द अंडरटेकर!

चैतन्य गौरान्गप्रभु's picture
चैतन्य गौरान्गप्रभु in जनातलं, मनातलं
26 Mar 2012 - 4:09 am

बास! शिर्षक वाचल्यावरच अनेकांचा थरकाप उडेल. अनेकांना आश्चर्य वाटेल. अनेकांना उत्साह वाटेल. आणि अनेकांना विचित्रही वाटेल. मात्र 'कोण हा अंडरटेकर?' असा प्रश्न कुणालाच पडणार नाही. रेसलींग या नावानं प्रसिद्ध असलेली कुस्ती तुम्हाला आवडत असेल अथवा नसेल, आणि डब्ल्य़ुडब्ल्य़ुएफ (किंवा आता डब्ल्य़ुडब्ल्य़ुई) अनेक वर्षांपासुन पाहिले असेल अथवा नसेल; परंतु 'अंडरटेकर' हे नाव आणि हे व्यक्तीमत्त्व याबद्दल काहिच कल्पना नाही; असा माणुस सापडणे विरळाच! आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रालाच आपल्या नावानं ओळखलं जाण्याचं सौभाग्य एखाद्याच सचिन तेंडुलकरला मिळतं आणि एखाद्याच अंडरटेकरला!

मार्क विल्यम कॉलॉवे. हे नाव फारसं कुणाला माहिती असण्याचं काही कारण नाही. १९९० मध्ये, वयाच्या साडेचोविसाव्या वर्षी डब्ल्य़ुडब्ल्य़ुएफ रेसलींगच्या रिंगमध्ये 'द अंडरटेकर' या नावाने पाय ठेवल्यापासुन मार्क कॉलॉवेनं जगाला सगळंकाही विसरायला लावलंय, अगदी स्वतःचं खरंखुरं नावही. रेसलींग न बघणा-यांसाठी तो एक 'भयावह पहेलवान' आहे. फॅन्ससाठी तो सर्वात मोठा 'ईंटरटेनर' आहे, आणि व्यावसायिक रेसलींगच्या क्षेत्रात आज 'द अंडरटेकर' हे दैवत आहे. जगभर 'व्यावसायिक रेसलींग' जाणणा-या आणि ना जाणणा-या आबालवृद्धांकरिता या क्षेत्राचा शुभंकर बनलेल्या 'अंडरटेकर' ने कालच (२४ मार्च) आपला छेचाळीसावा वाढदिवस साजरा केला.

खरं म्हणजे अंडरटेकरचा 'बि-लेटेड' हॅपी बर्थडे हा एप्रिल महिन्याच्या पहिल्या रवीवारी होणा-या डब्ल्य़ुडब्ल्य़ुईच्या वर्षातल्या सगळ्यात मोठ्या 'रसलमेनिया' नावाच्या स्पर्धेमध्ये दरवर्षी आपोआपच साजरा होत असतो. कारण गेल्या एकोणविस वर्षापासुन या स्पर्धेत अंडरटेकरने पराजय पाहिलेला नाही. या वर्षीच्या रसलमेनियामध्ये जेव्हा स्टेडिअम अंधारात बुडून जाईल, दूरवरच्या स्मशानातलं मोठठं घड्याळ एकामागुन एक बारा ठोके देइल, गुढ निळसर प्रकाशकिरणांनी आसमंत भारला जाईल, आणि पांढ-या धूराच्या लोटांमधून काळे कपडे घातलेला सहा फुट दहा ईंचाचा, एकशे छत्तीस किलोचा 'द अंडरटेकर' धिम्या गतीने एक एक पाऊल टाकत रिंगमध्ये पदार्पण करेल तेव्हा त्याच्या खांद्यावर स्मशानातल्या हाडं गारठवीणा-या थंडीपासुन बचाव करणारा काळा कोटच नव्हे, तर आपल्या विजयामालीकेमध्ये आणखी एका वर्षाची बेरीज करून २०-० असा स्वतःचाच विश्वविक्रम करण्याची महाजबाबदारीही असेल. त्याचा खेळ आणि त्याचा विजय पाहू ईच्छीणा-या जगभरातील कोट्यावधी चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझंही असेल. आणि त्याच्या खेळावर कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणुक केलेल्या व्यावसायिक रेसलींग जगताच्या आर्थीक उलाढालीचा सगळा खेळही असेल. 'द अंडरटेकर' अर्थात मार्क कॉलोवे गेल्या पंचवीस वर्षांपासुन हा सगळा 'खेळ' समर्थपणे खेळतोय.

मात्र पंचविस वर्षापुर्वी मार्कला हा खेळ मुळीच खेळायचा नव्हता. अमेरिकेल्या प्रत्येक उंचपु-या आणि धिप्पाड मुलाचं जे एकमेव स्वप्न असतं तेच त्याचंही होतं - बास्केटबॉल! ह्युस्टन (टेक्सास) मधल्या कॅथरीन आणि फ्रॅंक कॉलॉवे या उच्च मध्यमवर्गीय दाम्पत्याच्या पाच मुलांपैकी मार्क हे शेंडेफळ. बास्केटबॉलचं जीतकं वेड तीतकंच कौशल्यही भारीच. ल्युफकिनमधील सन्मानाच्या ऍजेलीना कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला तोच मुळी बास्केटबॉलच्या शिष्यवृत्तीच्या भरवश्यावर! मात्र नियतिच्या मनात वेगळंच काही होतं. कॉलेजमध्ये एक एक पराक्रम करणा-या मार्कचा मैदानातच भयंकर अपघात झाला. टोंगळा असा काही दुखावला, की मैदानातून बाहेरच जावं लागलं. पुढची अनेक वर्षे या दुखापतीतून सुटका होणार नव्हती. मग दूसरं काहीतरी करायचं ठरलं.

त्या वेळी रॉड्रीक मॅकमॅहॉन यांनी अमेरीकेत सुरू केलेल्या व्यावसायिक रेसलिंगचं चांगलंच पेव फुटलेलं होतं. बॉक्सींग, मिक्स्ड मार्शल आर्ट, आणि बेबंद मारामारी या सगळ्यांचा संगम असलेली ही विचित्र स्पर्धा. त्यातही ग्लॅमर, अभिनय, माईंड गेम ईत्यादी यायला हवं अशी व्यवस्था केलेली. आपल्या नावाने लढता यायचं नाही. कुठलंतरी पात्र रंगवा. त्या पात्राच्या रूपाने लढाई करा. त्याला जींकवा, त्याला हरवा, असा हा खेळ. एकोणीस वर्षाच्या मार्कने या क्षेत्रात पाउल ठेवलं. अनेक नावं आणि अनेक पात्रं रंगवली. काही लढती जिंकल्यादेखील. व्यावसायिक रेसलींगचे सामने घेणा-या अनेक कंपन्या त्याने बदलवल्या.

१९८०-९० चा तो काळ होता. 'डब्ल्युडब्ल्युएफ' या सगळ्यात मोठ्या कंपनीशी पहिला करार झाला. व्हिन्सेन्ट मॅकमॅहॉन त्या वेळला आपल्या वडिलांची कंपनी सांभाळत होता (आजही सांभाळतो आहे.) त्याच्या सुपिक डोक्यातून उंचपु-या मार्कसाठी एका पात्राचा जन्म झाला. आजवर असं पात्र रेसलींगच्या रिंगमध्ये आलंच नव्हतं. जुन्या काळातील ख्रिश्चन स्मशानभुमीमध्ये राहणारा, तीथली कबर खोदण्यापासुन सगळी व्यवस्था पाहणारा म्हणजे अंडरटेकर! मुळात कल्पनाच भयावह. थेट स्मशानातून, ते रहस्य, ते गुढ, आणि त्या कपड्यांसह आलेला, तांत्रीक, अघोरी शक्तींनी परिपुर्ण असा अंडरटेकर! रिंगमध्ये पहिली एन्ट्री घेतल्या दिवसापासुन ते आजतागायत 'द अंडरटेकर' ची हीच ओळख कायम आहे. त्याच्या अनेक दंतकथा बनल्या. तो मरून परत आलाय. त्याला जीवंत गाडलं तरीही तो परतला. त्याला जाळल्यावरही तो जीवंत राहिला. तो अचानक प्रगट होतो. अचानक गायब होतो. आणि ईतरही अनेक! अर्थात हे सगळं लोकांनी रेसलींग पहावं म्हणुन विणलेलं जाळं. अगदी त्याचं मुळही 'ह्युस्टन' नसुन 'डेथ व्हॅली' असल्याचं सांगुन, त्याच्या शेवटच्या वाराला 'लास्ट राईड' आणि 'टॉम्बस्टोन' अशी नावं देऊन, त्याच्या व्यक्तीमत्त्वाभोवतीचं मृत्युचं मळभ आणखीच दाट करण्यात आलं.
मार्क कॉलॉवे मात्र त्यात चपखल बसला. विस वर्षांच्या वाटचालीत सगळ्याच चॅंम्पियनशिप्सचे बेल्टस त्याने आपल्या कंबरेभोवती गुंडाळले, जवळपास सर्व मोठमोठ्या लढवैय्यांना धूळ चारली. अगदी आपल्या भारतातून तीकडे गेलेल्या महाकाय ग्रेट खलीलाही हरवलं. या सर्व चॅम्पीअनशिप्सपेक्षा 'द अंडरटेकर' हे नाव केव्हाच वरच्या पातळीवर पोचलं. तो त्याच्या खेळाचा राजदूत बनला.

मात्र या भितीदायक पात्राचा कधीकधी कंटाळाही येऊच नये का? तसा तो मार्कलाही आला. खासकरून दोन गोंडस मुलींचा बाप झाल्यावर असले डोळे पांढरे करणे, भुताचे खेळ करणे त्याला नकोसे वाटू लागले. म्हणुन मग त्याने अमेरिकन बॅड ऍस नावाचं एक पात्र जगायला सुरूवात केली. मोटरसायल चालवण्याची त्याला भारी आवड. मोटरसायलचं एक मोठं कलेक्शनच त्याच्याकडे आहे. त्यातूनच एक गाडी काढून थेट गाडीवर बसुनच त्याने रिंगमध्ये जाणं सुरू केलं.

मात्र जुन्या अंडरटेकरची आठवण कुणालाच पुसता आली नाही. २००४ मध्ये आपल्या जुन्या रूपात त्यानं पुनरागमन केलं. त्यानंतर आजपर्यंत 'डेडमॅन' रेसलींग जगतावर राज्य करतो आहे. रेसलींगच्या चाहत्या तरूण वर्गासाठी 'अंडरटेकर' म्हणजे स्फुर्ती, शक्तीचं स्थान आहे. अमेरिकेच्या स्थलसैन्यामधील सैनिकांना प्रोत्साहन म्हणुन त्यांच्याबरोबर थेट छावणीत जाऊन राहणारा; महाविद्यांलयांमध्ये जाऊन बास्केटबॉलचे धडे देणारा, आणि रेसलींगच्या रिंगच्या बाहेर आल्यावर वाचन, सिनेमा, बॉक्सींग, रेसिंग ईत्यादींची आवड बाळगणारा, अतीशय नर्मविनोदी आणि हसतमुख व्यक्तीमत्त्वाचा अमेरिकन मध्यमवयिन माणूस ही मार्क कॉलॉवेची खरी रूपं आहेत. रेसलींगव्यतीरिक्त स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीचा त्याचा व्यवसायही आहे. अर्थात भागीदारीमध्ये. कारण सेलीब्रिटी असल्यामुळे मार्क स्वतः डिल फिक्स करायला जाऊ शकत नाही. मात्र मागे एकदा एंजेलीना जॉली आणि ब्रॅड पिट यांना एक अपार्टमेन्ट विकलं, तेव्हा तो स्वतः कागदपत्रं घेऊन गेल्याचं अमेरिकेल्या नियतकालिकांनी प्रकाशीत केलं होतं.

शरीर साथ देतंय तोवर रेसलींग रिंगची मजा आहे, हे मार्कला ठाऊक आहे. त्यामुळेच त्याचा फिटनेस कमालीचा आहे. आजही दिवसातले सहा तास तो जीममध्ये असतो. ज्या वयात अनेकजण या जीवघेण्या खेळातून निवृत्ती पत्करून समालोचक किंवा मॅनॅजर होतात, त्या वयात तो त्याच्या करिअरच्या सर्वात देदिप्यमान शिखरावर पोचलेला आहे. कदाचित येत्या रवीवारी २०-० चा विश्वविक्रम काबीज करून तो शतकांची शंभरी पुर्ण करणा-या सचिनसारखा 'आभाळाएवढा'ही होउन बसेल.

समाजजीवनमानतंत्रराहणीविचारसद्भावनालेखसंदर्भप्रतिसादअभिनंदनबातमीशिफारसचौकशीमाध्यमवेधमदतमाहितीसमीक्षाभाषांतर

प्रतिक्रिया

संपत's picture

26 Mar 2012 - 10:16 am | संपत

चांगला लेख. ह्या निमित्ताने रेसलिंगबद्दल अधिक माहिती मिळवायला आवडेल. सर्वसाधारण समाज आहे कि ह्या सर्व लढती ठरलेल्या असतात. मग अंडरटेकरचे महत्व काय? तसेच त्याच्या एकमेकांना फारशी इजा न करता मारण्याच्या पद्धतीबद्दल एक लघुपट पहिला होता. त्या विषयीदेखील अधिक माहिती आवडेल.

चैतन्य गौरान्गप्रभु's picture

27 Mar 2012 - 3:52 am | चैतन्य गौरान्गप्रभु

आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. हल्ली या मॅचॅस ठरवून खेळलेल्या असतात. सर्वेमध्ये घेतलेल्या चाहत्यांच्या मताधिक्यांवरून त्याचा निर्णय ठरवला जातो आणि मग तो नाट्यपुर्णरित्या समोर आणला जातो. मात्र आता ही या खेळाची पद्धत झाली आहे. यातील मारामारी, खुनखराबा आणि हिंसाचार एक एक्शनपट म्हणुन पाहिला आणि त्यातील नाट्य़पुर्णतेचा आनंद घेतला तर रेसलिंग हे एक चांगले मनोरंजन आहे.

दिपक's picture

26 Mar 2012 - 10:26 am | दिपक

अंडरटेकर च्या रेसलींग आयुष्याचा छान आढावा. शाळेत असताना डब्लुडब्लुएफ चा फॅन होतो. १-२ वर्षापुर्वी ह्या रेसलींगवर आधारीत The Wrestler हा अप्रतिम चित्रपट पाहिला होता. तेव्हा ह्या पैलवानांची दुसरी बाजूही समजली होती.

(शॉन मायकेलचा फॅन)
दिपक

बॅटमॅन's picture

26 Mar 2012 - 10:41 am | बॅटमॅन

ओहो!!!!!!!! अंडरटेकर, स्टोन कोल्ड, आणि रॉक ही त्रिमूर्ती डब्ल्यू डब्ल्यू एफ च्या इतिहासातील अजरामर पात्र आहे हे नि:संशय. लहान असताना अंडरटेकरबद्दल काय त्या आख्यायिका ऐकल्यात वा वा वा....त्याचा जीव त्या एका भांड्यात आहे, तो मरून पुन्हा जिवंत होतो, इ.इ.इ. लै खतरी वाटायचे सगळे.
आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ खरे'च' आहे , याबद्दल इतका वाद घालायचो मोठ्या लोकांशी की बस...त्या अविस्मरणीय कालखंडाची आठवण करून दिल्याबद्दल १०००शः धन्यवाद!!!!!!

अवांतरः

सर्वात फेव्हरीट रेस्लर्स उतरत्या क्रमाने:

स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन, द रॉक, आणि द फीनॉम, द डेड मॅन दि अंडरटेकर!!!

त्यात पण स्टोन कोल्ड विरुद्ध रॉक ही लढत केवळ अप्रतिम व्हायची. ट्रिपल एच आणि त्याच्या गोतावळ्याला रॉक ने कसे धुतले, तेपण लै खत्री होतं. चैतन्यजी तुम्हाला विनंती आहे की बाकी डब्ल्यू डब्ल्यू एफ बद्दल पण एक डीटेल लेखमाला येउन जाऊदे..

** And that is the bottom line, 'coz Stone cold said so!!!(3:16) (सोबत काचा फुटल्याचा मोठ्ठ्ठ्ठा आवाज)

चैतन्य गौरान्गप्रभु's picture

27 Mar 2012 - 3:57 am | चैतन्य गौरान्गप्रभु

मी देखील एके काळी डब्ल्य़ु डब्ल्य़ु ई चा हृदयपुर्वक चाहता होतो. आजही मला त्यातील नाट्यमयता, या लढवैय्यांची अभिनयक्षमता, त्यांची स्क्रिप्ट-राईटिंग, ईत्यादी आवडते. या क्रिडामनोरंजन क्षेत्राबद्दल आपल्याकडे खुप गैरसमज आहेत. आपण सुचवल्याप्रमाणे वेळ मिळेल तसे यावर नक्कीच लिहीन. बाकी प्रतिसाद झकासच! माझा आवडता रेसलर आजही 'ट्रीपल एच' आहे. ख-याखु-या आयुष्यात त्याने डब्ल्य़ु डब्ल्य़ु ई चा मालक 'व्हिन्स मॅकमॅहोन' चा जावई होण्याची किमया करून दाखवलीय ना!!

अपूर्व कात्रे's picture

26 Mar 2012 - 11:18 am | अपूर्व कात्रे

छानच माहिती.............. अंडरटेकरने एवढे पराक्रम केलेत हे माहितीच नव्हते. बाकी त्याला पुरल्यानंतरही तो परत वर आला ही ष्टोरी लहानपणी मित्रामित्रात आश्चर्याने चघळायचो.

(लहानपणी हल्क होगनच्या मिशीचा आणि टाटान्काच्या पुढच्या लाल केसांचा जबरदस्त fan असलेला)
अपूर्व कात्रे

बॅटमॅन's picture

26 Mar 2012 - 12:31 pm | बॅटमॅन

१. स्टोन कोल्ड ची बीअर पिण्याची आणि मधले बोट दाखवण्याची स्टाईल, त्याचे म्यूझिक.
२. रॉक ची भुवई उडविण्याची तसेच रॉक बॉटम आणि पीपल्स एल्बो देण्याची स्टाईल,त्याचे म्यूझिक.
३. अंडरटेकर चा चोकस्लॅम, टोंब्स्टोन पाईल ड्रायव्हर, आणि ती मंद चाल आणि ते डोळे...व त्याचे म्यूझिक.
४. रिकिशी फाटू ची "ती" स्टाईल ;)
५. हार्ट ब्रेक किड शॉन मायकेल्स चे म्यूझिक, त्याची ती फेव्हरीट किक..
६.हल्क होगन ची बनियन फाडण्याची स्टाईल.
७.केन चे म्यूझिक आणि हात वर केले की रिंगणातून अशी आतिषबाजी व्हायची..सोबत त्याचा मास्क पण..
८. ट्रिश , टोरी विल्सन, चायना, सेबल, लिटा, इ.इ. महिलावॄंद आणि त्यांच्या अदा.
९. ट्रिपल एच, रिक फ्लेअर प्रभृती लोकांचे म्याच चालु असताना मध्येच येउन मारामारी करणे.
१०. मानवजात ऊर्फ मॅनकाईंड ऊर्फ मिक फोली यांचा सॉको.
११. बिग शो, खली, मार्क हेन्री, योकोझुना इ. हेवीवेट्स..
१२. जिम रॉस आणि जेरी द किंग लॉलर हे नेहमी हायपर होणारे आणि गेल्या ३० वर्षांपासून असणारे कॉमेंटेटर्स...

या आणि इतर अगणित गोष्टी....बालपण (शारीरिक आणि मानसिक)लै सुखात गेले आणि जाते आहे अशा गोष्टींमुळे...:)

अक्षया's picture

26 Mar 2012 - 11:45 am | अक्षया

लेख आवडला... :)

पहिल्यांदाच रेसलिंगबद्दल इतकी माहिती वाचली..

मनराव's picture

26 Mar 2012 - 12:45 pm | मनराव

लेख वाचता वाचता लैच मागे जाऊन आलो..

जो पर्यंत WWF नाव होतं तो पर्यंत नियमीत पाहल्याचे आठवते.....WWE झाल्यानंतर तो नाद सुटला.....

सर्वात आवडता होता स्टोन कोल्ड स्टिव ऑस्टीन आणि त्याचा तो स्टन्नर....
तो स्टन्नर करताना जाम भारी वाटायचं पहायला.

WWF च वेड इतकं होतं कि ब्रेडच्या पाकीटात पण सगळ्या लोकांचे फोटो येत होते....आणि ते जमवण्याचा छंद होता बर्‍याच जणांना (त्यात मि सुद्धा :) )

वर बॅटमॅन ने बरीच नावं सांगितली आहेत. त्यात आणखी एक भर घालावीशी वाटते ति योको़झुनाची.
केवढा आडदांड माणुस होता.

(स्टोन कोल्ड चाहता) मनराव.....

आत्मशून्य's picture

26 Mar 2012 - 12:56 pm | आत्मशून्य

अंडरटेकर, टाटान्का, पापा शँगो, हिट्मॅन, रॉक, म्हातारा (ब्लाँड)हल्क हॉगन, मॅचोमॅन असे एकसे बढकर एक वीर. त्यावेळी तर हे सगळं अत्यंत खरं वाटायचं (विषेशतः दुखापती वगैरे). मस्तच. या अंडरटेकरची क्रेझच एव्हडी होती की अक्षयकुमारच्या खिलाडियोंका खिलाडी चित्रपटात अंडरटेकरसोबत(अर्थातच डुप्लिकेट) अक्षयकुमारचा एक फाइट सिनही होता. लेख जरा विस्र्तुत असता तर अजुन रंगत भरली असती :)

चैतन्य गौरान्गप्रभु's picture

27 Mar 2012 - 4:01 am | चैतन्य गौरान्गप्रभु

वास्तवीक पाहता मी हे लेख एका वृत्तपत्रासाठी लिहतो. तीकडे ९५० शब्दांची मर्यादा आहे हो! म्हणुन त्रोटक वाटत असेल. 'अक्षरचित्र' नावाच्या या लेखमालेत मी विविध क्षेत्रातील गाजलेल्या व्यक्तींचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करत असतो. लिंक खाली देतोय. जमल्यास जरूर चक्कर मारून या!

http://gaurangprabhu.blogspot.in/

मी-सौरभ's picture

26 Mar 2012 - 1:03 pm | मी-सौरभ

अंडरटेकर विषयीची माहिती नविन आणि ईंटरेस्टींग आहे. ईतरांविषयी पण लिहा. :)

मी अजूनही WWE RAW / SMACK DOWN नियमितपणे घरच्यांच्या शिव्या खात खात बघतो.
जॉन सिना, रँडी ऑर्टन, रे मिस्तेरिओ यांचा खेळ मला अजूनही बघावासा वाटतो.

प्यारे१'s picture

26 Mar 2012 - 3:06 pm | प्यारे१

अन म्हणे लग्न करा... सौरभचं!

रेवती आज्जी, अशा परिस्थितीत सौर्‍याचं लग्न झालं तर नंतर होणार्‍या वस्तू आणि व्यक्तींच्या मोडतोडीस जबाबदार कोण?

मी-सौरभ's picture

26 Mar 2012 - 3:10 pm | मी-सौरभ

मी काय ल्हान पोरगा वाटलो क्या प्यारे१??

मी फक्त बघतो हो ते कार्यक्रम
असल्या मारामर्‍या मी करत असेन हे माझी शरीरयष्टी बघूनही तुम्हाला वाटलेलं पाहून माझे चारी ड्वाले पाणावले ;)

कपिलमुनी's picture

27 Mar 2012 - 12:09 pm | कपिलमुनी

सौरभची लग्नाची तयारी चालली आहे कुस्ती बघून ;)

कवितानागेश's picture

26 Mar 2012 - 1:40 pm | कवितानागेश

फोटू नाय टाकला. :(

अनिरुद्ध उर्फ अन्या's picture

26 Mar 2012 - 2:34 pm | अनिरुद्ध उर्फ अन्या

मी पण अजूनही WWE RAW / SMACK DOWN नियमितपणे घरच्यांच्या शिव्या खात खात बघतो.

विसुनाना's picture

26 Mar 2012 - 2:41 pm | विसुनाना

डब्लू डब्लू एफ्/ई कधीतरी टाईमपास म्हणून पाहिले असेल/नसेल. पण त्यातल्या एका हीरोवर लेख आलेला पाहून 'ड्वॉले पानावले'!

सचिनच्या नावाबरोबर अंडरटेकरचे नाव जोडलेले पाहून तर धन्य झालो.
आधीच फिक्स केलेल्या मॅचमध्ये आधीच ठरवलेल्या टप्प्यावर पडलेल्या प्लास्टिकच्या बॉलवर
प्लॅस्टिकच्या बॅटने सचिन सिक्सर मारतो आहे असे दृश्य डोळ्यांसमोर उभे राहिले.

@विसुनाना:

तरीबी अंडरटेकर ला अंडरएस्टिमेट करायचे अंडरटेकिंग नका घेउ सांगतोय हॉऑऑऑ!!!!

रस्त्याच्या कडेने:

निरागसता का काय म्हणतात ती जपू द्या ना राव :D :P

चैतन्य गौरान्गप्रभु's picture

27 Mar 2012 - 3:47 am | चैतन्य गौरान्गप्रभु

आपापली मतं आहेत! सगळ्यांचं स्वागतच आहे. सचिन आपल्या क्षेत्रातला देव आहे. अंडरटेकर त्याच्या क्षेत्रातला. निकाल ठरवलेले असोत, किंवा कुणी किती मार खायचा हे देखील ठरवलेलं असो, पण ती त्या खेळाची नियमावली आहे. या सर्वांमध्ये चपखल बसत अंडरटेकर गेल्या २० वर्षापासुन खेळतो आहे. राज्य करतो आहे. म्हणुन ही तुलना. बाकी काहीही नाही!!
आणि हल्ली क्रिकेटच्या मॅचही ब-यापैकी फिक्सच असतात देवा! विचारा श्रीलंकेला!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Mar 2012 - 9:45 am | निनाद मुक्काम प...

१९९० च्या दशकाच्या सुरवातीला उपग्रह वाहिन्या भारतात आल्या आणि डब्लू डब्लू एफ चे लोण घराघरांमध्ये पसरले.
आज ह्या लेखामुळे जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला.
आम्ही ह्या खेळाच्या विडीयो केसेट १० रुपये प्रती भाडे सुट्टीच्या दिवशी घरी आणत असू.
आम्ही ह्या खेळांचा पत्यांचा खेळ तर अगदी शाळेत सुद्धा खेळत असू.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Mar 2012 - 9:45 am | निनाद मुक्काम प...

१९९० च्या दशकाच्या सुरवातीला उपग्रह वाहिन्या भारतात आल्या आणि डब्लू डब्लू एफ चे लोण घराघरांमध्ये पसरले.
आज ह्या लेखामुळे जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला.
आम्ही ह्या खेळाच्या विडीयो केसेट १० रुपये प्रती भाडे सुट्टीच्या दिवशी घरी आणत असू.
आम्ही ह्या खेळांचा पत्यांचा खेळ तर अगदी शाळेत सुद्धा खेळत असू.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Mar 2012 - 9:45 am | निनाद मुक्काम प...

१९९० च्या दशकाच्या सुरवातीला उपग्रह वाहिन्या भारतात आल्या आणि डब्लू डब्लू एफ चे लोण घराघरांमध्ये पसरले.
आज ह्या लेखामुळे जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला.
आम्ही ह्या खेळाच्या विडीयो केसेट १० रुपये प्रती भाडे सुट्टीच्या दिवशी घरी आणत असू.
आम्ही ह्या खेळांचा पत्यांचा खेळ तर अगदी शाळेत सुद्धा खेळत असू.

मी-सौरभ's picture

27 Mar 2012 - 11:22 am | मी-सौरभ

भा.पो. :)

मन१'s picture

27 Mar 2012 - 1:21 pm | मन१

उत्तम परिचय. असली कित्येक आडदांड दिसणारी माणसे वैयक्तिक आयुष्यात सरळ साधी(कित्येक नम्र ,हसतमुखही) असू शकतात हेच कुणाला पटत नाही. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं, रंगवलेल्या पात्राचं कौतुक वाटत. पण..........
.
.
पण मुळात तेलुगु सुपरस्टार महेशबाबू,शक्तीमान व डब्लू डब्ल्यू एफ(विशेषतः अंडरटेकर) असल्या खेळांचे बहुतांश चाहते काहीसे विचित्र(बर्‍याचदा अर्धवट डोक्याचे,खुनशी,माथेफिरु, रामन राघवनची मानसिक औलाद) असेच का असतात कुणास ठाउक.
शक्तीमानची लोकप्रियता शिगेला होती तेव्हा चांगले १४-१५ वर्षांचे घोडमे टोणगेसुद्धा स्वतःला जाळून घेत असत , "शक्तिमान" वाचवायला येइल ह्या भरवशाने!
इकडे ह्या फ्रीस्टाइल कुस्तीवाल्यांचे तर काय कवतिक सांगावे? स्वतःचा मुळात जीव सशाहूनही लहान असला तरी "वन्ना किल यू मॅsssन",
"इट्स डेस्ट्रक्टिव", "आय एम गोन्ना फ** हिज अ‍ॅ*" हे असलं काहिसं बडबडत, नक्कल करीत वय वर्ष पाच ते एकोणीस असं कुणीही कॉलनीत दिसायचं, आणि वर पोरगं फाडफाड इंग्लिश बोलतय म्हणून नवश्रीमंत पालकांना झुरळाला घाबरून चड्डित मुतणार्‍या खुनशी पोराचं आणि नव्वदच्या दशकात नवीनच घेतलेल्या रंगीत टीव्हीचं कृत कृत्य वाटायचं; ते आठवलं.
उन्हाळ्याच्या सुट्टीत ही कार्टी कधी मैदानात खेळली नाहित, पोहायलाही गेली नाहित, काही वाचन असायची शक्यताच सोडा.
मग ह्या सगळ्यात त्या कुस्तीवीरांचा काय दोष? असा स्वाभाविक प्रश्न येतो. त्याचे थेट उत्तर टाळतोय.
पण हा प्रकार सरळ सरळ काही लोकांची हिंस्त्र्पणाची मानसिक गरज पूर्ण करणारा असा काहिसा आहे; थोडक्यात ही मंडळी स्वेच्छेने आधुनिक रोमन राज्यातील "ग्लॅडिएटर्स" बनलीत.
सदर कार्यक्रमात कित्येकदा उडणार्‍या रक्ताच्या चिळकांड्या* बघून कुणाला चिंता वाटत नसेल (किंवा आनंद होत असेल) तर खरच चिंतेचा विषय आहे.
ह्या प्रकाराच्या आहारी गेलेल्यांचे रोल मॉडेल असलेच रॉक, ट्रिपल एच, हल्क हॉगन,स्टोन कोल्ड स्टीव ऑस्टिन असतात. पण ते त्यांच्या मजबूत बांध्याचा आदर्श ठेवण्यापेक्षा दाखवल्या जाणार्‍या हिंस्त्रपणाचाच ठेवतात. अशा नगासमोर चुकून एकदा जुन्या काही आवडत्या चित्रपटांबद्दल बोलत असताना "तेव्हाच्या हिरोंना अ‍ॅब्स नव्हते. भुक्कड साले.आता बघ साला इम्रान(हाश्मी)चेही कसले लुक्स आहेत. नाय तर तुझे मरतुकडे अमिताभ अन् दिलीप." असली कमेंट मिळून आमचे थोबाड बंद झाले. पुढे पु ल, बाबा आमटे ही नावे आमच्या कॉलनीतील माकडांना आधी ठाउकही नव्हती.(नंतर "अ‍ॅप्टी" आणि "इंटरव्यू" साठी तोंडी लावण्यापुर॑ती पाठ झाली.)

संपूर्ण प्रतिसाद असंबद्ध वाटतोय? हो नक्कीच. पूर्णतः ताळतंत्र सोडलेल्या पब्लिकमध्ये दोनेक दशके काढल्याने माझेही टाळके अर्धाअधिक वेळ सटकलेलेच असते. उगीच सुसंबद्धता शोधत बसू नये.

*उदाहरणे शेकडो आहेत; गाजलेली उदाहरणे:- ब्रॉक ने मिस्टर अमेरिका बनून आलेल्या हल्क हॉगनला मरेस्तोवर बदडल्याचे दाखवले, शेवटी त्याला रक्ताची उलटी होताना पब्लिक "किल हिम" असे फलक दाखवत जल्लोष करत होती.
मिक फॉली ऊर्फ कॅक्टस जॅक ह्याला ट्रिपल एच ने फोडला,हाणला तो असा काही की पूर्ण चेहरा फुटला. पब्लिक आनंदाने बेहोष होत टाळ्या पिटतानाही दिसली. हे सर्व तुम्हाला चालत असेल तर मात्र कशातच काहिच चूक नाही हे मान्य आहे; पूर्ण प्रतिसाद मागे घ्यायला तयार आहे.