जेम्स मिचनेर या लेखकाची पुस्तक ओळख - भाग २

Ravindra's picture
Ravindra in जनातलं, मनातलं
24 Feb 2012 - 3:29 pm

पहिल्या भागाची लिंक - http://misalpav.com/node/20773

१९५७ मध्ये रशियाने पहिला स्पुतनिक उपग्रह सोडल्याची बातमी येते आणि देशाला आपण कम्युनिस्ट रशियाच्या मागे पडल्याच्या भावनेने अपमान वाटतो. पुन्हा स्पेस प्रोग्रामला वेग येतो. पैशाच्या अडचणी कमी होतात. मग चालू होतो एक विराट स्पेस प्रोग्राम. आपल्या चार नायकांची थंडावलेली करिअर परत वेग घेतात.

अमेरिकेचे काही उपग्रह पाठवण्याचे प्रयत्न फसतात आणि स्पेस प्रोग्राम मधील माणसांबद्दल अविश्वास दाखवला जाऊ लागतो. पण सिनेट कमिटी त्याना पाठींबा देते आणि एक यश मिळते.

युरी गागारीन च्या अंतराळ यात्रेनंतर , १९६१ मध्ये अध्यक्ष जॉन केनेडी देशाला “ १० वर्षात चंद्रावर माणूस पाठवून परत आणण्याचे ” आवाहन करतात आणि देश या मिशनच्या मागे लागतो. विविध महत्वाचे निर्णय घेण्याचा सिलसिला चालू होतो.
१. स्पेस प्रोग्रामचा कंट्रोल मिलिटरीकडे असावा कि सिविलीअन – प्रेसिडेंट जनरल आयसेन्होवर यांचा निर्णय सिविलीअनच्या बाजूने होऊन नासाची स्थापना.

२. चंद्रावर यान पाठवण्याची पद्धत – एक मोठे यान किंवा एकामागोमाग गळून पडणाऱ्या स्टेजेस. माणूस चंद्रावर पाठवून त्याला परत आणणे महत्वाचे होते. [एका आर्मी कर्नलने असा प्रस्ताव ठेवला कि माणूस यांमध्ये ३ वर्ष पुरेल एवढे अन्न, पाणी आणि ऑक्सिजन बरोबर चंद्रावर पाठवावा आणि त्या तीन वर्षात त्याला परत आणण्याचा मार्ग शोधावा. तू स्वताचे जीवन अशा पद्धतीने धोक्यात घालशील का , असे विचारल्यावर तो म्हणाला – मी त्यासाठीच आलो होतो. चंद्रावर जाणारा पहिला माणूस होण्यासाठी मीच काय , तुम्हाला लाखो लोक आपला जीव धोक्यात घालायला तयार होतील.].

३. स्पेस मध्ये पाठवण्यासाठी माणसे कुठून आणि कशी निवडावी. डिफेन्स फोर्स मधील माणसे पाठवण्याचा निर्णय झाला.
४. पृथ्वी कक्षा किंवा चंद्र कक्षा - म्हणजे मूळ यान पृथ्वी च्या किंवा चंद्राच्या कक्षेमध्ये फिरत राहील आणि छोटे यान वेगळे होऊन चंद्रावर उतरेल व परत येऊन मूळ यानाशी जोडले जाईल . चंद्राच्या कक्षेत मूळ यान फिरत ठेवण्याचा निर्णय झाला. याबद्दलच्या विविध फायदे , तोटे आणि लोकांची प्रखर मते दाखवली आहेत.

. काही तज्ञांच्या मते माणूस चंद्रावर पाठवणे हा मुर्खपणा आणि पैशाचा अपव्यय होता. माणूस पाठवायचा म्हणजे माणसाला आवश्यक असलेली हवा, पाणी आणि अन्न पाठवायचं. आणि त्यामधून येणारी complications वर उपाय काढण्यात पैसे आणि वेळ वाया घालवायचा. त्यापेक्षा मशीन चंद्रावर पाठवून माहिती मिळवावी आणि पुढे अवकाशामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करावेत. पण स्पेसच्या सिनेट कमिटीवरील सिनेटर त्यांना सांगतो – तुम्हाला अमेरिकन लोकांचा मानसिक आणि आर्थिक सहभाग हवा असेल तर ते नुसते यान पाठवून अशक्य आहे. At the end, Man is measure of all things. Machines could perform miracles, but they cannot enlist the emotional support of the public. Without the astronauts program has no viability. अर्थात रशिया माणूस पाठवेल आणि आपण न पाठवल्यास अमेरिकेचा तो कमीपणा जगाला दिसेल हा विचार सर्वांच्या मनात होताच.

मग चालू होतो अंतराळवीर निवडण्याचा सिलसिला आणि अगदी अमेरिकन पद्धतीने स्पेस प्रोग्रामची पब्लिसिटी. पुस्तकामध्ये एक काल्पनिक अंतराळवीरांचा गट बनवून त्याच्या प्रसिद्धीचा ठेका टकर थोमसन नावाच्या माणसास देण्यात येतो आणि अमेरिकन पद्धतीने अंतराळवीर आणि त्यांच्या पत्नी यांची प्रसिद्धी – काही जणांच्या मते तमाशा – चालू होते.

विविध तांत्रिक गोष्टी आणि त्यातील अडचणी फार छान समजावून सांगितल्या आहेत. उदाहरणार्थ – शून्य गुरुत्वाकार्षानाचे पृथ्वीवर ट्रेनिंग कसे द्यावे?

जेव्हा अंतराळात दोन याने जुळतात , तेव्हा ते अगदी हळुवारपणे कसे एकमेकांमधे बसतात – याचे उत्तर उदाहरणाने फार छान समजावून सांगितले आहे.

स्कॅन्निंग किंवा सातेलाईत फोटो – जे आज अगदी सहज आहे – त्याचा उगम याच स्पेसच्या तंत्रा मधून झाला.

जरी या पुस्तकात काही तांत्रिक गोष्टी समजावून सांगितल्या असल्या तरीही हे पुस्तक हि कादंबरी आहे अंतरालाशी झुंज घेणाऱ्या माणसांची.

आणखी एक सुंदर हाताळलेली अडचण म्हणजे , या सर्व प्रोग्राममध्ये एकही काळा माणूस दिसत नाही. यासाठी काय करावे ?

अंतराळवीरांचे ट्रेनिंग सुंदरपणे वर्णन केले आहे.

यामधून कितीतरी उपयोगी वस्तूंचा शोध लागला . उदा. वेल्क्रो. ज्या वातावरणात गुरुत्वाकार्श्नासारखा फोर्से नसतो , तिथे प्रत्येक गोष्ट बांधावी लागते. ती आरामात बांधण्य आणि सोडवण्याची पद्धत म्हणून वेल्क्रोचा उपयोग चालू झाला.

त्याचप्रमाणे जेव्हा यान परत येते तेव्हा पर्यावरणात शिरताना त्याचा तोंडावर भयंकर उष्णता निर्माण होते आणि तिथला धातू जळतो. [Ablation हा खरं योग्य शब्द आहे.] ती उष्णता सहन करू शकणारया धातूचा शोधामध्ये कितीतरी उपयोगी धातूंचे निर्माण झाले.

स्पेस यात्रा चालू होतात आणि त्या यात्रांचे वर्णन केले आहे. याबरोबरच अंतराळवीरांचे आणि त्यांच्या नातलगांचे, पब्लिसिटी आणि त्यातील व्यक्ती , या सर्वाचे वर्णन फार सुंदर आणि विस्तृतपणे केले आहे. वाचताना जराही कंटाळा येत नाही.

खऱ्या अपोलो अंतराळयात्रा अपोलो १७ पर्यंत होत्या. पुस्तकात काल्पनिक शेवटच्या अपोलो १८ यात्रेचे वर्णन केले आहे. अपोलो १८ हि यात्रा जाते चंद्राच्या काळोख्या भागावर. [लेखक समजावतो कि जरी तो भाग डार्क पार्ट ऑफ मून म्हणून ओळखला जात असला तरी तो काळोख नाही. फक्त तो पृथ्वीवरून दिसत नाही म्हणून त्याला चंद्राचा काळोख भाग म्हणून ओळखले जाते.]

कॉटेज नावाचा एक खाजगी खगोलशास्त्रज्ञ Sunspots अभ्यास करत असतो. त्याला असे लक्षात येते कि या काळात Sunspots वर काही activity वाढून सोलर फ्लेअर येण्याची शक्यता आहे. परंतु याच्या वेळेच्या अंदाजाला मागील आधार नसल्यामुळे तो कोणाला सांगत नाही. या यात्रे मध्ये जॉन पोप आणि त्याचे सहकारी आणि मित्र क्लाग्गेत व लीनले – निग्रो - असतात. पोप मुख्य यांनामध्ये राहतो आणि क्लागेत आणि लीनले चंद्राच्या दुसऱ्या बाजूला उतरतात. छोटे यान चंद्रावर उतरते आणि अंतराळवीर छोटी गाडी [रोवर ] घेऊन चंद्रावर फिरू लागतात. त्याचवेळी Sunspot activity व सोलर फ्लेर मुले किरणोत्सर्ग अचानक वाढतो आणि त्यामुळे संदेश प्रणाली मध्ये अडथळे येऊ लागतात. वातावरण नसलेल्या चंद्रावर फिरणाऱ्या अंतराळवीरांना हे धोकादायक असते. त्यांना परत येण्याचे आदेश दिले जातात. दोघेजण रोवर घेऊन परत निघतात. पण यानाजवळ येईपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये खूप किरणांचे शोषण झालेलं असत. यानाजवळ पोहोचताच क्लागेत यानात शिरून देता पाठवायला लागतो आणि लीनले दगडांचे नमुने घेण्यासाठी रोवर पाशी जातो आणि तिथेच तो भोवळ येऊन पडतो. क्लागेत लीन्लेला यानात आणतो आणि चंद्रावरून उड्डाण करतो , मुख्य यानाला परत भेटून जोडण्यासाठी. परंतु क्लागेतच्या शरीरातही खूप किरणांचे शोषण झालेलं असतं आणि तो उड्डाण करण्याचा कार्याविधी पूर्ण करण्या आधीच शुध्द हरपतो. यान परत चंद्रावर कोसळते आणि या दोन्ही अंतराळवीरांची शरीरे चंद्रावर कायमची विश्रांती घेतात. जॉन पोप एकटा परत येतो. या शेवटच्या अपोलो यात्रेपासून ग्रहांवर माणसे पाठवणे बंद होते.

पण पुढे चालू होतो मंगळाचा आणि शनीचा अभ्यास. दोन विभागांमध्ये मंगल आणि शनीचा अभ्यासाचे वर्णन केले आहे. हि कादंबरी असल्यमुळे त्या बरोबर त्यातील माणसांचे प्रवास चालू राहतात. पेनी पोपे सिनेट वर निवडून येते.
..............................................................................................................समाप्त.

आपण इथपर्यंत पोचला असाल तर पुस्तक ओळख एवढी लांब करण्याबद्दल माफ करावे. पण या ९०० पानी पुस्तकाबद्दल लिहिण्याचा मोह आवरला नाही.

साहित्यिकसमीक्षा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Feb 2012 - 4:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोनही भाग आत्ताच वाचले. नऊशे पानांची कादंबरी म्हटल्यावर किती लिहावं आणि किती लिहु नये असं होऊ शकतं. अर्थात आपण पुस्तकाची चांगली ओळख करुन दिली आहे. अर्थात जेम्स मिचनेरची ओळख आपल्यामुळेच झाली नाहीतर मला लेखकही माहिती झाला नसता त्यामुळे प्रथम आपले आभार.

स्पेस प्रोग्रॅम, यान, ग्रहांच्या गोष्टी आणि त्या निमित्ताच्या विविध घटकांची विशेषतः अभ्यासातुन संशोधनातुन जेम्स मिचनेर यांनी या कादंबरीत मांडणी केलेली असल्यामुळे त्यातल्या तपशिलवार गोष्टी वाचतांना माणुस हरखून जात असेल. मराठी भाषेत अनुवादित होऊन ही कादंबरी जेव्हा येईल तेव्हा वाचायला नक्कीच आवडेल. थँक्स........!

लेखन वाचतांना आणि अनुक्रमे समारोपाला येतांना लेखनाची थोडी तुटक तुटक तर मांडणी झाली नाही ना, असं वाटतं. पण चालायचंच. अजुन येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

डॉ.श्रीराम दिवटे's picture

25 Feb 2012 - 8:38 am | डॉ.श्रीराम दिवटे

नवनवीन साहित्याविषयी प्रत्येकालाच जि़ज्ञासा असते, त्यातही वैज्ञानिक विषयाला पसंती मिळते. आपण जेम्स मिचनेर यांच्या कादंबरीची झलक दाखविलीत त्या बद्दल अभिनंदन. फारच विस्तृत माहिती दिली गेलीय. उत्तम.

Ravindra's picture

25 Feb 2012 - 11:34 am | Ravindra

उत्तेजनाबद्दल धन्यवाद. माझे इंग्रजी वाचन खूप आहे पण मराठी लिखाणाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. काही त्रुटी राहिल्या असल्या तर माफ करावे. जेम्स मिचेनेरची मी जवळ जवळ सगळी पुस्तके वाचली आहेत. अशाच पद्धतीचे पुस्तक भारतातील एखाद्या भागावर लिहिले जावे असे माझे स्वप्न आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Feb 2012 - 5:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या लेखनासाठी आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा. पुस्तकाची ओळख मात्र अजुन येऊ द्या. प्रतिसाद किती आले आणि किती नाही आले, याचा विचार नै करायचा. जेम्स मिचनेर असा गुगलवर कोणी सर्च मारला तर दुवा मिसळपाववर (आंतरजालावर) आला पाहिजे. आणि जिज्ञासुची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. जालावर माहितीची शोधाशोध करणार्‍या पिढीसाठी नवनवीन माहिती उपलब्ध झाली पाहिजे, या मताचा असल्यामुळे आपल्या लेखनाचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे आणि शुभेच्छाही आहेत.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

25 Feb 2012 - 4:29 pm | पैसा

पुस्तक ९०० पानी म्हणजे कथानकही प्रचंड आवाका असलेलं आहे. तुम्ही त्याची छानच ओळख करून दिली आहे.