टाकाऊ पिम्पापासून शोभेचा पिंप.

सौरभ उप्स's picture
सौरभ उप्स in कलादालन
21 May 2012 - 11:34 pm

नमस्कार,
टाकाऊ पिम्पापासून शोभेचा पिंप मी तयार केला त्याबद्दलचा अनुभव आणि तो कसा केला याबद्दल थोडेफार..

माझ्या लहानपणी मला सांभाळलेल्या व् आमच्या शेजारच्या जोशी काकूंनी माझी चित्रे लहानपणापासून पाहिली होती,
आणि सध्याच माझ क्षेत्र ही कलेतच आहे हे त्यांना माहित होत.... त्या अनुषंगाने त्यांनी मला त्यांच्याकडे असलेला एक खूप जुना असा अंदाजे ३.५ फूट उंच आणि २ फूट रुंदीचा एक तांब्याचा पिंप
माझ्या घरी माझ्यासमोर आणून ठेवला, आणि म्हणाले कि जे काही सुचेल जे काही जमेल ते या पिंपाच काहीतरी कलात्मक बनवून देशील का?
मी तेवा अगदी आत्मविश्वासाने त्यांना सांगितल कि हो काहीतरी नक्की करेन....
त्यांना त्यावेळी हो सांगितलं खर पण जेवा मी त्या पिंपाला जवळून निरखून पाहिलं तर यावर काय काय करू शकतो याचा विचार केला पण काहीच सुचत नवत कि जे प्रत्यक्षात उतरवता येईल त्या पिंपावर..
बर तो पिंप पण धातूचा होता त्यामुळे त्यावर कोरीव काम कराव तर ते हि शक्य वाटल नाही... काही collage कराव तर तेही नाही, काही पेंटिंग कराव तर नंतर ते लवकरच खराब होईल याची शक्यता दाट होती म्हणून तेही नाही.

आता काय कराव... त्यांना तर हो म्हणून सांगितलं होत.... मित्रांना विचारून त्यांच डोक खल्ल तिकडूनही पटेल असं काही मिळाल नाही...
अक्षरशः घरच्यांनी तो पिंप वापरायला घेतलेला काही करत नाही जागा अड़तेय तर त्यात अडगळीच्या वस्तू ठेवल्या त्यांनी...
घरात थोड काम चालू होत म्हणून परत मध्ये खंड पडला....
पण त्यातच मला मस्त कल्पना सुचली..
पूर्वी कापडावर चित्र काढलेली थोडीफार मग डोक्यात टूब पेटली कि आपण कापडावर मस्त एखाद चित्र काढून छान काहीतरी तयार करुया..
ठरल मग...
पण आता काढायचं तरी कोणत चित्र हा प्रश्न.. लगेच आठवल कि त्यांच्याकडे लहान मुलगा आहे तर त्याच्यासाठी काहीतरी कार्टून काढूयात...
मग लहानात प्रसिद्ध असलेल Finding नेमो हे चित्र काढायचं ठरल ( पिंप हा पाण्याचा म्हणून कार्टून ही पाण्यात्लाच घेतला)

मग पिंपावर व्यवस्थित बसेल असं पांढर जाडसर (बहुतेक मांजर पाटच असाव) कापड दुकानातून आणल.
मग ते पिंपावर गुंडाळून अगदी मोजून मापून हवा तेवढा कापून घेतला...
मग मोबाईल वर ते कार्टून घेतलेलं ते पाहून हळू हळू स्केचिंग सुरु केल त्या कापडावर....
मध्ये मध्ये अंदाज घेत होतोच, पिंप चारही बाजूनी दिसू शकणार असल्यामुळे ते चित्र कुठूनही पाहिलं तरी अर्धवट नाही दिसल पाहिजे असं असाव या अंदाजाने पूर्ण केल..
मग त्यात रंग भरले आणि कापडावरच चित्र पूर्ण केल...
आता खरी परीक्षा होती ती ते कापड त्या पिंपावर राहील कसं???
पण बिनधास्त पाने मनाला वाटल तेच केल.. भरमसाट असा (नेहमी भरव्श्याचा असा) फेविकॉल त्या पिंपावर थापला मुख्यतः वरच्या कडेला आणि खालच्या कडेला जास्त....
मग ते कापड त्याला गुंडाळला व्यवस्थितपणे घडी/वळी न पडता आणि त्याची कडा अशी केली होती कि जर ते कपड व्यवस्थित तंतोतंत चित्कवल तर ते बघितल्यावर असच वाटेल कि अखंड कापड लावल आहे...
मग वरून आतल्या बाजूस आणि खालून आतल्या बाजूस पडलेल्या वळ्या ज्या आल्या होत्या त्यांना लपवण्यासाठी वेगळी पट्टी आजूबाजूच्या चित्राला match करेल अशी परत रंगवली आणि लावली ...
नशिबाने अंदाज पण अगदी perfect आला आणि अखेर सुंदर असा पिंप तयार झाला....

आणि मुख्य म्हणजे मी फक्त कार्टून काढून नुसता दिसायला चांगला वाटेल असा पिंप करायला गेलो आणि जेवा तो तयार झाला त्यानंतर भन्नाट कल्पना सुचली की याचा लहान मुलांची खेळणी ठेवता येईल असा उपयोग होऊ शकतो...

अश्याप्रकारे हा भंगारत देण्या लायक असलेला पिम्प मस्त पैकी एक शोभेचा असा करू शकतो....

खाली पिम्पाचे making करतानाचे फोटो दिले आहेत.

१) जुना असा अंदाजे ३.५ फूट उंच आणि २ फूट रुंदीचा एक तांब्याचा पिंप.

२) कापड आणि त्यावर सुरु केलेले स्केचिंग....

३) पेंटिंग सुरु असताना

४) अंदाज घेण्यासाठी अर्धवट झालेल चित्र पिम्पला लाउन बघितल.

५)

६)

७)

८) कलाकृति पूर्ण झालेला पिम्प...

९) टप्प्या टप्प्याने तयार झालेली कलाकृति ....

सर्वाना आवडेल अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद ..

कलारेखाटन

प्रतिक्रिया

Pearl's picture

21 May 2012 - 11:41 pm | Pearl

छान कला आणि अफलातून कल्पकता. ..
यातून जमून आलेली मस्त कलाकृती..

एक विचारायचं राहिलं
कापडावरच्या पेंटिंगसाठी कोणत्या कंपनीचे कोणते कलर्स वापरले...

कवितानागेश's picture

21 May 2012 - 11:43 pm | कवितानागेश

ग्रेट. खूप आवडलं. :)

स्पा's picture

21 May 2012 - 11:47 pm | स्पा

तुसि छा गये ग्रु :-)

जबर्या काम केलस.

सौरभ उप्स's picture

21 May 2012 - 11:56 pm | सौरभ उप्स

धन्यवाद प्रतिसाद दिलात त्यांचे...

pearl - मी यासाठी Fevicryl acrylic colours वापरले आहेत..

पियुशा's picture

22 May 2012 - 10:11 am | पियुशा

वॉव ,सुपर्ब !!!!!!!!!!!!!!
मला फार आवडेल अस काही करायला ,धन्यवाद सौरभ :)

शिल्पा ब's picture

22 May 2012 - 6:03 am | शिल्पा ब

काय भारी चित्रकला जमलीये!! छान.

सानिकास्वप्निल's picture

22 May 2012 - 7:02 am | सानिकास्वप्निल

एकदम क्लास दिसतय :)

५० फक्त's picture

22 May 2012 - 7:07 am | ५० फक्त

मस्त रे मस्त झालंय एकदम.

एक्दम सुरेख झालंय रे सौरभ.

तू कलाकार असल्याचे बोलला नाहीस कधी.

प्यारे१'s picture

22 May 2012 - 10:03 am | प्यारे१

मस्तच रे!

पण तांब्याचा पिंप आहे ना तो? जड असेल मजबूत!
पायावर पाडून घेतला पिप (दरवेळी 'टिम्ब' कशाला?)(टिप पण म्हणतात) तर काय करा? सांभाळूनच हो!

प्रेरणा पित्रे's picture

22 May 2012 - 10:29 am | प्रेरणा पित्रे

जुन्या पिंपाचा संपुर्ण लुकच चेंज केलास रे.... :)

प्रभाकर पेठकर's picture

22 May 2012 - 10:35 am | प्रभाकर पेठकर

वॉव! अतिशय सुंदर.

एक शंका. मुलांच्या खोलीत, पिंपावरचं कापडी आवरण, लवकरच खराब होऊ शकतं. ते धुणार कसं?

उदय के'सागर's picture

22 May 2012 - 10:36 am | उदय के'सागर

क्युट क्युट !!! :)

सौरभ उप्स's picture

22 May 2012 - 10:39 am | सौरभ उप्स

धन्यवाद.....

वल्ली - अरे कधी विषयच नाही झाला आपल्या बोलण्यात म्हणून.......

प्यारे - तेवढ वजन तरी आरामात हाताळू शकतो रे ... म्हणून तो पायावर पडण्याची शक्यता फार कमी होती ....

प्यारे१'s picture

22 May 2012 - 10:56 am | प्यारे१

अहो मालक, तुम्ही लहान मुलांसाठी बनवायचा असं लिहीलंय ना?
(तुम्ही वाटत असलात तरी राहिला नाहीत लहान बरं! )
तुमच्या नव्हे, लहानग्यांच्या पायावर पडू नये म्हणून... उंची पण ३.५ फूट आहे ना पिंपाची?

- प्यारे (पी सी एम सी)!

jaypal's picture

22 May 2012 - 10:44 am | jaypal

याला म्हणतात कलाविष्कार. ते कापड चिकटवल आहे का? कश्याने बर?

अवांतर :
टकाउतुन टिकाऊ बनवण्याचा कलाकाराचा अंदाजच निराळा,
नाही तर आम्ही काय केल ? परकराच पोत,हात तिच्या आयला.
माझ्या सासरकडुन असच एक पिंप लग्नात मिळाल आहे ;-) (जेव्हा मिळाल तेंव्हा चांगल होत म्हणुन आनंदाने घेतल होत.) ते आता कुणी मोडीत पण घेत नाही :-( तेंव्हा असेच काही नमुनेदार प्रयोग करावे म्हणातो चांगली शोभा येईल.

सौरभ उप्स's picture

22 May 2012 - 10:49 am | सौरभ उप्स

प्रभाकर - ते कलर धुऊ शकतो आपण... धुतल्यावरही ते जात नाहीत.. राहिला प्रश्न तो फेविकॉल ने चीत्कावण्याचा तर त्यामुळे आपण पूर्णपणे ते धुऊ शकत नाही, मात्र आपण ओलसर फडक किंवा वापरात नसलेला toothbrush थोडासा ओला करून पुरेस साफ करू शकतो.
अर्थात खराब होईल हे लक्षात ठेऊन मुद्दामून ते कलर डार्क किंवा असे वापरायचे कि लवकर खराब होणार नाहीत.

लहान मुलांसाठी केल असल्याने ते जर त्यांना खूप आवडल तर ते स्वतः त्याची खूप काळजी घेतात कि ते लवकर खराब होणार नाही.... हा अनुभव आहे....

प्रभाकर पेठकर's picture

22 May 2012 - 8:31 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद श्री. सौरभ उप्स.

जागु's picture

22 May 2012 - 10:52 am | जागु

वा मस्तच.

सौरभ उप्स's picture

22 May 2012 - 10:59 am | सौरभ उप्स

धन्यवाद जयपाल, हो ते कापड फेविकॉल ने चीत्कावल आहे....

अरे वा नक्की काहीतरी करा त्या पिपाच...

स्वातीविशु's picture

22 May 2012 - 11:16 am | स्वातीविशु

वा..... सुरेख.... तुमचे कौशल्य आवडले. :)

आमच्याकडे गावी असाच एक वापरात असलेला पितळी पिंप आहे. पुढे कधीतरी त्याचे असे

सुशोभीकरण करता येईल. :)

अत्रुप्त आत्मा's picture

22 May 2012 - 1:56 pm | अत्रुप्त आत्मा

--^--^--^-- :-)

नाना चेंगट's picture

22 May 2012 - 1:58 pm | नाना चेंगट

अच्छा हे पिंप होय.... मी भलतेच समजलो होतो !

michmadhura's picture

22 May 2012 - 4:03 pm | michmadhura

खूपच सुंदर!!!
नेमो तर माझा ऑलटाईम फेवरेट आहे. क्लासच !

sneharani's picture

22 May 2012 - 4:26 pm | sneharani

मस्त!!
:)

मुक्त विहारि's picture

22 May 2012 - 6:14 pm | मुक्त विहारि

चित्रकला, पिंपाला कापड लावायची कल्पना एकदम मस्त
पण
सगळ्यात भारी म्हणजे,

ते पिंप, जो वापरणार आहे , त्याचा केलेला विचार.(निमोचे चित्र)

तोडलंस मित्रा !! एकदम चाबूक !!

मस्तच! हातात कला आहे तुमच्या.

प्रास's picture

22 May 2012 - 8:38 pm | प्रास

लई भारी रे मित्रा....!

आवडलं. :-)

निवेदिता-ताई's picture

22 May 2012 - 10:27 pm | निवेदिता-ताई

अतिशय सुंदर....मस्त दिसतोय तो पिंप

मोदक's picture

23 May 2012 - 12:52 am | मोदक

मस्त रे...

स्पा आणि तू.. खल्लास कलाकार आहात..

निव्वळ अप्रतिम रे सौरभा :) फारच छान लगे रहो....

इनिगोय's picture

23 May 2012 - 11:18 am | इनिगोय

तांब्याच्या पिंपावर फेव्हिकॉलने कापड चिकटते, हे ठाऊक नव्हते! भन्नाट कल्पना आहे :)

मदनबाण's picture

24 May 2012 - 10:54 am | मदनबाण

शॉलिट्ट... :)
दुसर्‍या फोटुत दिसणारा सी-हॉर्स शेवटच्या फोटुत गायबलेला दिसतोय !

(कला प्रेमी) :)

सौरभ उप्स's picture

24 May 2012 - 11:26 am | सौरभ उप्स

धन्यवाद.....

मदनबाण- तो पिंप गोल आहे न म्हणून ते सी-हॉर्स मागच्या बाजूला गेलाय.....

विसुनाना's picture

24 May 2012 - 1:09 pm | विसुनाना

तुमच्या हातात जादू आहे. असे आणखी प्रयोग वाचायला/बघायला आवडतील.
तुम्ही केलेली (असतील तर) पेंटिंग्जही पहायला आवडतील.

कान्होबा's picture

24 May 2012 - 1:29 pm | कान्होबा

छान कल्पना आहे

नितिन थत्ते's picture

24 May 2012 - 8:17 pm | नितिन थत्ते

चुकून "टाकाऊ मिपापासून" असं वाचलं.

भरत कुलकर्णी's picture

24 May 2012 - 9:15 pm | भरत कुलकर्णी

उत्तम

संदीप चित्रे's picture

24 May 2012 - 11:42 pm | संदीप चित्रे

क्या बात है!
कल्पनाशक्ती आणि चित्रकला दोन्ही खूपच आवडलं.

पुश्कर's picture

25 May 2012 - 3:16 pm | पुश्कर

पिंप पाठवून देतो ......:-))