पुलंदर्शन!

आज १२ जून. आज पुलंचा स्मृतीदिन. पुलंच्या काही भावमुद्रा इथे देण्याचा मोह होत आहे.

साहित्य साधनेत मग्न!

पहिल्या चित्रात पंडित भीमसेनांबरोबर आणि दुसर्‍या छायाचित्रात पंडितजींना पेटीवर साथ करताना.

पु.ल.देशपांडे! महाराष्ट्राला पडलेलं एक हसरं स्वप्न! ह्या माणसाने निर्विष विनोदाने कोट्यावधी मराठी लोकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवलेले आहे. पुलं ची रुपेही अनेक. साहित्यिक पुलं,संगीतकार-गायक पुलं,नाटककार,नट,पटकथाकार,दिग्दर्शक अशा कितीतरी वेगवेगळ्या भूमिका जगून ह्या माणसाने मराठी माणसाचे सांस्कृतिक आयुष्य समृद्ध करून टाकलंय.
पुलंचे लेखन इतके सर्वव्यापी आहे की व्यवहारात त्या त्या प्रसंगाला अनुरुप अशी त्यांच्या लेखनातील वाक्ये आपल्याला आठवत असतात आणि त्या प्रसंगातही आपण रमतो असा माझा अनुभव आहे.

पुलंच्या पुण्यस्मृतीला माझी विनम्र आदरांजली.

पुलंची सर्व छायाचित्रे पुलंदेशपांडे.नेट वरून साभार

दंडवत..!

धन्यवाद प्रमोदशेठ!

आमच्या गुरुजींना आमचा साष्टांग दंडवत!

काय भाईकाका, वरती रंभा तुमच्या डोक्यावर तेल थापत्ये अन् ऊर्वशी पंख्यानं वारा घालत्ये म्हणतात! आणि तुम्ही मात्र निवांत बसून कधी मन्सूरअण्णांचा नटबिहाग तर कधी नारायणरावांच 'नयने लाजवीत...' ऐकताय असं कळलं! Smile

आपलाच,
तात्या बर्वा. Smile

ससुल्या गडी

पुलंदर्शन झालं की खूप प्रसन्न वाटते.

पुलंच्या पुण्यस्मृतीला माझी विनम्र आदरांजली.

सहमत. राज

सहमत.

राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... Wink

असेच म्हणतो

पुलंदर्शन झालं की खूप प्रसन्न वाटते.

पुलंच्या पुण्यस्मृतीला माझी विनम्र आदरांजली.

>>पुलंच्या

>>पुलंच्या पुण्यस्मृतीला माझी विनम्र आदरांजली.

असेच म्हणतो.

व्यंकट

+१

असेच म्हणतो !

महाराष्ट्राचेच नव्हे तर

जगभरातल्या मराठी भाषिकांचे जगण्याचे मानदंड एका विलक्षण उंचीवर नेऊन ठेवणार्‍या, माणूस ह्या प्राण्यावर नखशिखांत प्रेम करणार्‍या, संगीताशिवाय एक क्षणही जगू न शकणार्‍या, आपल्या सर्वंकष प्रतिभेच्या परीसस्पर्शाने जनसामान्यांच्या हृदयात अढळ स्थान पटकावणार्‍या भाईकाकांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!

चतुरंग

ह्याउप्पर

ह्याउप्पर आम्ही पामराने भाईकाकांबद्दल काय बोलावे!

भाईकाकांच्या स्मृतीदिनी त्यांच्या चरणि मस्तक ठेऊन त्रिवार वंदन!

आदरांजली

पुलंचा 'गुळाचा गणपती ' परत परत पहावा असा. साहित्य, नाट्य, संगीत याचा सुरेख संगम यातुन दिसुन येतो.
महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्वास विनम्र आदरांजली

आदरांजली

मला पुलंच "मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची" हे कुंकु ह्या चित्रपटातील गाणं हवं आहे.

कोणाकडे असल्यास दुवा पाठवा..

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

पुल दर्शन

पुल दर्शन आवडले,
त्यांची पुस्तके वाचताना,कथाकथनं ऐकताना,चित्रपट किवा नाटकांच्या व्हीसीडी पाहताना मध्येच कधीतरी जाणवतं,अरे .. हा अवलिया आता आपल्यात नाही, पण नाही कसा? ते तर आहेतच, इथेच आहेत.त्यांच्या पुस्तकांतून,कॅसेटमधून,नाटक आणि सिनेमातून भेटतात ना आपल्याला.. पण हसताना मात्र टचकन डोळे भरूनही येतात.
स्वाती

विनम्र अभिवादन

पुलंना माझे विनम्र अभिवादन. अजूनही 'ते आपल्या जगात नाहीत' असे वाटतच नाही.

विनम्र अभिवादन

महाराष्ट्राच्या ह्या लाडक्या व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन!

अभिवादन

पुलंना माझेही अभिवादन. त्यांच्या प्रतिभेप्रमाणेच त्यांनी सामाजीक क्षेत्रात "दाता भवती वा न वा" प्रमाणे दाखवलेल्या दातृत्वामुळेही.

पुलंना मिळालेला गदीमा पुरस्कार स्विकारताना केलेले दुर्मिळ भाषण येथे ऐका.

आदरांजली!

आजचा दिवस पुलंच्या स्मृतीमध्ये!
पुलं गेलेत हे खरंच वाटत नाही अजून...

आभारी आहे प्रमोदकाका!
पिडा