतो आणि केवळ एकटक त्याच्याकडे पाहू लागतो
तो पण आपल्याकडे पहात असतो
त्याला काही तरी सांगायचे असते असेच नेहमी वाटते
पण तो काय सांगतो हे कळत नाही
कधी समुद्रावर उगवणारा चंद्र पाहिला आहेस?
नसशील पाहिला तर बघ ... एकदा तरी बघ
कधी चंद्र नसला की त्याची वाट पहाणार्‍या चांदण्या दिसतात
जणू काही त्याच्या स्वागतासाठी नटून थटून त्या येतात
आपल्या इवल्याशा डोळ्यांनी भिरीभिरी इकडे तिकडे बघत डोळे मिचकवत त्या चंद्राला शोधत असतात
बराच वेळ झाला तरी तो येत नाही
मग फिकट चेहर्‍याने त्या हळूच पश्चिमेकडे निघून जातात
कुठे जातात ग त्या?
कधी तू पाहीले आहेस?
कधी शोधले आहेस?
मी खूप दिवसांपासून तुला विचारणार विचारणार म्हणून मनात प्रश्न जुळवत होतो
मी नसलो की तु पण अशीच वागतेस का?
एक दिवस उशीरा येऊन तुला पहाणार आहे
पण काय करु मलाच धीर निघत नाही आणि लवकर येऊन तुझी वाट पहातो
आजकाल तुझी वाट पहाणे हाच माझा विरंगुळा आहे
तु आलीस की लगेच निघून जातेस
ऐन भगभगत्या उन्हाळ्यात एखादा चुकार ढग सूर्यासमोर येऊन क्षण दोन क्षण सावली देऊन जावा तसं असतं तुझं येणं आणि जाणं
येण्याआधी येण्याची वाट पहाणं आणि गेल्यावर आठवणी कुरवाळणं
कधी तरी पाऊस पडेल या आशेवर काहीलीची तगमग कमी होते
पण बरसशील तर पावसाळ्याच्या पावसासारखी तृप्त कर
वळीवाचा पाऊस पडतो जोरदार पण तगमग अजूनच वाढते.

लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

मुक्तक आवडल smiley

पियुशा......

http://lovelypiyu.blogspot.com

खुप आवडलं! सुंदर आहे!!

ऐन भगभगत्या उन्हाळ्यात एखादा चुकार ढग सूर्यासमोर येऊन क्षण दोन क्षण सावली देऊन जावा तसं असतं तुझं येणं आणि जाणं
येण्याआधी येण्याची वाट पहाणं आणि गेल्यावर आठवणी कुरवाळणं
कधी तरी पाऊस पडेल या आशेवर काहीलीची तगमग कमी होते
पण बरसशील तर पावसाळ्याच्या पावसासारखी तृप्त कर
वळीवाचा पाऊस पडतो जोरदार पण तगमग अजूनच वाढते.

हे खासच!
smiley

छान लिहिले आहे.
आवडले..smiley

नाना चेंगटांनी मुलींना खूश केलेल दिसते मुक्तकातून... ... सही है लगे रहो.

वळीवाचा पाऊस पडतो जोरदार पण तगमग अजूनच वाढते.

हे बाकी १००% खरंय रे नान्स.

बाकी मुक्तक नेहमी प्रमाणेच चान चान. smiley

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली

नानबा खासच लिहिले आहे रे अगदी.

खूप आवडले.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

सुंदर!!!

छानच!

बिपिन कार्यकर्ते

वाहव्वा! वाहव्वा! वाहव्वा! smiley

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे. http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

मस्त !! आवडलं ..

___________________________________________________

झेपायच्या पलीकडले....

एम.जी.

सुखद अपेक्षा भंग . गद्य लिहिता लिहिता कवितेचा काठ गाठणारे.जबरदस्त आवडले आहे.

- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.

नाना!
नाना!!
नाना!!!

________________________________
सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात!

विजुभाऊंच्या या धाग्याची आठवण झाली.

छान आहे मुक्तक.

कधी समुद्रावर उगवणारा चंद्र पाहिला आहेस?
पष्चिम भारतात सूर्य आणि चंद्र हे डोंगरा आडून उगवतात व समुद्रात मावळतात.
नान्या भूगोल सुधार रे............

नान्या हल्ली चैनैला असतो विजुभौ... येनी आब्जेक्शन???

________________________________
सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात!

विजुभौ, कधीतरी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाला या.
समुद्रातून उगवणारा सुर्व्या बघायला मिळेल..

-----------------------------------------------
मिपाने मला काय दिले?!!
-----------------------------------------------

मस्त!

ऋषिकेश
------------------
माझे मिपावरील लेखन इथे वाचा

परत परत वाचावे असे झाले आहे.

=====================================
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|

आम्ही सध्या लेखणी म्यान केली आहे.
उफ़्फ़... ये गालिब!!

झक्कास

********************************************

सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी

!

अत्यंत अश्लील प्रतिसाद.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

मुक्तक खूपच छान जमलंय.

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आधीं होती दासी । पट्टराणी केलें तिसी ॥
तिचें हिंडणें राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥

संध्येच्या खिडकीत येऊनी
ही हसरी तारा
हळूच पाहते खुणावते ही
या या कोणाला? smiley

बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला
केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी

मुक्तक आवडल

पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|

सुंदर.

"फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची " -अरुण म्हात्रे

मस्तच रे नानुडी.

--टुकुल.

काय बरसात होते ती!

मुक्तक आवडलं.

_____________________
जगतो तेच लिहीतो

मुक्तक आवडलं!!

आवडले.

कौशी

नाना तगमग पोचली.
छान.

छान.

-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।

मस्त च रे नान्या !!

पुन्हा वाचण्यात ही आवडले

सुहास
शंभर प्रतिसादात काड्या सारायच्या, अधून मधून सतत कण्हत राह्यचे आणि वर्षा दोन वर्षातून एखाद्या लेखात आव ऋषिमुनींचा आणायचा असले लोक आमच्या ही डोक्यात जातात. (सही-सौजन्य : बिरूटेसर )

वेळ झाली भर माध्यान्ही
माथ्यावर तळपे उन्ह
नको जाउ कोमेजुन
माझ्या
प्रितीच्या फुला
माझ्या प्रितीच्या फुला॥

शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥

आवडलं !

अमृत

त्याला काही तरी सांगायचे असते असेच नेहमी वाटते
पण तो काय सांगतो हे कळत नाही
>>
... हे असे चेंगटपणामुळे होत असावं का बरं?? smiley

========================
"देवा, मला पाव."
"देवा, मला बटरपण!"
-माउ

मस्त मस्त smileysmiley

____________________________________________________

I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

मुक्तक आवडले,
स्वाती