बदामी

Primary tabs

स्नेहांकिता's picture
स्नेहांकिता in भटकंती
28 Feb 2012 - 1:20 pm

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Feb 2012 - 1:22 pm | प्रचेतस

हे काय? इतकेच फोटो तेही बारीक, कुठल्याही वर्णनाशिवाय?

स्नेहांकिता's picture

28 Feb 2012 - 3:20 pm | स्नेहांकिता

पहिलच प्रयत्न आहे फोटो अप्लोड करण्याचा...मार्गदर्शनाची गरज आहे.
१. फोटो पिकासावर एवढाच दिसतो आहे. मोठा कसा करायचा?
२. मधे मधे मजकुर कसा लिहायचा? सगळे फोटो चिकटून चिकटून दिसतात.

मुक्त विहारि's picture

28 Feb 2012 - 1:30 pm | मुक्त विहारि

बदामी म्हणजे कर्नाटक राज्यातिलच ना?

चान्गले आहे ठिकाण.....

स्नेहांकिता's picture

29 Feb 2012 - 10:29 am | स्नेहांकिता

बरोबर आहे. फोटो बदामी जि. बागलकोट रा. कर्नाटक इथलेच आहेत. फोटो चढवण्याच्या प्रयत्नातच इतकी दमछाक झाली की काही लिहायला दमच उरला नाही काल्..गणपाभौ॑च्या क्रुपेने फोटो मोठे झाले आहेत. आता लिहिते..

चौकटराजा's picture

28 Feb 2012 - 2:21 pm | चौकटराजा

बदामीत रेल्वे स्टेशनच्या तिकिट बारीच्या रेलींगवरही माकडे बसलेली असतात. त्यांचा उपमर्द लेखात झाल्यामुळे त्यांनी " शू शेना" ष्टाईलने चिडून जाउन लेख व फोटो फाडून राडा केल्येला हाय ? ( बातमी पुढे प्रस्नचिनन्ह हाय नायतर मायला आमच्या घराचा राडा व्हायचा )

चौकटराजा's picture

28 Feb 2012 - 2:21 pm | चौकटराजा

बदामीत रेल्वे स्टेशनच्या तिकिट बारीच्या रेलींगवरही माकडे बसलेली असतात. त्यांचा उपमर्द लेखात झाल्यामुळे त्यांनी " शू शेना" ष्टाईलने चिडून जाउन लेख व फोटो फाडून राडा केल्येला हाय ? ( बातमी पुढे प्रस्नचिनन्ह हाय नायतर मायला आमच्या घराचा राडा व्हायचा )

गुगलून छायाचित्रे शोधलीत का ?

स्नेहांकिता's picture

28 Feb 2012 - 3:23 pm | स्नेहांकिता

ते का? अस्मदिका॑चा पण आहे ना फोटो लेण्या॑च्या पार्श्वभूमीवर. पण ते अपलोड्च॑ त॑त्र मेल॑ अजून नीट जमत नाहिये...

वपाडाव's picture

28 Feb 2012 - 4:42 pm | वपाडाव

त्यासाठी आधी लोकांच्या खरडवह्यात घुसा... मग खरडफळ्यावर या अन मग नंतर एकदम सुसाट निघा...

स्नेहांकिता's picture

29 Feb 2012 - 1:30 pm | स्नेहांकिता

नेमक्या कुणाच्या खरडवहीत घुसलं म्हणजे फोटो चढवण्याची माहिती मिळेल ?

मोहनराव's picture

28 Feb 2012 - 2:46 pm | मोहनराव

अपेक्षाभंग!!

स्नेहांकिता's picture

28 Feb 2012 - 3:24 pm | स्नेहांकिता

अपेक्षा आहेत हे ऐकून आन॑द वाटला! पुढचा प्रयत्न जरा जोमाने करीन....

वासोटा किल्यापेक्षा जास्त चांगला प्रयत्न आहे, पिकासावरही चित्रे उघडुन मगच युआरएल कॉपि करा, डायरेक्ट अल्बम मधुन नको.

कॉमन मॅन's picture

28 Feb 2012 - 4:51 pm | कॉमन मॅन

हे सारे कुठले फोटो आहेत?

मुक्त विहारि's picture

28 Feb 2012 - 5:01 pm | मुक्त विहारि

बदामि....जि. बागलकोट्...राज्य - कर्नाटक... असे वाटत आहे....मी विचारले पण उत्तर नाही मिळाले..म्हणुन गुगल आणि विकिपेडियाला कामाला लावले....तिथल्या तळ्याचा फोटो आणि इथल्या तळ्याचा फोटो सारखाच दिसत आहे.....

विजापुर जवळ असलेली बदामी लेणी ... खूप वर्षांपूर्वी पाहिली आहे.
तिथली लाल माती आणि माकडांच्या झुंडी आठवतात.

फोटो मोठे केले आहेत आता.
त्या बद्दल थोडी माहिती पण द्या.

sagarpdy's picture

28 Feb 2012 - 8:41 pm | sagarpdy

अहो तीच चित्रं फक्त ओढून-ताणून लावल्यासारखी दिसताहेत.

आता आडातच नसेल तर पोहर्‍यात कुठुन आणू मी?
फोटो त्यांनी काढलेत मी फक्त मागणी नुसार मोठे करण्याचा प्रयत्न केला.
(मुळ स्त्रोत मिळाला असता तर अजुन काही करता आल असत म्हणा.)

वपाडाव's picture

28 Feb 2012 - 9:01 pm | वपाडाव

गंपा, सदर धागाकर्तीला त्याबद्दल थोडे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे...
पण त्या फटुंबद्दलची कल्पना देउन ते मोठे (मुळ स्वरुपातील)मिपा व्यवस्थापनास उपलब्ध करुन देता येत असतील तर इथे धागा मॉडिफाय करावा अन्यथा हा धागाच उडवुन पुन्हा एक नविन धागा लिहिणार का हे विचारावे...

स्नेहांकिता's picture

29 Feb 2012 - 10:24 am | स्नेहांकिता

गणपाभौ वपाडावजी अन चौकट्दादा,
फोटो मोठे करुन देण्याबद्दल अन मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद ! आता याच धाग्याला पुन्हा एडिट कस॑ करायच॑ सा॑गा म्हणजे वर्णन टाकता येईल. अडाणीपणाबद्दल माफी असावी.

चौकटराजा's picture

29 Feb 2012 - 7:11 am | चौकटराजा

लीना बाईंची छायाचित्रे फारशी उत्तम दर्जाची नाहीत. वेब साठी रूपांतरीत केली असल्यास असे होउन शकते. बदामी ला मी जाऊन आलेलो आहे
व ही बदामीचीच चित्रे आहेत. एकवार वल्ली सारख्या शोधकानी जाण्याचे ठिकाण नक्कीच आहे.

गवि's picture

29 Feb 2012 - 10:31 am | गवि

दर्जेदार असणार ही छायाचित्रे.

मला वाटतं की थंबनेल साईजची चित्रं डकवली गेली आहेत आणि मग त्यांची लांबीरुंदी खेचली गेली आहे..

मूळ छायाचित्रं मूळ कॅनव्हास साईझमधे लिंक केल्यास ती दर्जेदार असावीत.

चौकटराजा's picture

29 Feb 2012 - 11:58 am | चौकटराजा

आसपासचा प्रदेश आयर्न ओरचा असल्याने तांबड माती भरपूर. किल्ल्ला वर चढून जाताना तर एके जागचा फोटो " ग्रॅन्ड कॅनन " म्हणूनही छापता येईल . आमच्या हॉटेलच्या खोलीचे दार चुकून उघडे राहिले. पांढर्‍या शूभ्र बेडशीट वर पावलांचे ठसेकाम झालेले बाहेरून आल्यावर दिसले. कुणाची कृपा बरं ही ? बजरंग बली की जय !

पांढर्‍या शूभ्र बेडशीट वर पावलांचे ठसेकाम झालेले बाहेरून आल्यावर दिसले. कुणाची कृपा बरं ही ?

तुम्हाला साधी भानामती ओळखता येऊ नये याचं आश्चर्य वाटलं.

चौकटराजा's picture

1 Mar 2012 - 12:32 pm | चौकटराजा

मला परामानसशात्र या भटजीच्या साक्षीने भानामतिशी लग्न करायचे होते. कांउट ड्राकुलाची थंड हिरवी हवेली हनिमून साठी ही कधीच बुक केली आहे . पण अरेरे समोर येऊन सुद्धा हा शिंचा तिला ओ़ळखू शकला नाही. ......जिवाच्या सखीला कितीदा पुकारू कुठे साद घालू किती हाक मारू... ...... किती हा.....क मा रू ( हॉंन्टींग ईफेक्ट ) .