दोन दुर्मिळ पुस्तके परत.

मित्रहो,

ज्यांना या विषयात रस आहे त्यांनी ही पुस्तके जरूर घ्यावीत. (मी नाव नोंदवणार आहे.)

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी स्थापन केलेले भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे आपली १०१ वर्षांची वाटचाल पूर्ण केली. या कालावधीत मंडळाने अनेक् मान्यवरांची अनेक विषयांवरील पुस्तके, विविध शोधनिबंध त्रैमासिकांतून् इतिहास अभ्यासकांसाठी प्रकाशित केलेले आहेत.

डॉ.ग.ह.खरे हे प्रदीर्घ् कालावधीसाठी मंडळात कार्यरत होते. त्यांचा बहुविध अभ्यास सर्वांच्याच परिचयाचा आहे. नाणी, ताम्रपट्, शिलालेख तसेच फर्माने व कागदपत्रे इ.चे वाचन डॉ.खरे कित्येक वर्षे करीत होते. डॉ.खरे यांची जवळपास ५० पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत.

शताब्दी वर्षात मंडळाने ‘शिवचरीत्रप्रदीप’ व ‘संशोधकाचा मित्र’ ही दोन पुस्तके पुन:मुद्रित केली होती. त्याचप्रकारे मंडळ येत्या काही दिवसात डॉ.ग.ह,खरे यांनी लिहिलेली ‘मूर्तिविज्ञान’ व् ‘महाराष्ट्राची चार दैवते’ ही दोन पुस्तके पुन:मुद्रित् करीत आहे.

मूर्तिविज्ञान व महाराष्ट्राची चार दैवते ही दोन्ही पुस्तके अभ्यासासाठी व संदर्भग्रंथ म्हणून आजही वापरण्यात येतात व ही पुस्तके आता दुर्मिळ आहेत.

ह्या दोन्ही पुस्तकांचे मूल्य रु.८००/- असून् प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास मंडळातर्फे २५% सवलत देण्यात ये‌ईल. म्हणजेच रु.६००/- मधे नोंदणी करता ये‌ईल.

इच्छुकांनी मंडळामध्ये श्री.देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा.
भारत इतिहास संशोधक मंडळ
१३२१, सदाशिव पेठ, पुणे-३० फोन : ०२०-२४४७२५८१
वेळ सकाळी ८.३० ते ११.३० व दुपारी ४ .०० ते ८.०० (गुरुवारी साप्ताहिक सुट्टी)

मला वाटते भा.इ.स.मंला मदत म्हणूनसुद्धा ही पुस्तके घ्यायला हरकत नाही.

जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया

घेतोच आता!!!!!!!!!!!! धन्यवाद :)

घेणार.

धन्यवाद जयंतराव.

धन्यवाद...

आजच जात आहे.

आजच भारत इतिहास संशोधक मंडळात जाऊन पुस्तकासाठी नाव नोंदणी करून आलो.
डॉ. गजानन मेहेंदळे आणि डॉ. शोभना गोखले हया दोन महनिय व्यक्ती ग्रंथालयात बसल्या होत्या. अर्थात बोलण्याचे धैर्य काही मजला झाले नाही.

मंडळाच्या संग्रहालयाच्या आवारात पुण्यातील इस्लामिक आक्रमणात उद्ध्वस्त झालेल्या पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या दोन मंदिरांचे काही अवशेष ठेवलेले आहेत. त्यावरून ह्या मंदिरांच्या पूर्वीच्या वैभवाची कल्पना येते.

अरे त्यात काय बोलायचे ना त्यांच्याशी. ओळख करून देउ का ?

नक्कीच.
कधी जायचे बोला.

त्या म्य्युजीयम ला भेट द्यायचा मनावर घ्या की ! जयंत काकाना पण बोलवा .
आमास्नी कळल कायतरी

जाउयात लवकरच.

छान माहिती. धन्यवाद

अमोल केळकर

वल्ली मित्रा,

मूर्तिविज्ञान पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील तू काढलेला फोटो एकदम भारी दिसतोय.
पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी तू काढलेले छायाचित्र निवडले गेल्याबद्दल तुझे अभिनंदन
बाकी पुस्तकाच्या दर्जाबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

अरे वा ! वल्लीशेट मनःपूर्वक अभिनंदन !!!

नायतर काय आम्ही पहिल्यापासून म्हणतच होतो की तुमची चित्रे मस्त असतात ते :)

धन्यवाद.
बाकी हा धागा मधेच कसा काय वर आला?

माहितीबद्दल आभार.

अलिकडेच पुण्यातील अपरांत नावाच्या एका नविन प्रकाशन संस्थेने कै. डॉ. ग.ह खरे यांनी लिहिलेले शनिवारवाडा व कै. डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनी लिहिलेले देवगिरीचे यादव अशी दोन दुर्मिळ पुस्तके परत उपलब्ध करुन दिली आहेत.