कुणी सांगा ......सुख म्हणजे नक्की काय असतं ?

जगी सर्वसुखी असा कोण आहे ....? .......विचारी मना तूच शोधोनी पाहे.
समर्थ रामदासांनी शेकडो वर्षांपूर्वी हे वाक्य लिहून ठेवले आहे. या वाक्यातून प्रक़्श्न निर्माण केला नसून मनुष्य स्वभावाचे वर्णन केले आहे . मोठ्या सुखांच्या मागे लागलेल्या माणसाची अवस्था नेहमी भांबावलेली असते कारण सुख मिळत नाही आणि त्याची चातकासारखी वाट बघणे असते आणि ते जेंव्हा समोर येते तेंव्हा उशिरा मिळाल्याचा खेद होत असतो . पुन्हा हे सुख कधी मिळणार या विचारात सुख खर्या अर्थाने उपभोगतच येत नाही . दररोज च्या जगण्यातील त्याच त्याचपणामुळे येणारा ताण .....या जगण्याचा येणारा प्रचंड उबग......सुखाच्या मोठ्या क्षणांची वाट पाहता पाहता होणारी आपली प्रचंड दमछाक ...या सर्वावर उपाय म्हणजे या रोज च्या जगण्यात सुद्धा जे अतिशय छोटे छोटे सुखाचे क्षण लपलेले आहेत ते डोळसपणे हेरण्याची ते शोधण्याची आणि ते उपभोगण्याची वृत्ती . कोणी म्हणेल रोजच्या जगण्यात कसलं आलंय सुख ?
विचार करा .....घरी येतांना कधी आपल्या बायकोचा विचार मनात आणून एखादा गजरा ...एखादेच चाफ्याचे फुल वेगळाच आनंद देवून जाते का ? घरी येताना आपल्या मुलाला आवडणारा एखादा पदार्थ अगदी एकच पीस आणला तरी त्याच्या चेहेऱ्यावर काही वेगळे भाव येतात का ? कधी तरी सुट्टीच्या दिवशी आपण स्वयंपाकाची जबाबदारी घेवून आपल्या परतणार ला सरप्राईज देता येतं का ? आपण दोघांनी एकत्रपणे बनवलेला पदार्थ चवीला जास्त चांगला लागतो का ? नेहमीच्या हॉटेल संस्कृतीला चाट देवून कधीतरी गरम गरम मक्याचे कणीस घेतल्यावर त्याची वेगळीच चव लागते का ? चिंब पावसात रिक्षा पकडून घरी जाण्यापेक्षा कुटुंबा बरोबर भिजत भिजत चालत जायला जास्त मजा येते का ? नेहमीचा पोळी भाजी डाळ भात चौकडीचा बेत बदलून सुखी भेल झिंग आणते का ? कधीतरी " mall " मध्ये न जाता घावूक बाजारात मोठ्या पिशव्या घेवून महिन्याची खरेदी करण्यात काही मजा येते ? नेहमीच्या फिरायच्या जागा सोडून अनोळखी वाटांवरुन फिरण्यात काही वेगळी गम्मत येते का ? आठवड्याच्या बाजारात मिळणाऱ्या चित्र विचित्र वस्तू आकर्षित करतात का ? कधीतरी घरच्या जेवणाचा डबा घेवून जवळच्या बागेत किंवा तळ्याकाठी केलेल्या अंगत पंगत जेवणाची चव वेगळी लागेल का ? आपल्या मुलांच्या बरोबरीने माचीस ची कव्हरे , पोस्टाची तिकिटे , पोकीमॉन ची चित्रे जमवण्यात वेडेपणा वाटेल का ? कधी वेळात वेळ काढून आपल्या मुलांच्या मित्रांबरोबर क्रिकेट ,फुटबॉल खेळण्यात आणि खोटे खोटे हरण्यात खरच कमीपणा असेल का ? कधी वेळेच्या आधी मुलाला शाळेत स्कूलबसने न पाठवता स्वतः पोहोचवायला आवडेल का ? बायको चहा घेवून यायच्या आत अंथरुणे आवरून बेडरूम नीटनेटकी केल्यावर बायको रागावेल का ? कधी तिला न कळवता तिच्या ऑफीसच्या दारात ऑफीस सुटण्याच्या वेळेला तुम्हाला पाहून तीला गोड धक्का बसेल का ? आणि दोघे मिळून घरी परत येताना तीला आवडणारी कचोरी आवर्जून खायला घातल्यावर ती तृप्त होईल का ? तिच्या आवडत्या झाडाला एके दिवशी सकाळी तुम्ही जर पाणी घातले तर काय होईल ?
सांग सांग भोलानाथ या सर्वामधून सुख मिळेल का ...... हो नक्की मिळेल , सुख काही कोठल्या " पपलू " चिडिया का नाम नाही हैं. सुख उपभोगणे हा विषय नसून ती वृत्ती आहे . मग काय आज पासून या संदर्भातील गोष्टींची " थिंग्स टू डू " ची लिस्ट बनवणार की नाही ?

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

प्रवीण दवणे तुमचे आवडते लेखक आहेत काय..?

सुख ..सुख म्हणजे नक्की काय असतं . अजुनही विचार केला तरी उत्तर नीटस मिळत नाही.मग खोल विचार केला कि वाटत हेच सुख शोधण्यासाठी माणूस जी वाट चालत असतो ,जीचं त्यानेच स्वतःच्या सोयीन जीवन ,आयुष्य अस नामकरण केलेलं असत , त्या वाटेवर मिळणार समाधान ...आनंद ,काही अपेक्षांची पूर्तता म्हणजे सुख असेल बहुतेक .
कमाल आहे ना पहिल्यांदाच जाणवल ..कि एका शब्दाचा अर्थ त्या शब्दाशिवाय दुसरा काढताच येत नाहीय .किवा अस म्हणूया कि कितीही शब्द वापरा ' सुख ' ह्या शब्दातला गोडवा हा त्या शब्दाशिवाय कुठे मिळत नाहीय .
सुख हे रोजच्या जगण्यातच दडलेलं असत ,फक्त ते दिसण्यासाठी ,त्या सुखाला समजून घेण्यासाठी आपली नजर सुखी हवी. काहींच सुख खाण्यापिण्यात दडलेलं असत ,तर काहींच फिरण मौजमजा करणं ,काहीजण आपल्यातच गुंग होवून जगण्याला सुखाच नाव देवून बसतात ...तर काही कुणाच्यातरी संगतीत ,सोबतीत आयुष्य घालवण्याला सुख म्हणतात .खरय तेही ..व्यक्ती तितक्या प्रवृत्ती .जस कोण कधी हसेल ,कोण कधी रडेल हे सांगता येत नाही ,अगदी तसच कोणाच सुख कशात लपलय हे सांगता यायचं नाही ,
आमच्या शेजारच्या गण्याला खाण्यात सुख आहे अस वाटत ,तो म्हणतो " ज्या दिवशी गुलाबजामून , कालाजामून खायला मिळतात ,तो माझ्यासाठी सुखी दिवस ,तर ह्याच ' खाण्यातल्या ' सुखाकडे पहायची दृष्टी एका गरीबाची कशी असेल? ..तर " आज सुकलेली ,शिळी का होईना पण पोटभर भाकरी मिळाली "
माणसा माणसाची व्याख्या वेगळी .तसच अजून एक उदाहरण देता येईल . चित्रकाराला कोऱ्या कागदावर नुसत्याच रेगोटया मारण्यात आणि त्यातून चित्र निर्माण करण्यातही
आनंद मिळतो ...त्यातूनच एखादी प्रतिमा नकळत तयार झालीच तर त्याच्या चेहेर्यावर उमटणार समाधान " किती सुखी आहे हा माणूस " बोलायला भाग पाडतं , तर हेच चित्र एखाद्या अरसिकाच्या डोक्यात जात .जी गोष्ट एकाच्या सुखाची व्याख्या बनते तीच गोष्ट दुसर्याच्या रागाची ,चिडण्याचीही कारण बनते .
सगळ्यात सुंदर उदाहरण द्यायचं म्हटलं तर ते देता येईल 'तीच ' आणि ' त्याच ' सुख ...
तिचं सुख ..ओफिस्वरून घरी आल्यावर त्याने प्रेमाने केसावरून हात फिरवून " थकलीस ? " एवढच म्हणन म्हणजे तिच्यासाठी ते सुख ..
त्याचं सुख ...घरी आल्या आल्या तीच ताजतवान करणार स्मितहास्य पहाण ...म्हणजे .. त्याच्यालेखी ते सुख
तिला आवडणारी गोष्ट लक्ष्यात ठेवून खास त्यान तिच्यासाठी मुद्दामहून आणण म्हणजे सुख ..तर
त्याच्या आवडीची भाजी ,तीन कितीही उशीर झाला ,कितीही थकली असली तरी खास त्याच्यासाठी बनवण .....म्हणजे सुख ..
मात्र त्या दोघांचही सुख दडलेलं असत ते एकमेकांच्या सहवासात .....त्याचं एकत्र असण हीच खरी सुखाची व्याख्या असते त्या दोघांसाठी .
असो ..तर हे सुख , पैशात न मोजता जस मिळेल जिथे मिळेल तिथून उचलून आणून त्याला आपलस केलत तर ते सुख दुप्पट होत ...

०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====

♥ " मेरा पती ' पती ' smiley ... तेरा पती ' वनस्पती ' smiley " ♥

पूजा ..
प्रतिक्रियक़ वाचून खूप बरं वाटलं. सुख हा शब्दच उच्चारला की वेगळी भावना मनात येते. प्रत्येक अनवट क्षणी आपल्याला हवी असणारी गोष्ट आपल्या आयुष्यात आली की मिळतं ते सुख. थंडीतील पहाटे शेकोटीच्या बाजूला बसून गरम गरम चहा पिताना मिळते सुख आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाची बोटे कुरवाळता मनात दाटते तेही सुखच. मात्र आपला मुल आणि दुसऱ्याचा मुल असा फरक आपलं मन करत असेल तर आपल्याला सुख शोधण्याची वणवण करावी लागेल याची नांदी असेल कारण अशी व्यक्ती सुख उपभोगणारी नसून फक्त सुखाचा शोध घेणारी असते.
एकदा अशी छोटी छोटी सुख उपभोगण्याची सवय ...सवय हा शब्द नको.... वृत्ती अंगी बाणली ना की प्रत्येक दुखः साखरेचा थर चढवलेल्या औषधाच्या गोळी सारखे वाटू लागेल. आणि फक्त सुखाचीच अपेक्षा आपण करत असू तर मधून मधून अशी दुख्खाच्या औषधची गोळी हवीच नाही तर सुख उपभोगतच येणार नाही काही काळाने. एकदा सुख उपभोगण्याची वृत्ती जमली की मग त्यापुढे जावून आपण दुख्खा देखील छान एन्जोय करू शकू. !!!!

यशोधन

रोज रोज तुमचे लेख वाचणे हेही एक सुखच आहे.

-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।

विरामचिन्ह राहिलं का रे? smiley

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"A government is the most dangerous threat to man’s rights: it holds a legal monopoly on the use of physical force against legally disarmed victims."
Capitalism: The Unknown Ideal- Ayn Rand

छे छे. चातक जशी पर्जन्याची वाट बघत असतो तशी आम्ही त्यांच्या लेखांची वाट बघण्याची इच्छा धरून आहोत पण ते तशी संधी आम्हास देत नाहीत.

-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।

ज्या समर्थांनी .. जगी सर्व सुखी असा कोण आहे ? हा प्रश्न विचारला आहे .. त्यांनीच त्याचे नि:संदिग्ध उत्तरही दिले आहे !
सांडून राम आनंदघन| ज्याचे मनीं विषयचिंतन |
त्यासी कैंचें समाधान| लोलंगतासी ||६२||
जयास वाटे सुखचि असावें| तेणें रघुनाथभजनीं लागावें |
स्वजन सकळही त्यागावे| दुःखमूळ जे ||६३||
जेथें वासना झोंबोन पडे| तेणेंचि अपायें दुःख जडे |
म्हणौनि विषयवासना मोडे| तो येक सुखी ||६४||
विषयजनित जें जें सुख| तेथेंचि होतें परम दुःख |
पूर्वीं गोड अंतीं शोक| नेमस्त आहे ||६५||
गळ गिळितां सुख वाटे| वोढून घेतां घसा फाटे |
कां तें बापुडें मृग आपटे| चारा घेऊन पळतां ||६६||
तैसी विषयसुखाची गोडी| गोड वाटे परी ते कुडी |
म्हणौनियां आवडी| रघुनाथीं धरावी| ६७||

आपणांस आहे मरण! म्हणोन राखावें बरवेपण!!

जगी सर्व सुखी असा कोण आहे ?
" विचारी मना, तूच ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

जे विचारी मन आहे , ते सुखाच्या शोधात नसते तर ते स्वतः च सुखी असते.
जगताना दोन प्रकारची दु: खे आपण अनुभवतो. कल्पनेने निर्माण केलेली व जाणीवेने निर्माण केलेली.
जाणीव म्हणजे वेदना संवेदना यानी दिलेला दु: खाचा संदेश . उदा पोट दुखणे डोके दुखणे ई. यावर उपाय पेन किलर.
कल्पनेने दिलेला दु: खाचा संदेश म्हणजे मनाने निर्माण केलेली दु: खे उदा अपमान, मत्सर, द्वेष न्यूनगंड, इ. यावर उपाय म्हणजे
नेहमी साधक बाधक विचार करून उजळ बाजू जवळ करणे. उदा. एखाद्याने अपमान केला तर " तो मुर्ख आहे" म्हणून आपण बरोबर
असतानाही त्याला आपला अपमान करावासा वाटला" असे आपल्या मनाला पटवून देणे.

------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !

१. विचारी नाही तर विचारें मना तूंचि शोधूनि पाहे॥
२. एखाद्याच्या दृष्टीनं सुख म्हणजे काय त्यावर याचं उत्तर अवलंबून आहे.

राघव

जे आसपास होतंय घडतंय ते अनुभवायला आपण जिवंत आहोत याचा आनंद होत असणं = सुख

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

सदर वाक्य सुप्पर लाइक करण्यात आलेलं आहे.

--मनोबा
"The last Christian died on the cross".

http://www.misalpav.com/node/8554

वाचा ( सुख काय ते कळण्या करिता smiley )

सुहास
शंभर प्रतिसादात काड्या सारायच्या, अधून मधून सतत कण्हत राह्यचे आणि वर्षा दोन वर्षातून एखाद्या लेखात आव ऋषिमुनींचा आणायचा असले लोक आमच्या ही डोक्यात जातात. (सही-सौजन्य : बिरूटेसर )

नको तिथं आल्याने प्रकाटाआ...

= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =

लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.

घरी येतांना कधी आपल्या बायकोचा विचार मनात आणून एखादा गजरा.

हो केला की... पैल्यांदा विचित्र वाटलं... पण मग म्हटलं "xx-xx xx, x x xxx xx!" (भरा आता गाळलेल्या जागा, अन व्यनि करा मला)...

= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =

हा पोरगा बग बायको बद्दल लिहीतो आणी मग तुझ्या कडे नाव नोंदवतो ....
हा काय बराबर पोरगा नाय असां माका वाटत असां smiley

.......................................................................
मी जे लिहीन ते खरं लिहीन खोटं लिहिणार नाही...

अग्गो बाई,मला तर वाटल होत कि तुझ लग्न व्हायचं.

-----------------------------------------------------------------------------------------------

सुखि संसाराची सोपी वाटचाल!

बायको स्वतःची होती असे कुठे लिहिले आहे वप्याने ?

===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================

म्हणुन तर लिहिलं होतं ते... पण सर्वांना कुठं कळतंय मी काय लिहितो ते... बरं झालं नाही कळालं तेच...
किचेनतै, अजुन निरागसतेच्या सप्ताहातच रममाण असाव्यात...

= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =

सुख म्हणजे सुख असतं, न बोचलेलं दुख: असतं,
न बोचणारं दुखः म्हणजे, हवं थोडं असताना मिळालेलं खुप असतं,
मिळतं खुप तेंव्हाच जेंव्हा पोटात नसते भुक, मिळतं खुप तेंव्हाच जेंव्हा पोटात नसते भुक,
पोटात भुक असताना सुखाची अपेक्षा, करणंच चुक असतं,
सुख म्हणजे सुख असतं, न बोचलेलं दुखः असतं.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

कशाला लिहिता हो असले जीवघेणे वास्तव..? smiley

सुख उपभोगणे हा विषय नसून ती वृत्ती आहे !!
ह्म्म.. विचार करतोय smiley

-- लिखाळ.
तेच ते तेच ते !

सुख म्हनजे नक्कि काय असतं ,

सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचन्यातही एक सुख असतं.smiley

०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====

♥ " मेरा पती ' पती ' smiley ... तेरा पती ' वनस्पती ' smiley " ♥

सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचन्यातही एक सुख असतं.

नवीन आहात. थांबा थोडे दिवस. smiley

===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================

ह्म्म बरोबर आहे तुमच smiley

०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====

♥ " मेरा पती ' पती ' smiley ... तेरा पती ' वनस्पती ' smiley " ♥

अगदी बरोब्बर... लिहिण्यात जे सुख असतं ते वाचण्यात नसतं...
@पुजा, हवं तर किचेनतै/पियुशा ह्यांना विचारुन बघा...

= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =

मी तर तुम्हा सर्वांच्या कळफलकातून बाहेर निघालेल्या स्तुतीसुमानांना घाबरून लिहायचेच थांबवले आहे.
सुखाच्या प्रतीक्शेत आपली किचेन.
सुखि संसाराची वाटचाल सोपि नाहि हो.

-----------------------------------------------------------------------------------------------

सुखि संसाराची सोपी वाटचाल!

@मी तर तुम्हा सर्वांच्या कळफलकातून बाहेर निघालेल्या स्तुतीसुमानांना घाबरून लिहायचेच थांबवले आहे.>>> अचं नक्को कलु ना किच्चु तै,पुन्ना लीहायला लाग

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्त...!http://www.easyfreesmileys.com/smileys/free-evil-grin-smileys-754.gif बस नाम ही काफि है। smiley

लिहा हो तुम्ही. लोकांची मस्करी ऐकून लिहिणे कशाला थांबवायचे ?
ती बाप आणि मुलगा गाढवाबरोबर जात असतात ती गोष्ट माहित आहे ना ??

===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================

सुख म्हनजे नक्कि काय असतं ,

सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचन्यातही एक सुख असतं.smiley

०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====

♥ " मेरा पती ' पती ' smiley ... तेरा पती ' वनस्पती ' smiley " ♥

सुख आणि आनंद म्हणजे सेम का? एखाद्या कलाकाराला त्याच्या कलेमधून 'आनंद' मिळतो की 'सुख'? मला वाटतं की आनंद आणि सुख यात थोडा फरक आहे. बहुतेक वेळेला 'सुख' मिळावं म्हणून आनंदाला मुकलं जातं. (घासून गुळगुळीत झालेलं वाक्य). पण आपल्यापैकी कितीजणं रोज ऑफिसमधे दहाबारा तास घालवून, चांगल्यापैकी पगार घेऊनही त्यांना ज्या गोष्टींची आवड आहे ती करून आनंदी होतात? दूरवरच्या 'सुखांचं' लक्ष्य गाठण्याच्या वेडापायी, आजूबाजूच्या आनंदाचे क्षण पायदळी तुडवतो? आजच माझ्या बॉसने सगळ्यांना एक बातमी दिली, जवळ जवळ बारा वर्ष आमच्या कंपनीत घालवल्यानंतर आज तो नोकरी सोडून स्वतःचं एक छोटं शेत घेऊन तिथे ऑर्गनिक शेती करणार आहे (हा भारतीयच माणूस आहे शिवाय त्याने हाच प्रकल्प त्याच्या गावी बंगलोरच्या जवळही केला आहे). ज्या कामात आनंद मिळतो ते काम करायला मिळणे हे 'सुख' !

------------------------
मराठे
http://kaaheebaahee.blogspot.com
http://ikadetikade.blogspot.com

सुख हे सहसा शरीराशी संबंधित असतं- भौतिक असतं तर आनंद हा मनाचा असतो.
सुख हे अनुभवता येतं , आनंदाची अनुभुती यावी किंवा घ्यावी लागते.
सुखाची ठरलेली परिभाषा आहे, आनंद तसा बांधलेला नसतो.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

सत्यनारायणाचा प्रसाद खाणं हे सुख असतं !
साधुवाण्याची कथा ऐकणं हा आनंद असतो !
असं म्हणायचं का " फक्त ५०" आपल्याला ????

------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !

सत्यनारायणाचा प्रसाद खाणं हे सुखच असतं पण ती साधुवाण्याची जाम भंपक कथा ऐकणं म्हणजे...जाऊ द्यात.

-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।

@ चौकटराजा,

छे छे, माझ्या मते, केळी / अननस घालुन केलेला शिरा खाणं हे सुख आहे, आणि कुणितरी तो आपल्यासाठीच केला आहे हे न बोलता समजण्यात आनंद आहे.

मी सुख हे शरीराबरोबर जोडतो कारण सुखाला कशाच्या तरी स्वरुपात व्यक्त होण्याची गरज असते, आनंदाचं तसं नसतं आणि तो व्यक्त झाला तरी त्याचं बाह्य दृष्य रुप हे सुखाचंच असतं.

अवांतर - उदा.
श्री. सुड यांना बालुशाही, श्री. वपाडाव यांना प्लॉवरची भाजी, मा. पियुषातै यांना जिलेबी करता येणं यात आम्हाला आनंद आहे, पण या गोष्टी प्रत्यक्ष खायला मिळणं यात सुख आहे.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

मार्मिक. smiley

-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।

@श्री. सुड यांना बालुशाही, श्री. वपाडाव यांना प्लॉवरची भाजी, मा. पियुषातै यांना जिलेबी करता येणं यात आम्हाला आनंद आहे, पण या गोष्टी प्रत्यक्ष खायला मिळणं यात सुख आहे.>>>

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्त...!http://www.easyfreesmileys.com/smileys/free-evil-grin-smileys-754.gif बस नाम ही काफि है। smiley