उपासाचा किस...(घेतला का कधी?)
बराच वेळ मनाशी
मी हाच विचार करत होतो
की उपासाला नेमका
हा किस कसा चालतो..?
उपासाला जड असे
काहिच खायचे नसते..म्हणे!
मग हे कसे चालते..?
बारश्याला तेराव्याचे गाणे?
खिचडी काय..नी..किस काय?
हलके थोडेच असतात..होय?
माणसे कशी शोधुन काढतात
उपवासालाच सुखाची सोय?
उपवसाला शास्त्रात म्हणे
निराहार ही संज्ञा आहे
पण लोक केवढा किस काढतात
की पाहुन वाटतं..काय हे..?
खिचडी काय...नी थालपिठं काय
सगळं जडच खातात
तर काहि दुसरं टोक गाठणारे
पाणी पिऊन उपाशी रहातात.
तुंम्ही म्हणाल,जाऊ द्या हो...
ज्याची त्याची अवड..!
मी म्हणतो,,बा धर्मा..
आता तुझ्या अस्थी सावड
धर्म ही अफूची गोळी
हे वचन आज मला पटलं
आणी त्यांना गुंगी का हवीये?
हे ही कोडं सुटलं
रोजचं जीवन जगता जगता
होते थोडी दमछाक...
म्हणुन ही थोडी मौज मजा
आणी हाच धर्माचा परिपाक.
==============================================================================
मागे मी,आंम्हा भिक्षुकांची त्या साबुदाण्याच्या खिचडीनी कशी दैना उडते,त्याची पिरेमं-मय व्यथा या http://www.misalpav.com/node/18998 कवितेतून मांडली होती. आज ही अठवण(आणी कविता) व्हायचं कारण म्हणजे,आज सकाळी एका कामाच्या ठिकाणी,एक नग,उपासाला खिचडी/किस हेच योग्य असताना...तुंम्ही, 'पोहे चालतील' हे कसं सांगता..? म्हणुन त्यानी स्वतः खाल्लेल्या खिचडीचे हात धूउन माझ्या मागे पडला. अता आंम्हीही,,ही तत्व-निष्ठांची जमात साबुदाण्यापेक्षा पचायला जड असली,तरी यांच्यावर दही टाकलं,की ही मऊ पडते...हे ओळखून बसलेलो आहोत. म्हणुन मी त्याला जे पचायला जड ते उपासाला कसं चालत..? असा ५००ग्रॅम चा प्रश्न टाकला. त्याला हा प्रश्न पचायला जड(च) असल्यामुळे,,,तो प्लेटमधल्या रताळ्याच्या किसासह,दुसर्या खोलीत चचला...आणी माझिही संभाव्य काथ्या-कुटातनं काहि क्षण सुटका जाहली...पण घरी येइ पर्यंत त्या रताळ्याच्या किसानी माझं डोकं हैराण केलं... स्वतःला ''आपण अतीशय धार्मिक आहोत'' असं म्हणवणारी माणसं,तत्वात जिंकुन व्यवहारात हरतात..हे काय कोडं आहे? हा विचार मला छळू लागला.
म्हणजे आज उपासाला प्रचलीत असलेल्या सर्व पदार्थांचं मूळतत्व ते केवळ खरकटे नाहीत,एवढच आहे...पण ते खाल्ल्यामुळे आपल्या पोटोबांना ओव्हरटाइमला बसावे लागते,हे उपवासाच्या दृष्टीनी योग्य आहे का..?असा प्रश्न का बरं पडत नसावा..? किवा पडत असला तरी, ते तो टाळतात..किंवा दुर्लक्षितात का..? उपवासाच्या मूळ तत्वाचा शास्त्र/परंपरेतला गर्भीत अर्थ-उपासाचे पदार्थ ज्या पासुन-बनवले जातात त्या गोष्टी म्हणजे-धान्यहोत नाहीत,पर्यायी त्या [धान्यासारख्या] खरकट्या नाहीत..म्हणुन उपासाला चालतात,असा आहे...ठिक आहे,हे तत्व मान्य..पण उपवास ही काही नुसती सुटी इहलौकिक गोष्ट नाही,उप-वास या शब्दाचा अर्थ-परमेश्वराच्या सांनिध्यात जाणं,त्याच्या निकट जाणं असा आहे. अता हे निकट जाताना त्या प्रीत्यर्थ काही उपासना करतांना,माणुस एकाग्र असावा हे गरजेचं आहे...म्हणुन तो त्या दिवशी निराहार करणारा असावा.. असंही आहे. निराहार,म्हणजे आळस/थकवा येणार नाही...यासाठी हलका आहार आणी तोही दिवसातून एकदाच...हा त्या निराहाराच्या तत्वामागचा व्यवहार आहे.
आज उपवासाला जे जडान्न खाल्लं जातं,,, ते नुसतच तात्विक नाही काय..? कारण त्यानी उपासाचा व्यवहार पाळण तर सोडाच,उलट त्याच्या हेतुलाच हरताळ फासला जातो..मग तरिही लोक व्यवहाराची
खिचडी करुन हा उपासाचा किस का घेतात..? आणी हे फक्त उपासाच्या बाबतीतच नाही,तर धर्मातल्या(लोकांना) नैतिक वाटणार्या/असणार्या अनेक कर्मकांडांच्या,समाज नियमांच्या बाबतीतही हे सगळ असच आहे...
पर्वाच एका मुंजीच्या कार्यक्रमात कर्नाटकमधुन आलेल्या एका वैदिकाशी (तो ही माझ्यासारखाच व्यवहारानी फक्त माणुस असल्यामुळे
) माझी फक्कड दोस्ती जमली,आणी मधे मोकळ्या असलेल्या दोन तासात, धर्मातल्या निरनिराळ्या गोष्टींवर चर्चा करुन आंम्ही एका मतावर ठाम झालो...ते म्हणजे हे की,''वुई आर एंटरटेनींग टू पिपल्स'' ''आज आपण लोकांची करमणूक करित आहोत...'' माझे ते वैदिक मित्र या मतामुळे काहिसे खिन्न झाले होते...पण मी मात्र हसत होतो..त्यांनी त्याचं कारण विचारल्यावर,मी त्यांना म्हणलो... वुई आर एंटरटेनींग...एंटरटेनींग...अँड एंटरटेनींग... मग काय..? दोन मिनिटं आंम्ही दोघेही भरपूर मनापासुन हसलो... आणी होऊ घातलेल्या बटूला अंतरपाटामागे आणण्यासाठी ऑन स्टेज जाहलो... 
प्रतिक्रिया
??????????? ?????? ???? ???
???????????
??????
????
???
बर... .... व्हेजिटेरियन ला ........असो !!
सुहास
शंभर प्रतिसादात काड्या सारायच्या, अधून मधून सतत कण्हत राह्यचे आणि वर्षा दोन वर्षातून एखाद्या लेखात आव ऋषिमुनींचा आणायचा असले लोक आमच्या ही डोक्यात जातात. (सही-सौजन्य : बिरूटेसर )
@????????????????????????
@???????????
??????
????
???
बर... .... व्हेजिटेरियन ला ........असो !! Wink >>>

तुमच्या प्रतिसादांचा अर्थ दुसर्यांना समजायला किती काळ जातो हो नक्की..? 
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
मिपा खाद्य मोहोत्सव झालाच पाहिजे!
अ आ
अ आ .. तुम्हाला + पाशा असे लिहायचे होते का की "उपासा"च बरोबर आहे ?
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
आजी कमी ऐकू येणार्या
आजी कमी ऐकू येणार्या आजोबांना जोरात ओरडून "अहो.. तुम्हाला हवाय का कीस?"
असं हातात रताळ्याच्या किसाचा झारा पकडून विचारत असल्याची आठवण जागी झाली..
आजोबा एकदम हडबडून "आँ.. नको नको.." म्हणाले.
मी बराच वेळ हसलो त्यादिवशी.
-----------------स्वाक्षरी सुरु--------------
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..
-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..
"अहो.. तुम्हाला हवाय का
"अहो.. तुम्हाला हवाय का कीस?"















"आँ.. नको नको.."
गुरुजी भन्नाट हो.
-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।
असेच
असेच.
अगदी शेवटच्या कडव्यापर्यंत मी नर्मविनोदी शृंगाराची वाट बघत होतो.
(उपासाच्या खादाडीबद्दल मुद्दे सुद्धा चांगलेच आहेत, पण...)
,आंम्हा भिक्षुकांची त्या
अप्पाची खिचडी खाल्लीय का हो बुवा? या एकदा जिमखान्यावर सकाळी.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
@अप्पाची खिचडी खाल्लीय का हो
@अप्पाची खिचडी खाल्लीय का हो बुवा? या एकदा जिमखान्यावर सकाळी >>> लै जुनी बात झाली... ही खिचडी म्हणजे शेंगदाण्याच्या भरडकुटाचा जरा अतीच मारा झालेली,आणी काकडी म्हणजे खच्चुन दही साखर घालून गोड केलेली...असते,,, असेही आंम्ही अता खात नाही,आणी ती मूळरूपा पेक्षा मेक-अप लै झालेली म्हणुन नकोच...
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
मिपा खाद्य मोहोत्सव झालाच पाहिजे!
सहमत सहमत
अगदी आपण दोघांनी एकदम सेम टू सेम प्रतिसाद दिला. इतके दिवस मला वाटायचे मलाच तीची चव वेगळी वाटते म्हणून.
माझे ब्लॉग्स्
www.bolghevda.blogspot.com (मराठी)
www.rashtrarpan.blogspot.com
www.rashtravrat.blogspot.com
रणजित चितळे
+२
शमत हाय. आम्ही तरीही ती खिचडी खायची तयारी झाईर केली आहे (मान उतरुन देण्याच्या इष्टाईलने), अट एकच 'श्री ने त्या दिवशी त्या दुकानातला कळकटपणा साफ केला असला पाहिजे.' (थोडक्यात आम्हाला ही खिचडी कधीच खावी लागणार नाही.)
__________________________________________
Every 'ism' is a euphemism, every religion a contagion
हल्ली यापेक्षा डेक्कनच्या
हल्ली यापेक्षा डेक्कनच्या सह्याद्री जवळ बिपिन मध्ये खिचडी चांगली मिळते असा अनुभव आहे. एकदा जमुया तिथं ब्रेड पॅटिस आणि बटाटेवडा चटणी सुद्धा चांगली मिळते तिथं.
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
बिपीन ची खिचडी
उत्तम !!!
जगण्याचे त्रैराशिक मांडण्याचा प्रयत्न आणि त्याला फुटलेली वाचा ..
इथे वाचा
http://trairashik.blogspot.com
प्र का टा आ
दो. आ. प्र. का. टा. आ.
__________________________________________
Every 'ism' is a euphemism, every religion a contagion
तुमचं कसं झालय,रोज रोज खाता
तुमचं कसं झालय,
रोज रोज खाता खिचडी आणि तूप
म्हणून राहिले नाही कसलेच अप्रूप.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
जिलब्या
खिचडी सोडून आता जिलब्या खायला सुरुवात केलीन् काय?
***************************************
- मन्या फेणे
खरे सांगू
अप्पांची खिचडी हल्ली चांगली होत नाही (का माझी चव बदलली आहे) ती पूर्वीची चव नाही.
अवांतर
आपण पुण्यास कोठेशी असता?
माझे ब्लॉग्स्
www.bolghevda.blogspot.com (मराठी)
www.rashtrarpan.blogspot.com
www.rashtravrat.blogspot.com
रणजित चितळे
भन्नाट हो भटजीबूवा...
अशी मौजमजा यजमानांच्या घरी करत जाऊ नका हो. नाही तर लोचा व्हायचा.
@अशी मौजमजा यजमानांच्या घरी
@अशी मौजमजा यजमानांच्या घरी करत जाऊ नका हो. नाही तर लोचा व्हायचा >>>धन्यवाद,धनाजीराव... तुमची ही प्रतिक्रीया हा आता आमच्या धाग्याचा परिपाक... अहो वरती नीट वाचलं नै का...? आंम्ही बहुसंख्य ठिकाणी अता काय करत असतो... एंटरटेनींग...एंटरटेनींग...अँड एंटरटेनींग... (म्हणजे धर्मात सांगितलेलं असलं नसलं तरी- खरं /नैतिकतेच असेल ते नाही करायचं,लोकांना जे हवं आहे,आणी अवडतं ते करायचं... एंटरटेनींग. असं जे मी म्हणालो..ते हेच हो...!)
आणी धर्माच्या नावाखाली मौजमजा आमच्या सारखी माणसं करत नाहीत हो...
मग इथे असो किंवा तिथे..
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
मिपा खाद्य मोहोत्सव झालाच पाहिजे!
अशी मौजमजा यजमानांच्या घरी
अशी मौजमजा यजमानांच्या घरी करत जाऊ नका हो. नाही तर लोचा व्हायचा. >>
आपल्या अनुभव- विश्वाचे आम्हाला सदैव कौतुक वाटत आले आहे
सुहास
शंभर प्रतिसादात काड्या सारायच्या, अधून मधून सतत कण्हत राह्यचे आणि वर्षा दोन वर्षातून एखाद्या लेखात आव ऋषिमुनींचा आणायचा असले लोक आमच्या ही डोक्यात जातात. (सही-सौजन्य : बिरूटेसर )
.
संपादित
***************************************
- मन्या फेणे
हो
पहीला उपासाचाच होता.
उपास कसला घडला होता?
उपास कसला घडला होता?
बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला
केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी
जेवण मिळत नसल्याचा
जेवण मिळत नसल्याचा
***
आमच्याकडे कशावरही, कोणावरही, कितीही पिंका टाकून मिळतील.
पहा असल्या (म्हणजे साध्या
पहा असल्या (म्हणजे साध्या भोळ्या हो
) प्रश्नांना कशी तत्पर उत्तरे मिळतात 
बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला
केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी
साध्या भोळ्या प्रश्नांची
साध्या भोळ्या प्रश्नांची उत्तरे साधी भोळी असतात म्हणून मिळतात.
जरा अवघड प्रश्न विचारुन बघा... आमचे नेहमी उत्तर "पास" असे असेल.
***
आमच्याकडे कशावरही, कोणावरही, कितीही पिंका टाकून मिळतील.
उपासा
उपासा हे काशमीरी नाव असेल तर मी किसाचा विचार करीन म्हणतो. पण कानडी असेल तर फुकट ही नको मला कीस
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
कानडी
कानडी बद्दल तुमचा काही तरी डीप रुटेड इश्यु दिसतोय.
आणि काशमीरी डीप रुटेड फँटसी.
+१
खरच
बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला
केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी
हा धागा जिवंत केलाय,तसे जरा
हा धागा जिवंत केलाय,तसे जरा परतिसादही जिवंत करा हो संपादक... कोण कोण नेमकं काय काय बोलुन गेलं अठवतंही नाहीये,,,काय आहे? आमचेही कामाचे दिवस होते ना धागा काढला तेंव्हा. म्हणुन म्हणतोय ,कराच जरा जिवंत प्रतिसाद पण!
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
मिपा खाद्य मोहोत्सव झालाच पाहिजे!
अहो आत्मूदा पण ते कानडी अन
अहो आत्मूदा पण ते कानडी अन काश मेरी आपलं काश्मीरी काय प्रकार आहे? नै म्हंजे प्रभूसरांच्या परतिसादात लिवलंय बगा म्हून इच्यारतुय
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||
तुम्ही म्हणताय म्हणून करीन पण
तुम्ही म्हणताय म्हणून करीन पण हे काम कंटाळवाणं आहे. अगदी गरज असल्याशिवाय ही दुरुस्ती करायची नाही असं ठरवलय.
अतिशय धन्यवाद.
अतिशय धन्यवाद.
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
मिपा खाद्य मोहोत्सव झालाच पाहिजे!
>>>>>>>> आजी कमी ऐकू येणार्
>>>>>>>> आजी कमी ऐकू येणार्या आजोबांना जोरात ओरडून "अहो.. तुम्हाला हवाय का कीस?"
असं हातात रताळ्याच्या किसाचा झारा पकडून विचारत असल्याची आठवण जागी झाली..
आजोबा एकदम हडबडून "आँ.. नको नको.." म्हणाले.
मी बराच वेळ हसलो त्यादिवशी. >>>>>>>>>>>>>
!! ब्रम्ह देवे आपुल्या शीरे , लिहिली अस्तील दुष्टाक्षरे !!
!! श्रीसदगुरु चरण संपर्क शीरे , दुष्टाक्षरे शुभ होती !!
(No subject)
।। हिन्दु तितुका मेळवावा । आपुला हिन्दुधर्म वाढवावा ।। सर्वत्र विजयी करावा । सनातन हिन्दुधर्म ।।