जागतिक महिला दिन व शिमगा.

तर्री's picture
तर्री in काथ्याकूट
7 Mar 2012 - 10:50 pm
गाभा: 

जागतिक महिला दिन व शिमगा हा एक भयंकर योग जुळून आला आहे.
महिला दिना निमित्त शिव्यां ची ऊजळणी करावी तसेच शिमग्या निमित्त महिलांचे सेक्सकमिकरण नाही हो सक्शमिकरण च्यायला सक्षमिकर्ण....जावू दे करायला हवी असे वाट्ते आहे.

सगळ्या शिव्या ह्या महिलांच्या शरिराशी , चारिक्टर शी निगडीतच का असतात ? असे एका पुरोगामी महिलेने विचारले असता मला पुरुषांच्या संदर्भातील एकही शिवी आठवली नाही. महिला दिना निमित्त केलेल्या पुरणपोळ्यांचीच ही नशा ! नाही तर शिमग्याच्या भांगेच्या आय चा घो !!

बायको सकाळीच ऊठली तिने चहा केला. मी विचारले का ? तर म्हणाली महिलाना सामान दर्जा हवा. तू रोज करतोस चहा . आता मीही ५० % तुला मदत करणार.सकाळचा चहा मी केला , आता दुपारची भांग तू कर . काय पण जमाना आला. बायको हल्ली पिऊन आल्यागत बरळत असते.

महिलांना शिमग्याला ३३ % आरक्षण दिलेच पाहिजे . कंपलसरी . तो सैफ अलीचा सिनेमा आला होता ...आरक्षण ....तसे. कंपलसरी शिमगा. बाजुच्या बिल्डिंगीत एक आयटम रहायला आली आहे. तिला कंपलसरी केलेच पाहिजे. कंपलसरी शिमगा.

होळी पेटवलीच पाहिजे. ब्रा बर्निंग म्हणजे तरी काय ? महिला दिना ची होळीच ती . पुरुषी अत्याचार , अहंकारचा शिमगा. त्यात हे आरक्षण ओतले की चांगलीच पेटेल होळी. जय लोरिना बोबेट.

आता त्याच होळीच्या ज्वळेतून एक तेजस्वी महिला निघेल आणि ती अफू ची शेती करेल. अफू म्हणजे गांजा , चरस , भांग. व्यसनी पुरुषांना ..पुरुष व्यसनीच की. यादवाना नाही का चढली. बस्स.....

भंम भंम भोले शंकर ! तिसरा डोळा !! विनाश अटळ आहे.
२०१२ साल महिला दिन आणि होळी ! जगबुडी आली !! झोपावे पुरणपोळ्या अंगावर घेऊन शांतपणे !!!

प्रतिक्रिया

सुधीर१३७'s picture

7 Mar 2012 - 11:02 pm | सुधीर१३७

खतरी................................................ :)

शुचि's picture

7 Mar 2012 - 11:10 pm | शुचि

भन्नाट =)) =)) =)) हहपुवा

छोटा डॉन's picture

7 Mar 2012 - 11:12 pm | छोटा डॉन

एकदम जोरदार ...

भंम भंम भोले शंकर ! तिसरा डोळा !! विनाश अटळ आहे.
२०१२ साल महिला दिन आणि होळी ! जगबुडी आली !! झोपावे पुरणपोळ्या अंगावर घेऊन शांतपणे !!!

=)) =)) =))

अंगावर पुरणपोळ्या घेऊन झोपण्याची कल्पना बेक्कार आहे, लै आवडली.

- छोटा डॉन

पैसा's picture

7 Mar 2012 - 11:13 pm | पैसा

सक्काळी सक्काळी चहाच घेतलात ना? ;)

सूड's picture

7 Mar 2012 - 11:42 pm | सूड

कोरा चहा घेतला असावा. बाकी लिहिलंय झक्कास.

तर्री's picture

8 Mar 2012 - 9:18 am | तर्री

काय घेतले ते आठवत नाही. डोक्यात सुरुंग पेरलेले आहेत कसे काहीसे झाले आहे. केंव्हा ही कसे ही फुटत आहेत.

पक पक पक's picture

9 Mar 2012 - 11:07 pm | पक पक पक

बायको सकाळीच ऊठली तिने चहा केला. मी विचारले का ? तर म्हणाली महिलाना सामान दर्जा हवा.

:bigsmile: :bigsmile: :bigsmile:

हॅ हॅ हॅ खात्री करुन घ्या...... ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Mar 2012 - 11:03 am | विश्वनाथ मेहेंदळे

आम्ही महाविद्यालयात असताना नाक्यावर उभे राहून अनेक महिलांना सदर दर्जा प्रदान केला होता. पण तसे कुणी चुकून बोलून गेले तर त्याच महिलांचा रोष पत्करावा लागत असे. स्त्री हीच स्त्रीची शत्रू (?) असते असे म्हणतात ते काय उगीच ?

Pearl's picture

7 Mar 2012 - 11:46 pm | Pearl

लेख आवडला नाही.
आणि या लेखानिमित्त असं सांगावसं वाटतं आहे की
गेले काही दिवस मिपावर जे काही लेख/कविता महिलांविषयी येत आहेत ते वाचून मिपावर लॉग-इन होत जावे की नाही असा प्रश्न पडत आहे.
ज्याने त्याने यावे आणि महिला या विषयी उगाच काही-बाही बरळून जावे, असं होत चालले आहे. त्यामूळे दुर्लक्ष करण्याच्या क्षमतेचा अंत होत आला आहे. निदान या धाग्यावर हे विचार व्यक्त तरी करावेसे वाटले. बाकीच्या धाग्यांवर तर १ कमेंट लिहावी असेही वाटले नाही.

तर्री's picture

8 Mar 2012 - 8:50 am | तर्री

लेख आवडला नाही हे मत समजले. आपल्या मताचा आदरपूर्वक स्विकार केला गेलेला आहे.
असो. काही-बाही बरळून आहेच त्यात. पण ते स्रियांना अपमानित करेल असे नाही , निदान ऊद्देश तरी नाही.
होळी आहे हो. थोडे असे होणारच की.

लेख परत वचावा ही नम्र विनंती.

"स्त्री जन्माचे तेज , पुरुषांची व्यसनाधीनता ह्या मधून होणारा विनाश" आणि "स्त्रियांवरचे अत्याचार" जर ध्वनित होत नसतिल तर लेखाचे अपयश मान्य करण्यात येईल.

"ब्रा-बर्निंग" सारख्या शब्द प्रयोगामुळे आपले मत "काही-बाही बरळून" वगैरे झाले असेल तर मात्र माझा नाईलाज आहे. असे शब्द वाचण्याची ताकद नसते . ब्रेन हायजॅक होतो. मत न वाचता बनवले जाते.
ह्या नंतर चा परिच्छेद आपण वाचला नसावा असे वाटते

लेख आवडला नाही असं म्हटलं आहे.
कारण तो तितकासा जमला नाहीये. ओढून-ताणून विनोदनिर्मिती वाटते. नाही म्हणायला २-३ पंच आहेत. पण ते तेवढ्यापुरते. ते अधे मधे 'गाय' वगैरे निबंध येत असतं त्यासारखे वाटते.

आणि या लेखानिमित्त असं सांगावसं वाटतं आहे की
ही ओळ काळजीपूर्वक वाचावी. मी लेखानिमित्त असे म्हटले आहे.

>>गेले काही दिवस मिपावर जे काही लेख/कविता महिलांविषयी येत आहेत ते वाचून मिपावर लॉग-इन होत जावे की नाही असा प्रश्न पडत आहे.
>>
स्पष्ट बोलायचे झाले तर हे खालील लेख आणि त्यावरच्या काही प्रतिक्रिया अजिबात आवडले नाहियेत.
http://www.misalpav.com/node/20924
http://www.misalpav.com/node/19205
असो. तुमच्या धाग्यावर विषयांतर नको. मी याबाबत स्वतंत्र धागा काढून माझे मत मांडेन.

>>ज्याने त्याने यावे आणि महिला या विषयी उगाच काही-बाही बरळून जावे, असं होत चालले आहे. त्यामूळे दुर्लक्ष करण्याच्या क्षमतेचा अंत होत आला आहे. निदान या धाग्यावर हे विचार व्यक्त तरी करावेसे वाटले. बाकीच्या धाग्यांवर तर १ कमेंट लिहावी असेही वाटले नाही.>>
हे लिहिले कारण
१) आजकाल मिपावर महिलादिन वगैरे गोष्टींवर फक्त खिल्ली उडवण्यासाठी चर्चा केली जाते. ह्या गोष्टींवर हसी-मजाक करा ना. पण फक्त हसी-मजाक नको, कधीतरी सिरियसली बोला. निकोपरित्या विचार करून पहा. ज्या अर्थी असा काही दिन करावा लागतो आहे त्याअर्थी त्यात काही तत्थ्य असणार ना. आता सगळं आलबेल आहे असच म्हणत असाल तर मग पुढे काही बोलायलाच नको.

२) काव्य आवडलं नाही.
http://www.misalpav.com/node/20924
इथे स्त्री- पुरुष दोन्ही प्रकारचे सभासद आहेत. मान्य आहे की दोन्ही प्रकारांच्या सदस्यांच्या आवडी-निवडी वेगळ्या असतील पण एखादा ले़ख/कविता वाचताना स्त्री किंवा पुरुषाला इन्सल्टिंग वाटेल असं काही लिहू नये असं माझं वैयक्तिक मतं.
आणि याला अभिव्यक्ति स्वातंत्र्य वगैरे असं कोणी म्हणत असेल तर मग निळ्या चित्रफितीही/फोटोही इथे खुशाल डकवावीत. मग आम्ही मिपाची रजा घेऊ.

आणि तो लेख अजिबात आवडला नाहिये.
http://www.misalpav.com/node/19205
कारण असं मनात येईल तसंच वागायचे असेल तर कशाला पाहिजेत मानवी जीवनाचे निती-नियम.
कारण मनात नैसर्गिकरित्या एखाद्याचा खूप राग आला, खून करावासा वाटला, तर करा खून. मनात आज एकीबद्दल उद्या दुसरीबद्दल परवा तिसरीबद्दल नैसर्गिकरित्या आकर्षण वाटले तर त्या अनुशंगाने वागा लेखक म्हणतो तसा. कशाला निसर्गाशी प्रतारणा. हो की नाही. कसलाच फरक नको आपल्यात आणि जनावरात.

अवांतराबद्दल परत एकदा क्षमस्व. नवीन धागा काढून लिहिन आता वेळ मिळाला की.
पण मी वर लिहिल्याप्रमाणे या धाग्यानिमित्त मला जे म्हणावेसे वाटत होते ते मी लिहिले आहे. कारण हे अवांतर विषयाशी संबंधित अवांतर वाटले म्हणून लिहिले.

तर्री's picture

8 Mar 2012 - 10:22 pm | तर्री

आमचा लेख हा तुमच्या रागाचा निचरा करण्याच्या कामी आला ! ठिक आहे.
अवांतराशी संबधित म्हण्जे काय ? ते मात्र कळले नाही....पण तो तुमचा दोष नाही.
ऊद्या वाचतो.कदचित कळेल.

एवढा सविस्तर प्रतिसाद इथे द्यायचा नव्हता. पण तुम्ही व्य.नि. करून माझ्या प्रतिसादाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा दर्शविली म्हणून मला काय म्हणायचे आहे ते सविस्तर सांगितले.

'अवांतराशी संबंधित' असं मी म्हंटल नसून, 'विषयाशी संबंधित अवांतर' असं म्हंटलं आहे.
असो. मला वाटतं याविषयीची पुढील चर्चा आपण खरडीतून करू. असं म्हणून मी येथे थांबत आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Mar 2012 - 12:52 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तुम्ही धागा काढाच. तिथे नक्की चर्चा करू. इथे तुम्हीच याला अवांतर म्हणत आहात म्हणून जास्ती काही लिहित नाही.

अन्नू's picture

9 Mar 2012 - 10:35 pm | अन्नू

तुमचे म्हणणे १००% पटले. Smiley

अन्नू's picture

9 Mar 2012 - 10:36 pm | अन्नू

मिपावर हल्ली स्त्रियांना उद्देशून खालच्या दर्जाचे लिखाण होत आहे. शिवाय काही असेही लिखाण आहे की जे स्वतः आंम्हालाही वाचताना नको वाटते. त्यामुळे मिपा सदस्यांनी आपले साहीत्य लिखाण करताना येथील मिपा कुटुंबात इतर स्त्री सदस्यही आहेत याचे भान ठेऊन असे वल्गर शब्द किंवा लिखाण शक्यतो टाळायला हवेत. आत्ताही काढलेले काही नवीन धागे याचेच उदा. आहेत.

एका थट्टा मस्करीपर्यंत ठिक आहे हो पण जर त्याचाच अतिरेक होत असेल तर मात्र ते लिखाण अति मनस्ताप देणारे ठरत नाही का!

=>शिवाय येथे स्त्री सदस्यांही जोपर्यंत अशा लेखाविरुद्ध तिखट कमेंट करत नाहीत तोपर्यंत असे लिखाण होतच राहणार. संपादकांना सांगुन तुंम्ही फक्त पळवाट शोधताय असे नाही का वाटत तुंम्हाला?
नाहीतर मग आहेच तुमचा मार्ग ठरलेला=> "असं काही लिखाण आलं की घे रजा!, कोण काय बोललं की घे रजा!" अशा प्रकाराने सर्वच ठिकाणांवरील असे लिखाण थांबतील का? याचा विचार स्त्री सदस्यांनी स्वतः करावा. आणि मग त्यांनीच काय तो निर्णय घ्यावा की या प्रकारांना निडरपणे सामना करायचा की भ्याडासारखा यातुन पळ काढायचा!

अवांतरः वरील पुर्ण कमेंट अर्थात नुसत्या मिपा पुरतीच मर्यादीत नसून संपुर्ण नेटवर्क साईटच्या बाबतीतच केलेली आहे.

पाशवी शक्तींचा विजय असो. मी पॉपकॉर्न घेऊनच बसलोय.

पोपकॉर्न नुसते घेवून बसू नये . त्या वर रामनाम लिहून खाण्यास सुरवात करावी.
अन्यथा ते बनवणार्‍या चा अपमान होईल. आणि "बनवणारी" असेल तर.............
घालिन लोटांगण @ २ करावे लागेल.

रामनाम लिहायला कोणत्या रंगाचं पेन वापरावं ?

होळी च्या दिवाशी कोणता रंग वापरावा ? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
अल्पसंख्याकांच्या भावना दुखावणार नाहीत , बहुमताचा आदर होईल , बालमनावर विपरीत परिणाम होणार नाही असा कोणताही रंग चालेल.
आणि स्त्रियांचा ही विचार करावा लागेलच की !
म्हणून "पांढरा" रंग कसा वाटतो ? एकदम नोन कोणत्रोवार्सिअल !

त्याने रामनाम लिहिलेलं रामाला पण दिसायचं नाही. दुसरा ऑप्शन सुचवा राव. दिसेलसं रामनाम लिहीलेले पॉपकॉर्न मुंबई पुण्यात कुठे मिळतील सांगू शकाल काय.

तर्री's picture

8 Mar 2012 - 10:34 am | तर्री

विचार सुरू आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Mar 2012 - 1:21 pm | अत्रुप्त आत्मा

अग्ग...ब्बा....बो...! आज मिसळीला काय बेक्कार तर्री
पडली हाय...! ह्ह्ह्ह्ह्हाआआआ..! फुल करंट आला...राव..! एकदम फुलट्टॉस...!

एक्सट्रॉ तर्री:- ----@आणि स्त्रियांचा ही विचार करावा लागेलच की !
म्हणून "पांढरा" रंग कसा वाटतो ? एकदम नोन कोणत्रोवार्सिअल !>>>बरेचदा तुमचा ओपनला आकडा चुकतो काय वो..? ;-)

कानडाऊ योगेशु's picture

8 Mar 2012 - 12:21 am | कानडाऊ योगेशु

काही'तर्री' च काय?

हॅ हॅ हॅ...

एकदम भारी.. जोमात येवुन एका दमात बोलल्यासारखा लेख आला आहे.. आवडला.

--टुकुल

नगरीनिरंजन's picture

8 Mar 2012 - 8:55 am | नगरीनिरंजन

:)

मनीषा's picture

8 Mar 2012 - 12:41 pm | मनीषा

शिमगा आणि महिलादिन या पर्वणीचे स्वागत !!!

सर्व पाशवी शक्तींनी या शुभघडीचा लाभ घ्यावा हे नम्र अवाहन !

(अवांतर : आज धूळवड आहे. )

अन्नू's picture

8 Mar 2012 - 1:18 pm | अन्नू

आज शिमगा नैच. शिमगा कालच झाला, आज तर धुळवड आहे. ;)
चला आता 'या' डे च्या सेलिब्रेशनची तयारी लवकरच सुरु होईल बहुतेक! Smiley

गणपा's picture

8 Mar 2012 - 1:10 pm | गणपा

हा हा हा मस्त एकदम होळी पेश्शल.

नावातकायआहे's picture

8 Mar 2012 - 1:11 pm | नावातकायआहे

एकात एकमध्ये अजुन एकाची भर

विजुभाऊ's picture

8 Mar 2012 - 1:57 pm | विजुभाऊ

तर्री तै.........
एकदम बकवास ...........
नक्की कशासाठी लिहिलेय तेच कळाले नाही

जेनी...'s picture

9 Mar 2012 - 2:32 am | जेनी...

+++++++११११११११११

विजुभाऊ

तर्री's picture

8 Mar 2012 - 2:38 pm | तर्री

मी "ही" नाय , "हा" हाय. किंवा मी पुल्लिंगी हाय....आणि विरुध्दाकर्षणच हाय.
नाय तर टेम्पोत बसवाल पार....आता तर कायदा बी तसाच हाय.
अवांतर : बाकी "बाकवास" हाय हे बाकी बेस बोल्लाव....

थोड्याचवेळापूर्वी गणपाने माझ्या भांगेच्या धाग्यावर टाकेलल्या प्रतिसादात तळीरामाचा उल्लेख होता. तो वाचून इथे ह्या धाग्यावर आलो, एकदम हसण्याचा डबलबारच झाला.
मस्त जमली आहे शिमग्याची भट्टी.

- (पुरणपोळी अंगावर येउन आडवा झालेला) सोकाजी

गणेशा's picture

8 Mar 2012 - 4:20 pm | गणेशा

लेख आवडला नाही..

वपाडाव's picture

8 Mar 2012 - 4:34 pm | वपाडाव

एकदम 'तर्री'बाज झालंय...

मराठमोळा's picture

8 Mar 2012 - 4:35 pm | मराठमोळा

होळी स्पेशल... :) चालू द्या.. होळी रे होळी..

असो, थोडं अवांतरः
कोणत्याही लेख/कवितेला प्रतिसाद हे प्रामुख्याने खालील तीन गोष्टींवर पुर्णतः अवलंबून असतात असे मला वाटते. अपवादात्मक लिखाणसुद्धा असतेच म्हणा..
१. कुणी लिहिलं आहे
२. प्रतिसाद देण्यार्‍याची त्या क्षणीची मानसिक अवस्था काय आहे
३. ईतरांनी काय प्रतिसाद दिले आहेत.. (काही लोकांना प्रवाहाबरोबर पोहायला आवडतं तर काहींना त्याविरुद्ध)

यामुळे समान धाग्यांनादेखील पसंती/नापसंती, प्रतिसाद संख्या, वाचने ह्या स्टॅटीस्टीक्स निराळ्या असु शकतात.. पुलंनी देखील म्हंटलच आहे "या जगात काय लिहिलय या पेक्षा कुणी लिहिलय यालाच जास्त महत्व आहे. :) असे हे "माझे मत".

बाकी शिमगा चालू द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2012 - 6:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

भांग चढलेल्याचं प्रकटन अफलातून जमलं आहे. "म्हणून मी कधीच रिस्क घेत नाही" कवितेची आठवण झाली.

झोपावे पुरणपोळ्या अंगावर घेऊन शांतपणे !

हा कहर आहे.
You have some insane sense of humour. (या वाक्याचं चांगलं भाषांतर कोण करणार का?) 'खुपते तिथे गुप्ते'मधे रसिका जोशीने फोनवरचं जे संभाषण केलं होतं तसल्या कोटीचा काही प्रकार.

(याचं विडंबन करावं असा विचार आला. पण हा जबरी विनोद आहे; माझी तेवढी पात्रता नाही त्यामुळे विडंबन फसण्याचीच शक्यता जास्त. त्यामुळे तर्रीशेट, फक्त अभिवादनाचा स्वीकार करा.)

ज्याचे प्रतिसाद अनुकुल आहेत त्यांचे विशेष आभार.
ज्यांचे प्रतिकुल आहेत त्याच्यासाठी एवढेच सांगतो की तुम्ही बहुमतात असाल.सो खूष रहो.

*लेखाचा उद्देश केवळ होळीची "टवाळकी" इतकाच होता. महिलादिन हे केवळ निमित्त होते.
**मिपाच्या व्यक्तीमत्वानुसार थोडे जादा सभ्य-वाह्यात लिहिता आले.

आदितींचा अभिप्राय अतिशय समर्पक. भाषांतराचा प्रयत्न करतो.
You have some insane sense of humour - विद्वत्ता , विनोद आणि विक्षिप्तपणा ह्या एकाच नाण्याच्या "तीन" बाजु आहेत.

कॉमन मॅन's picture

10 Mar 2012 - 11:17 am | कॉमन मॅन

महिलांना शिमग्याला ३३ % आरक्षण दिलेच पाहिजे.

तसा खास शिमग्याबद्दलचा प्रस्ताव सर्व विवरणासहीत संसदेसमोर आला पाहिजे तर त्यावर विचार होऊ शकेल.

भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३ ड (सुधारीत २००९) नुसार आता स्त्रियांना ५०% आरक्षण दिले आहे.

जागतिक महिला दिन व शिमगा हा एक भयंकर योग जुळून आला आहे.

हे वाक्य मात्र फार्फार आवडले.. :)