पोळीचा लाडू

पूनम ब's picture
पूनम ब in पाककृती
20 Apr 2012 - 9:57 pm

साहित्य

४-५ पोळ्या (शिळ्या पोळ्या)
१/२ कप खिसलेला गुळ
२ टेबल स्पून तूप
३ टेबल स्पून दूध
५-६ बदाम
१/२ टीस्पून वेलची पूड

पोळ्या चे तुकडे करून घ्यावे आणि ते तव्या वर कमी आचेवर भाजून घ्यावे किंवा ओव्हन मध्ये २५० डिग्री फ वरती २० मिनिट बेक करावे आणि थंड होऊ द्यावे . थंड झाल्या नंतर तुकडे कुरकुरीत होतील.

मिक्सर मध्ये घालून त्याची पावडर करून घ्यावी. त्यामध्ये गुळ घालावा आणि कमी आचेवर ३-४ मिनिटे परतून घावे किंवा मायक्रोव्हेव मध्ये १ मिनिट शिजवून घावे. गुळामुळे मिश्रण थोडे ओलसर होईल. त्यामध्ये तूप, दुध, वेलची पावडर, आणि बदामाचे काप घालून मिश्रण एकजीव करावे. मध्यम आकाराचे लाडू बांधून घ्यावे. अधिक स्वादासाठी पोळी मिक्सर मध्ये बारीक करताना बडीशेप हि घालू शकता.

प्रतिक्रिया

निवेदिता-ताई's picture

20 Apr 2012 - 10:51 pm | निवेदिता-ताई

मस्तच.....छानच दिसतायेत लाडू....पण हा केशरी रंग कशामुळे आला??

पूनम ब's picture

20 Apr 2012 - 11:11 pm | पूनम ब

धन्यवाद ताई. गुळ घालून भाजल्यानंतर असा केसरी रंग आला आणि मिश्रण ओलसर पण झाले.

संजय क्षीरसागर's picture

20 Apr 2012 - 10:58 pm | संजय क्षीरसागर

पाककृती आणि फोटो अफलातून! बायकोला वर्दी दिलीये, प्रचंड धन्यवाद!

लॉरी टांगटूंगकर's picture

20 Apr 2012 - 11:13 pm | लॉरी टांगटूंगकर

सुंदर फोटो आहेत,तुमच्या क्रीएटीव्हीटीला सलाम!!!!!!!!

पण विचित्र अपेक्षाभंग झालाय ,पोळीचे लाडू या स्वरुपात बघितले नव्हते........नेहमीच्या लंबोदर बाप्पांना सुटा
बुटा मध्ये पाहतोय असे वाटतंय

पैसा's picture

20 Apr 2012 - 11:29 pm | पैसा

"भाजल्यानंतर मिक्सरमधे बारीक करा " हे लिहायचं राहिलं का?

बाकी संजय क्षीरसागर म्हणतात तसं, साच्यात वगैरे घालण्यापेक्षा आजीने हाताने वळून दिलेल्या लाडूला जी चव असायची ती फाईव्ह स्टार हॉटेलच्या शेफलासुद्धा यायची नाही!

शनिवार सकाळची शाळा + आईने हाताने वळून दिलेला लाडू + गरम गरम दूध.

पोळीचा लाडू म्हणजे हेच समीकरण आहे डोक्यात..!!!! :-)

सुनील's picture

21 Apr 2012 - 1:48 am | सुनील

पोळीचा लाडू अशी पाकृ आल्याचे पाहून आता भाताचा लाडू असे खवचट विडंबन टाकायचे असा विचार करीतच धागा उघडला.

आता मात्र विचार बदललाय!

पाकृ आणि फोटो छान.

रेवती's picture

21 Apr 2012 - 3:01 am | रेवती

मस्तच! खूप आठवणी आहेत या लाडूच्या.
मोदकाच्या (सदस्यनाम नव्हे) आकारातला लाडू अगदी सात्विक वाटतोय.

शिल्पा ब's picture

21 Apr 2012 - 5:39 am | शिल्पा ब

हं!! मला मात्र फोडणीची पोळी जास्त आवडते. असो. लेख अन फोटो छान आहेत.

एक्झॅक्टली हेच लिहायला आलो होतो, त्याबरोबर थोडंसं ताक किंवा दही मिळालं तर लई भारी.

निवेदिता-ताई's picture

21 Apr 2012 - 3:19 pm | निवेदिता-ताई

आणी सायीचे गोड दही मिळाले तर लईच भारी..:p

आणि दह्यावरती काळे मीठ..

सुहास झेले's picture

21 Apr 2012 - 5:23 pm | सुहास झेले

अगदी ह्येच म्हणतो !!!!

तरी पाककृती आणि सादरीकरण आवडले..... :)

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2012 - 7:51 am | अत्रुप्त आत्मा

परिचित पाककृती...यात अजुन एक प्रकार करता येतो,पोळीच्या चुर्‍यात फक्त पिठिसाखर,तुप आणी थोडा व्हॅनिला इसेन्स,वेलदोडा पावडर घातली,तर वेगळी अफलातुन चव मिळते. :-)

प्यारे१'s picture

21 Apr 2012 - 9:10 am | प्यारे१

मिपाकर 'मलिदा' खाणार तर...!

किसन शिंदे's picture

21 Apr 2012 - 9:51 am | किसन शिंदे

पोळीचा लाडू कधी खाल्ला नाही, पण फोडणीची पोळी/भाकरी मात्र बर्याचदा खाल्लीय. :)

सर्वात वरचा फोटो भारीच!

अविनाशकुलकर्णी's picture

21 Apr 2012 - 11:19 am | अविनाशकुलकर्णी

मस्त..पोळीचा लाडु..कडीचा डबा..व लहान पण आठवले..
व आता हयात नसलेली आई पण..

नावातकायआहे's picture

21 Apr 2012 - 11:09 pm | नावातकायआहे

वरील सर्व गोष्टींशी बाडिस.

सहज's picture

21 Apr 2012 - 12:22 pm | सहज

काही शब्द असतात जे कमी वेळा वापरायची संधी येते त्यातला एक वापरत आहे.

ओव्हरकिल.. =
More than what is needed. In gross excess of what is reasonably expected. An excess of something beyond what is required or suitable for a given purpose.

पण खरच मस्त केला आहे त्याबाबत दुमत नाही. इतका की [निदान परदेशात] मोतीचूर लाडूच्या शेजारी ठेवून त्याच किमतीत विकाला जावा असा. सादरीकरणही मिपाकर सानिकास्वप्नीलतैं सारखेच उत्तम..

बाकी तसा मीही शिल्पाबतै, ५०फक्तभौं प्रमाणेच फो.पो.चा चाहता. पण लहानपणी पो.ला. + आमटी देखील आवडीने खायचो ते आठवले.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Apr 2012 - 1:01 pm | परिकथेतील राजकुमार

पाकृ आणि फटू दोन्ही खल्लास आणि आठवणी जाग्या करणारे.

बाकी ही पाकृ अंडे घालून कशी करता येईल ? आणि हो इकडे वेलची पूड कुठे मिळेल ?

तुझ्या कामवाल्या बाईला सांग. तिच्याकडे बघितल्यावर वाटत तिला नक्कि येईल.;)

गणपा's picture

21 Apr 2012 - 1:26 pm | गणपा

मिपाच्या या दालनात स्वागत. :)
पहिलाच फोटो इतका आकर्षक आहे की लगेच उचलून तोंडात टाकायचा मोह झाला.

धनुअमिता's picture

21 Apr 2012 - 3:11 pm | धनुअमिता

पोळीचा लाडू कधी खाल्ला नाही. पण आता करुन बघेन.

आणखी एक फोटोमध्ये ते कप आहेत ते भारतात मिळतील का?

निवेदिता-ताई's picture

21 Apr 2012 - 3:21 pm | निवेदिता-ताई

कसले कप म्हणते आहेस...तो मोदकाचा साचा का??

धनुअमिता's picture

21 Apr 2012 - 3:29 pm | धनुअमिता

नाही. ते पहिल्या फोटमध्ये आहेत ते. ज्याच्यात गुळ, दुध आहे ते.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Apr 2012 - 3:37 pm | परिकथेतील राजकुमार

व्हॅट १९ आणि अ‍ॅमेझॉन वरती आहेत की विकायला.

धनुअमिता's picture

21 Apr 2012 - 3:54 pm | धनुअमिता

धन्यवाद परा साहेब.
पण ऑनलाइन नको आहे. मॉलमध्ये किंवा दुकानात मिळतील का?

परिकथेतील राजकुमार's picture

21 Apr 2012 - 4:06 pm | परिकथेतील राजकुमार

धन्यवाद परा साहेब.

येवढी मदत केली त्याचा मोबदला असे अपशब्द वापरुन ?

पण ऑनलाइन नको आहे. मॉलमध्ये किंवा दुकानात मिळतील का?

हो नक्की मिळतील.

Inorbit Pune
Email: sales.pune@inorbit.in
Tel: +91 22 26565400

Email: estore@shoppersstop.com

धन्यवाद परा. मॉलची माहिती आणि फोन नंबर दिल्याबद्दल.

येवढी मदत केली त्याचा मोबदला असे अपशब्द वापरुन ?

अपशब्द वाटतो आहे का तुम्हांला. मग माफ करा, परत नाही वापरणार असे अपशब्द.

धन्यवाद परा. मॉलची माहिती आणि फोन नंबर दिल्याबद्दल.

येवढी मदत केली त्याचा मोबदला असे अपशब्द वापरुन ?

अपशब्द वाटतो आहे का तुम्हांला. मग माफ करा, परत नाही वापरणार असे अपशब्द.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Apr 2012 - 3:34 pm | बिपिन कार्यकर्ते

अफलातून!

खल्लास, सादरीकरण आवडलं !!

विशाखा राऊत's picture

21 Apr 2012 - 3:46 pm | विशाखा राऊत

आईच्या हातच्या पोळीच्या लाडवाची आठवण आली... सकाळी सकाळी २ लाडु खावुन झाले की बस :)

कवितानागेश's picture

21 Apr 2012 - 5:16 pm | कवितानागेश

मस्तच!
लहानपणी दर २ दिवसानी खाल्लेला पदार्थ.
ह्म्म.... आता इथे पोळ्या शोधणे आले.... ;)

इरसाल's picture

21 Apr 2012 - 7:08 pm | इरसाल

आवडले.
फक्त आकारामुळे तो पोळीचा लाडू आहे ह्यावर विश्वास ठेवणे कठीण जातेय.

फोडणीचा भात, फोडणीची पोळी, दुध गूळ पोहे,गोड पोळी, तुपाची बेरी,शिकरण ई. पदार्थ आठवले.
पोळीचा लाडू मस्तच! खायला हवा आता.

आमच्याकडे अलमोस्ट एकदिवसा आड होतो हा लाडू.
पण मी बदाम आणि वेलची नाही घालत.
नुसताच पोळीचा कुस्करा करुन, त्यात तूप पातळ करुन आणि गूळ खिसून घातले. आणि मिश्रण एकजीव करून लाडू वळते.
लेकाच्या ड्ब्यात स्नॅकसाठी देते.
हा लाडू एकदम.. डेसर्ट स्टाईल वाटतो आहे. मस्तच.

स्पंदना's picture

22 Apr 2012 - 10:34 am | स्पंदना

यातच थोडी खसखस भाजुन मिसळली तर पौष्टीक होतो. मी करते.
पण आमच्या इथे खाणारी मी एकटीच, त्यामुळे अति पौष्टीक होतय हल्ली.

फोटो अन सादरीकरण झक्कास .

पियुशा's picture

22 Apr 2012 - 11:40 am | पियुशा

मस्त !!! आवडता पदार्थ
फोटो जबरदस्त :)

पूनम ब जी , अतिशय मस्त दिसताहेत फोटो व रेसिपी.

अजुन एक मस्त रेसिपी

गरम दुध + साखर + गरम गरम कुसकलेली पोळी त्या गरम दुधात .