प्रतापगडाला कसे जावे !

आशु जोग's picture
आशु जोग in भटकंती
14 Feb 2012 - 11:51 pm

काही माहिती हवी आहे प्रतापगडाबाबत

गडाची उंची किती आहे. खालून वर चढत जाणे शक्य आहे का !
की फारच उंच आहे

नाइट स्टे करण्यास काही सोय आहे का?

वरती पिण्याचे पाणी मिळेल का

जेवण वर मिळू शकेल का अथवा आपले आपण बनवण्यास परवानगी असेल का

अन्य कोणती काळजी घ्यावी

प्रतिक्रिया

>>>प्रतापगडाला कसे जावे !

तुमचे गाव कुठले हे माहीत नसल्याने (आणि स्वपरीचयात दिले नसल्याने) सांगणे अवघड आहे.

>>>गडाची उंची किती आहे. खालून वर चढत जाणे शक्य आहे का !
की फारच उंच आहे

अर्ध्यावाटेपर्यन्त गाडी वाट आहे. साधारणपणे पुढील वाटचालीला २०-२५ मिनीटे लागतात. चढण्याचा प्रॉब्लेम असल्यास डोली मिळते.

>>>नाइट स्टे करण्यास काही सोय आहे का?

आहे. परन्तु त्याची सद्यस्थीती माहीत नाही.

>>>वरती पिण्याचे पाणी मिळेल का

हो. टाके आहे आणि आजकाल पॅकेज ड्रिंकीग वॉटरसुद्धा मिळते.

>>>जेवण वर मिळू शकेल का अथवा आपले आपण बनवण्यास परवानगी असेल का

जेवण मिळू शकते. (बनवण्यास सोइस्कर जागा मिळणे अवघड आहे.)

>>>अन्य कोणती काळजी घ्यावी

अजूनही गडाचा दरवाजा सुर्यास्ताला बंद होतो आणि सुर्योदयाचे थोडे आधी उघडतो.

देवीचे स्थान आहे. त्यामुळे पावित्र्य जपले जाईल एव्हढे पहा.

पक पक पक's picture

15 Feb 2012 - 1:57 pm | पक पक पक

.काही माहिती हवी आहे प्रतापगडाबाबत

प्रतापगड हा एक ऐतिहासीक किल्ला आहे..

गडाची उंची किती आहे.

मोजली नाही....

खालून वर चढत जाणे शक्य आहे का !

सर्व गडांवर खालुनच वर चढतात असे ऐकले होते ,आम्ही देखिल खालुनच वर गेलो होतो.पॅरेशुटने वरुन खाली येता येइल्,पण खर्च खुप येइल.... ;)

की फारच उंच आहे

उंच आहे म्हणूनच प्रसिद्ध आहे ....पण सद्ध्या गाड्या अर्ध अंतर वर घेउन जातात, बाकी तुम्हाला झेपेल तसं...

नाइट स्टे करण्यास काही सोय आहे का?

विचार काय आहे ..? ;) सोय आहे पण पावित्र्य जपा :)

वरती पिण्याचे पाणी मिळेल का

कोल्ड्रिंक पण मिळेल, ताक जरुर प्या.. :)

जेवण वर मिळू शकेल का अथवा आपले आपण बनवण्यास परवानगी असेल का

आंगाशी ,आता कसा प्रश्न विचारलात ,लै भारी वांग्याची भाजी ,झुण्का भाकरी,ठेचा लाल मिरच्यांचा..अन् बाकी बरेच महाराश्ट्रियन पदार्थ मिळतील...

अन्य कोणती काळजी घ्यावी

उगाच कोठेही डोकाउ नका ,गड खुप उंच आहे,उन्हात टोपि घाला..स्वतःच्याच डोक्यावर्,ठीकाण प्रेक्शणीय आहे तसेच ऐतिहासीक पण आहे,तिथले पावित्र्य जपा ,उगाच वेड्या वाकड्या ठिकाणी चढुन फोटो काढु नका...जपा ;)

बात की खाल निकालनाचा पुनश्च प्रत्यय आला. (मिपाला हे नवं नाही.)
चालुद्या. :)

बाकी एकदाच प्रतापगडावर गेलोय लहान असताना. त्यामुळे सध्या धागाकर्त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मज जवळ नाहीत. क्षमस्व.

बात की खाल निकालनाचा पुनश्च प्रत्यय आला. (मिपाला हे नवं नाही.)

आम्ही देखील हे इथेच शिकलो.....

चालु द्या तुम्च देखिल ;)

गणपा's picture

15 Feb 2012 - 3:37 pm | गणपा

आम्ही देखील हे इथेच शिकलो.....

हॅ हॅ हॅ म्हणून गिरवणे चालु आहे होय?
गिरवा गिरवा.. काय गुण उधळताय ते दिसतच आहे.

गिरवा गिरवा.. काय गुण उधळताय ते दिसतच आहे.

त्याची काळजीच नाही ,आम्ही गिरवतोच आहोत हो :)

बोळा फिरवायला तुम्ही आहातच कि.... ;)

गणपा's picture

15 Feb 2012 - 3:58 pm | गणपा

बोळा अडकलाय का?
त्या सर्व्हीसेस आम्ही घेत नाही.
बाकीची बोलणी खवत करुया. :)

पक पक पक's picture

15 Feb 2012 - 4:07 pm | पक पक पक

बोळा अडकलाय का?
त्या सर्व्हीसेस आम्ही घेत नाही.

नाही पाटी भरली आहे ...बोळा फिरवा अस म्हणालो.

प्रचेतस's picture

15 Feb 2012 - 2:12 pm | प्रचेतस

महाबळेश्वरहून प्रतापगड पायथ्याला जायला बस, टॅक्सी मिळू शकते. किंवा मुंबईहून पोलादपूर मार्गे आलात तरी प्रतापगड फाट्याजवळ उतरू शकाल. जवळजवळ गडाच्या मुख्य पायर्‍यांपर्यंत गाडी जाते. तिथून १५ मिनिटात किल्ल्यावर पोहोचू शकाल पण त्यात मजा नाही. गाडीवाट टाळून गडावर यायचे असल्यास पायथ्याच्या आंबेनळी गावातून जावळीच्या जंगलातून जाणारी मस्त वाट आहे. तिथून साधारण १.५ ते २ तासात गच्च रानातून गडमाथा गाठता येतो.

गडावर मुक्कामाची सोय तिथल्या मंदिरात अथवा धर्मशाळेत होऊ शकते. पण सूर्यास्तापूर्वी गडावर पोहोचले पाहिजे. गडावर घरगुती जेवण उत्तम मिळते, पिण्याचे पाणीही विपुल आहे. तुम्हाला जेवण बनवायचे असल्यास कदाचित तिथे परवानगी काढावी लागेल कारण हा गड आजही भोसल्यांची खाजगी मालमत्ता आहे.

गडावर वावरताना आपण महाराजांच्या सान्निध्यात आहोत इतके फक्त लक्षात असू द्या.

मोदक's picture

15 Feb 2012 - 2:29 pm | मोदक

तिथे उतरल्यानंतर गुळाच्या खड्याला मुंगळे चिकटावेत तसे गाईड लोक मागे लागतील. गाईड घेणार असल्यास योग्य ठिकाणी पैसे भरून गाईड मिळेल.

पण ते खूप त्रोटक माहिती देतात, तसेच संपूर्ण गड फिरवत नाहित. (हे विधान व्यक्तीसापेक्ष असू शकते. :-))

जखमेवरती मीठ चोळून घ्यायचे असल्यास पायथ्याचे अफझलखानाचे स्मारक (?) बघून या. पोलीस तिथे खूपच कर्तव्यदक्षता दाखवत आपली चौकशी करतात, नाव, पत्ता व सही घेतात. जास्ती लिहू शकत नाही याबद्दल. %$#%@&.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Feb 2012 - 3:22 pm | परिकथेतील राजकुमार

प्रतापगडासारख्या ठिकाणी जावे तर स्वतः च्या घरापासून गडापर्यंत थेट घोड्यावरती बसूनच जावे.

पक पक पक's picture

15 Feb 2012 - 3:34 pm | पक पक पक

घोड स्वतःच की भाड्याच ...?

स्वतःच असेल तर ते घोड तयार व्हायला पाहीजे.. ;)

अन भाड्याच असेल तर मालक तयार व्हायला पाहीजे... ;)

अर्थात हे तुम्च मत आहे म्हणुन हे प्रश्न पड्ले... ;)

सुनिल पाटकर's picture

15 Feb 2012 - 3:23 pm | सुनिल पाटकर

समुद्रसपाटी पासूनची किल्ल्याची उंची : 300 मीटर , तालुका :महाबळेश्वर, जिल्हा : सातारा.. प्रतापगड हा महाबळेश्वरच्या जवळ आहे ,महाड - महाबळेश्वर मार्गावर कुंभरोशी येथुन आत रस्ता जातो .पायथ्यापर्यंत गाडी जाते . खालून वर चढत जाणे शक्य आहे.पिण्याचे पाणी ,जेवण मिळेल.
गडावर राहण्याची सोय नाही .महाबळेश्वर उत्तम.महाबळेश्वर येथुन बस आहे.

प्यारे१'s picture

15 Feb 2012 - 3:49 pm | प्यारे१

समुद्रसपाटी पासूनची किल्ल्याची उंची : 300 मीटर

फक्त +/- १००० फूट? चुकताय मालक! महाबळेश्वर ५५०० फूट + आहे (५५००/३.२८१) मी. प्रतापगड जवळपास तेवढाच आहे.
बाकी माहिती बरीचशी बरोबर.

सुनिल पाटकर's picture

16 Feb 2012 - 10:15 pm | सुनिल पाटकर

समुद्रसपाटी पासूनची किल्ल्याची उंची : १०८० मीटर ,

सुहास..'s picture

15 Feb 2012 - 3:26 pm | सुहास..

गूगल.कॉम

परिकथेतील राजकुमार's picture

15 Feb 2012 - 3:28 pm | परिकथेतील राजकुमार

गूगल.कॉमला कसे जावे ?

पशू रोग

सुहास..'s picture

15 Feb 2012 - 3:35 pm | सुहास..

www,google.com

वाशु ढोंग ;)

मूळ धाग्या पेक्षा प्रतिक्रिया वाचण्यात मजा आहे.

वपाडाव's picture

15 Feb 2012 - 3:50 pm | वपाडाव

.

वपाडाव's picture

15 Feb 2012 - 3:50 pm | वपाडाव

मूळ धाग्या पेक्षा प्रतिक्रिया वाचण्यात मजा आहे.

मिपाचा USP आहे ते !!

प्यारे१'s picture

15 Feb 2012 - 3:51 pm | प्यारे१

एकदा लिहून पण समजले असते ना कार्यकर्त्यांना! ;)

चौकटराजा's picture

15 Feb 2012 - 4:30 pm | चौकटराजा

सकाळी उठावे. स्नान केल्यावर आईकडून तहान लाडू , भूक लाडू याची शिदोरी बांधून घ्यावी. चालायला लागावे . दमल्यास वाटेत खेडशिवापूर ,
शिरवळ , बावडा, सुरूर, वाई म पाचगणी , महाबळेश्वर ई. ठिकाणी थांबावे. मिपाचे मेंबर शिप दाखविल्यास मिसळ पाव मोफत मिळेल.
बेस्ट लक !

मेघवेडा's picture

15 Feb 2012 - 7:15 pm | मेघवेडा

दमल्यास वाटेत खेडशिवापूर , शिरवळ , बावडा, सुरूर, वाई म पाचगणी , महाबळेश्वर ई. ठिकाणी थांबावे. मिपाचे

आणि आम्ही मुंबई किंवा रत्नागिरी किंवा सातार्‍याकडून येणार असलो म्हणजे? द्यायची तर संपूर्ण व्यवस्थित माहिती द्यावी राव.

पक पक पक's picture

15 Feb 2012 - 7:30 pm | पक पक पक

आणि आम्ही मुंबई किंवा रत्नागिरी किंवा सातार्‍याकडून येणार असलो म्हणजे?

अग्दी सातार्‍या कडुन जरी येणार असाल तरी आधी पुण्यातच यायच ,त्ये 'वाई वरुन सातारा ' म्हणतात ना तस पुण्या वरुन महाबळेश्वर्,प्रतापगड.. :) मग ते लाडु बिडु काय घ्यायच ते घ्याय्च अन निघायच रच्याकने. ;)

वपाडाव's picture

15 Feb 2012 - 7:19 pm | वपाडाव

आम्ही मुंबई किंवा रत्नागिरी किंवा सातार्‍याकडून येणार असलो म्हणजे?

या सर्व गावांहुन पुण्याला यष्ट्या येतात. त्यात चडुन पुण्याला यायचं...
पण याच्या आदी भुक लाडु अन तहान लाडू घ्युन याला इसराचं न्है..

पायथ्याशी उतरायचे तर एस टी ला कोणते गाव, स्टॉप सांगावा

पायथ्यापासून वर पोचायला किती वेळ लागतो, गड हिंडायला किती वेळ पुरेसा आहे
--
सर्वांनी दिलेली माहितीही उपयुक्तच आहे

प्रचेतस's picture

16 Feb 2012 - 8:35 am | प्रचेतस

कुंभरोशी किंवा आंबेनळी.

गड हिंडायला एक दोन तास पुरे झाले, अर्थात आजूबाजूचा निसर्ग बघण्यात कितीही वेळ जावू शकतो..

तिथे शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे, तो बारकाईने बघा, पुतळा घडवण्यातला काही दोष सापडतो का तेही सांगा आल्यावर :-)

या निमित्ताने उत्तम माहिती मिळाली..

शाळेच्या ट्रिपसोबत गेल्याचं आठवतंय.. शिवाय खालील थरारक पुस्तकाने प्रतापगड मनात घर करुन बसला होता..

प्रचेतस's picture

16 Feb 2012 - 6:52 pm | प्रचेतस

अगदी अगदी हो गवि,
हे पुस्तक अजूनही मिळेल काय?

गवि's picture

16 Feb 2012 - 7:07 pm | गवि

हो.. मी नुकतंच परत घेतलं..
आधीचं हरवल्याने..

परिकथेतील राजकुमार's picture

16 Feb 2012 - 6:52 pm | परिकथेतील राजकुमार

बाकी हा फास्टर फेणे अंमळ स्पावड्या फेणे दिसत आहे.

हाय का नाही शेम टू शेम ?

प्रचेतस's picture

16 Feb 2012 - 6:54 pm | प्रचेतस

आपकी पारखी नजर और निरमा सुपर..:)

म्हणजे स्पावड्या फेणे अजुनही चाकलेटी रंगाची हाप चड्डी घालतो असं म्हणायचं आहे का तुम्हाला ?

म्हणजे स्पावड्या फेणे चड्डीही घालायला लागला का आता?

बाकी आमचेही दोन पैसे:

>>>प्रतापगडाला कसे जावे !

चालत कारण बसने जरी गेलात तरी ती बस थेट गडाच्या टोकावर सोडत नाही त्यामुळे शेवटल्या पायर्‍या चालतच जावे लागेल. किती लहान आहात ते माहीत नाही अन्यथा कुणाच्यातरी कडेवरून गडाच्या कडावर जाणे शक्य आहे.

>>म्हणजे स्पावड्या फेणे चड्डीही घालायला लागला का आता?

असे म्हणायचे आहे का की,

म्हणजे स्पावड्या फेणेला चड्डी घालायला यायला लागली का आता?

;-)

स्पा's picture

17 Feb 2012 - 11:34 am | स्पा

=))
=))
=))

तेजायला

५० फक्त's picture

18 Feb 2012 - 1:52 pm | ५० फक्त

मा. श्री. स्पाजी, आपले नाव स्पावड्या आपटे आहे स्पावड्या फेणे नाही, हे अखिल मराठी आंतरजालाला माहित आहे, तेंव्हा तुमच्या बद्दल नसलेली एखादी गोष्ट तुम्ही तुमच्याकडे का वळवुन घेता हे माहित नाही.

स्पा's picture

18 Feb 2012 - 2:15 pm | स्पा

आम्हाला संपादकांचे उगचाचे व्यनी वेग्रे येतात
अवांतर टाळलेत तर बर होईल
तुमचा नवीन संस्थळ काढण्याचा वेग्रे विचार असेल तर ठीके. .पण आम्हाला इथेच राहायचेच

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडळाच्या कार्यालयात येऊन संवाद साधावा अशी नम्र विनंती.

दुसर्‍याचं घर हे स्थान 'अशा संवादा'साठी नाही हे कृपया लक्षात घ्यावे.

चौकटराजा's picture

16 Feb 2012 - 9:50 pm | चौकटराजा

आम्ही चालत चालत प्रतापगडला जायचा सल्ला दिला होता. बन्या नाही का फुरसूंगी ते पुणे चालत आला होता. आयला नुस्ती फास्टर फेणे ची
पुस्तकं वाचायची काय ? एक तरी ओवी अनुभवावी ... कसे ?

संपत's picture

18 Feb 2012 - 10:58 am | संपत

अहो तो तर चक्क विमानाने (ग्लायडर) आला होता..

आशु जोग's picture

19 Sep 2014 - 10:26 pm | आशु जोग

एस टी बसने स्टॉपवर उतरल्यास चढायला किती अंतर आहे

साधारण किती वेळ लागेल.

(एस टी बस असे लिहीले असल्याने ते ध्यानात घेऊन उत्तर द्यावे. गाडीचा रस्ता असला तरी मला तो पायीच चालावा लागणार ना !)

प्यारे१'s picture

19 Sep 2014 - 11:25 pm | प्यारे१

१४ फेब्रुवारी २०१२ (धागा प्रकाशित झाला तो दिवस) ते १९ सप्टेंबर २०१४ (आजचा दिवस) ....
अजून नाहीच गेलात ? काय राव?
महाबळेश्वर बस स्थानकावरुन दर्शन गाडी सुटते. महाबळेश्वर स्थानक संपर्क क्रमांक गुगलून मिळेल.
महाबळेश्वरला आपलं आपण पोचा. कुठल्या मार्गे वगैरे स्वतः ठरवून. आणि स्वतःची वाहन व्यवस्था नसेल तर शक्यतो महाबळेश्वरहून प्रवास सुरु करा.
दर्शन गाडीनं स्टॉपवर उतरल्यानंतर जास्तीत जास्त ३५०-४०० पायर्‍या आहेत. (आकडे लावणारे तसेच गणिती लोकांनी माफी द्यावी) आपापल्या मगदुरानुसार चढण्याउतरण्यास वेळ लागतो.

बाकी मोदकानं प्रतापगडावर महाराजांच्या पुतळ्यामध्ये काही उणं अधिक सापडतंय का ते बघायला सांगितलेलं.
आम्हास उत्तर ठाऊक आहे.

आशु जोग's picture

20 Sep 2014 - 1:28 am | आशु जोग

ओके

झिंगाट's picture

16 Jul 2018 - 8:12 pm | झिंगाट

काय कमतरता आहे आता तरी सांगा राव...

प्रसाद_१९८२'s picture

16 Jul 2018 - 8:37 pm | प्रसाद_१९८२

महाराजांच्या हातातील तलावार थोडीशी बाकदार आहे मात्र त्या तलवारीचे म्यान मात्र सरळ आहे. हि इतकीच चूक शिल्पकाराच्या हातून झाली आहे.

गडावर राहण्याची उत्तम सोय आहे, सातार्‍याला सां. बा. विभागाकडे अगोदर तारीख देउन नोंदणी करता येते. ३ -४ रुम आहेत. रुम मोठ्या आणि सुंदर आहेत. म्हणजे आम्ही दोन कुटुंब आणि दोन मुले एकाच रुम मध्ये राहिलो होतो. गरम पाण्यासाठी गिझर आहे. तेथे १ शासकीय कर्मचारी असतो. तोच जेवण ही बनवुन देतो. पण त्यापेक्षा गडावर ईतरत्र भाजी भाकरी खा. जर आपण सरळ गडावर गेलो आणि कोणाचे अगोदर बुकींग नसेल तर आपली सोय या रुम मध्ये शासकीय मामांशी बोलुन योग्य रकमेवर आरामात होते. सकाळी लवकर उठा. रुमच्याच मागे तटबंदी आहे, त्यावर जाउन बसा अक्षरशः स्वर्गाचा भास झाला नाही तर नाव बदला. सगळीकडे ढगांची दाटी असते, जमीन अजीबात दिसत नाही, दुरवर कोकण असतो. मागे महाबळेश्वरचे डोंगर .......आणि निवांत शांतता.
PratapgadhPratapgadh 1https://drive.google.com/open?id=0B_adIueWeQ_6MjdXMzRaZEJFakk

जानु's picture

16 Jul 2018 - 11:21 pm | जानु

Pratapgadh

विनोदी प्रतिसाद गुप्तकाळानंतर गायब झाले.
बाकी स्पावड्याफेणे आणि स्पा हे दोन वेगळे आइडी असणार पण सवयी एकच असतील.

आता सगळे प्रतिसाद रेल्वे टैमटेबलातल्या प्यासिंजर इन्फॅारमेशनसारखे झाल्यापासून मजा गेली.

लेखक महाशय गेले का? किंवा दुसय्रा गडावर आपलं दुसय्रा स्थळावर माहिती काढायला गेले?
तरवारीचं रहस्य बघायला जावं लागेल.