खट्टी-मिठी कैरीची कोशिंबीर

जागु's picture
जागु in पाककृती
26 Apr 2012 - 10:30 am

१) छोट्या कैर्‍या ५-६ मोठ्या असतील तर १-२
नुसती कैरी पाहूनच तोंपासु की नाही!:स्मित:

२) १ मोठा चमचा मिठ
३) १ मोठा चमचा साखर
४) पाऊण चमचा लाल मसाला किंवा लाल तिखट
५) १ चमचा गोडे तेल

पाककृती
१) प्रथम कैर्‍यांचा सुगंध घेत घेत कैर्‍यांची साले सुरीने काढा. छोट्या कैर्‍या असल्यास त्याचे दोन भाग करून कोय काढून टाका. बाठेवाल्या असल्यास तशाच किसण्यासाठी ठेवा, किसुन झाल्यावर बाठे टाकता येतात.

२) आता कापलेल्या कैर्‍या किसून घ्या. ही प्रक्रिया करताना तोंडाला पाणी सुटणे, लहान मुलांनी मध्येच कैर्‍या पळवणे असे प्रकार होऊ शकतात. अगदीच अनावर झाल्यास एखादा तुकडा तोंडात टाका. :स्मित:

३) किसामध्ये मिठ, मसाला, साखर टाकुन एक चमचा कच्च्या तेलाची धार सोडा (कच्च्या तेलाची म्हणजे न तापवता वगैरे). हा किस हाताने एकजीव करा म्हणजे तुमच्या हाताची चवही त्याला येईल. पण न राहवून बोटे तोंडात जाणार नाहीत याची काळजी घ्या :हाहा: धिर असेल तर थोडा वेळ मुरवत ठेवा म्हणजे पाणी सुटेल आणि रसाळ लज्जतदार, मसालेदार कोशिंबीर तयार होईल.

हा मी अधीरपणाने न मुरवाता काढलेला तयार कोशिंबीरीचा फोटो.

अधीरपणाने काढण्याचे कारण ह्या फोटोवरून समजेलच :स्मित: आमची बच्चेकंपनी मुरायच्या अधीच तुटून पडली होती कोशिंबीरीवर.

अधिक टिपा:
विशेष टिप म्हणजे मुलांना आधी सांगूच नका हा प्रकार करणार आहात नाहीतर तुमच्या पाककृतीत मध्ये मध्ये अडथळे येतील :हाहा: मुलेच काय काही मोठी माणसेही अडथळा आणतात घाई करुन.

जर साखर मिठाचे प्रमाण कमी वाटले तर नंतर थोडे टाकावे.

मसाला असला तरी हा प्रकार मुले आवडीने खातात.

तेल आवडत नसल्यास नाही टाकले तरी चालेल.

लाल तिखट असल्यास पाव चमचा पुरे.

प्रतिक्रिया

इरसाल's picture

26 Apr 2012 - 10:33 am | इरसाल

छान.
ह्या आंबट गोष्टी तोंडाला एवढे पाणी का आणतात बरे ?????????

प्रचेतस's picture

26 Apr 2012 - 10:36 am | प्रचेतस

अगदी.
तोंपासु.

गवि's picture

26 Apr 2012 - 10:40 am | गवि

आई ग्गं...

अमृत's picture

26 Apr 2012 - 10:41 am | अमृत

कालच रात्री याचा फडशा पाडला गेला :-)

अमृत

सुहास झेले's picture

26 Apr 2012 - 11:01 am | सुहास झेले

भन्नाट !!

घरी जाऊन करमट करुन खातोय असं झालय आता व्वा व्वा जागु तै क्या बात है :)

आवडेश अता घरी जाउन करमट आणि कैरीचे पन्हे घ्यायलाच हवे :)

अगदी अगदी..

सुदैवाने इकडे कैर्‍या मिळतात. इंडियातल्या कोंकणातल्या कैर्‍या इथे आल्या आहेत. कालच घेऊन आलो.

प्यारे१'s picture

26 Apr 2012 - 11:26 am | प्यारे१

___/\___

काय रे परा ?सारखं सारखं काय इंडियन स्टोअर शोधत बसतो? एकदाच ये भारतात नी खा काय खायचं ते!

बाकी आपण कैरीचं लोणचं बघितलंच नाही. त्यामुळं तोंपासु इ. काहीच झाले नाही.
(अरे कुणीतरी कैर्‍या कापा रे! :( )

हॅ हॅ हॅ..

मी आणि गवि एकच आहोत हे सिद्ध करण्याचा क्षीण प्रयत्न.. ;)

मी इकडे आहे आणि ते तिकडे..

पियुशा's picture

26 Apr 2012 - 11:20 am | पियुशा

वॉव !!!! कैर्या आहेतच ,आजच करुन बघते :)

सानिकास्वप्निल's picture

26 Apr 2012 - 11:59 am | सानिकास्वप्निल

कसली दिसतेय कोशिंबीर :) अहाहा
विकांताला नक्की करून बघणार
धन्यवाद ताई

चान चान !!

आम्ही जरा वेगळ्या पध्दतीने करतो ;) बाकी हे ही आवडले

निवेदिता-ताई's picture

26 Apr 2012 - 6:36 pm | निवेदिता-ताई

आम्ही यात खमंग फोडणी करुन घालतो..गरमच...

असेही छानच वाटतेय....तो पा सु

कैर्‍या दिसल्या की त्या सोलणे किसणे इत्यादी सोपस्कार पार पाडायला धीर कुणा कडे असतो.
आम्ही तर वाडीत जाताना एका खिशात मीठाची आणी दुसरीत साखर लाल तीखट घेउन जायचो.
पाडली कैरी की ती अंगावरल्या कपड्याला पुसायची. एक छोटा चावा घेउन मग एकदा मीठात एकदा साखर तिखटात लावायची आणि ती तोंडात असताना हातात दगड घेउन दुसर्‍या कैरीवर नेमबाजी चालु. :)

स्मिता.'s picture

26 Apr 2012 - 3:23 pm | स्मिता.

जागुताई, पहिला फोटो बघूनच तों पा सु. बाकीचे फोटो बघता बघता तर फक्त तोंडचं पाणीच आवरत होते.

आता इंडियन स्टोअरमधे कैर्‍या शोधणे आले ;)

नशीब तुम्हाला तिथे कैर्‍या मिळतात तरी.

गणपा कैर्‍या आणि लहानपण हे एक समिकरणच आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Apr 2012 - 6:22 pm | अत्रुप्त आत्मा

वा!
आत्ता मी नुसत्याच कैर्‍या तिखट मीठ लाऊन खात बसलोय.
आता हे करुन पहातो.
पण खिसणी नाही; सुरीने बारिक कराव्या लागणार.

छ्या. कैर्‍या किसायला कुणाला वेळ आहे इथे. फक्त कैरी दिसली रे दिसली, लगेच सुरी/कोयता काय मिळेल ते घेऊन दणादण तुकडे करुन मीठ-मसाल्यात बुडवून कधी तोंडात टाकतो.. इतकेच ते काय.

- (कैरीचोर) पिंगू

यकु हो बारीक तुकडे करुनही करता येते.

पैसा's picture

26 Apr 2012 - 11:44 pm | पैसा

पण किसायला जे कष्ट लागतील त्याच्या १/५ वेळात गायब होणारा पदार्थ आहे हा!

कैरी पाहूनच तोंपासु
कोशिम्बिर करायलाच पाहीजे आता

पाकक्रुती आणी प्रतिसाद दोन्ही दिसत नाहीत.

पाकक्रुती आणी प्रतिसाद दोन्ही दिसत नाहीत.

सुर's picture

30 Nov 2012 - 11:32 am | सुर

धन्यवाद