रंगीत पेन्सिल्स - जॅपनीज क्रेन्स

The elaborate courtship dance of Japanese Cranes (From nature series book "Birds")
माध्यमः Prismacolor रंगीत पेन्सिल्स, ग्रॅफाईट पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर

लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

छान आले आहे. आवडले.
मूळ चित्र पाहिले आहे. त्यात मागे झाडे आणि जमिनीवर बर्फ आहे. तो परिणाम मात्र आला नाहीय. (ते सोपे नाही हेही खरेच..)
पक्षी थोडे लहान आणि पार्श्वभूमीवर झाडे किंवा पाणी दाखविले असते तर त्रिमिती परिणाम आला असता असे वाटते.
चित्रात एक तरी अन्य संदर्भ असेल तरच हे पक्षी चिमणी एवढे आहेत की बदका पेक्षा मोठे - हे कळेल.
पेन्सील ने डोक्याभोवती रंगवताना काहीवेळा गडबड झाली आहे. तुमच्याकडची मूळ इमेज मोठी केलीत तर हे लक्षात येईल.
अर्थात हे म्हणणे सोपे आहे, पण पूर्वी खूप चित्रे काढली आणि आता जमत नाही पण किती वेळ जातो माहीत आहे.
मात्र तुम्ही चित्रे काढताय ते कौतुकास्पद आहे..

चित्रकला येत नाही, पण काढलेल्या चित्रात मानेच्या व पायाच्या वेगवेगळ्या हालचाली मस्त दिसत आहेत. रंगसंगतीही आकर्षक आहे.
बरेच दिवसांनी पुनरागमन केलेत याचा आनंद झाला :)

पण काढलेल्या चित्रात मानेच्या व पायाच्या वेगवेगळ्या हालचाली मस्त दिसत आहेत.

अन्या, थँक्स रे! या अँगलने चित्राची नजाकत आणखी वाढली!
सुंदर चित्र!
और भी आने दो.

निव्वळ पेन्सिलींनी चित्रं तयार करताना काही मर्यादा येतात. खेडूत म्हणतात तसा झाड किंवा पाण्याचा परिणाम आणण्यासाठी मुख्य विषयाकडे दुर्लक्ष होऊ शकलं असतं. त्या मर्यादा जमेला धरून चित्र खूप छान आलंय!

अतिशय सुरेख चित्रे.

श्री. अन्या दातारांनी म्हंटल्याप्रमाणे मानेच्या आणि पायांच्या हालचाली विशेष चांगल्या आल्या आहेत.त्याने चित्राला एकप्रकारचा 'जीवंतपणा' आला आहे. अभिनंदन.

सुरेख......:)

धन्यवाद सर्वांना, हो खूप दिवसांनी आले इकडे :)
@खेडूत, पुस्तकातील मूळ फोटोमध्ये झाडे, पाणी नाहीत. पक्ष्यांची पार्श्वभूमी ब्लर्ड आहे पूर्णपणे. निळीच आहे. पाणी असू शकेल पण blurrinessमुळे अजिबात डीटेल्स दिसत नाहीत. हो जमिनीवर पांढरेशुभ्र बर्फ आहे ते नाही जमलंय. पार्श्वभूमी - आकाश, झाडे, जमिन वगैरे रंगवताना माझी कायम वाट लागते! असो. या प्रतिसादासाठी आभारी आहे. :)
असल्यास, तुमची चित्रे पहायला आवडेल.

मला देखील चित्रकलेतलं फार कळत नाही, तरीपण एक प्रकारची लय जाणवते आहे. धन्यवाद.

सुरेख चित्र.

वॉव !!!!!!!!!!!!

मस्त चित्र....

सगळे पक्षी प्रभात फेरीला निघाले असून पहिला म्होरक्या एकदम नाना पालकरांचे श्लोक वगैरे म्हणत असावा अशी शंका येत आहे. ;)

सुंदर ! :)

सुंदर आणि नीटनेटकं :-)

मस्त जमलेय .. अगदी असे वाटतेय कि सर्वात पुढ्चा क्रेन तुकडिचा म्होरक्या आहे आणी तो म्हणतोय .. " आ~गे....बढो ! " अन बाकिचे त्याच्या मागे हुकुमाची अमंलबजावणी करत चालले आहेत :)
(कोर्ट्शीप डान्स का म्हणत असावेत बुवा याला ?? )

अ प्र ति म ......... !!
खूप खूप आवडलं :)

मूळ चित्र बघायला मिळाले असते तर अजून मला आली असती.

साधारण असे काहीसे असावे :-

चित्रकलेत रिअ‍ॅलिस्टिक आणि इंप्रेशनिस्ट असे दोन प्रकार आहेत. रिअ‍ॅलिस्टिक म्हणजे फोटोसारखं भासणारं चित्र आणि इंप्रेशनिस्ट म्हणजे कमीतकमी रेषात दृष्याची जास्तीतजास्त प्रभावी मांडणी. तुमचं चित्र इंप्रेशनिस्ट स्टाइलचं आहे, रेषेत नजाकत आहे आणि चित्राच्या तोलाचं तुम्हाला ज्ञान आहे, लगी रहो!

.........................चित्रकलेत रिअ‍ॅलिस्टिक आणि इंप्रेशनिस्ट असे दोन प्रकार आहेत..........

अधिक माहितीसाठी खालील लेख वाचण्याची शिफारस करतो:

जाणिजे चित्रकर्मः
http://misalpav.com/node/18741

चित्र आवडले.

मस्त आहे चित्र. छानच. आणि अन्याशीही पूर्णपणे सहमत :)

सुरेख चित्र!! आणखीही येऊ दे.

सुंदर आले आहे चित्र... :)

फार आवडलं. एकदम ग्रेसफुल.

या चित्राची लज्जत त्यातील 'वर्णनात्मकता' आणि 'केवलता' (वा अमूर्तता) यांचे मधे कुठेतरी असण्यात असावी, असे वाटते.
संदर्भः http://misalpav.com/node/18741
परा यांनी दिलेला फोटो संपूर्ण पणे 'वर्णनात्मक' असा आहे. असेच्या असे चित्र काढण्यात फारशी गंमत नाही, अश्या फोटोचा संदर्भ घेऊन त्याआधारे द्विमित चित्राची रचना करताना 'केवल' कलेचे काही गुण वा निकष यांचा विचार करून चित्र करण्यात वेगळी मजा असते.

उदा. वर्षा यांच्या चित्रात प्रामुख्याने निळा व काळा (आणि अर्थातच कागदाचा पांढरा) रंगच आहेत, तरी पार्श्वभूमीच्या निळ्या रंगात कमिजास्त दाबाने व विविध दिशेने पेन्सिल वापरण्यातून, आणि कागदाच्या अंगभूत पोतामुळे आलेला खडबडीतपणा, पक्षांमधील कमिजास्त अंतर, त्यांच्या माना व पायांच्या आकारातील फरक व साम्य, पांढरा, काळा व निळा या रंगांचे चित्रातील 'वाटप'... वगैरे केवलात्मक गुण म्हणता येतील.

पक्षांच्या पायांमागे त्यांची किंचितशी सावली दाखवली, तर या चित्राला जास्त पूर्णत्व येउ शकते, म्हणजे खालची जमीन अगदी ओकीबोकी वाटते, त्यात काहीतरी हवे, या दृष्टीने, तसेच यामुळे पक्षी 'पुढे' जात आहेत, असा गतीचा आभास पण होइल.

सर्वांना धन्यवाद.
चित्रगुप्त, तुमची चित्रे पाहिली. तुमच्यासारख्या चित्रकाराने म्या पामराच्या चित्रावर प्रतिसाद द्यावा हे माझं भाग्य! थँक्यू सो मच!
मी सावली दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता पण जमले नाही. तसंच मला बर्फही अजिबात जमलेलं नाहीये. :(