गर्द नजरेची नार..

अभिजीत राजवाडे's picture
अभिजीत राजवाडे in जे न देखे रवी...
10 Apr 2012 - 9:58 pm

गर्द नजरेची नार
जणु चांदण्याची धार
होता पैंजणांचा वार
सार डोलतं शिवार

कधी उसळता ज्वार
कधी बावरी ती खार
चिंब मोगर्‍यांचे हार
हसु तिचं वाहणारं

उंच उडणारी घार
जशी तेज तलवार
करी नजरांचे भार
एका नजरेत गार

गर्द नजरेची नार
काय शब्द बोलणारं
तिच्या नजरेतं सारं
माझ्या मनातलं सार

शृंगारकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Apr 2012 - 4:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आवडली.

यकु's picture

11 Apr 2012 - 4:17 pm | यकु

यालाच वग म्हणतात काय?
संपेसंपेपर्यंत ढोलकीची टिप आणि घुंगरांचा खणखणाट ऐकू येणार की काय असे वाटत होते
मस्त!

प्यारे१'s picture

11 Apr 2012 - 4:28 pm | प्यारे१

वग वेगळा!
तमाशामध्ये आधी नाटकात असते तशी नांदी, श्रीवंदना, गण गौळण, बतावणी नंतर टाईमपास वगैरे असतो. मध्यंतरानंतर एक छोटे करमणूक प्रधान नाटुकले असते त्याला वग म्हणतात!

वरची लावणी छानच जमलीये. यकुंच्या भा. पो.

खुप खुप आभार!!