टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
आजकालच्या न्यूज चैनलची ठासाळलेली गुणवत्ता बघता, सर्वात गचाळ न्युज चैनल कोठले असा विचार पडतो...त्यावर आपले मत घेवू इच्छ्तो.
प्रेषक अमितकुमार ( शनी, 06/14/2008 - 11:59) .
आज तक / तेज
54% (20 votes)
स्टार न्यूज
3% (1 vote)
इन्डिया टिव्हि
32% (12 votes)
लाईव
5% (2 votes)
झी न्युज
5% (2 votes)
एकुण मतं : 37
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

आरुषी
आरुषी मर्डरकांड तथा इतर काही बातम्यामध्ये वरील पाचही न्युज चॅनल गचाळ वागले.. ह्याचवर विश्वास ठेऊ नये ह्या मतावर मी आलो आहे.
राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी...
मला तर
मला तर वाटते कि सगळेच गचाळ आहेत.
सगळेच टुकार
आहेत.
तद्दन फिल्मी बातम्या देतात. गांभिर्य राहिल नाहिये बातम्यामधे आता.
आधी ७ च्या बातम्या लागल्या की आम्ही पोरदेखील हे काहितरी महत्वाच आहे म्हणुन कोणी न सांगताच अळि मिळी करुन बसत असु. भले त्या बातम्यामधल काही कळो न कळो आणि त्या कितिही न आवडो
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
एका माळेचे मणी
सब घोडे बाराटक्के. सगळ्या व्रुत्तवाहिन्या सार ख्याच.
सग्ळेच
सग्ळेच वाईट्ट चॅनल आहेत...क्रम लावून पाहतो...
आय बी एन ७ विसरलात काय?
इन्डिया टीवी
आय बी एन ७
तेज आज तक
स्टार न्यूज
झी न्यूज
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
सगळ्यात
सगळ्यात चांगले डिडि न्युज, सी ऐन ऐन, बी बी सी
आणी याहु न्युज, द हिन्दु, ईन्डियन ऐक्सप्रेस
उडदामाजी . . . . .
हे काय भलतेच सांगितलेत? अहो, उडदामाजी काळे - गोरे कसे काय निवडायचे ?
त्यातल्या त्यात बरे
एन डि टि व्हि इंडिया
सी एन बी सी
डी डी न्युज इज द बेस्ट
@
इन्डिया टि व्हि
सगल्यात पकाउ
रजत शर्मा ,लोका सान्गे ब्रम्हद्यान आपुन कोरडा पाषान !
अमितकुमार,
अमितकुमार, इथे अजून एक पर्याय ठेवा. 'सगळेच चॅनेल्स' असा. म्हणजे मग या कौलात मत देता येईल.
बिपिन.
अमितकुमार,
अमितकुमार, इथे अजून एक पर्याय ठेवा. 'सगळेच चॅनेल्स' असा. म्हणजे मग या कौलात मत देता येईल.
सहमत आहे....
तात्या.
+१
सगळेच रद्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द...................................द्द्द्द्ड
नाना
वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील
सगळेच
सगळेच न्युज चॅनल एक नंबरचे रद्दड आहेत,,
इश्मीत सिंह च्या मृत्यु ची बातमी देणार्या एका वृत्तवाहिनीने तर सरळ त्याच्या वडीलांना फोन लावला...या प्रसंगा सुद्दा त्यांना त्यांची प्रतिक्रिया घ्यावी वाटली की त्यांच्या मुलाचा मृत्यु नेमका कसा झाला... या वाहिनी ला कुठल्याच घटनेचे भान राहत नाही हे दिसुन आले..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
१००% मान्य
मदनबाण, आपले म्हणणे १००% मान्य. सर्वच चॅनेल रद्दड आहेत.
असेच काही संतापजनक किस्से सांगतो:
१)कंदाहार विमान अपहरण प्रकरणात दहशतवाद्यांनी गुरगावच्या रुपीन कट्यालची हत्या केली. रुपीन आपली पत्नी रचनासह मधुचंद्रासाठी नेपाळला गेला होता आणि ते विमानाने परत येत होते.त्या विमानाने अमृतसर, दुबई मार्गे कंदाहार गाठले.दरम्यान रुपीनचा मृतदेह दुबईहून भारतात आणण्यात आला.रचना कंदाहारला अडकून पडलेली असताना तिच्या दोन भावांनी शवपेटी दिल्ली विमानतळावर सरकारी सोपोस्कार झाल्यानंतर ताब्यात घेतली. आणि त्यानंतर एन्.डी.टी.व्ही. चॅनेलवरील दीडशहाण्या वार्ताहारांनी रचनाच्या एका भावाला फोन लाऊन 'आता या क्षणी आपली प्रतिक्रिया काय' असा संतापजनक प्रश्न विचारला होता.
२)मागे इराकमध्ये काही भारतीय नागरीकांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते.त्यांची नंतर सुटका झाली.पण त्यांची सुटका व्हायच्या आधीच 'सबसे तेज' बातम्या देण्याच्या उद्देशाने 'इराकमध्ये अपहृत भारतीयांची सुटका' ही बातमी सत्यपरिस्थितीची पडताळणी व्हायच्या आधीच प्रसारीत केली. आता बोला.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
अतिशय
अतिशय टुकार आहेत आज तक, इंड्या टीवी, स्टार न्युज सारखे चॅनल्स. ह्यांनी दाखवलेल्या काही ब्रेकिंग न्युज पहा:
१) छज्जे पर फसी बिल्लो रानी (एक मांजर)
२) राहुल ने दाल पुरी और सब्जी खायी
३) अमिताभ बच्चन को ठंड लगी.
४) अमिताभ बच्चन ने लेमन ज्युस पिया.
५) कमिशनर साहब का कुत्ता मिला. २५ मार्च से हुआ था लापता.
६) रात के अंधेरे मे प्याज मांगती है चुडैल.
७) नाग लेगा नागिन के मौत का बदला...
http://sucheltas.blogspot.com
व्वा !!!
व्वा !!! क्या बात है? अश्या हेडलाईन्स द्यायला सुद्धा बुद्धि तल्लख लागते महाराजा...
मला आवडलेल्या टॉप ३...
१) रात के अंधेरे मे प्याज मांगती है चुडैल.
२) कमिशनर साहब का कुत्ता मिला. २५ मार्च से हुआ था लापता.
३) छज्जे पर फसी बिल्लो रानी (एक मांजर) (बहुधा ते नविन गाणे 'बिल्लोरानी कहो तो अपनी जान दे दू' याच बिल्लोराणी ला उद्देशून असेल)
बिपिन.
न्यूज एक्स
आपल्यापैकी कोणी न्यूज एक्स पहात नाही असं वाटतंय. मला हा चॅनल आवडतो. ही घ्या त्यांची वेबसाईट.
मी काही फार नाही पहात टी.व्ही., पण जेवढा वेळ जेवते तेवढा वेळ बातम्या याच चॅनलवर पहाते. तिथे एकूणच भडकपणा फारच कमी आहे (किंवा नाहीच आहे). उगाच अंगावर येणारे स्पेशल इफेक्टस पण नाही दिसत. मी गेले ३-४ महिनेच टी.व्ही. पहात आहे, पण त्यात मला हा चॅनल acceptable वाटला.
यमी
सर्वच रद्दड...!
सगळेच तद्दन फालतू आहेत.
"आरुषि अच्छी लडकी थी....सी बी आय" .... अशी ब्रेकिंग न्यूज होते ?...
कल्पना चावला गेल्याच्या दिवशीही त्यांच्या घरच्यांची प्रतिक्रिया विचारणारे हे
टी आर पी च्या स्पर्धेत अक्षरशः "टाळूवरचे लोणी" खाऊ पहातात.
आपले "सदाशिव दीक्षित आपल्याला बातम्या देत आहेत"
किंवा "प्रवाचिका विजयश्री:"....कुठे हरवले बरे ?
प्रदीप भिडे, सरिता सेठी, डॉली ठाकूर्....सुद्धा छान होते.
मी अजूनही कित्येकदा रेडिओवरच्याच बातम्या ऐकतो. त्यानंतर डी डी चॅनेल्स्...अजून तरी तितके बहकलेले नाहीत.
पण या न्यूज चॅनेल्स वर कोणताच कायदा बंधनकारक नसतो का ?