(हातसफाई - एक समृद्ध प्रयत्न)

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
27 Feb 2012 - 3:58 am

(हातसफाई - एक समृद्ध प्रयत्न)

सहज थोडा चवीत बदल म्हणून ही पाककृती करून पाहिली आहे. चाखून चव कशी आहे ते जरूर सांगा.

लोकलमधली गर्दी सटकतांना उडालेली झुंबड, (मला) (चक्क!) नकोनकोशी
वाटणारी खिडकीची सीट, गुदमरवून
टाकत फुप्फुसाकाश, कोंडला
अनंत प्राचीन श्वास, ढकलत कासावीस प्राण.

धनशक्तीचे सकसान्न घेवून
उधळणारी कनकपिढी, विखुरते
लोकलफलाटातून.
होवूदे तुझी बोहणी
वाजताच शीटी ८:५३ सीएसटी फास्टची.

हे वेड्या खिसापाकीटस्तेना,
चलधनरूपी द्रव्यमुद्रा लोकलच्या सिटागर्दीत विखुरले आहे,
ते तुला चोरता येत नाही, कारण
आज मोटरमनचा संप आहे.

- पाषाणभेदचंद्रजी (थोर्ले साहेब)

प्रवासविडंबनसमाजजीवनमानमौजमजा

प्रतिक्रिया

कल्पना मस्तच प्राचीनकवि पाषाण भेद.
पण ठोका थोडासा ओझरता बसला आहे.
हे पहा (या कवितेच्या ओळी नसून प्रतिसादाच्या ओळी आहेत)

लोकलमधली गर्दी सटकतांना उडालेली झुंबड, (मला) (चक्क!) नकोनकोशी
वाटणारी खिडकीची सीट, गुदमरवून
टाकत फुप्फुसाकाश, कोंडला
अनंत प्राचीन श्वास, ढकलत कासावीस प्राण.

धनशक्तीचे सकसान्न घेवून
उधळणारी कनकपिढी, विखुरते
लोकलफलाटातून.
होवूदे तुझी बोहणी
वाजताच शीटी ८:५३ सीएसटी फास्टची.

हे वेड्या पाकीटमारा,
चलधनरूपी द्रव्यमुद्रा लोकलच्या सिटागर्दीत विखुरले आहे,
ते तुला चोरता येत नाही, कारण
आज तुझेच पाकिट मारले गेले आहे.

पाषाणभेद's picture

28 Feb 2012 - 12:55 am | पाषाणभेद

>>>ते तुला चोरता येत नाही, कारण
आज तुझेच पाकिट मारले गेले आहे.

पाकीटमार सहसा पाकीटात पैसे ठेवत नाही अन धंदा झाला की लगेचच त्याचे पाकीटाशी घेणे असते. (आमच्या धंद्याच्या गोष्टी तुम्हाला खाजगीत सांगतो आहे, कुणाला सांगू नका. एक-दोन BE (IT) झालेली पोरे पन या लायनीत आलेली आहेत जे धंदा केल्यानंतर मुद्दल काढून घेवून उरलेले पाकीट मुळ मालकाला कुरीयर करत आहेत. आम्ही जुन्या वळणाचे आहोत. असो. )

त्यामुळे "आज तुझेच पाकिट मारले गेले आहे." ही लाईन आमच्या लाईनीवरच्या कवितेत मावत नाही. अहो पाकीटात कुणी एलआयसी पॉलीसी, मेडीकल पॉलीसी, बायोडाटा, बँकेचे पासबुक ठेवेल काय? त्यात ते मावणार काय? नाही ना? मग त्याचप्रमाणे आमच्या लायनीत आम्ही खिशात पाकीट ठेवत नाही त्यामुळे मारले जात नाही.

त्याउप्पर सांगतो की, आमची एकमेकांची लायन ठरलेली आहे. डोंबिवली कोण, ठाणे स्लो कोण, ठाणे फास्ट कोण, बदलापुर कोण, कसारा कोण, कर्जत कोण, भायखळ्याला कोण, सीएसटी ला कोण, सेंट्रल कोण, वेस्टर्न कोण, हार्बर कोण, सकाळची शिप्ट कोण करणार, दुपारी कोण करणार, पास कोण करणार (शब्द निट वाचा- अर्थ सांगत नाही- धंदा आहे हा आमचा!) हे सगळे ठरलेले असते. त्यातल्या त्यात बेस्टचा रूट वेगळा आहे अन त्या रुटला मी लहान असतांना असल्याने आता त्यात बदल झालेले असतील.

हां पण लोकल बंद झाल्यावर आमची लाईफलाईनच बिघडून जाते. म्हणून आम्ही लोकलच्या संपाच्या विरोधात आहोत.

त्यात हे मेगाब्लॉकवाले पण त्रास देतात त्यामुळे रविवारी मेगाब्लॉकच्या दिवशी आम्ही सुटी घेतो अन मस्तपैकी मल्टीफ्लेक्स पाशी अड्डा जमवतो. झाले तर कामपण होते अन पिक्चरपण पाहणे होते, काय!

असो. तुम्हाला आमच्यात विंट्रेस असेल तर सांगा. उस्मानभाय ची गाठ घालून देतो. भला मानुस आहे. तुमाला पोटापान्याला लावून देईल.

यकु's picture

28 Feb 2012 - 1:02 pm | यकु

_____/\____!!!