जेम्स मिचनेर या लेखकाची पुस्तक ओळख

Ravindra's picture
Ravindra in जनातलं, मनातलं
22 Feb 2012 - 11:58 am

जेम्स मिचनेर या लेखकाने विसा पेक्षा जास्त पुस्तके लिहिली . त्याचे वैशिष्ठ्य म्हणजे एक भौगोलिक भाग किंवा विषय घेऊन त्याचा कादंबरी रूपामध्ये इतिहास लिहिणे. खूप रिसर्च करून लिहिलेली हि पुस्तके कादंबरी स्वरुपात मनोरंजन आणि माहिती देतात. त्याच्या अशा पुस्तंकापैकी काही सेन्तेनिअल , टेक्सस, अलास्का , हवाई , चेसापेंक , कॉवेनांत ,सोर्स , स्पेस , द्रीफ्तेर्स ,कॅरावंस, मेक्सिको, पोलंड इत्यादी . खूप अभ्यास करून लिहिलेली हि पुस्तके आहेत. त्या भागामधील तीन – चार कुटुंबांचा वेगळ्या वेगळ्या कालावधीतील प्रवास आपल्याला त्या भागातील त्या त्या वेळची परिस्थिती सांगतो. स्पेस हे असेच पुस्तक. या पुस्तकामध्ये अमेरिकेचा स्पेस मधला प्रवास आहे.

पुस्तक चालू होते ते दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी. या पुस्तकामधील चार माणसांची ओळख. त्यामध्ये एक अमेरिकन इंजीनीअर स्टेनले मोट. दुसरा भावी सिनेटर नॉर्मन ग्रांट. तिसरा भावी अंतराळवीर जोन पोप आणि चौथा जर्मन रॉकेट इंजीनीअर दिएतर कोल्फ.

हिटलरचा थेट लंडनवर मारा करू शकेल अशा मिसाईलचा शोध आणि हरत आलेल्या जर्मन नाझीची इंगीनीअरना घाई. त्यातून स्वताला वाचवण्याचा प्रयत्न करणारे शास्त्रज्ञ आणि जनरल. याच वेळी स्टेनले मोट हा जर्मनी मध्ये आलेला असतो. त्याचे मिशन आहे जर्मनी मधील रॉकेट वर शोधकाम केलेल्या शास्त्रज्ञांना रशिया पासून आणि अमेरिकेच्या बॉम्बस पासून वाचवून अमेरिकेत आणणे. त्यातील कोल्फच्या शोधाची आणि सुटकेची रोमांचकारी कथा. कप्तान नॉर्मन ग्रांट याची सागरी युद्ध आणि त्यातून वाचण्याची कथा. जॉन पोपचे आणि काही भाबी अंतराळवीरांचे फायटर पायलट म्हणून कोरिया युद्धातील अनुभव.

याच बरोबर या चार माणसांच्या बायकांची ओळख. हे दोन विभाग त्या वेळचे अमेरिकन सामाजिक परिस्थिती आणि लोकांच्या मनस्थितीची ओळख करून देतात.
जर्मन शास्त्रज्ञांची अमेरिकेमध्ये राहण्याची आणि वेपन प्रोग्राम मध्ये सामील होण्याची धडपड फार छान दाखवली आहे .

अमेरीकेची पहिली स्पेस संस्था स्थापन केली जाते आणि मोट आणि जर्मन शास्त्रज्ञ त्यामध्ये असतात. पण या गोष्टी साठी देशाची काही urgency नसते. आणि बजेट हि फार नसते. रॉकेटचे फसलेले प्रयोग आणि त्यामधील फ्रस्ट्रेशन. [कल्पना करा. आपण आज जेव्हा भारतीय फसलेले मिसैलचे प्रयोगन्बद्दल वाचतो तेवा वैतागतो. पण हे आधी कोणीतरी केलेल्या गोष्टी आहेत आणि आपण कोठे तरी चूक करतो आहे एवढाच वैताग आहे. पण जेव्हा तुम्ही अगदी नवीन काहीतरी करायला जाता आणि प्रयत्न फसतो तेवा हे खरच शक्य आहे का हा प्रश्न मनात येत असेल.] अशात फसलेल्या प्रयोगांमुळे जर्मन शास्त्रज्ञ असलेली प्रयोगशाळा बंद करण्यात येते आणि या नवीन अमेरिकन नागरिकांना इंडस्ट्री मध्ये नोकरया शोधाव्या लागतात.

या सर्वांचं व्यक्तिगत आयुष्य आपल्याला अमेरिकन समाजाची कल्पना देत. मोटचा एक मुलगा गुन्हेगारी जगात जातो. दुसरा मुलगा गे असतो आणि त्यामुळे आई वडिलांपासून दुरावतो. जॉन पोपचे त्याचा बालपणीच्या मैत्रिणीबरोबर [पेनी ]लग्न होते. जॉन पोप ऐअरर्फोर्स मध्ये फायटर पायलट होतो. त्याचे कोरिया मधील जीवन आणि नंतर टेस्ट पायलटचे जीवनाचे वर्णन केले आहे. पेनी सिनेटर नॉर्मन ग्रांट च्या ऑफिस मध्ये काम करत असते. नॉर्मन सिनेटच्या स्पेस कमिटीवर असतो. नॉर्मन ग्रांट ची पत्नी मानसिक रोगी होते. ती एका फसव्या [कोनमान] [स्त्राबिस्मुस] च्या मागे लागते. स्त्राबिस्मुस लोकांना पराग्रहांवरील जीव पृथ्वी ताब्यात घेणार आहेत आणि मी तुम्हाला त्यांच्या नवीन राज्यात वाचवू शकेन असे सांगून त्यांच्या कडून पैसे काढत असतो. ग्रांट ची पत्नी खूप पैसे यामागे उधळते. हे ऑफिस कॅलीफोर्निआमध्ये असते. ग्रांट याबाबतीत कायद्याने काहीही करू शकत नाही. नंतर ग्रांटची मुलगी या माणसाबरोबर भागीदारी मध्ये काम करू लागते.दिएतर कोल्फ आणि त्याच्या कुटुंबाचे परिश्रम आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्याची धडपड अगदी सुंदर दाखवली आहे.

या सगळ्या कथेमध्ये खरी पात्रे [ वेर्नेर वोन ब्रॉन, सिनेटर- भावी राष्ट्रपती लिंडन जोन्सन] मधून मधून येत असतात.

१९५७ मध्ये रशियाने पहिला स्पुतनिक उपग्रह सोडल्याची बातमी येते आणि देशाला आपण कामुनिस्त रशियाच्या मागे पडल्याच्या भावनेने अपमान वाटतो. पुन्हा स्पेस प्रोग्रामला वेग येतो. पैशाच्या अडचणी कमी होतात. मग चालू होतो एक विराट स्पेस प्रोग्राम. आपल्या चार नायकांची थंडावलेली करिअर परत वेग घेतात.

......... चालु राहिल

साहित्यिकसमीक्षा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

22 Feb 2012 - 3:43 pm | मुक्त विहारि

धन्यवाद...

कवितानागेश's picture

22 Feb 2012 - 3:52 pm | कवितानागेश

वाचतेय ओळख...

पैसा's picture

24 Feb 2012 - 4:30 pm | पैसा

सर्वप्रथम मिपावर स्वागत. पदार्पणात एवढा व्यवस्थित लेख टाईप करता आल्याबद्दल अभिनंदन! अशीच आणखी पुस्तकाम्ची ओळख करून द्या. कथानक इंटरेस्टिंग वाटतं आहे.

Ravindra's picture

25 Feb 2012 - 3:22 pm | Ravindra

धन्यवाद. खरं म्हणजे या मराठी टंकलेखनामुलेच इतके दिवस मिपा वर लिहू शकलो नव्हतो. खूप शोध केल्यावर गुगल मधून एक टूल घेतले आणि मराठी टंकलेखन MS Word मध्ये करून मिपा ओर पेस्त करतो. ते जरा सोपं पडत.