तुझ्या प्रेमात सजणा

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जे न देखे रवी...
4 Apr 2012 - 9:00 am

जवळ असूनही तुझ्यापासून मी खूप दूर आहे
राहवत ना मुळी म्हणून ऐकवते हा सल आहे

तुझ्या प्रेमात सजणा, झाले मन हे किती बेज़ार
कोणी पाहो वा ना पाहो ईश्वर पाहतो आहे

अंतरी तुझी मूर्ती स्थापित, झाली जेव्हापासून आहे
शप्पथ एकही रात्र न मला, झोप लागली फार आहे
हवा हवासा दर्द आहे,
निश्वासही माझा सर्द आहे,
चेहराही माझा जर्द आहे,
न कळे कुठला रंग रंगवे तुझी पाहणे वाट

तूच माझा जीव आहेस, तू ची आहेस प्राणही
मला मिळावास तू, हीच मनात एकची आसही
संगतीस तू साथ हो,
काही मना-मनाची बात हो,
गुजगोष्टी दिलखुलास हो,
गाणीही गावी प्रेमाची छेडावी मनची तार

ओवाळीन मी जीव तुझ्यावर, भग्न हृदय हे सांध तू
नजरांमधला दूर दुरावा नजरेने कर पार तू
दुर्लभदर्शन आज आहेस
का भेटीलाही महाग आहेस
मनही दुःखातच आज आहे
अशीच क्रंदत राहीन जोवर दर्शन ना होणार

पुरूषाची अवस्था प्रेमात वाईट होते. तो विरहाने व्याकूळ होऊन जातो. अशी वर्णने आपण वाचतो.
मात्र स्त्रीही अगदी कशी जार-जार होऊन जाते ह्याचे वर्णन शकील बदायुनी ह्यांनी केले. तेव्हा ही कविता निर्माण झाली.

हा मराठी आविष्कार मात्र माझाच आहे. आशा आहे की तुम्हाला आवडेल.

http://anuvad-ranjan.blogspot.in/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

शृंगारकवितामौजमजा

प्रतिक्रिया

पैसा's picture

4 Apr 2012 - 10:57 pm | पैसा

(तेरे प्यार में दिलदार जो हैं मेरा हालेजार, कोई देखे या ना देखे अल्ला देख रहा है)

यावेलेला मात्र त्या मीटरमधे झालं नाही ना!

नरेंद्र गोळे's picture

8 Apr 2012 - 9:02 am | नरेंद्र गोळे

पैसाताई, प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

http://anuvad-ranjan.blogspot.in/2012/04/blog-post.html इथे तुलना करता येईल.

http://www.youtube.com/watch?v=C1blmP-gaSY इथे पाहता येईल.

मग कदाचित मत बदलले तर सांगा!