जर उपवर मुला॑नी असे केले तर

शितल's picture
शितल in जनातलं, मनातलं
19 Jun 2008 - 6:05 pm

गेल्या आठवड्यात आम्ही ७/८ मैत्रीणी नी एका मैत्रीणीच्या घरी रात्रीची मैफिल ठरविली होती, मस्त गप्पा टप्पा- खाणे पिणे, पत्याचे खेळ असा मस्त कार्यक्रम आखला होता. ठरल्या प्रमाणे सगळ्या जणी जमलो, आमच्या ग्रुप मध्ये गृहीणी, नोकरी करणार्‍या आणि काही जणी मुले झाल्यावर मुले लहान असल्या मुळे करिअरला तात्पुरता राम राम ठोकलेल्या अशा सगळ्या जणी आहोत.

गप्पा टप्पा सुरू झाल्या, मस्त वेगवेगळ्या विषया॑वर चर्चा र॑गत गेली, आणि असा एका विषयावरील चर्चा मनाला स्पर्शुन गेली, त्या बद्दल विचार करता आजच्या समाजातील तरूणाई आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टा २१ व्या शतकात पोहचली आहे, पण वैचारिक दृष्टा अजुन खुप मागे आहे नक्की कितव्या शतकात ते नाही सा॑गता येणार. आज मुलीनी किती ही शिक्षण घेतले आणि कोणत्याही चा॑गल्या हुद्यावर, चा॑गल्या पगाराची नोकरी केली तरी तीला लग्न ठरताना आणि लग्न झाल्यावर ही काही वर्ष समाजातील काही जाचक गोष्टीना सामोरे जावे लागते (तर मग ज्या अल्पशिक्षित आणि मागास भागापासुन आहेत त्या॑च्या बाबतीत विचार करणे ही बुध्दीच्या पलिकडे आहे )

जी उपवर मुले आहेत त्या॑नी काही गोष्टीचा विचार केल्यास समाजातील अनेक मुली॑चे जीवन सुखावह होईल.

जी मुले उपवर आहेत त्या मुला॑नी त्याची जीवनसाथी बद्दलच्या अपेक्षा एकदा घरी स्पष्ट कराव्यात्,म्हणजे मुलगी मिळवती हवी की नोकरी नसली तरी चालणारी ,दिसायला कशी शिक्षणाने आणि कोणती आवड निवड बाळगणारी , आणि आपण कुठल्या गोष्टीवर ऎडजेस्टमेट करू शकतो हे मनाशी ठरवावे आणि मग मुलगी पहायला सुरूवात करावी. मुलगी पाहुन झाल्यावर होकार - नकार किती दिवसात सा॑गतो हे मुली कडच्याना सा॑गावे आणि उगाचच समोरच्याला वाट पहायला लावु नये कारण ३/४ अशी स्थळे पाहुन गेली की आजु बाजुचे आणि नातलग म॑ङळी मुलीला वेडे वाकडे बोलायला कमी करत नाहीत आणि त्यात त्या मुलीला मानसिक त्रास होतो आणि स्वतः बद्दलचा आत्मविश्वास ढासळतो.

हु॑डा हा तर भारतीय समाजाला लागलेला शापच आहे, फक्त त्याचे स्वरूप वेगवेगळे असते, "हैस " ह्या शब्दा खातर मुली कडच्या॑ना कर्जाचा डो॑गर होतो, ह्या हैसे खातर मुली कडच्याना न फेडता येणारे कर्ज करावे लागु नये ह्याची जाणीव ठेवावी, कारण लग्नाची गरज जशी मुलीला आहे तशी मुलाला ही आहे हे समजुन घ्यावे.

काही मुले, मुलीला भाऊ नाही म्हणुन ती मुलगी घरातल्याच्या सागण्यावरून नकार देतात, पण मुलानी असा विचार केला तर, आपण जावई बनुन मुलीच्या आई-वडिलाना मुलाचे प्रेम देऊ शकतो, आणि आपल्याला ही ते मुलगा नसल्याने मुला प्रमाणे प्रेम देतील.

आता लग्न झाल्यावरही मुलीला आपल्या घरात रूळायला वेळ द्यायला हवा, कारण मुली कडच्या चालीरिती वेगवेगळ्या असतात आणि लग्न हो ऊन ती सासरी आल्यावरही ती थोडी घाबरलेली आणि थोडी बावरलेली असते, तीला सासरच्या चालीरिती शिकायला आणि घराच्याचा लळा लागायला जरा वेळ दिला पाहिजे आणि त्या वेळे तीच्या नव-याने तिला जास्त पाठिबा दिला पाहिजे, आणि त्यामुळेच तीला नव-या बद्दल विश्वास निर्माण होईल, आणि तीला सासरी रूळायला सोपे जाईल.

लग्न हो ऊन काही महिने झाल्यावर घरात बाळ खेळायला हवे असे घरातील लोक / पाहुणे मडळीचे बोल कानावर पडु लागतात, आणि नमस्काराला आशिर्वाद दिला जातो पुत्रवती भव !
(मुलगा हा वशाचा दिवा हे अजुन मनात असते म्हातारपणी बघो न बघो ) मग त्या नवविवाहितेच्या मनात परत भिती निर्माण हो ऊ लागते, की अरे बाप रे (जर मुलगी झाली तर ) (हे समाजातील सर्व घरात असते असे माझे म्हणने नाही पण अजुन ही समाजात अशी सुशिक्षित घरे ही आहेत ज्याना मुलगाच हवा असतो ) त्यावेळी मुलाने ठाम पणे घरी सागावे की मुलगा असो वा मुलगी दोन्हीच्यातही भेद न करता होईल त्या आपत्यचा प्रेमाने स्विकार करायचा आणि होणार्या बाळाला चागले आरोग्य, आणि शिक्षण कसे देता येईल, बाळाचे व्यक्तीमत्व सर्वा॑गानी बहुगुणी कसे बनवता येईल ह्याचा विचार करावा.
असे जर लग्नाच्या बाबतीत मुला॑नी आणि लग्ना न॑तर नवरा झालेल्या मुला॑नी विचार पुर्वक निर्णय घेतले तर समाजातील अनेक कुटु॑बे सुखी होतील.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

छान विषयाला वाचा फोडलीस शीतल....

मी माझे लग्न साध्या रजिस्टर पद्धतीने व्हावे या मताचा होतो...माझ्या होणार्‍या बायकोला लग्न थाटामाटात व्हावे असे वाटत होते.
माझ्या पत्नीला तुला पुढे शिकायचे का असे विचारले... नोकरी करायची असेल तर करु शकतेस असेही सांगितले....
मला माझ्या बायकोने मी ऑफिसातुन आल्यावर गरम गरम चहा नाश्ता समोर द्यावा असे नाही केले तरी चालेल अशी अपेक्षा नाही. फक्त तिने तिच्या बुद्धीचा वापर करत रहावे. नुसते घर आणि नातेवाईक यात गुंतुन पडुन डोके / बुद्धी भिजत/वाळत घालु नये. ही मनापासुन अपेक्षा.....
पण तीलाच या सर्व गोष्टींमधे रस आहे....
माझ्या सर्व विचाराना तीने रीतसर काट मारुन ठेवली आहे. :)
बायका/ मुली अशा का वागतात....( सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे......)

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

भडकमकर मास्तर's picture

20 Jun 2008 - 8:53 am | भडकमकर मास्तर

मी माझे लग्न साध्या रजिस्टर पद्धतीने व्हावे या मताचा होतो...माझ्या होणार्‍या बायकोला लग्न थाटामाटात व्हावे असे वाटत होते.
मीही यातूनच गेलोय... 'सह्या करण्यात कसलं आलंय लग्न? " असं होणार्‍या बायकोने म्हणून नेहमीचा समारंभ वगैरे करायला लावलंच ...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आनंदयात्री's picture

19 Jun 2008 - 6:34 pm | आनंदयात्री

चांगला विषय.
पण जनरली बहुतेक सुशिक्षित उपवर मुले याबाबतीत घरच्यांशी क्लिअर असतात अन मुली सुद्धा लग्नाच्या मुलाशी बोलुन त्यांचा अपेक्षा सांगतात, जसे मला भाउ नाही माझ्या आई वडिलांचा सांभाळ आपल्यालाच करावा लागेल.
वर मांडलेल्या समस्या ऐकुन माहिती असल्या तरी वैयक्तिकरित्या पहाण्यात आल्या नाहित.

>>असे जर लग्नाच्या बाबतीत मुला॑नी आणि लग्ना न॑तर नवरा झालेल्या मुला॑नी विचार पुर्वक निर्णय घेतले तर समाजातील अनेक कुटु॑बे >>सुखी होतील.

हे पटले.

शेखस्पिअर's picture

20 Jun 2008 - 12:27 pm | शेखस्पिअर

आपण घरी विरजण लावतो..त्यात टाकले जाणारे विरजण आधीच्या दह्यातले असते..
आता मला सांगा...सर्वात आधी दही कसे झाले असेल..
झाले ना 'दिमाग चे दही'...
हेच तत्व लग्नाच्या बाबतीत असते...
हा विषय चघळण्यासाठी चांगला आहे..पण ठरवून लग्न करण्यापासून ते पुढे आयुष्यभर तो विषय दर वेळी विरजण लावल्यासारखा
येत राहतो...
क्यों की साँस भी कभी बहू थी..
हेच ते विरजण्..पिढीतले अंतर हे कालसापेक्ष असते...
सासू (उर्फ "सारख्या सूचना" ) आणी सून(उर्फ "सूचना कोत")
हे पुढेही चालु राहणार...
आता प्रश्न राहतो लग्नपध्द्तीचा...
लग्नात वरपक्ष अव्वाच्या सव्वा मागण्या करीत असेल तर त्याला ठणकावण्याची हिंम्मत मुलीने/मुलाने बाळगलीच पाहीजे..
आजकाल मुले/मुली आर्थिक द्रुष्ट्या स्वतंत्र आहेत..थोडे सुशिक्षीत झाले(साक्षर म्हणजे सुशिक्षीत नव्हे)तर बरेच प्रश्न सुट्तील.
पण स्वानुभवावरून सांगतो... आजच्या मुलींच्या अपेक्षा प्रचंड वाढ्लेल्या आहेत..
आता मला सांगा.. लग्नाच्या वेळी असलेला पगार आयुष्यभर राहतो का?पण मुलीचा बाप (बाहेर भेटू दे रे त्याला)
हा आजकाल फार हावरट झाला आहे .मान्य आहे मुलगी सुखात रहावी असे प्रत्येक बापाला (बाहेर भेटू दे रे त्याला)वाटणारच...
पण म्हणून लग्न व्हायच्या आधीच मुलाला २० वर्षानंतरचा पगार कसा मिळेल???
बरे ,मुलगी काय फार कमावत असते असे नाही पण आजच्या काळात हा भाग मुलींना ही लागू होतो...
काहीतर बाप (बाहेर भेटू दे रे त्याला)बघायला गेल्यावेळी शिक्षण पण काढतात्..माझा एक मित्र अभियांत्रिकी पदवी पात्र होता..त्याचा प्रथम वर्ग थोडक्यात चुकला ...मुलगी कला शाखेत प्रथम वर्ग होती..तिच्या बाबतीत तो थोड्क्यात मिळाला होता..आता मला सांगा
ह्याच्यात तुलना होऊ शकते का?किंवा करण्यात काय अर्थ आहे??
तस्मात 'शितल', आयुष्य हे विरजणासारखे आहे..
दही बनवणे अपरिहार्य आहे ...दह्याचे वैशिष्टय म्हणजे ते आंबट आणी गोड दोन्ही असते..
तुम्ही कुठ्ली चव घेता ते महत्त्वाचे...जाता जाता २ ओळी..काय करणार त्याशिवाय किडा शांत होत नाही..

त्या कोवळ्या मुलांचा बाजार पाहिला मी...||
पैशात मेलनाचा व्यापार पाहिला मी..||

गट्ठाच पत्रिकांचा ओसंडतो तरीही...
नजरेत मी पिताच्या (बाहेर भेटू दे रे त्याला)पगार पाहीला मी..||

'पोहे'च खात गेलो सगळीकडे परंतू ..||
बुद्धितुनी मी त्यांच्या अंधार पाहिला मी..||

हात तिचा मी ज्याला मागावयास गेलो..||
तो बाप (बा. भे. दे .रे .त्या.)ही जरासा मुजोर पाहीला मी...||

धमाल मुलगा's picture

20 Jun 2008 - 1:28 pm | धमाल मुलगा

:) लै भारी शेख स्पिअर!

आता मला सांगा.. लग्नाच्या वेळी असलेला पगार आयुष्यभर राहतो का?पण मुलीचा बाप (बाहेर भेटू दे रे त्याला)
हा आजकाल फार हावरट झाला आहे .मान्य आहे मुलगी सुखात रहावी असे प्रत्येक बापाला (बाहेर भेटू दे रे त्याला)वाटणारच...
पण म्हणून लग्न व्हायच्या आधीच मुलाला २० वर्षानंतरचा पगार कसा मिळेल???

ह्म्म्म...आम्ही फार फार नशिबवान बुवा मग.
आमच्या सासर्‍यानं आमच्या प्रेमप्रकरणाला तेव्हाच मान्यता दिली होती जेव्हा मी दमडीही कमवत नव्हतो. सरकारी कागद करायचा झाला तर त्यात व्यवसायः सुशिक्षित बेरोजगार असा टाकावा लागायच्या काळातही आमच्या सासरेबुवांनी काहीही खळखळ न करता संमती दिली होती....मोठा देवमाणूस...आणि समजुतदारही!

बाकी, बाहेर भेटू दे रे त्याला हे लै लै भारी...भेटलाच तर मलाही फोन करा, मीही हात धुवुन घेइन म्हणतो ;)

वरदा's picture

19 Jun 2008 - 6:49 pm | वरदा

बरोबर आहे गं

आता लग्न झाल्यावरही मुलीला आपल्या घरात रूळायला वेळ द्यायला हवा, कारण मुली कडच्या चालीरिती वेगवेगळ्या असतात आणि लग्न हो ऊन ती सासरी आल्यावरही ती थोडी घाबरलेली आणि थोडी बावरलेली असते, तीला सासरच्या चालीरिती शिकायला आणि घराच्याचा लळा लागायला जरा वेळ दिला पाहिजे आणि त्या वेळे तीच्या नव-याने तिला जास्त पाठिबा दिला पाहिजे, आणि त्यामुळेच तीला नव-या बद्दल विश्वास निर्माण होईल, आणि तीला सासरी रूळायला सोपे जाईल.


हे तर खूपच पटलं जवळजवळ सगळे नवरे एकदा बायको घरी आली की आईकडे तिला शिकवायची जबाबदारी देऊन टाकतात्...अगदी साध्या गोष्टी असतात पण वाद तिथेही होतो...
साधं उदाहरण माझी सासू पालक, मेथी चिरुन झाल्यावर धुते..लग्नानंतर दोन दिवसांनी मी भाजी टाकायला गेले तर म्हणाली आधी काय धुतेस नंतर धुवायची..मी सांगितलं की नंतर धुतल्याने व्हिटॅमिन्स जातात वगैरे पण ते त्यांच्या डोक्यावरुन गेलं १५ मिन. घरच्या चालीरिती दोनच दिवसात बदलालयला लागल्या ह्यावर लेक्चर मिळालं....भाजी धुण्यात कसल्या आल्यात चाली रिती???? पण नवर्‍याने अजिबात तोंड उघडलं नाही...म्हणाला असता अगं ती चांगल्यासाठी सांगतेय तर काय बिघडलं असतं......
शिकलेली बायको हवी तर थोडं समजून घ्यायला शिका की.......
अर्थात हे ३ वर्षापुर्वी आता बिचारा सांगतो आईला ती करेल ते नीटच करेल पण तेव्हा नवीन आल्यावर सपोर्ट ची खूप गरज असते हे खरं.....

अभिरत भिरभि-या's picture

19 Jun 2008 - 7:00 pm | अभिरत भिरभि-या

भाजी धुतल्याने व्हिटॅमिन्स जाणारच मग आधी काय आणि नंतर काय ?
कॄपया हा मुद्दा थोडा सविस्तर सांगावा ...

वरदा's picture

19 Jun 2008 - 7:05 pm | वरदा

आपल्या ९वीच्या सायन्सच्या पुस्तकात दिलं होतं याचं कारण अख्खी पानं धुतल्यावर व्हिटॅमिन्स जात नाहीत्..तेच जर भाजी बारीक चिरल्यावर धुतली तर व्हिटॅमिन्स जातात ....शास्त्रीय कारणे द्या मधे हा प्रश्न हमखास असायचा....

अभिरत भिरभि-या's picture

20 Jun 2008 - 11:47 am | अभिरत भिरभि-या

व्वा वरदाताई मानले तुम्हाला !!

शितल's picture

19 Jun 2008 - 7:07 pm | शितल

हाच फरक पडतो, बारीक सारीक गोश्टीवरून चालीरिती आणि घराण्याच्या गोश्ह्टी केल्या जातात.

वरदा's picture

19 Jun 2008 - 7:10 pm | वरदा

गं अशा कितीतरी गोष्टी असतात्..आणि मुलांना कायम वाटतं त्यात काय एवढं विशेष्?...सॉलीड पटला तुझा लेख्...मस्त...

आशु's picture

19 Jun 2008 - 8:02 pm | आशु

शीतल,

मी बरेच दिवस मिसळ पाव वरचे लेख वाचते. आज तुझा लेख वचुन प्रतिक्रीया देण्याचा मोह अनावर झाला, आणि सदस्यत्व घेतले.
तु मान्ड्लेले सगळेच मुद्दे अतिशय योग्य आहेत. ओफिस्मधे नविन रुजु झालेल्या माणसाल एरवी जेवढी मदत केली जाते तेवढीहि मदत नविन मुलीच्या वाट्याला येत नाही. म्हणजे हे मी कामाबाबत म्हण्त नाही, तर ती वेगळ्या घरातुन आली आहे, तिच्या काही वेगळ्या पद्धती असु शकतात हे समजून्च घेतले जात नाही. आमचेच सगळे चान्गले आणि बरोबर कसे हे सिद्ध करायला जणु हक्काचा श्रोता मिळतो की ज्याने थोडे जरी वेगळे बोलायचा प्रयत्न केला तरी आइवडिलान्नी वळण कसे लावले नाही हे ऐकायला मिळते. आणि तथाकथित सुशिक्शित आणि उच्च्मध्यमव्रर्गिय लोकहि याला अपवाद नसतात हे खेदाने म्हणावेसे वाट्ते. आधी २/३ वर्शे शोधाशोध करुन सर्व बाजुने पारखुन घेतलेल्या मुलीविषयी आणि तिच्या आइ वडिलान्विषयी तक्रार करताना आपणच ही निवड स्वखुशीने केलेली आहे याचाहि विसर पड्तो. कोणाचे बरोबर आणि कोणचे चुक हे वादाने कधिच सिद्ध होत नाही , येणारा काळच ते खरे सान्गतो हे जरी कितिही बरोबर असले तरी सुरुवातीच्या काळात मनावर उठलेले ओरखडे सहजासहजी बुजले जात नाहीत हेही खरे.
लग्नाची गरज ही जेवढी मुलीना असते तेवढीच ती मुलान्नाही असते हे जोपर्यन्त समाजमनामधे खोलवर रुजत नाही तोपर्यन्त असेच चालणार, असे वाटते.

वरदा's picture

19 Jun 2008 - 9:06 pm | वरदा

कोणाचे बरोबर आणि कोणचे चुक हे वादाने कधिच सिद्ध होत नाही , येणारा काळच ते खरे सान्गतो हे जरी कितिही बरोबर असले तरी सुरुवातीच्या काळात मनावर उठलेले ओरखडे सहजासहजी बुजले जात नाहीत हेही खरे.

१००% पटलं

अवांतरः मला काय वाट्टं माहितेय लग्नानंतर आपण १ महिना नवर्‍याच्या घरी राहिलं की त्यानेही १ महिना आपल्या घरी येऊन राहिलं पाहिजे आणि सगळी कामं केली पाहिजेत्...म्हणजे कळेल कसं वाट्टं पुर्ण नवीन घरात गेल्यावर..

यशोधरा's picture

19 Jun 2008 - 10:03 pm | यशोधरा

छान लिहिलं आहेस शीतल. वरदा, आशू खरच गं तुम्ही म्हणताय ते ही.

भाग्यश्री's picture

19 Jun 2008 - 10:18 pm | भाग्यश्री

ह्म्म लेख आवडला! बर्‍याच समस्या वैयक्तीकरीत्या पाहण्यात नसल्या तरी अजुन समाजात आहेत याची कल्पना आहे.. बेसिकली जितकं मुलगा आणि मुलगी यांच्यात सांजस्याचे नाते आहे/असावे तितकेच ते दोघांच्या पालकांमधे असावे.. तरच ते लग्न खर्‍या अर्थाने परिपूर्ण बनते.. आमच्या दोघांच्या आईबाबांचे इतके मस्त जमते की आम्हालाच मजा वाटते.. :) पण त्याचा खरच फाय्दा होतो.. लग्न ठरायच्या आधीच मी, आईबाबांशी(सासू-सासरे) इतकी क्लोज झाले होते की लग्नानंतर काहीच वेगळं वाटलं नाही मला...अजिबात ऑकवर्ड्नेस नाही.. उलट मी घरात नवीन आलेय्,म्हणुन पहीले १५ दिवस त्यांनी मला काही कामही करू दिले नाही.. आम्ही दोघे इतके लांब आहोत त्यांच्यापासून पण त्या मला त्यांच्या मुलाइतकंच मिस करतात ! वगैरे वगैरे..

सांगायचा मुद्दा हा, की थोडी थोडी का होईना परिस्थिती बदलत आहे निश्चित! पण असं सर्व ठीकाणी व्हायला पाहीजे.. अजुनही माझ्या मैत्रिणी आहेत, ज्यांना दोन दिवस सासू त्यांच्याकडे राहायला आली की अडचण वाटते.. किंवा आता यांच्याशी काय बोलायचं वगैरे प्रश्न पडतात!! शिवाय त्या सासूने देखील लवकर नातू पाहीजे वगैरे साठी दबाव आणणे या गोष्टी चुकीच्या आहेत.. हुंडा सारख्या गोष्टी अजुनही होतात आजुबाजुला याची मात्र कमाल वाटते.. निर्लज्जपणे मुलीच्या आईबाबांना अश्या पैशांच्या डीमांड्स करणार्‍या आणि तिला त्रास देणारी लोकं पाहून तिडीक उठते!!! एक उदा. जवळच्या घरात झाले.. आणि संताप संताप झाला होता! मुलीशी लग्न केले म्हणजे पाहीजे ते मागून घ्यायचे तिच्या घरच्यांकडून, आणि उगीचच त्रास द्यायचा ही कसली विचारसरणी!! पथेटीक!! असं अजिबात असता कामा नये.. पण आहेत अश्या केसेस..

असो.. फार लिहीले! पण जवळचा विषय आहे! :)

http://bhagyashreee.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

19 Jun 2008 - 11:18 pm | संदीप चित्रे

खूप चांगला विषय सुरू केलास शितल :)

सहज's picture

20 Jun 2008 - 7:51 am | सहज

महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.

गमंत अशी आहे की मुलापेक्षा जास्त कारणीभूत अथवा ह्या मुद्यांवर योग्य तोडगा काढण्यास उपयुक्त व्यक्ती ही बरेचदा "मुलाची आई" हीच असते. ही सासु देखील एकेकाळी सुन होतीच ना. बाई बाईला सांभाळुन घेउ शकत नाही. मधल्या मधे शिव्या खातो बिचारा नवरा. ;-)

नवर्‍याला आई व बायको दोन्ही बाजु सांभाळाव्या लागतात.

हुंडा मुलगा मागतो पेक्षा त्याच्या घरचे मागतात असे नाही वाटत? हा आता मुलगा त्याच्या घरच्यांना तसे करायला नकार देउ शकतो पण त्याच न्यायाने मुलगी तिच्या आइवडलांना हुंडा देण्यापासुन का बरे परावृत्त करु शकत नाही?

जावई हा मुलगा बनणे जितके "स्वाभाविक" तितकेच सुन "मुलगी" बनणे. [बाय द वे माझे मत आई-वडील एकमेव!! सासु सासरे ह्यांच्याबद्दल मला प्रेम, आदर आहे पण दुसर्‍या कोणाला आई-वडील मानणे जमत नाही. व हे सुनेला देखील लागू, दुट्टपीपणा नाही. :-) शिवाय त्यातुन आपल्याकडे मुलगी घर बदलते म्हणुन व्यावहारीक दृष्ट्या तिच्यात व सासुमधे आई-मुलगी नाते होऊ शकणे हे कधीतरी भेटणार्‍या जावई-सासरे/सासु पेक्षा किंचीत सोपे.]

पुत्रवती भव हा जुना वर आहे म्हणुनच शिवाय गिव्हन द चॉईस अशी मुळ लेखात म्हणल्याप्रमाणे परिस्थीति असेल तर मुलगाच बरा किनाई!! कृ. ह. घ्या.

सुनेला नव्या घरात रुळायला व उपरे न वाटता घरचाच सदस्य वाटण्यासाठी जे वातावरण लागते त्यासाठी मात्र सासरकडच्यांनी जास्त प्रयत्न केले पाहीजेत ह्यात काही दुमत नाही. अर्थात तसे न केल्यास ती सुन अजुन एक नवे घर घ्यायला लावते नवर्‍याला. ;-)

असो शेवटचे वाक्य - असे जर लग्नाच्या बाबतीत मुला॑नी आणि लग्ना न॑तर नवरा झालेल्या मुला॑नी विचार पुर्वक निर्णय घेतले तर समाजातील अनेक कुटु॑बे सुखी होतील. पुर्णता पटले नाही. कारण असा अर्थ अभिप्रेत होतो की उपवर मुलांनी जर का काही केले तरच...

वाद नाही. असेच जरा २०व्या शतकातील टिपीकल बाई मानसीकता असलेला लेख म्हणजे लेखाचा शेवट कसा बघा आमचे हे जरा सुधरले तर किनाई मगच... :-) म्हणुन हा प्रतिसाद.

असो ओव्हरऑल सहमत आहे बर का शितलताई...

त्याच न्यायाने मुलगी तिच्या आइवडलांना हुंडा देण्यापासुन का बरे परावृत्त करु शकत नाही?

एकदम मनातलं बोललात सहज...
पूर्वी मुली पायावर उभ्या नव्हत्या तेव्हा कदाचित त्यांना कोणी जुमानत नसेल, पण आपल्या वडिलांना कर्जात / दु:खात लोटणार्‍या सासरच्या अवास्तव मागण्या अमान्य कराव्यात असं आजकालच्या उच्चशिक्षित स्वतःच्या पायावर उभ्या मुलींमध्ये तरी दिसतं का ? गेल्या दहा वर्षांत अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत... आता अशा लोभी घरामध्ये आयुष्य काढायचंय तर आपल्यालाच त्रास होईल, हे त्या मुलींना कळत नाही का? तेव्हा मात्र चांगल्या घरी पटकन पडायची हौस असते...
_______________________________
हौस या विषयावर बरंच लिहिता येईल... "मी हौस जी काही करतो ती स्वतःच्या पैशाने करतो, इतरांचे ( आई वडिलांचे सुद्धा ) पैसे घेऊन स्वतःची हौस / समारंभ वगैरे का? "...

माझ्या लग्नापूर्वी ( स्थळ म्हणून आलेल्या ,अनोळखी आणि न भेटलेल्या,बोललेल्या)एका लग्नेच्छू मुलीला मी लिहिले होते की " मान्य आहे , तुला लग्नसमारंभाची हौस आहे, ओके, तू नोकरी करतेस, आता असा विचार कर की सगळा खर्च फक्त तुला तुझ्या स्वतःच्या साठवलेल्या / नोकरीच्या पैशातून करायचा आहे, मग तुझे तूच ठरव केवढा समारंभ करायचा आणि किती माणसे बोलवायची ते... मग खर्चाला बरोबर कात्री लागेल की नाही? " तिला हे भलतेच चक्रम वाटले असावे.... " असं कसं? माझे बाबाच माझ्यासाठी हा खर्च करणार... आणि मी सगळी हौस करणार..."
आम्ही पुन्हा कधीच भेटलो बोललो नाही हे वे सां न ल ... :)
...... माझ्या लग्नात मी स्वतः ( वडिलांचे पैसे न घेता ) समारंभ ( बायकोच्या हौसेखातर) केला... :)
आणि मुलगी असतो तरी हेच केलं असतं...
_______________
पण मीही ..... ओव्हरऑल सहमत आहे बरं का शितलताई...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वरदा's picture

20 Jun 2008 - 6:04 pm | वरदा

१०१% पटलं

वरदा's picture

20 Jun 2008 - 6:04 pm | वरदा

नवर्‍याला आई व बायको दोन्ही बाजु सांभाळाव्या लागतात
पण तो त्याच्याच घरात असतो आणि त्याला त्याचीच आई सांभाळायची असते...
आम्ही नवीन घरात असतो आणि आम्हाला दुसर्‍याची आई सांभाळायची असते...थोडा सपोर्ट नको? आम्हाला स्वभाव माहित व्हायला वेळ हवाय आणि तोवर सारखी घरच्या चालीरितींची लेक्चर्स नकोयत......

विसोबा खेचर's picture

20 Jun 2008 - 8:12 am | विसोबा खेचर

चर्चा छान सुरू आहे चर्चा!

पण लगीन हा आपला विषय नाही तेव्हा आपण यात काही बोलणं बरोबर होणार नाही! :)

बाकी चालू द्या, वाचायला मजा वाटते आहे! :)

आपला,
(अविवाहित) तात्या.

II राजे II's picture

20 Jun 2008 - 9:35 am | II राजे II (not verified)

>> लगीन हा आपला विषय नाही
आमचा ही नाही... ;)

पण वाचतो आहे.. मदत होईल पुढे मागे !

राज जैन
माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

अमोल केळकर's picture

20 Jun 2008 - 9:19 am | अमोल केळकर

प्रस्तुत लेख आणी त्यावरच्या सर्व प्रतिक्रिया नक्किच विचार करण्यासारख्या.
या विषयाला अनुसरुन सनई चौघडे ( कांदा पोहे ) नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शीत होत आहे. बघुया काही वेगळे/वैचारिक मुद्दे पहायला मिळतात का?

शेखर's picture

20 Jun 2008 - 9:27 am | शेखर

शितल,

अत्यंत सुंदर लेख आणि नेटक्या शब्दात भावना मांडल्या. मी तुमच्या भावनांशी १००%सहमत आहे.

पण हा विचार तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या भावजयी बद्दल केला आहे? जर तुमच्या घरात असे घडत असेल तर तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या आईला व भावाला समजावुन सांगितले आहे? तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या भावजयी सांभाळुन घेतले आहे? तुम्हाला भाऊ असेल किंवा नसेल, तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या जवळच्या नातेवाईकानां अथवा स्नेह्यांना सांगितले आहे?

ह्या सर्व गोष्टी तुम्ही केल्या असतील तर तुमच्या विचारांना लोक किंमत देतील आणि तुम्हाला मदत करतील. अन्यथा हे नक्राश्रु वाटतील.

जर तुम्हाला माझ्या प्रतिक्रियेने वाईट वाटले किंवा राग आला असेल क्षमा असावी.

शेखर.

वरदा's picture

20 Jun 2008 - 5:55 pm | वरदा

मला भावजय नाही नाहीतर मी अगदी १०० % माझ्या आईला समजावलं असतं पण हल्ली बर्‍याच मैत्रीणींना हे करताना पहातेय्..परवाच एक काकू मला सांगायला लागल्या त्यांच्या सुनेची कहाणी मी लगेच सांगितलं काकू हेच तुमच्या मुलीच्या सासूने केलं तर हो? सगळेजण वेगळे असणारच आपण वेगळ्या विषयावर बोलू.....

भडकमकर मास्तर's picture

20 Jun 2008 - 9:34 am | भडकमकर मास्तर

पण हा विचार तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या भावजयी बद्दल केला आहे? जर तुमच्या घरात असे घडत असेल तर तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या आईला व भावाला समजावुन सांगितले आहे? तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या भावजयी सांभाळुन घेतले आहे? तुम्हाला भाऊ असेल किंवा नसेल, तुमच्या पैकी किती जणींनी तुमच्या जवळच्या नातेवाईकानां अथवा स्नेह्यांना सांगितले आहे?

ह्या सर्व गोष्टी तुम्ही केल्या असतील तर तुमच्या विचारांना लोक किंमत देतील आणि तुम्हाला मदत करतील. अन्यथा हे नक्राश्रु वाटतील.

१०० % प्रचंड सहमत....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऋचा's picture

20 Jun 2008 - 9:47 am | ऋचा

छान लिहिलं आहेस गं.

१००००% सहमत!!!

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

चावटमेला's picture

20 Jun 2008 - 11:06 am | चावटमेला

छान लेख आहे शीतलताई..
अगदी विचार करायला लावणारा
http://chilmibaba.blogspot.com

धमाल मुलगा's picture

20 Jun 2008 - 11:07 am | धमाल मुलगा

बराच विचार करायला लावणारा विषय.

माझा मुळात 'मुलगी पाहणे' ह्या प्रकारावरच आक्षेप आहे. ती काय दुकानात मांडलेली फुलदाणी आहे की गाय-म्हैस? मुलाकडच्यांनी गुरांच्या बाजारात गेल्यासारखं मुलीकडे जायचं / त्यांना आपल्या घरी बोलवायचं, मोठ्या गप्पा झोडायच्या, आणि मुलगी चहा-पोहे घेऊन आली की एखादी गाय-म्हैस विकत घेत असल्यासारखं तीला निरखायचं! अरे, किती विचित्र वाटत असेल तीला!
तरी बरं, हल्ली "मुली, चालुन दाखव, सुईत दोरा ओऊन दाखव" इ.इ. शारिरीक व्यंग शोधायचे फडतुस प्रकार थांबलेत.

जी मुले उपवर आहेत त्या मुला॑नी त्याची जीवनसाथी बद्दलच्या अपेक्षा एकदा घरी स्पष्ट कराव्यात्

हल्ली बर्‍याच घरी हे होतं ही एक समाधानाची बाब.

मुलगी पाहुन झाल्यावर होकार - नकार किती दिवसात सा॑गतो हे मुली कडच्याना सा॑गावे आणि उगाचच समोरच्याला वाट पहायला लावु नये

++++१
उगाच एखाद्याला झुलवत ठेवण्यात काय हशील हे मला आजपर्यंत समजलेलं नाही....
हेच जर मुलीकडचे जरा अर्धा तास उशीरा आले तर किती टोमणे मारले जातात?

"हैस " ह्या शब्दा खातर मुली कडच्या॑ना कर्जाचा डो॑गर होतो, ह्या हैसे खातर मुली कडच्याना न फेडता येणारे कर्ज करावे लागु नये ह्याची जाणीव ठेवावी

अगदी बरोबर.
पण इथं एक गोष्ट नमुद करावीशी वाटते, जे लोक खर्च करु शकतात, त्यांनी मऊ लागलं की कोपरानं खणत केवळ पैसा वाचवायचा म्हणुन दरिद्रीपणा दाखवल्याची बरीच उदाहरणं पाहण्यात आहेत. ह्या बाबतीत समतोल असावा.
(अर्थात नोंदणी पध्दतीने विवाह केल्यास उत्तमच...हा प्रश्नच उद्भवत नाही.)

जर समारंभ थाटात करायचा असेल, तर खर्च दोन्हीकडच्या घरांनी समान विभागुन घ्यावा.

मुलानी असा विचार केला तर, आपण जावई बनुन मुलीच्या आई-वडिलाना मुलाचे प्रेम देऊ शकतो, आणि आपल्याला ही ते मुलगा नसल्याने मुला प्रमाणे प्रेम देतील.

काही प्रमाणात सहमत, काही प्रमाणात असहमत.
ह्या गोष्टी व्यक्तिसापेक्ष आहेत. १००% सगळ्यांना लागु पडणार नाहीत...आणि ते शक्यही नाही!

आता लग्न झाल्यावरही मुलीला आपल्या घरात रूळायला वेळ द्यायला हवा, कारण मुली कडच्या चालीरिती वेगवेगळ्या असतात आणि लग्न हो ऊन ती सासरी आल्यावरही ती थोडी घाबरलेली आणि थोडी बावरलेली असते, तीला सासरच्या चालीरिती शिकायला आणि घराच्याचा लळा लागायला जरा वेळ दिला पाहिजे आणि त्या वेळे तीच्या नव-याने तिला जास्त पाठिबा दिला पाहिजे, आणि त्यामुळेच तीला नव-या बद्दल विश्वास निर्माण होईल, आणि तीला सासरी रूळायला सोपे जाईल.

अतिशय सर्वसामान्यज्ञानातला हा एक भाग आहे. पण खरंच किती लोकांना हे कळतं?
एक मुद्दा: आणि समजा, लग्न ठरुन ते होईपर्यंत १/२-२ वर्षं मध्ये वेळ आहे, आणि त्या वेळात मुलीचं मुलाकडे आणि मुलाचं मुलीकडे जाणंयेणं चालू आहे. बर्‍याच रिती वगैरे एकमेकांना ठाऊक झाल्या आहेत.
तरीही वरचा मुद्दा लग्नानंतर लागु पडेल काय?
तसं असेल तर तो मुलीचा दुराग्रह समजु नये काय?

आपण कितीही म्हणालो की काळ बदलला आहे..तरीही अजुनतरी मुलीलाच सासरी रहावं लागतं. मग जिथे रहायचं तिथल्या माणसांशी, त्यांच्या पध्दतींशी जुळवुन घेणे क्रमप्राप्तच नाही का?

बाकी, ह्या मुद्द्यावर वरदा ताईशी पुर्ण सहमत. भाजी चिरण्यापुर्वी धुवायची की चिरल्यानंतर असल्या फालतु गोष्टींत लक्ष घालुन फक्त घरातलं वातावरण बिघडतं...ते तारतम्य सासरच्या माणसांनी नक्कीच पाळावं.

मुलाने ठाम पणे घरी सागावे की मुलगा असो वा मुलगी दोन्हीच्यातही भेद न करता होईल त्या आपत्यचा प्रेमाने स्विकार करायचा आणि होणार्या बाळाला चागले आरोग्य, आणि शिक्षण कसे देता येईल, बाळाचे व्यक्तीमत्व सर्वा॑गानी बहुगुणी कसे बनवता येईल ह्याचा विचार करावा.

स्त्रीभृणहत्या विरोधी कायद्यानंच ह्या गोष्टीची काळजी घेतली आहे. आणि निदान हल्ली तरी कोणी मुलगी झाली म्हणून सासुरवास करत नसावेत असा माझा एक कयास आहे. :)

लग्नाच्या बाबतीत मुला॑नी आणि लग्ना न॑तर नवरा झालेल्या मुला॑नी विचार पुर्वक निर्णय घेतले तर समाजातील अनेक कुटु॑बे सुखी होतील.

असहमत !

केवळ मुलगा/नवरा ह्यांची ती जबाबदारी नाही...मुलीने/बायकोनेही तारतम्य ठेवणे तितकेच गरजेचे आहे.

ह्याउप्पर मी असं म्हणेन की हे निर्णय घेताना, जनरेशन गॅप बाजुला ठेऊन वडिलधार्‍यांनी आणि मुला/मुलींनी एकत्र बसुन साधकबाधक चर्चा करुन निर्णय घेतले तर समस्या अगदी सोप्या होऊन जातील.
(माझं हे अगदी मनापासुनचं मत आहे. कारण माझ्याच घरच्यांनी मला रजिस्टर-मॅरेज करायचं म्हणल्यावर जे काही ऐकवलंय त्यानंतर जनरेशन गॅप ही अतिशय महत्वाची भुमिका बजावते हे मला फार चांगलं कळलंय. असो.)

आपला,
- (काहीसा सहमत, काहीसा असहमत) ध मा ल.

सखाराम_गटणे™'s picture

20 Jun 2008 - 11:41 am | सखाराम_गटणे™

धमाल बरोबर सहमत

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ यांच्या वर्गातला :))

वरदा's picture

20 Jun 2008 - 6:14 pm | वरदा

सॉलीड विचार केलायस रे...धमी लकी आहे हो....:)

एक मुद्दा: आणि समजा, लग्न ठरुन ते होईपर्यंत १/२-२ वर्षं मध्ये वेळ आहे, आणि त्या वेळात मुलीचं मुलाकडे आणि मुलाचं मुलीकडे जाणंयेणं चालू आहे. बर्‍याच रिती वगैरे एकमेकांना ठाऊक झाल्या आहेत.
तरीही वरचा मुद्दा लग्नानंतर लागु पडेल काय?

कसं आहे ना धमु...कितीही माहिती असणं आणि त्या घरात जाऊन रहाणं यात खूप म्हणजे खूपच फरक असतो....अगदी ती घरात काय घालते..घरी आल्यावर पाय धुते का...भाजी फोडणीस टाकताना त्यात जिरं कशाला टाकते....रोजच्या भाजीत तेल किती घालते....ती माहेरुन आणलेली जी फोडणीची वाटी वापरते त्यात फोडणी जळते कशी... ह्या आणि अशा भंपक गोष्टी डोकं पिकवतात आणि त्या लग्ना आधी अज्जिबात झालेल्या नसतात्..तेव्हा सगळं गोड गोड असतं.....तेव्हा ह्या गोष्टी येतात रुळण्यामधे.....अर्थात त्या सगळ्यांच्या घरी होत नाहीत हे नक्की.....किंवा कमी झाल्या तर बरं हा सांगण्याचा मुद्दा....

केवळ मुलगा/नवरा ह्यांची ती जबाबदारी नाही...मुलीने/बायकोनेही तारतम्य ठेवणे तितकेच गरजेचे आहे.


मान्य फक्त मुलाने तिला जास्त मदत करायला हवी कारण तो त्याच घरात असतो....त्याला माहित असतं काय करायचं काय नाही...जसं आमच्या घरात गणपती नव्हता नवर्‍याकडे आहे...त्याने मला अगदी सगळं नीट शिकवलं पहिल्यांदाच्...प्रत्येक तयारी करायला माझ्याबरोबर आला....खड्याची गौर आणायला जाऊ नको म्हणाली त्याची आई तर म्हणाला मी जाऊन फोटो काढतो...आणि मला सगळं दाखवलं कसं करायचं ते.... एवढीच अपेक्षा असते..अजुन काही नाही....

धमाल मुलगा's picture

23 Jun 2008 - 6:20 pm | धमाल मुलगा

सॉलीड विचार केलायस रे...धमी लकी आहे हो...

=)) =))
तिच्यासमोर नको हे असलं काही बोलुस बाई....
तुझे किमान २ तास माझ्या कागाळ्या ऐकण्यात जातील :)

अगदी ती घरात काय घालते..घरी आल्यावर पाय धुते का...भाजी फोडणीस टाकताना त्यात जिरं कशाला टाकते....रोजच्या भाजीत तेल किती घालते....ती माहेरुन आणलेली जी फोडणीची वाटी वापरते त्यात फोडणी जळते कशी... ह्या आणि अशा भंपक गोष्टी डोकं पिकवतात आणि त्या लग्ना आधी अज्जिबात झालेल्या नसतात्.

च्यामारी...ए...का घाबरवते मला...

आयला, काय फालतुपणा आहे हा?
हे असलं काही आमच्या आईसाहेबांनी आणि धमीनं जर मांडलं ना तर मी सरळ सन्यास घेऊन जाईन सज्जनगडावर!
मग बसा म्हणेन बोंबलत....
अरे काय वेडेपणा आहे हा...हे हे इतकं होतं?

मान्य फक्त मुलाने तिला जास्त मदत करायला हवी कारण तो त्याच घरात असतो....त्याला माहित असतं काय करायचं काय नाही..

हो. हे मात्र खरं.

त्याने मला अगदी सगळं नीट शिकवलं पहिल्यांदाच्...प्रत्येक तयारी करायला माझ्याबरोबर आला....खड्याची गौर आणायला जाऊ नको म्हणाली त्याची आई तर म्हणाला मी जाऊन फोटो काढतो...आणि मला सगळं दाखवलं कसं करायचं ते....

+++१ :)
लै भारी...
शिकवणी मिळेल काय ;)

एवढीच अपेक्षा असते..अजुन काही नाही....

हम्म्म.....असे आहे तर! ठीक ठीक. आम्ही वैयक्तिकरित्या प्रयत्न करु!

वरदा's picture

23 Jun 2008 - 9:59 pm | वरदा

रे...मी आधीच म्हटलं सगळ्या घरात होतं असं नाही...काही जणी सहज समजवून घेतात किंवा सहज दुर्लक्ष करणार्‍या पण असतात्...पण तरीही कंम्पॅरिझन होते कुणाशीतरी नकळत् नवीन आलेल्या व्यक्तीची जुन्या व्यक्तींशी...कुणी मुद्दाम नाही रे करत किवा कुणी वाईटही नसतं.....आणि संन्यास घ्यायचा ऑप्शन "शुभमंगल सावधान" होईपर्यंतच असतो नंतर नाही बरं का....मग कंपल्सरी ग्रुहप्रस्थाश्रम......

शिकवणी मिळेल काय
अरे तोही बारामतीकर..तो शिकला तसाच तुही शिकशील.....:)

हम्म्म.....असे आहे तर! ठीक ठीक. आम्ही वैयक्तिकरित्या प्रयत्न करु!


बरं आहे..चला धमी खूष राहील तर आमची....:)

साती's picture

20 Jun 2008 - 9:03 pm | साती

खड्याची गौर आणायला जाऊ नको म्हणाली त्याची आई तर म्हणाला मी जाऊन फोटो काढतो...आणि मला सगळं दाखवलं कसं करायचं ते.... एवढीच अपेक्षा असते..अजुन काही नाही

असा शहाणा नवरा पाहिजे वरदा.
साती