शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती

चैतन्य गौरान्गप्रभु's picture
चैतन्य गौरान्गप्रभु in जनातलं, मनातलं
3 May 2012 - 8:53 pm

वेदांचे परमज्ञाता, अद्वैतवादाचे प्रणेते आणि हिंदू धर्माचे पुनरूज्जीवक जगदगुरू श्री आद्यशंकराचार्यांची जयंती आपण नुकतीच साजरी केली. हे वाक्य वाचून आपल्यापैकी अनेकांच्या नजरा सहज दिनदर्शिकेकडे वळतील कारण जयंती नेमकी कधी होती याची कल्पनाही अनेकांना नसेल. शंकराचार्य म्हणजे हिंदूंचे धर्माचार्य, जगदगुरू! आद्यशंकराचार्यांनी तयार केलेली काही पिठं आहेत - बहुतेक चार! याशिवाय अनेक स्वयंनिर्मित पिठं आहेत. किती? माहिती नाही! सध्या हयात असलेल्या शंकराचार्यांपैकी कुणाचं नाव आठवेल का? तर कांची पीठाचे श्री जयेन्द्र सरस्वती! कारण? कसल्यातरी वादाच्या भोव-यात अडकले होते, ते हेच शंकराचार्य ना? -- आपल्या धर्मव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल ईतका उदासिन असणारा समाज हिंदु धर्माशिवाय अन्य कुठे आढळणे शक्य आहे का?

अश्या परिस्थीतीतही धर्मविहीन राजनीति विधवा आणि राजनीति विहीन धर्म विधुरासमान असतो, असं परखड वक्तव्य करून राष्ट्रकार्य हेच ईश्वरकार्य असल्याचं सांगणारे गोवर्धन मठ पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगदगुरु शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती हे शंकराचार्य या संस्थेला जनसामान्यांच्या अगदी समीप आणून ठेवण्याचं कार्य करण्यात अग्रणी ठरतात. आदी शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार पिठांपैकी ऋग्वेदाचे अधिष्ठान मानले गेलेल्या पुरी गोवर्धन पिठाचे ते १४५ वे शंकराचार्य आहेत. या पिठाचं वेगळेपण म्हणजे आदीशंकराचार्यांचे पहिले शिष्य श्री पद्मपादाचार्य हे या पिठाचे पहिले शंकराचार्य होते. त्यांच्यानंतर चालत आलेली ही परंपरा आजवर अखंड सुरू आहे.

नदिचं मुळ आणि ऋषिचं कुळ विचारू नये असं म्हणतात. त्यातही संन्यास घेतल्यानंतर ऐहिक जीवनाशी कायमचा काडीमोड घेतला असल्याने 'पुरी मठाचे शंकराचार्य' ही एकच ओळख स्वामीजींसाठी आज पुरेसी आहे. मात्र सामान्यांसाठी सामान्य अशी त्यांची ओळख करून घेणंही गरजेचंच नाही का? तर १९३९ साली बिहारमधल्या कलुहाई पोस्टमधल्या हरिपुर बक्सी टोल या खेड्यात उच्चविद्याविभुषित आणि वेदशास्त्रपारंगत मैथीली ब्राम्हण घरात जन्मलेल्या स्वामीजींचं मातृछत्र त्यांच्या बालपणीच हरवलं. त्यांच्या आईचं नाव होतं गीता देवी. आईच्या अचानक सोडून गेल्यानंतर त्यांनी भगवतद्गीतेलाच आई मानलं आणि आपली वाटचाल सुरू केली.

वेद, मिमांसा, वेदान्त, कर्मकाण्ड ईत्यादींचं शिक्षण हरिद्वार, श्रृंगेरी, वाराणसि, वृंदावन ईत्यादी ठीकाणी घेत असतांनाच, वेदांचं अध्ययन करतांनाच सन्यास घेण्याची प्रेरणा झाली. वाराणसीच्या गुरूदेव स्वामी करपत्री महाराजांकडून सन्यासदिक्षा प्राप्त झाली. पुढे शंकराचार्य स्वामी निरंजनदेवतिर्थ ह्यांचं शिष्यत्त्व पत्करलं आणि आध्यात्मीक क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली. १९९० च्या दरम्यानचा तो काळ होता. रामजन्मभुमीच्या आंदोलनाने अवघं हिंदू जनमानस पेटून उठलेलं. तेव्हाच गुरूजींच्या हाती पुरी पिठाची सुत्र आली आणि त्याबरोबरच आली ती खुप मोठी जबाबदारी.

धर्मपिठाचं पावित्र्य जपत असतांनाच राष्ट्रीय विचारांना स्थानही मिळायला हवं! हा विचार करूनच स्वामीजींनी पुरी पिठाची पुढची दिशा ठरवली. आदिशंकराचार्यांनी हिंदू धर्माचं पुनरूज्जीवन केलं, चार पिठांची स्थापना केली, त्यामागचा उद्देश म्हणजे अखील भरतवर्षाला एकसुत्रतेत बांधायचा होता, हे त्यांनी ओळखलं आणि जाहिर कार्यक्रमांमध्येही आपल्या ओजस्वी वाणीने जनमानसाशी सहज संवाद सुरू केला. आज स्वामीजींची वेबसाईट आहे. ते आज नेमके कुठे आहेत? उद्या कुठे जाणार आहेत? कुठल्या मार्गे जाणार आहेत? कुठे त्यांना भेटता येणं शक्य आहे, याबद्दलची सर्व अद्ययावत माहिती त्यावर मिळते.
आपल्या अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात अवघा भरतखंड पिंजुन काढणा-या आदिंशंकराचार्यांची पुजा बांधत स्वामी निश्चलानंद सरस्वतीही मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात. या वयातही त्यांचा अखंड प्रवास सुरू आहे. चार्टर्ड विमान वगैरेच्या भानगडीत न पडता रेल्वे, आणि साध्या कारमधूनही ते प्रवास करत असतात. जातील त्या ठीकाणी जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ज्याप्रमाणे आपल्या तर्क आणि शास्त्रार्थांच्या बळावर आदिशंकराचार्यांनी विभिन्न पेच आणि चुकीच्या मान्यतांमध्ये उचित सुधार घडवून आणून धर्माची सांगड मुख्य धारेशी घातली, त्याचप्रमाणे बदलत्या काळाबरोबर आपण कसं बदलायला हवं याबद्दल ते सुचवत असतात.

सन्यास घेतला आणि नि:संग झालो, तरीही जननी आणि जन्मभुमीशी असलेलं नातं तुटत नाही, हा आदिशंकराचार्यांचा विचार त्यांनी अंगीकारला आहे. आदिंशंकराचार्यांनीही सन्यस्थ जीवन जगत असतांनाही आपल्या आईला दिलेलं तिच्या अंतीम घडीला घरी पोचण्याचं वचन पाळलं होतं. स्वामीजींनीही आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ तिच्या मुळगावी उभारल्या गेलेल्या स्मृतीमंदिराच्या शिलान्यासाला उपस्थीत राहून आपल्या लहानपणच्या अठवणी जाग्या केल्या. सन्यास म्हणजे त्याग. तुसडेपणा नव्हे. हे त्यांच्या 'जिंदादील' व्यक्तीमत्त्वातून दिसुन येते.

गोवर्धन मठाच्या माध्यमातून सुशीलता, ओजस्विता व शूरता या तीनही गुणांनी सपन्न अशी नवी पिढी तयार करण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं आहे. मठाच्या पिठ परिषदेच्या माध्यमातून आदित्य वाहीनी आणि आनंदवाहीनी या युवक आणि युवतींच्या संघठनाची बांधणी त्यांच्या नेतृत्त्वाखाली झालेली आहे. भारतातली सगळ्यात मोठी रथयात्रा भरवणारं जगन्नाथपुरी हे एकमेव ठीकाण असावं. आदित्यवाहिनीच्या कार्यकर्त्यांच्या या आयोजनातला सहभाग सर्वमान्य आहे. अगदी गरजुंना वैद्यकिय सुवीधा पुरवण्यापासुन ते कचरा उचलण्यापर्यंत सगळी कामं हे युवक करत असतात. पुरीमध्ये शंकराचार्यांचं वेदाध्ययन केन्द्र आहे. योगपिठ आहे. गोशाळा आहे. या गोशाळेचं उद्दिष्टदेखील दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बनवणे हे नसुन मुळ भारतीय गाईंच्या दर्जेदार वंशावळीची पैदास करणे आणि उच्च प्रतिच्या गाईंची देशभर निर्यात करून भारतीय गोवंश टिकवणे असं आहे. मुळात वैज्ञानिक दृष्टीकोण समोर ठेवून स्वामीजींनी नवे बदल घडवून आणले आहेत. आणत आहेत.

शंकराचार्य ही मुळात एक व्यक्ती नसुन संस्था आहे. दक्षीणेत शृंगेरी, पुर्वेत जगन्नाथपुरी, पश्चीमेत शारदामठ द्वारीका, उत्तरेत बद्रिकाश्रम या चार पिठांची स्थापना प्रत्यक्ष आदिशंकराचार्यांच्या हातची. त्यामुळे या चार पिठांच्या पिठाधिशपदी येणा-यांमधे सहाजीकच दैवी शक्ती, सामर्थ्य असल्याचे मानले जाते. त्यांना 'चल-शंकर' म्हणजे शंकराचार्यांचा अवतारच संबोधले जाते. मात्र पिठाधिशपदी येण्यासाठी लागणारे ज्ञानसामर्थ्य, योगसामर्थ्य, आणि गुरूभक्ती यांशीवाय हे सामर्थ्य येत नाही. स्वामी निश्चलानंद सरस्वती मात्र याहूनही पुढे जाऊन राष्ट्रभक्ती, आणि निःस्वार्थ जनसेवेच्या व्रताला अधीक पवित्र मानतात. धर्मसंस्थेच्या माध्यमातून राष्ट्रोत्कर्षासाठी झटणा-या स्वामी निश्चलानंद सरस्वतींच्या तालमीत तयार झालेली नवी पिढी हिंदू धर्मसंस्थेला एकूणच नवा आयाम देइल, आणि ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्या पायावर उभे असलेले तर्कसंगत धर्मविचार आपल्याला मिळतील अशी खात्री पुज्यश्रींकडे पाहिल्यावर वाटल्याशिवाय राहत नाही.

संगीतसंस्कृतीधर्मवाङ्मयइतिहाससमाजजीवनमानराहणीविज्ञानफलज्योतिषज्योतिषसद्भावनाबातमीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

यकु's picture

3 May 2012 - 9:19 pm | यकु

हा लेख वाचून उत्सुकता वाटल्याने साइट शोधली.
In this spiritual text His Holiness has shown that like other fields, Mathematics can be a path to salvation of the soul हे वाचल्याने त्यांच्या पुस्तकांबद्दल आणखीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

Ankapadiyam: - This book launched in 2006 has recently become the focus of attraction of some eminent mathematicians from across the globe. Another name for this text is also Sutra Ganit (Sutra = Word Formula, Ganit = Mathematics).
In this the philosophical base is given as to why number counting should begin from 0 and not 1. In this text it has been highlighted that in the Vedic literature and scriptures zero was an important concept and attribute. The book has tried to make the readers understand Mathematics from the philosophical point of view. It states Zero is a Place above One. It makes us understand that it is zero which is the mother of all numbers. The Books shows patterns which emerge if you start the number counting from zero.
He has given 18 sutras to understand this and has given all the sources so that there is no controversy regarding the claim.
His Holiness states that to understand this book you need knowledge of Hindi Grammar (Since the book is in Hindi and not English) and of course Mathematics.
Swastika Ganit :- The swastika (from Sanskrit meaning "good fortune" or "well-being") is an equilateral cross with its arms bent at right angles in either left-facing or right-facing direction. The swastika is a sacred symbol in Hinduism , Buddhism , Jainism and Odinism . The Hindu version is often decorated with a dot in each quadrant .
In this work His Holiness has given such principles which will help us to understand the system of Vedic Maths. The symbol of Swastika can be written to write the numerals from 1-10 and also be used to add, subtract, multiply and divide. This book is in its second edition now and it continues to astonish its readers.
Ganita Darshan:- In this spiritual text His Holiness has shown that like other fields, Mathematics can be a path to salvation of the soul.

http://www.vedicmathsindia.org/Govardhan_Matha

कवितानागेश's picture

3 May 2012 - 10:00 pm | कवितानागेश

ओ भाषांतर वाले, जरा समजेल असे लिहा की. :)

मदनबाण's picture

3 May 2012 - 10:46 pm | मदनबाण

माऊ शी सहमत !
माउ ला नाझ्का लाईन्सचे हे चित्र भेट ! ;)

http://whc.unesco.org/uploads/thumbs/site_0700_0001-469-0-20091001154136...

मदनबाण's picture

3 May 2012 - 9:27 pm | मदनबाण

उत्तम आणि चांगली माहिती !
आपले लेख मी नेहमी वाचतो... असेच लिहीत रहा.

हिंदू स्वतःच्या धर्मव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल ईतके उदासिन का असावेत ?
हिंदूंना हिंदू असण्याचा अभिमान का नाही ? असल्यास तो कुठे दिसतो ?

अवांतर :--- पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हिंदू महिलांची स्थिती बिकट असून दरमहा सरासरी २५ हिंदू तरुणींचे अपहरण होत आहे. याशिवाय असंख्य हिंदू तरुणी अत्याचारांनाही बळी पडत आहेत. या सर्व तरुणींचे सक्तीने धर्मातर केले जाते.
या सर्व प्रकारांना कंटाळून गेल्या काही महिन्यांत तेथील ४०० हिंदू कुटुंबीयांनी भारतात स्थलांतर केले आहे.
संदर्भ :---http://alturl.com/oiqja
आणि आपले गृहमंत्री पी. चिदंबरम म्हणतात पाकिस्तानमध्ये हिंदू महिलांवर होणारे अत्याचार ही पाकिस्तानची अंतर्गत बाब आहे !

रणजित चितळे's picture

4 May 2012 - 9:20 am | रणजित चितळे

हिंदू स्वतःच्या धर्मव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल ईतके उदासिन का असावेत ?
हिंदूंना हिंदू असण्याचा अभिमान का नाही ? असल्यास तो कुठे दिसतो ?

खरेच मला पण ह्याचे वाईट वाटते.

.....हल्ली समाजातील प्रौढ व लहान मुले एकत्र भेटतात व एकमेकांत सुसंवाद सादतात असे बघायला मिळत नाही. ते प्रयत्नपुर्वक पणे केले पाहीजे. शाळेबाहेरील शाळा सक्षम करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे किर्तन, प्रवचनांना प्रोत्साहन देणे. सगळ्यात चांगले प्रोत्साहन म्हणजे आपल्या मुलांना घेऊन अशा कार्यक्रमांना जाणे. किर्तन, प्रवचनांना फक्त म्हातारी लोकं जातात असा जो एक समाजात समज आहे तो आपण स्वतः जायला लागुन बदलला पाहीजे. त्यात कोणाला कमीपणा वाटायला नको, लाज वाटायला नको व मागासलेपणा पण वाटायला नको. आपले क्रिश्चन बांधव पण रविवारच्या मास ला जवळच्या चर्च मध्ये जातातच ना. ते मागासलेले वाटतात का आपल्याला? त्यांना लाज वाटते का? त्यांना त्यात कमीपणा वाटतो का? ते जातियवादी होतात का लागलीच? किर्तनात, प्रवचनात जे सांगितले जाते ते सगळेच्या सगळे देश, काल पात्रानी आपल्याला आणि आपल्या समाजाला लागु होतच असेल असे नाही पण निदान आपल्याला विचाराला चालना तरी मिळेल. ब-याच जणांना आपल्या मुलांना किर्तन प्रवचनांना घेऊन जायचे म्हणजे मुलाला शामळू बनवायचे किंवा लहानवयापासुन वैराग्याचे व अल्पसंतुष्ट होण्याचे धडे द्यायचे असे वाटते. थोडक्यात किर्तन प्रवचनांना लहान मुलांना घेऊन जाणे म्हणजे गृहास्थाश्रमासाठी मुलाला नालायक बनवणे असे काही लोकांना वाटेल. ....
http://www.misalpav.com/node/15404

http://bolghevda.blogspot.com/2010/10/blog-post.html

अर्धवटराव's picture

4 May 2012 - 4:00 am | अर्धवटराव

>>वेदांचे परमज्ञाता, अद्वैतवादाचे प्रणेते आणि हिंदू धर्माचे पुनरूज्जीवक जगदगुरू श्री आद्यशंकराचार्यांची जयंती आपण नुकतीच साजरी केली.
-- म्हणजे तुमच्या लक्षात होती म्हणा कि. काहितरीच टाईम पास बघा.

>>शंकराचार्य म्हणजे हिंदूंचे धर्माचार्य, जगदगुरू!
--म्हणजे नक्की कुठल्या धर्माचे? आम्हि हिंदु नावाचा कुठला धर्म आहे हेच मानित नाहि मुळी.

>>आपल्या धर्मव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल ईतका उदासिन असणारा समाज हिंदु धर्माशिवाय अन्य कुठे आढळणे शक्य आहे का?
-- धर्माभिमान वगैरे फुटकळ गोष्टींसाठी आमच्याकडे वेळ नाहि. किंबहुना कसल्या कालबाह्य परंपरांचा वेडगळ अभिमान का बाळगायचा हेच कोडे आहे. आम्हाला बाकि काहि काम-धाम नाहि का?

>>अश्या परिस्थीतीतही धर्मविहीन राजनीति विधवा आणि राजनीति विहीन धर्म विधुरासमान असतो, असं परखड वक्तव्य करून राष्ट्रकार्य हेच ईश्वरकार्य असल्याचं सांगणारे गोवर्धन मठ पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगदगुरु शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती हे शंकराचार्य या संस्थेला जनसामान्यांच्या अगदी समीप आणून ठेवण्याचं कार्य करण्यात अग्रणी ठरतात.
-- चला. म्हणजे परत धर्माच्या नावाने राजकारण करायची तयारी सुरु आहे म्हणा कि. आमच्या सेक्युलर देशात असल्या भानगडी करताना लाज नाहि वाटत या लोकांना.

>>आदी शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार पिठांपैकी ऋग्वेदाचे अधिष्ठान मानले गेलेल्या पुरी गोवर्धन पिठाचे ते १४५ वे शंकराचार्य आहेत. या पिठाचं वेगळेपण म्हणजे आदीशंकराचार्यांचे पहिले शिष्य श्री पद्मपादाचार्य हे या पिठाचे पहिले शंकराचार्य होते. त्यांच्यानंतर चालत आलेली ही परंपरा आजवर अखंड सुरू आहे.
-- या सगळ्याला पुरावा काय? तुम्ही म्हणता म्हणुन आम्हि मानणार नाहि. पुरावे द्या.. ते देखील आम्हाला पटतील असे.

>>नदिचं मुळ आणि ऋषिचं कुळ विचारू नये असं म्हणतात.
-- काहितरीच वेडगळ कल्पना.

>>१९३९ साली बिहारमधल्या कलुहाई पोस्टमधल्या हरिपुर बक्सी टोल या खेड्यात उच्चविद्याविभुषित आणि वेदशास्त्रपारंगत मैथीली ब्राम्हण घरात जन्मलेल्या...
-- आले ना शेवटी जातीवर?? कसही करुन आम्हि कसे श्रेष्ठ हेच बडबडण्यात जन्म जायचा या लोकांचा

>>वेद, मिमांसा, वेदान्त, कर्मकाण्ड ईत्यादींचं शिक्षण...
-- हे कसलं शिक्षण? याचा काय उपयोग? आणि काहि रजिस्टर्ड्/सर्टीफाईड/फॉरेन विद्यापिठाने बोनाफाईड केलेले विद्यापीठातुन शिक्षण घेतले कि असेच गावाच्या चौपाल वरुन? आम्हाला नाहि माहित असं कुठलं विद्यापीठ आहे ते...

>>पुढे शंकराचार्य स्वामी निरंजनदेवतिर्थ ह्यांचं शिष्यत्त्व पत्करलं आणि आध्यात्मीक क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली.
-- म्हणजे बुवाबाजी सुरु केली तर... काय करावं या भोळट श्रद्धाळु लोकांचं...

>>१९९० च्या दरम्यानचा तो काळ होता. रामजन्मभुमीच्या आंदोलनाने अवघं हिंदू जनमानस पेटून उठलेलं.
-- पैसे वाटुन, दारु पाजुन जमा केलेले लोक ते.. काहि पेटुन वगैरे उठलं नाहि कोणि.

>>धर्मपिठाचं पावित्र्य जपत असतांनाच राष्ट्रीय विचारांना स्थानही मिळायला हवं! हा विचार करूनच स्वामीजींनी पुरी पिठाची पुढची दिशा ठरवली.
-- ह्म्म्म्म्म्म... नागपुरला बरच जाणं असावं यांचं. या असल्या गोष्टी तिथेच पिकतात म्हणे.

>>आपल्या अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात अवघा भरतखंड पिंजुन काढणा-या आदिंशंकराचार्यांची पुजा बांधत स्वामी निश्चलानंद सरस्वतीही मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात.
-- काहि पुरावा आहे का या भारत भ्रमणाचा?

>>सन्यास घेतला आणि नि:संग झालो, तरीही जननी आणि जन्मभुमीशी असलेलं नातं तुटत नाही, हा आदिशंकराचार्यांचा विचार त्यांनी अंगीकारला आहे.
-- आपली हौस भागवायला काहितरी सबब लागते. मग काय, आले जननी-जन्मभुमी वगैरे घेऊन...

>>आदिंशंकराचार्यांनीही सन्यस्थ जीवन जगत असतांनाही आपल्या आईला दिलेलं तिच्या अंतीम घडीला घरी पोचण्याचं वचन पाळलं होतं.
-- परत... पुरावा काय याचा?

>>स्वामीजींनीही आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ तिच्या मुळगावी उभारल्या गेलेल्या स्मृतीमंदिराच्या शिलान्यासाला उपस्थीत राहून आपल्या लहानपणच्या अठवणी जाग्या केल्या.
-- ह्म्म्म्म्म्म... या मंदीराच्या बांधकामाला पैस कुठुन आला ते जाहीर करा म्हणावं.

>>गोवर्धन मठाच्या माध्यमातून सुशीलता, ओजस्विता व शूरता या तीनही गुणांनी सपन्न अशी नवी पिढी तयार करण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं आहे. मठाच्या पिठ परिषदेच्या माध्यमातून आदित्य वाहीनी आणि आनंदवाहीनी या युवक आणि युवतींच्या संघठनाची बांधणी त्यांच्या नेतृत्त्वाखाली झालेली आहे.
-- आता तर खात्रीच पटली.. हा नक्की नागपुर इफेक्ट. अहो, नागपुरला लोकसभेची सीट कधी मिळवुन दाखवता येत नाहि यांना... आणि म्हणे संगठन करताहेत.

>>मुळ भारतीय गाईंच्या दर्जेदार वंशावळीची पैदास करणे आणि उच्च प्रतिच्या गाईंची देशभर निर्यात करून भारतीय गोवंश टिकवणे असं आहे. मुळात वैज्ञानिक दृष्टीकोण समोर ठेवून स्वामीजींनी नवे बदल घडवून आणले आहेत. आणत आहेत.
-- हा हा हा. यात कसला आलाय वैज्ञानीक दृष्टीकोन? निव्वळ भोळसटपणा. सुधरणार नाहि रे कधी हे लोक.

>>...त्यामुळे या चार पिठांच्या पिठाधिशपदी येणा-यांमधे सहाजीकच दैवी शक्ती, सामर्थ्य असल्याचे मानले जाते.
-- दैवी सामर्थ्य वगैरे तर फारच अवैज्ञानीक गोष्टी. त्यांचा असा उदोउदो करुन हे बाबा लोक जनतेला फसवतात.

>>स्वामी निश्चलानंद सरस्वती मात्र याहूनही पुढे जाऊन राष्ट्रभक्ती, आणि निःस्वार्थ जनसेवेच्या व्रताला अधीक पवित्र मानतात. धर्मसंस्थेच्या माध्यमातून राष्ट्रोत्कर्षासाठी झटणा-या स्वामी निश्चलानंद सरस्वतींच्या तालमीत तयार झालेली नवी पिढी हिंदू धर्मसंस्थेला एकूणच नवा आयाम देइल, आणि ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्या पायावर उभे असलेले तर्कसंगत धर्मविचार आपल्याला मिळतील अशी खात्री पुज्यश्रींकडे पाहिल्यावर वाटल्याशिवाय राहत नाही.
-- म्हणजे परत समाज कर्मकांडात फसवायला, आळशी बनवायला ट्रेनींग देणे सुरु आहे तर. अहो धर्म ही तर अफुची गोळी... त्यात वरुन हिंदुधर्म तर अस्तित्वातच नाहि. मग कसले आले ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान वगैरे ?? बाबांनो... युज युवर ब्रेन बरं का...

अर्धवटराव

>>>-- ह्म्म्म्म्म्म... नागपुरला बरच जाणं असावं यांचं. या असल्या गोष्टी तिथेच पिकतात म्हणे.

>>>-- आता तर खात्रीच पटली.. हा नक्की नागपुर इफेक्ट. अहो, नागपुरला लोकसभेची सीट कधी मिळवुन दाखवता येत नाहि यांना... आणि म्हणे संगठन करताहेत.

जळजळीसाठी एकच रामबाण उपाय सुचवला जातो. "ईनो". काविळीवर काय उपाय सुचवणार????

असो.

अर्धवटराव

>>>--म्हणजे नक्की कुठल्या धर्माचे? आम्हि हिंदु नावाचा कुठला धर्म आहे हेच मानित नाहि मुळी>>>

तुम्ही मानत नसाल हो. पण त्यामुळे हिंदूधर्म संपला असे समजू नका. मानणारे खूप लोक आहेत अजून.

>>>-- या सगळ्याला पुरावा काय? तुम्ही म्हणता म्हणुन आम्हि मानणार नाहि. पुरावे द्या.. ते देखील आम्हाला पटतील असे.

>>>-- काहि पुरावा आहे का या भारत भ्रमणाचा?

>>>-- परत... पुरावा काय याचा?

तुम्ही विचारले म्हणून कोणी का उत्तर द्यावे. तुमचा अभ्यास वाढवा आणि नुसते प्रश्ण न विचारता हे खोटे आहे हे सिध्द करून दाखवा.

रणजित चितळे's picture

4 May 2012 - 10:53 am | रणजित चितळे

छान प्रतिसाद आवडला

टवाळ कार्टा's picture

4 May 2012 - 11:10 am | टवाळ कार्टा

>>"तुम्ही विचारले म्हणून कोणी का उत्तर द्यावे. तुमचा अभ्यास वाढवा आणि नुसते प्रश्ण न विचारता हे खोटे आहे हे सिध्द करून दाखवा."

मी सूक्श्म रुपाने योग वापरुन परग्रहावर जाउन आलो आहे आणि तिथल्या लोकांबरोबर जेवलो आहे
कोणाचा विश्वास नसेल तर तुमचा अभ्यास वाढवा आणि हे खोटे आहे हे सिध्द करून दाखवा ;)

आणि जर इतके शंकराचार्य होउन गेले आणि त्या सगळ्यांनी इतके काही समाज कार्य केले तर शिवाजी राजांना पंडित का नाही मिळाला??

हिंदु धर्मातील वाइट रुढी बंद करायला १९वे शतक का उजाडावे लागले??

शंकराचार्य लोकांना मतदान करायला का सांगत नाहीत

शंकराचार्य हे "सत्य साइबाबांना" चमत्कारी समजतात??

चायला पण आजकाल सगळ्यांना पिण्यासाठी मात्र विदेशीच लागते... मग वाइनरीच्या जागी सोमरसाचे कारखाने सुरु करणार का??

इष्टुर फाकडा's picture

4 May 2012 - 1:38 pm | इष्टुर फाकडा

आणि जर इतके शंकराचार्य होउन गेले आणि त्या सगळ्यांनी इतके काही समाज कार्य केले तर शिवाजी राजांना पंडित का नाही मिळाला??

मी आद्य शंकराचार्यांचा फ्यान आहे. तरीसुद्धा तुमच्या 'शिवाजीराजांना पंडित का मिळाला नाही' या विधानाची एक मिपाकर म्हणून शरम वाटली ;) पंडित दुर्भिक्ष्याबद्दल तुमचा निर्देश राज्याभिषेकाकडे दिसतो. हे विधान तद्दन अद्यानांतून आले आहे असे नम्रपणे टोचवतो. ह्या धाग्यांवरची भाषणे ऐका आणि कळवा.

http://www.esnips.com/thumbnails.php?album=4678391

आणि हो, ते एक राहिलंच, अभ्यास वाढवा ;) (चान्स पे डान्स करून घेतला)

चिंतामणी's picture

4 May 2012 - 1:44 pm | चिंतामणी

>>>पंडित दुर्भिक्ष्याबद्दल तुमचा निर्देश राज्याभिषेकाकडे दिसतो. हे विधान तद्दन अद्यानांतून आले आहे असे नम्रपणे टोचवतो.

पुर्णपणे सहमत. अभ्यास वाढवायची गरज आहेच. पण एकांगी दृष्टीकोन बदलण्याची गरज जास्त आहे.

टवाळ कार्टा's picture

4 May 2012 - 2:14 pm | टवाळ कार्टा

>>पंडित दुर्भिक्ष्याबद्दल तुमचा निर्देश राज्याभिषेकाकडे दिसतो. हे विधान तद्दन अद्यानांतून आले आहे असे नम्रपणे टोचवतो.

सहमत....
पण बाकी मुद्द्यांचे काय???

चैतन्य गौरान्गप्रभु's picture

5 May 2012 - 1:15 am | चैतन्य गौरान्गप्रभु

पोप किंवा ईमाम किंवा लामा किंवा मुनीदेखील मतदान करायला सांगत नाही. पण नेमके हिंदूंच्या धर्मगुरूचा विषय निघाला की मगच सामाजीक, राजकीय, तर्कशास्त्रीय, विज्ञाननिष्ट ईत्यादी आग्रह धरले जातात.

अर्धवटराव's picture

5 May 2012 - 1:22 am | अर्धवटराव

>>पोप किंवा ईमाम किंवा लामा किंवा मुनीदेखील मतदान करायला सांगत नाही.
-- मतदान वगैरे बाबतीत यांचा इंटरेस्ट पराकोटीचा असतो. एखाद चक्कर टाका आमच्या भिवंडी/हैद्राबादला.

अर्धवटराव

टवाळ कार्टा's picture

5 May 2012 - 6:23 am | टवाळ कार्टा

"त्यांचे" चुकीचे असतील पण मग म्हणुन आपले पण चुकीचेच असायला हवे का??
आणि धर्माबद्दल बोलताना आस्तिक लोकांकडुन नेहेमी"च" उत्तर देण्यापेक्शा प्रतिप्रश्न का लोकांकडुन?

म्हणजे प्रश्न आमच्या करता नाहिच मुळी :) पण हे उपरोधाने घ्यायचं काय? म्हणजे तुम्हाला उपरोध कळातो असं समजायचं काय? असो.

>>तुम्ही मानत नसाल हो. पण त्यामुळे हिंदूधर्म संपला असे समजू नका. मानणारे खूप लोक आहेत अजून.
-- असतील ना. आमची कुठे ना आहे? मानोत बापडे. आमच्या वैज्ञानीक जगात देखील बिग बँग थेअरी ( काय म्हणालात?? नॉट अगेन ?? अर्रे वा रे वा ) मानणारे आणि न मानणारे अनेक लोकं आहेत. मानायला/न मानायला काय पैसे लागतात होय.

>>तुम्ही विचारले म्हणून कोणी का उत्तर द्यावे. तुमचा अभ्यास वाढवा आणि नुसते प्रश्ण न विचारता हे खोटे आहे हे सिध्द करून दाखवा.
-- आम्ही विचारले म्हणुन कोणि उत्तर द्यावे असा आमचा मुळीच आग्रह नाहि. उत्तर असेल, आणि द्यायची इच्छा असेल तर द्या, अथवा देऊ नका. बिग डील. पण म्हणुन आम्ही समाज प्रबोधन थांबवणार नाहि.

अर्धवटराव

चिंतामणी's picture

5 May 2012 - 8:08 am | चिंतामणी

>>>पण म्हणुन आम्ही समाज प्रबोधन थांबवणार नाहि.

उपरोक्त प्रश्ण विचारून जे समाज प्रबोधन करीत आहात, ते बघता आपले नाव लौकरच राजा राम मोहन रॉय, आगरकर, न्या.रानडे इत्यादी धुरंधराचे पाठोपाठ आपले नाव घेतले जाईल यात शंकाच नाही.

अर्धवटराव's picture

5 May 2012 - 8:34 pm | अर्धवटराव

छे हो. ते कसले समाजसुधारक. आम्हाला मिपावरच्या समाजसुधारकांच्या पंक्तीत बसायला आवडेल. नव्हे, तशी एंबीशन आहे आमची !!

अर्धवटराव.

चैतन्य गौरान्गप्रभु's picture

4 May 2012 - 9:00 pm | चैतन्य गौरान्गप्रभु

ही प्रतिक्रीया खरोखरच विनोदी आहे. बराच वेळ खर्ची घालून (अर्थात आपला वेळ मौल्यवान असल्यामुळे खर्ची घालून असे म्हणतोय) ही लिहलेली दिसतेय. पण प्रयोजन काही कळले नाही.

अर्धवटराव's picture

4 May 2012 - 9:14 pm | अर्धवटराव

>>ही प्रतिक्रीया खरोखरच विनोदी आहे.
-- म्हणजे प्रतिक्रिया तुम्हाला कळली म्हणायची. तसं अगदीच दुर्बोध नाहि लिहीत आम्ही

>>बराच वेळ खर्ची घालून (अर्थात आपला वेळ मौल्यवान असल्यामुळे खर्ची घालून असे म्हणतोय) ही लिहलेली दिसतेय.
-- छे छे. म्हणजे आमचा वेळ मौल्यवान आहे यात काहि शंका नाहि. पण असल्या प्रतिक्रिया द्यायला आम्हाला आमच्या प्रतिभेचा एक दशांश देखील वापर करावा लागत नाहि.

>>पण प्रयोजन काही कळले नाही.
-- अहो आम्हा समाज सेवकांचं काम काळाच्या बरेच पुढे असतं. सर्व सामान्य लोकांना त्याचं प्रयोजन असं सहजासहजी कळलं असतं तर ते देखील आमच्या पंक्तीत येऊन बसते ना...

अर्धवटराव

रणजित चितळे's picture

4 May 2012 - 9:11 am | रणजित चितळे

वाचून बरे वाटले.
माहिती वाचून त्यांच्या बद्दलचा आदर वाढला. आपला लेख आवडला.

चिंतामणी's picture

4 May 2012 - 9:38 am | चिंतामणी

हिंदू स्वतःच्या धर्मव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल किती उदासिन आहेत हे नेमक्या शब्दात दाखवून दिलेत.

अजून असे लेख येउ द्यात.

टवाळ कार्टा's picture

4 May 2012 - 11:24 am | टवाळ कार्टा

आता धर्मगुरु देशातल्या भ्रश्टाचाराबद्दल किती उदसीन आहेत हे नेमक्या शब्दात दाखवून द्यावे

अर्धवटराव's picture

4 May 2012 - 9:17 pm | अर्धवटराव

>>हिंदू स्वतःच्या धर्मव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल किती उदासिन आहेत हे नेमक्या शब्दात दाखवून दिलेत
-- किती उदासीन आहे हे कळलं तर... पण असं का याचा काहि विचार?? तसा हा प्रश्न आमच्या करता गौण आहे म्हणा... कारण हिंदु म्हणाजे कोण हेच ठरायची जिथे मारामार तिथे कसलं औदासिन्य आणि कसलं काय..

अर्धवटराव

चैतन्य गौरान्गप्रभु साहेब , अतिशय चांगला लेख लिहिला आहे.

मुळात जे लोक इथे हिंदु धर्म कुठे आहे अस विचारतात त्याना काय लिहायचे ते लिहुद्यात. ते लोक स्वता कट्टर जाती
धर्म पाळणारे असतात असा अनुभव आहे. कारण जात धर्म ह्या वरुन बोलणारे लोक ज्या जातीतील असतिल त्या जाती शिवाय इतर लोकाना कमीच लेखतात असा अनुभव बहुतेक सगळ्या जातित येतो.
आणि जर कोणी चांगले काम करत असेल मग तो कुठल्याही जाती धर्म मानणारा असेल त्याचे कौतुक व त्याचे काम हे सगळ्याना कळलेच पाहीजे.
त्यात गोवर्धन मठ पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगदगुरु शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती हे हिंदुंचे मानबिंदु आहेत. त्यांच काम आम्हाला कळण हे आमच सदभाग्य आहे.
खरच खुप सुंदर आहे हा लेख.
मी हिंदु असल्याचा अभिमान मला नेहमी आहेच व तो माझ्या जीवात जीव असेस तोवर राहील.

चैतन्य गौरान्गप्रभु's picture

5 May 2012 - 1:21 am | चैतन्य गौरान्गप्रभु

श्री निश्चलानन्द् सरस्वती शंकराचार्यांचा कार्यविस्तार खुप मोठा आहे. त्यांच्या सिद्धपिठाचा ईतीहासही मोठा देदिप्यमान आहे. रामजन्मभुमी आंदोलनात त्यांची संयत परंतु सुस्पष्ट भुमिका खुप महत्त्वाचं कार्य करून गेली. म्हणुन त्यांचा परिचय या ठीकाणी करून दिलाय. जेवढी माहिती मला होती, तेवढी देऊ शकलोय.

टवाळ कार्टा's picture

5 May 2012 - 6:32 am | टवाळ कार्टा

>>रामजन्मभुमी आंदोलनात त्यांची संयत परंतु सुस्पष्ट भुमिका खुप महत्त्वाचं कार्य करून गेली.

"कोणती संयत परंतु सुस्पष्ट भुमिका", "कोणते खुप महत्त्वाचं कार्य" या बद्दल काही माहिती मिळेल का? किंवा कुठे मिळेल त्याची लिन्क मिळेल का?

मूकवाचक's picture

4 May 2012 - 2:05 pm | मूकवाचक

आद्य शंकराचार्य - वेध एका महावताराचा (लेखकः स. कृ. देवधर, मेघ:श्याम सावकार - प्रसाद प्रकाशन) हे पुस्तक या संदर्भात वाचण्यासारखे आहे.

नाना चेंगट's picture

4 May 2012 - 2:23 pm | नाना चेंगट

>>>वेदांचे परमज्ञाता, अद्वैतवादाचे प्रणेते आणि हिंदू धर्माचे पुनरूज्जीवक जगदगुरू श्री आद्यशंकराचार्यांची जयंती आपण नुकतीच साजरी केली

>>>>वेदांचे परमज्ञाता

शंकराचार्य उपनिषदांचे गाढे अभ्यासक होते. वेदांच्या संदर्भात त्यातील ब्राह्मण भाग तसेच संहीता ज्या ज्ञानमार्गास उपयुक्त आहेत त्यांचाच संदर्भ ते घेत असत. कर्मकांड संदर्भात त्यांची भुमिका त्यांना टाळण्याचीच असे. नीरक्षीर विवेकाने ते वेदांचा संदर्भ वापरत. त्यामुळे परम ज्ञाता म्हणजे नक्की काय? ज्ञाता आणि परमज्ञाता यात काय फरक?

>>>अद्वैतवादाचे प्रणेते

अद्वैतवादाचे प्रथम लिखित स्वरुपात प्रतिपादन शंकराचार्यांचे गुरुंचे गुरु गौडपादाचार्य यांनी केले त्यांनी अद्वैतवाद आणि अजातिवाद प्रतिपादन केला. मात्र त्यांच्या आधी अनेकांनी अद्वैतवाद प्रतिपादन केला आहे. उपनिषदांमधे, ब्रह्मसुत्रांमधे सुद्धा अद्वैतवाद प्रतिपादन केला आहे. त्याला जुना वेदांत असे म्हणतात.
शंकराचार्यांनी अद्वैतवादाचे समर्थन केले आणि मायावादाचे प्रतिपादन केले. त्यानंतरच्या सर्व अद्वैत प्रतिपादनाला नवा वेदांत म्हणतात.
मग शंकराचार्य अद्वैतवादाचे प्रणेते कसे?

>>>आणि हिंदू धर्माचे पुनरूज्जीवक

हिंदू धर्म म्हणजे नक्की कोणता? यज्ञयाग समर्थक हिंदू धर्म? त्याच्यावर तर शंकराचार्य टीका करतात. उपनिषद प्रणित धर्म? रामानुजाचार्य तर त्यांना प्रच्छन्न बौध्द म्हणतात. त्यांच्या काळातील धर्म मार्तंड त्यांना धर्मबुडव्या म्हणतात कारण त्यांनी कर्मकांडावर प्रखर टीका केली. मग कोणता हिंदू धर्म? बाबा, बुवा मानणारा, देवपूजा करणारा? शंकराचार्य तर देव नाकारतात. धर्माची आवश्यकता फक्त ज्ञान मिळेपर्यंत नंतर नाही. मग धर्माचे पुनरुज्जीवन कसे काय केले? नक्की काय केले?

उप्स.... एका ओळीतील निम्म्या वाक्यातच मला भंजाळायला झाले. एवढी उत्तरे द्या पुढ्चा संवाद चालू ठेवू.

रमताराम's picture

4 May 2012 - 3:04 pm | रमताराम

मूळ रुपातल्या नानाचे आम्ही नेहमीच फ्यान आहोत. कालच कोणाशी तरी बोलताना म्हटले होते की या धाग्यावर नान्या असता तर... आणि नाना हजर. (खर्‍या भक्ताच्या हाकेला देव धावून येतात तसेच.)
यातले एक दोन मुद्दे आम्ही लिहायला आलो होतो, नानाने अधिक लिहिले आहे (साहजिकच आहे, कुठे हा ऐरावत नि कुठे आमच्यासारखं तट्टू) बास. आता नाना आहे म्हणजे डोळे मिटायला मोकळा झालो. (मध्यंतरी 'अद्वैत तत्त्वज्ञान म्हणजे हिंदू धर्माचे व्यवच्छेदक लक्षण' अशी व्याख्या ऐकून मी सदेह स्वर्गाला गेलो होतो, त्याऐवजी अशा रितीने डोळे मिटण्याची वेळ येणे केव्हाही चांगले.)

सहमत असे वेगळे लिहायला नकोच.

परिकथेतील राजकुमार's picture

4 May 2012 - 3:38 pm | परिकथेतील राजकुमार

येथील काही सभासदांना समुपदेशनाची गरज आहे !

सदर लेखक हे मिपावरती फक्त स्वतःचे लेखन टाकण्यापुरते येतात. असे असताना त्यांना काही शंका विचारणे आणि उत्तराची अपेक्षा ठेवणे हे मानसीक व बौद्धीक आजारपणाचे लक्षण आहे.

टवाळ कार्टा's picture

4 May 2012 - 4:09 pm | टवाळ कार्टा

_/\_
:D :D :D

बाकी हे मिपाच्या धोरणात बसते का??

समकालिन शंकराचार्य असोत की पूर्वीचे शंकराचार्य, ते कितीही सिद्धपुरुष, महाज्ञानी, ज्ञाता, परमज्ञाता असले तरी त्यांच्यामध्‍ये वेदांचे प्रामाण्‍य पूर्णत: ओव्हरराइड करुन स्वत:चे नवे तत्त्वज्ञान निर्माण करण्‍याची धमक दिसली नाही. ज्ञाता, परमज्ञाता आहात तर मग तुमच्या परमज्ञानाला आधार म्हणून वेदांची जुनी बाडं कशाला उघडत बसता? तुमचे पूर्णत: नवीन तत्त्वज्ञान निर्माण करा ना. नीरक्षीर विवेकाने वेदांचा संदर्भ वापरावा लागतोय म्हणजे वेदात सांगितलेलं आजच्या काळाला लागू नाही हे तर स्पष्‍टच आहे, मग तरीही जिथे‍तिथे वेदांचेच प्रामाण्‍य उकरुन काढण्‍याची काय गरज आहे? थोडक्यात हे सगळेच लोक रट्‍टामारु लोक आहेत, त्यांना पूर्णत: नवं काही निर्माण करण्‍याची भीती वाटते.
शंकराचार्य ही परंपरा सोडा, अलिकडच्या रजनीशांसारख्‍या तथाकथित परमज्ञात्यानेही सुरुवातीला कितीही नव्याची आवई उठवली तरी त्याने नुसता वेदांचाच नव्हे तर जगातल्या सगळ्या जुन्यापुराण्‍या, कुजलेल्या, सडलेल्या ‍तथाकथित परमज्ञानविषयक तत्त्वज्ञानाचा वापर करुनच कालहरण केले, त्यांना नवी दिशा दिसली नाही, त्यांना त्यांच्या स्वत:च्या परमज्ञानाची नवी सारणी उभी करता आली नाही.
नाना चेंगट तुम्हाला खरोखर ‍उत्सुकता असेल तर युजी कृष्‍णमूर्तींचे आयुष्‍य अभ्यासून पहावे अशी विनंती करतो. युजींचं वेगळेपण हे की ''परमज्ञान'' या विषयवस्तूचे वर्णन करणारी सगळी जुनी Terminology त्यांनी कचर्‍यात फेकण्‍याचं धाडस दाखवलं - त्यांना भलेही स्वत:चं लोकप्रिय तत्वज्ञान उभं करता आलं नसलं तरी त्यांच्या अनुभूतीला कुठल्या आधाराची गरज भासली नाही.

स्वानन्द's picture

4 May 2012 - 4:34 pm | स्वानन्द

>>शंकराचार्य ही परंपरा सोडा, अलिकडच्या रजनीशांसारख्‍या तथाकथित परमज्ञात्यानेही सुरुवातीला कितीही नव्याची आवई उठवली तरी त्याने नुसता वेदांचाच नव्हे तर जगातल्या सगळ्या जुन्यापुराण्‍या, कुजलेल्या, सडलेल्या ‍तथाकथित परमज्ञानविषयक तत्त्वज्ञानाचा वापर करुनच कालहरण केले, त्यांना नवी दिशा दिसली नाही, त्यांना त्यांच्या स्वत:च्या परमज्ञानाची नवी सारणी उभी करता आली नाही.

रजनीशांच्या कुठल्याही डिस्कोर्सेस मध्ये 'वेद असे म्हणतात, म्हणून मी म्हणतोय हे बरोबर आहे' असा सूर कुठेच दिसत नाही. त्यांचे बोलणे त्यांच्या स्वतःच्या अनुभुतीतून आलेले आहे हे स्पष्ट दिसते.

राहिला प्रश्न तत्त्वज्ञान उभे करण्याचा, तर त्यांचा भर पूर्णपणे 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' असा दिसतो. जे मला तरी योग्यच वाटतं.

>>>>रजनीशांच्या कुठल्याही डिस्कोर्सेस मध्ये 'वेद असे म्हणतात, म्हणून मी म्हणतोय हे बरोबर आहे' असा सूर कुठेच दिसत नाही. त्यांचे बोलणे त्यांच्या स्वतःच्या अनुभुतीतून आलेले आहे हे स्पष्ट दिसते.

---- 'वेद असे म्हणतात, म्हणून मी म्हणतोय हे बरोबर आहे' असं म्हणायला रजनीश काय खुळा होता काय? अनुभूती स्वत:ची असेल, पण ती जेव्हा जगासमोर मांडण्‍याची वेळ आली तेव्हा आधी त्यांनी प्रचंड गाजा-वाजा करुन वेद, हिंदुसहित बहुतांश धर्मांवर धुवांधार टिका केली आणि त्याची स्वत:ची नवी निर्मिती कोणती होती? तर रजनीश बायबल, ओशो उपनिषद ! म्हणजेच त्यांना जुन्याच संज्ञांचा आणि लोकांच्या मनात असलेल्या मूळ बायबल, उपनिषदांनी तयार केलेल्या पार्श्‍वभूमीचा आधार घ्‍यावा लागला. मला हे सेकंडहँड वाटतं.

>>>>राहिला प्रश्न तत्त्वज्ञान उभे करण्याचा, तर त्यांचा भर पूर्णपणे 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' असा दिसतो. जे मला तरी योग्यच वाटतं.
---- योग्य वाटतंच, वाटणारच. पण 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' म्हणत राहूनही ओशो कम्युन इंटरनॅशनलची इस्‍टेट, रोल्स रॉयस गाड्या, ओरेगॉनमधली इस्टेट, ओरेगॉनमधल्या निवडणुकीमध्‍ये मूळनिवासी मतदारांवर केलेला विषप्रयोग, फोन टॅपींगचं काय करायचं?

स्वानन्द's picture

4 May 2012 - 5:15 pm | स्वानन्द

>>तर रजनीश बायबल, ओशो उपनिषद ! म्हणजेच त्यांना जुन्याच संज्ञांचा आणि लोकांच्या मनात असलेल्या मूळ बायबल, उपनिषदांनी तयार केलेल्या पार्श्‍वभूमीचा आधार घ्‍यावा लागला. मला हे सेकंडहँड वाटतं.

नाव देण्याची पद्धत सेकंड हँड वाट्त असेल तर ठीक आहे. पण तुमचा मूळ मुद्दा प्रामाण्याचा होता. तो इथे गैरलागू वाटतोय. म्हणजे 'अमूक एकाने म्हटलंय.. म्हणून हे खरं आहे' हा प्रकार कुठेच नाही.
जे ग्रंथ लोक अगदी पूज्य मानतात, त्यातलाच गर्भीत अर्थ आपल्या स्वानुभुतीतून उलगडून सांगणे ह्यात चूक काहीच वाटत नाही.

>>---- योग्य वाटतंच, वाटणारच. पण 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' म्हणत राहूनही ओशो कम्युन इंटरनॅशनलची इस्‍टेट, रोल्स रॉयस गाड्या, ओरेगॉनमधली इस्टेट, ओरेगॉनमधल्या निवडणुकीमध्‍ये मूळनिवासी मतदारांवर केलेला विषप्रयोग, फोन टॅपींगचं काय करायचं?

पण दोन्हीमध्ये संबंध काय? म्हणजे ओशो कम्युन इंटरनॅशनलची इस्‍टेट, रोल्स रॉयस गाड्या ह्या असल्या काय आणि नसल्या काय त्याचा आणि 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' ह्या सांगण्याचा संबंध काय?

राहिला प्रश्न 'ओरेगॉनमधल्या निवडणुकीमध्‍ये मूळनिवासी मतदारांवर केलेला विषप्रयोग, फोन टॅपींगचं काय करायचं?' तर मुळात ह्या विषयाबद्दलच अनेक मतमतांतरे आहेत ज्याबद्दल जालावर अनेक चर्चा झडल्या आहेत. आणि त्याचाही परत 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' ह्या सांगण्याशी काडीचाही संबंध नाही.

>>>>>नाव देण्याची पद्धत सेकंड हँड वाट्त असेल तर ठीक आहे. पण तुमचा मूळ मुद्दा प्रामाण्याचा होता. तो इथे गैरलागू वाटतोय. म्हणजे 'अमूक एकाने म्हटलंय.. म्हणून हे खरं आहे' हा प्रकार कुठेच नाही. जे ग्रंथ लोक अगदी पूज्य मानतात, त्यातलाच गर्भीत अर्थ आपल्या स्वानुभुतीतून उलगडून सांगणे ह्यात चूक काहीच वाटत नाही.
---- नुसती नाव देण्‍याची पद्धत चूक म्हणत नाहीय. सुरुवातीला वेद, बायबल यांनी तयार केलेल्या समाजाच्या मनोभूमिकेवर तुटुन पडायचं, नंतर स्वत: समाजाला काय द्यायचं तर तर रजनीश बायबल आणि ओशो उपनिषद. यात तुम्हाला विरोधाभास दिसत नसेल तर मला दुर्दैवानं तो यापेक्षा जास्त सांगता येणार नाही.

>>>>>पण दोन्हीमध्ये संबंध काय? म्हणजे ओशो कम्युन इंटरनॅशनलची इस्‍टेट, रोल्स रॉयस गाड्या ह्या असल्या काय आणि नसल्या काय त्याचा आणि 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' ह्या सांगण्याचा संबंध काय? राहिला प्रश्न 'ओरेगॉनमधल्या निवडणुकीमध्‍ये मूळनिवासी मतदारांवर केलेला विषप्रयोग, फोन टॅपींगचं काय करायचं?' तर मुळात ह्या विषयाबद्दलच अनेक मतमतांतरे आहेत ज्याबद्दल जालावर अनेक चर्चा झडल्या आहेत. आणि त्याचाही परत 'स्वतः अनुभुती घ्या, तुमचे तुम्हीच सत्य जाणून घ्या' ह्या सांगण्याशी काडीचाही संबंध नाही.

----- बर बुवा. नसेल.

काहून ब्यांडविडथ वाया घालवताय बे?

>>>काहून ब्यांडविडथ वाया घालवताय बे?
---- तुम्हाला कळ लागणार हे माहित होतंच :p
म्हणून वरच्या प्रतिसादानंतर गप्प बसलो होतो.
पण आता पुन्हा एकदा खालचा प्रतिसाद देताना बँण्‍डविड्थ वाया गेल्याने या चार ओळींसाठी पुन्हा एकदा बँडविड्थ वाया घालवतो आहे ;-)
याचं श्रेय तुम्हालाच ;-)

एक थोडं कुरुंदकर वाचा की हो म्हणतो मी! म्हणजे ओशो कम्युन इंटरनॅशनलची इस्‍टेट, रोल्स रॉयस गाड्या इ.इ. सर्व सोडूनच द्या. पण लेखी जरी ओशोने वेद्/उपनिषद इत्यादींचे प्रामाण्य सांगितले नाले तरी त्याचे तत्वज्ञान हे अभिनवगुप्ताच्या तांत्रिक शैवपंथी तत्वज्ञानापेक्षा आजिबात वेगळे नाही, हे कुरुंदकरांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. त्यामुळे ओशो सांगतो ते चूक की बरोबर हे सोडूनपण त्याचा 'वरिजिनॅलिटी' चा दावा पण सपशेल फेल गेला.

स्वानन्द's picture

4 May 2012 - 6:37 pm | स्वानन्द

काय म्हणतोय कुरुंदकर? आणि कुठे म्हणतोय म्हणतो मी? जरा काय लिंक बिंक किंवा पुस्तकाचं नाव देऊन सोडा की हो.

ओशो तंत्र, योगसुत्रे, धम्मपद, ताओ, उपनिषदे, भक्तीसुत्रे, भगवद्गीता, अष्टावक्रगीता अशा अनेक ग्रंथांवर बोलले आहेत. तेव्हा कुरंदकरांनी यातलं कुठलं म्हणणं हे ओशोंचे तत्वज्ञान म्हणून गृहीत धरलंय हे बघायला आवडेल.

( स्वगतः ज्ञानेश्वरांनी गीतेवर टीका लिहीली म्हणून त्यांना प्रामाण्यवादी म्हणावं की अमृतानुभव लिहीले म्हणून वरीजनल म्हणावे बरं!! )

तेंचं "यात्रा" नावाचं पुस्तक हाय बगा तितं लिहिलंय ओशोंवर. आणि आधीच सांगून ठिवतो, आमी काय ओशोचे जाणकार नाय, तुमी किंवा यक्कुशेठ वगैरेंना जमतं हे असलं किचकट. पण कुरुंदकरांच्या लिखाणाचा मी (५ वर फिरणारा) फॅन आहे, आणि त्यांना खोडणे नामुमकिन नसले तरि बहुत मुश्किल आहे हे नक्की. तेव्हा ते वाचा, आणि तुमचा अभ्यास असेल तर जरूर त्यांचे सप्रमाण खंडन करा ही नम्र विनंती.

हॅहॅहॅ
बास का.
मी एक सांगतो - रजनीश हा जगातला सगळ्यात मोठा चोर होता. आता हे काही कुरुंदकरांनी म्हटलंय की नाही मला माहित नाही, पण मी असं म्हणतो - कारण मी रजनीश पुरता वाचलाय, माझी शारीरिक, बौद्धीक क्षमता एक्झॉस्‍ट होईल इ‍तपत अनुभवलाय. त्यामुळे वाद-प्रतिवाद करुन कुणालातरी 'विन ओव्हर' करण्‍याचा बिलकुल मानस नाही.

ज्यांना वाटतं की रजनीश चोर नव्हता त्यांनी तसं म्हणण्‍यात बिलकुल कचरु नये.
तूर्तास स्वानंदने कुरुंदकरांची साइट पहावी: http://narharkurundkar.com/book.html

कुरुंदकरांचे हे मत स्वानंदने वाचावे अशी आग्रहाची विनंती.

माझ्या विवेचनाचे महत्व कदाचित कुणाला वाटणार नाही. माझी स्तुती होईल, विवेचनाची उपेक्षा होईल, मग माझ्या विवेचनाचे महत्व समजणारे वाचक निर्माण होईतो थांबणे भाग आहे."
ते पुढे लिहितात,
"पण, माझी इच्छा कठोर टीका होऊन सर्वांनी मला मुर्खात काढावे ही आहे. कारण त्यासाठी माझ्यापेक्षा खोलात उतरावे लागून *मराठी समीक्षा अधिक सखोल करावी लागेल व तेच मला हवे आहे."

* मराठी हा शब्द वगळला तर या चर्चेत कुरुंदकरांनी दिलेला हा प्रतिसाद मानता येईल. ;-)

>>समकालिन शंकराचार्य असोत की पूर्वीचे शंकराचार्य, ते कितीही सिद्धपुरुष, महाज्ञानी, ज्ञाता, परमज्ञाता असले तरी त्यांच्यामध्‍ये वेदांचे प्रामाण्‍य पूर्णत: ओव्हरराइड करुन स्वत:चे नवे तत्त्वज्ञान निर्माण करण्‍याची धमक दिसली नाही
-- तसं ओव्हरराईड करुन स्व्तःचे तत्वज्ञान जेंव्हा निर्माण झाले तर त्याचे रेफरन्स वेदांत परत कुठे तरी सापडले. कारण सिंपल आहे... वेद अपौरुषेय आहेत. अनेक तार्कीकांनी अगदी उलटसुलट रितीनी विचान/मनन/चिंतन करुन , ओवर द पिरिञेडन/मनन/चिंतनवेद रचले. (यक्कु... प्लीज, तुम्ही तरी पुरावे मागु नका बुवा)

>>तुमचे पूर्णत: नवीन तत्त्वज्ञान निर्माण करा ना.
-- हात्त तिच्या.. त्यात काय एव्हढं.. आमचे नवीन तत्वज्ञान ऐकवतो... जगात पूर्णतः नवीन काहि निर्माण होत नाहि आणि जुनं पूर्णतः कधी नष्ट होत नाहि. थोडं "सायंटीफीक"ली सांगायचं हा लॉ ऑफ कंसर्व्हेशन ऑफ एनर्जी आहे (नक्की हेच कारे यक्कु??) आता याचे रेफ्रन्स शोध बघु ;)

>>नीरक्षीर विवेकाने वेदांचा संदर्भ वापरावा लागतोय म्हणजे वेदात सांगितलेलं आजच्या काळाला लागू नाही हे तर स्पष्‍टच आहे
-- ते वेद "निर्माण" झाले तेव्हाही ते त्या काळी पूर्णपणे लागु नव्हते. म्हणुनच अनेकांनी त्यात आपापल्या परीने भर घातली.

>> मग तरीही जिथे‍तिथे वेदांचेच प्रामाण्‍य उकरुन काढण्‍याची काय गरज आहे?
-- ज्यांना हे प्रामाण्य आवश्यक वाटते त्यांच्या करता उकरुन काढावे लागते बाबा. कोणी म्हटलं "आय डोण्ट केअर", तर कशाला असे संदर्भ देईल??

>>थोडक्यात हे सगळेच लोक रट्‍टामारु लोक आहेत, त्यांना पूर्णत: नवं काही निर्माण करण्‍याची भीती वाटते.
-- सगळे "च" नाहित. पण बरेच.. इन फॅक्ट शेकडा यांचाच टक्का जास्त भरायचा... आमच्या सारखे संदर्भ उत्तरपत्रीका घोकुन पास झालेले इंजीनिअर्स ते.

>>युजींचं वेगळेपण हे की ''परमज्ञान'' या विषयवस्तूचे वर्णन करणारी सगळी जुनी Terminology त्यांनी कचर्‍यात फेकण्‍याचं धाडस दाखवलं
-- अनेकांनी तसं केलय. पण फार विषयांतर होईल म्हणुन तुर्तास पास :)

नाना चेंगट's picture

5 May 2012 - 11:12 am | नाना चेंगट

समकालिन शंकराचार्य असोत की पूर्वीचे शंकराचार्य, ते कितीही सिद्धपुरुष, महाज्ञानी, ज्ञाता, परमज्ञाता असले तरी त्यांच्यामध्‍ये वेदांचे प्रामाण्‍य पूर्णत: ओव्हरराइड करुन स्वत:चे नवे तत्त्वज्ञान निर्माण करण्‍याची धमक दिसली नाही. ज्ञाता, परमज्ञाता आहात तर मग तुमच्या परमज्ञानाला आधार म्हणून वेदांची जुनी बाडं कशाला उघडत बसता? तुमचे पूर्णत: नवीन तत्त्वज्ञान निर्माण करा ना. नीरक्षीर विवेकाने वेदांचा संदर्भ वापरावा लागतोय म्हणजे वेदात सांगितलेलं आजच्या काळाला लागू नाही हे तर स्पष्‍टच आहे, मग तरीही जिथे‍तिथे वेदांचेच प्रामाण्‍य उकरुन काढण्‍याची काय गरज आहे? थोडक्यात हे सगळेच लोक रट्‍टामारु लोक आहेत, त्यांना पूर्णत: नवं काही निर्माण करण्‍याची भीती वाटते.
शंकराचार्य ही परंपरा सोडा, अलिकडच्या रजनीशांसारख्‍या तथाकथित परमज्ञात्यानेही सुरुवातीला कितीही नव्याची आवई उठवली तरी त्याने नुसता वेदांचाच नव्हे तर जगातल्या सगळ्या जुन्यापुराण्‍या, कुजलेल्या, सडलेल्या ‍तथाकथित परमज्ञानविषयक तत्त्वज्ञानाचा वापर करुनच कालहरण केले, त्यांना नवी दिशा दिसली नाही, त्यांना त्यांच्या स्वत:च्या परमज्ञानाची नवी सारणी उभी करता आली नाही.

वरच्या तुमच्या मतामधली भाषा नीट असती तर तिचे योग्य शब्दात खंडन केले असते. परंतु आपल्याला मान्य नसलेल्या कोणत्याही मताला अशा पद्धतीने मांडणे, आणि अशा पद्धतीने मांडलेल्या मताचे खंडन करणे माझ्या तत्वात बसत नाही. सबब केवळ आक्षेप नोंदवत आहे. असो.

नाना चेंगट तुम्हाला खरोखर ‍उत्सुकता असेल तर युजी कृष्‍णमूर्तींचे आयुष्‍य अभ्यासून पहावे अशी विनंती करतो. युजींचं वेगळेपण हे की ''परमज्ञान'' या विषयवस्तूचे वर्णन करणारी सगळी जुनी Terminology त्यांनी कचर्‍यात फेकण्‍याचं धाडस दाखवलं - त्यांना भलेही स्वत:चं लोकप्रिय तत्वज्ञान उभं करता आलं नसलं तरी त्यांच्या अनुभूतीला कुठल्या आधाराची गरज भासली नाही.

ज्ञानप्राप्तीच्या विविध प्रमाणांमधे शब्द प्रामाण्य सुद्धा असते असे समर्थन करणार्‍या तत्वज्ञांच्या मताला चुकीचे मानणारे स्वतःला मान्य असलेल्या तत्वज्ञाच्या मताचे केवळ शब्दप्रामाण्यानेच समर्थन करतात हे पाहून गंमत वाटली.

असो.

वरच्या तुमच्या मतामधली भाषा नीट असती तर तिचे योग्य शब्दात खंडन केले असते. परंतु आपल्याला मान्य नसलेल्या कोणत्याही मताला अशा पद्धतीने मांडणे, आणि अशा पद्धतीने मांडलेल्या मताचे खंडन करणे माझ्या तत्वात बसत नाही. सबब केवळ आक्षेप नोंदवत आहे. असो.

आक्षेप पावला. मी वर कुठलेही 'मान्य नसलेले मत' मांडलेले नाही (प्रतिपक्षाचे), माझे निरिक्षण मांडले आहे म्हणा हवं तर, आणि ते कसे चुकीचे आहे हे समजून घ्‍यायला नक्कीच आवडले असते. पण तत्व वगैरे आलं म्हटल्यानंतर आपला पास.

ज्ञानप्राप्तीच्या विविध प्रमाणांमधे शब्द प्रामाण्य सुद्धा असते असे समर्थन करणार्‍या तत्वज्ञांच्या मताला चुकीचे मानणारे स्वतःला मान्य असलेल्या तत्वज्ञाच्या मताचे केवळ शब्दप्रामाण्यानेच समर्थन करतात हे पाहून गंमत वाटली.

पहिल्यांदा तर इथे 'नाना चेंगट' आणि 'यकु' यांचा वाद चालू नव्हता, त्यामुळे कसले समर्थन केले आहे (मान्य असलेल्या तत्वज्ञाच्या मताचे केवळ शब्दप्रामाण्याने समर्थन, गंमत वगैरे वगैरे तर फारच दूरचा मुद्दा ). तुम्ही लेखावर जे प्रश्न विचारले आहेत त्यामधून वेगळा सूर दिसत होता, म्हणून एक शिफारस केली होती. बट नाऊ दॅट यू हॅव चेंज्ड यूवर स्‍टँड, आय रिस्पेक्‍ट इट.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 May 2012 - 5:02 pm | बिपिन कार्यकर्ते

खात्री पटत चालली आहे!

कशाची खात्री पटत चालली आहे हे वाचण्यासाठी अगदी वरपर्यंत स्क्रोल केलं, पण नशिब नाही.

कवितानागेश's picture

5 May 2012 - 12:21 am | कवितानागेश

कुठे चालली आहे?? :P

बिपिन कार्यकर्ते's picture

5 May 2012 - 12:36 pm | बिपिन कार्यकर्ते

तुम्हाला काय करायचे आहे? तुमच्या नाझ्का लाइन्सच्या मार्गाने तर नक्कीच नाही चाललीये! कळ्ळं?

कवितानागेश's picture

5 May 2012 - 12:50 pm | कवितानागेश

आम्हाला विदा गोळा करायचा आहे, कुणाकुणाची कुठेकुठे पटत चालाली आहे याचा.
तुम्ही गपचुप माहिती द्या.
अवांतरः नाझ्का लाइन्स आमच्या बिलकुल नाहीत! म्हणून तर आम्ही त्यांच्या भानगडीत पडतोय आणि सतत तेच तेच प्रश्न विचारतोय..'काय झाले?...काय झाले?...काय झाले?...काय झाले?...काय झाले?...'

इरसाल's picture

4 May 2012 - 5:22 pm | इरसाल

पटत चालली आहे.

प्यारे१'s picture

4 May 2012 - 5:24 pm | प्यारे१

माझी पटलेली आहे..... ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 May 2012 - 6:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धर्मसंस्थेच्या माध्यमातून राष्ट्रोत्कर्षासाठी झटणा-या स्वामी निश्चलानंद सरस्वतींच्या तालमीत तयार झालेली नवी पिढी हिंदू धर्मसंस्थेला एकूणच नवा आयाम देइल, आणि ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्या पायावर उभे असलेले तर्कसंगत धर्मविचार आपल्याला मिळतील अशी खात्री पुज्यश्रींकडे पाहिल्यावर वाटल्याशिवाय राहत नाही.

खरंय........! हात जोडून नमस्कार आहे.

नाना यांच्यासाठी : ज्ञाता म्हणजे जाणणारा, विद्वान मनुष्य. परमज्ञाता म्हणजे अत्युच्च विद्वान मनुष्य. परम ज्ञाता आणि ज्ञाता यात फरक आहे.

-दिलीप बिरुटे

चैतन्य गौरान्गप्रभु's picture

4 May 2012 - 8:57 pm | चैतन्य गौरान्गप्रभु

माझ्या लेखावर ईतक्या प्रतिक्रीया पाहून मी खुपच खुष झालो होतो. मात्र वाचल्यावर प्रचिती आली की चर्चा पार कुठच्या कुठे भरकटलीय. असो.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 May 2012 - 9:03 pm | बिपिन कार्यकर्ते

वेलकम टू द मॅट्रिक्स

- (मॉर्फिअस)

यकु's picture

4 May 2012 - 9:05 pm | यकु

ठ्ठो !!!!!

__/\__ !

चैतन्य गौरांगप्रभू: फार तीव्र नाराजी असेल तर भरकटलेली चर्चा या (तुमच्या) धाग्यावरुन काढून टाकण्याची संपादकांना विनंती करु शकता.

रमताराम's picture

4 May 2012 - 10:05 pm | रमताराम

ठार मेलो. सदेह स्वर्गी पोचलो. =))

चैतन्य गौरान्गप्रभु's picture

4 May 2012 - 9:12 pm | चैतन्य गौरान्गप्रभु

चर्चा काढावी अशी मागणी माझी मुळीच नाही. कृपया नाराज होउ नये. चर्चा झालीच पाहिजे. त्यातुनच काहीतरी उत्तमफल प्राप्त होते.

धन्या's picture

5 May 2012 - 1:22 am | धन्या

चर्चा ही व्हायलाच हवी. त्याशिवाय लोकांचा "दर्जेदार टाईमपास" कसा होणार. तुम्ही काही चर्चा काढायच्या वगैरे भानगडीत पडू नका.

यकु कृष्णमूर्तींकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही. त्यांना सडेतोड बोलण्याच्या नावाखाली असं काही बोलायची अधूनमधून लहर येते. ;)

यकु कृष्णमूर्तींकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही. त्यांना सडेतोड बोलण्याच्या नावाखाली असं काही बोलायची अधूनमधून लहर येते.

1. पौर्णिमा किंवा अमावस्येला आमच्यामध्‍ये ही लहर उसळत नाही असे स्पष्‍टीकरण दिले जाते. :|
2. आज पौर्णिमा किंवा अमावस्या असल्यास त्यासाठी आम्ही जबाबदार नाही. तो केवळ एक योगायोग मानावा. :|
3. आम्ही सडेतोड बोलण्‍याच्या नावाखाली बोलत नसून फक्त जे आहे ते स्पष्‍टपणे मांडतो, हा प्रकार आपल्याला सडेतोडपणा वाटला असेल तर हॅहॅहॅ... आता यावर काय बोलावं? ;-)

कलोअ

ह्रदयाच्या मूळापासून/तळापासून आपलाच,*

यकु

*वरीजनल From the bottom of my heart - चा निवृत्त भाषांतर संघाकडून करुन घेतलेला मराठी अनुवाद :p

परिकथेतील राजकुमार's picture

5 May 2012 - 10:56 am | परिकथेतील राजकुमार

मुळात मिपावरती श्री. चौकटराजा, श्री. नरेंद्र गोळे, श्री. चैतन्य गोरांगप्रभु ह्यांसारखे तज्ञ, अभ्यासु आणि मान्यवर लोक हे लेखक आणि मार्गदर्शक अशा भुमीका पार पाडत असताना, काही नादान सदस्य सतत कोण ते कुरुंदकर, सावरकर, कृष्णमुर्ती अशा तद्दन कोणालाही माहिती नसलेल्या आणि काहीही लिखाण करणार्‍या लोकांची उदाहरणे का देत असतात ? अशा सदस्यांना असा विद्वान लोकांचा अपमान करून काय मिळते ? अशा लोकांना कदर नाही मिपावरच्या ह्या मार्गदर्शकांची.

बॅटमॅन's picture

5 May 2012 - 2:49 pm | बॅटमॅन

खी:खी: खी:

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

हे काय आहे?

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

हे काय आहे?

टवाळ कार्टा's picture

5 May 2012 - 6:57 pm | टवाळ कार्टा

मग मी लिहिलेल्या प्रतिसादाला उत्तर तरी द्या