भटकंती - औरंगाबाद (घृश्नेश्वर + वेरूळ/एलोरा)
मागील भागवरुन पुढे: भटकंती - औरंगाबाद (पाणचक्की + बीबी का मकबरा)
...जो पर्यंत आग्रा जाऊन ताज बघत नाही तो पर्यंत एकदातरी औरंगाबाद ला जाऊन बीबी का मकबरा बघुन यावं.
♦♦♦♦
गाडी आता देवगिरीच्या किल्ल्या कडे आली.
"आत काही नाही, खंडर आहे सगळं. वर जायला ४ तास लागतात." - ड्रायवर
"इससे अच्छा अपन घृश्नेश्वर चालते है. १२ ज्योतीर्लींगोमे से एक है." - मधल्या सीटवरील कुटुंब प्रमुख
"दोपहर के १२ बजे है. अब येह किला कौन चढ पायेगा." - दोन म्हतार्यापैकी एकजण
"येताना आपण इथे उतरून किल्ला चढू या लोकांना जायचं तर जाउ दे." - सौ आणि मी
देवगिरी सोडून आम्ही घृश्नेश्वर मंदिरात पोहोचलो. देवगिरी समोर नकार घंटा वाजवणारे, घृश्नेश्वरच्या मंदिरात असतील नसतील त्या सगळ्या घंटा वाजवत होते.
वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जिर्णोद्धार केला. सध्याचे आस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक असेलेल्या या मंदिराच्या जागेचा उल्लेख शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या पौराणिक ग्रंथात मिळतो.
टिपः
१) मंदिरपरिसरात फोटोग्राफीस मनाई आहे. मी प्रयत्न करुन पाहिला. पकडलो गेलो 
२) मंदिराबाहेर फुल/हार विकणार्या दुकानात आपल्याला हव्या असतील त्याच वस्तु घ्याव्या. दुकानदार गळ्यात मारण्यात एक नंबर आहेत. उदा. फुल-१०रु, नारळ-१०रु, साखरफुटाणे-१०रु, पिंडीवर वाहण्यासाठी दुध-१०रु ई. ई. करुन पुजेच्या ताटाची किंमत ६०-७० रु वर जाते.
३) मंदिरात शंकराच्या पिंडीवर बेल आणि फुलं याशिवाय काहिही वाहण्यास मनाई आहे. त्याव्यतीरिक्त काही नेल्यास ते मंदिराच्या गाभार्या बाहेरच ठेवुन घेतात, व बाहेर पड्ल्यावर ते परत न्यावं लागत.
४) मंदिर हे विशिष्ट पोंगापंडितांनी भरले आहे. त्यामुळे गाभार्यातुन बाहेर आल्यावर कोणी गंध/टिळा लावायला बोलवले तर तो लाउन घ्यावा, नमस्कार करुन पुढे जावे व परत दुसरा गंध/टिळा लाउन घ्यावा. पैसे ठेवण्याच्या भानगडीत पडू नये.
५) दान ठेवा/ चढावा ठेवा, देव तुम्हाला आशिर्वाद देईल असे मंदिराच्या गाभार्यातील पुजारी दर २ से़कंदानी ओरडत असतो. भक्तांनी आपली सद्सद्विवेक बुद्धी वापरावी.
६) अतिशय मह्त्वाची सुचना - पुरुष/मुलांना या मंदिरात प्रवेश करण्याअगोदर कंबरेच्यावरचे सर्व कपडे काढावे लागतात. त्यामुळे दर्शनाला जाताना भोके न पडलेली, बर्यापैकी पांढरी दिसणारी, पिवळी न झालेली बनियान घालावी.
वरिल ६ वी गोष्ट मला माहीत नव्हती. मी टि-शर्ट काढल्यावर सौ. ने हळुच कानात शिव्यांची लाखोली वाहिली.
आता आम्ही पोहोचलो होतो ते वेरुळच्या लेण्यात. लेणी पाहतांना गाईड असतातर बरं झाल असत असं सारखं वाटतं होतं. तरी अगोदर बरीच माहिती इंटरनेट वरून वाचल्यामुळे ती उणीव भरून निघाली. ५-१० व्या शतकात डोंगर पोखरून ही लेणी तयार केली आहेत. इथे बौध्द, जैन आणि हिंदू अशा तीनही समाजाच्या देवतांची कोरीव शिल्पे आहेत. यात गुफा क्र. ३०-३४ व १६ अधिक देखण्या आहेत.
३० ते ३४ या साधारण जैन गुंफा आहेत ३२ वी इंद्रसभा ही २ मजली एका अखंड कातळात कोरलेली गुंफा आहे. या इंद्रसभे बाहेर एक देउळ आणि हत्ती उभा आहे. इंद्रसभेच्या आत एक मोठा सभामंडप असुन त्याच्या छतावर सुंदर नक्षीकाम असलेले कमळ आहे.


कैलासनाथ, गुंफा क्र १६. ही एक भव्यदिव्य मंदिरा एवढी मोठी आहे. अनेक माजली असलेली हे मंदिर एकाच मोठ्या कातळातून कोरून काढलं आहे. या परिसरातील ही सर्वात मोठी गुफा आहे. शंकराच्या निवासस्थान कैलास पर्वताचा देखावा ह्या लेण्यात कोरला आहे.

मुख्य मंदिराच्या आसपास रामायण, माहाभारातातील कथा, हत्ती, सिंह तसेच बरेच काल्पनीक प्राणी कोरलेले आहेत. ह्यातील काल्पनीक प्राणी हे चिनी ड्रगन, तसेच चिनी पौराणीक गोष्टीत आढळणार्या प्राण्यांसारखे दिसतात.
खालील फोटोत उजव्या बाजुला महाभारतातील एक प्रसंग दाखवला आहे. तर डाव्या बाजुला एक काल्पनीक प्राणी दिसतो.
क्रमश:
♦♦♦♦♦
सूची
घृश्नेश्वर - http://en.wikipedia.org/wiki/Grishneshwar
वेरुळ / एलोरा - http://en.wikipedia.org/wiki/Ellora_Caves
MTDC - http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/HTML/MaharashtraTourism/Defaul...
प्रतिक्रिया
छान फोटो. तो काल्पनिक प्राणी
छान फोटो. तो काल्पनिक प्राणी बहुधा व्याल असावा.
बाकी लेख थोडा मोठा हवा होता.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
धन्यवाद
व्याल बद्द्ल अधिक तपशील मिळेल का?
फोटो आवडले
फोटो आवडले
पियुशा......
http://lovelypiyu.blogspot.com
फोटू लै बेश्ट ...
फोटू लै बेश्ट ...
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
बस नाम ही काफि है। 
अत्रुप्त...!
सूंदर माहिती...
आणि देवगिरी लिहिल्याबद्दल धन्यवाद..
सही====> नानू सरंजामे म्हणाला, "मी झोपतो करून हिमालयाची उशी"====
हो
मला पण दौलताबाद पेक्षा देवगिरी च आवडत.
लेख आणि फोटो दोन्ही मोठे हवे
लेख आणि फोटो दोन्ही मोठे हवे होते, बाकी लहानपणाच्या आठवणी जागा केल्याबद्दल धन्यवाद.
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
मुख्य म्हणजे
मुख्य म्हणजे फटू मस्त आलेयत. नजरेत भरतात .देवगिरी हे माझ्या भ्रमन्ती तील एक अविस्मरणीय स्थल आहे.
धन्यवाद !
आग्र्याच्या ताज चे आकर्षण असेल तर माउंट अबूचे विमल साहू हे जैन देवालय प्रथम पहा. ( फोटो ग्राफी अलाउड नाही) .
ताज बद्द्ल कदाचित आपले मत बदलू शकते तिथे ! अर्थात ताज एका नजरेत म्हणाल तर " स्व्रर्गीय " हे विशेषण बरोबर !
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
सुरेख!
फोटो आवडले. लिखाणही चांगलं होतंय. जरा जास्त लिहिलं असतं तर अधिक आवडलं असतं.
o ज्योति कामत o
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||
हा हा... वर्णन मस्तच!
हे बरं सांगिलत. माझं दुर्दैवं असलं की जेंव्हा जेंव्हा मंदिरात किंवा पाण्यात उतरताना शर्ट काढायची वेळ येते तेंव्हा माझ्या स्टॉक मधला मी हमखास (या वेळी वापरून पुढच्या वेळी टाकू असं १७६० वेळा ठरवलेला) सर्वात जास्त भोकं पडलेला बनेल
घातलेला असतो! 
__________________________________________________________________________________
"And it never ceases to amaze me how many individuals feel their own ability to grasp a topic is a clear indication that anyone else can grasp it"
-Unknown author!
वेरूळच्या लेण्यांत काही
वेरूळच्या लेण्यांत काही ठिकाणचे रंग अद्याप शाबूत आहेत.
हे छतावरचं चित्र. इथेच एका बाईचा चेहरा पण नीट दिसतो, पण तो फोटो हरवला बहुतेक.

रंग इतकी वर्षे टिकून राहण्यामागे कदाचित चुना आणि रंगाचा खूप जाड थर हे कारण असावं.
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
लेख
व फोटो दोन्ही मोठे हवे होते या वाक्याशी सहमत. पुढिल लिखाणास शुभेच्छा
अवांतर= वॉटरमार्क फोटोच्या उगाचाच मधेमधे लुडबुड करतोय अस वाटत.
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
फोटो आवडले.
अजून असतिल तर टाका. आवडतिल बघायला.
*********************************************************************
"Aut inveniam viam aut faciam"