"सुब्याच्या मिश्या ........!!"

जेनी...'s picture
जेनी... in जनातलं, मनातलं
13 Feb 2012 - 9:26 pm

सकाळी सकाळी आई ने झोपेतून उठवल...हल्ली सुट्टीच्या दिवशीही कोणी झोपू देत नाही ..का? तर नेमक

सुट्टीच्याच दिवशी पाहुणे येणार असतात बघायला .. पप्पांची सुट्टी ..दादाची सुट्टी ..बघायला येणाऱ्या मुलाची आणि

त्याच्या पप्पांची पण सुट्टी ......सगळ बघूनच दिवस ठरवला जातो .अरे पण माझ्या झोपेच कोळस होत ना ..आधीच

रात्री जाग जाग जागून मिळेल त्याला पकवत असते ...इंटरनेट म्हणजे माझा रात्रीचा सोबती झालाय ..दिवसभर

ऑफिस ..मग घरी आल्यावर ...आल्या आल्या झोपायचं .....

मग उठून उगाच मिळेल ती सीरिअल बघायची नंतर

आयत जेवायचं आणि मग आरामशीर याहू ....जीमेल वर लॉग इन व्हायचं .......रोज रात्री झोपायला दोन तरी

वाजतात ..नियमच झाला होता माझा ....सगळ्याचं ओरडून झाल होत .हल्ली सगळ्यांनी बोलयचच सोडून दिलय

.....निर्लज्जम सदा सुखी ...अशी गत आहे . आज कोणीतरी बघायला येणार होता मला ..काय बर नाव सांगितल त्याच ?..

म्म्मम्म्म ..हां सुबोध ......सुबोध इनामदार .

सुबोध सोफ्टवेर फिल्ड मधला ........फोटोत तर एकदम तमिळ ..तेलगु ..कन्नड पिच्चर चा हिरो वाटत होता

......चेहेर्याने नाजूक वाटला ..पण हि जाड च्या जाड मिशी .खावून पिवून एकदम तंदुरुस्त ..हलो ...मिशी बर का

.....तो नाही ..तो मस्त होता तब्येतीने एकदम परफेक्ट .पण मिश्या ........मी आईला म्हटल " आई बाकी सगळ

ठीक वाटतंय ग ..पण त्या मिश्या ...

मिश्या जरा जास्तीच जाड आहेत . थोड्या पातळ हव्या होत्या ....नसत्या तर आणखीन मस्त ...त्या जर का त्याने

काढल्या तर ..चांगला वाटेल ..पण काढेल का?" .

त्यावर आई भलतीच चिडली .....म्हणे " अग तुला तो आवडला का ते सांग ..मिश्यांशी नाही लग्न करायचं . मिश्या

ह्या पुरुषाच्या मर्दान्गीची निशाणी असते ..एखादा आपल्या मिशीच्या बाबतीत ..बायकोच्या बाबतीत नसेल एवढा

हळवा असतो .....आणि तो जर का तसा असेल .. आणि तू डाय्रेक्ट त्याच्या मिश्यान्वरच हल्ला चढवलास तर गेल हे

स्थळ पण हातातून ."

तन तन करत ती किचन मध्ये शिरली ..माझी मात्र अजून फोटो हातात घेवून त्याच्या मिश्यांवर आर एन डी चालू

होती ..
भलत्याच जाड होत्या . सगळा वरचा ओठ मिश्यांनी झाकला होता . काळ्याभोर मिश्या .....शब्दच नाहीत

त्याचं वर्णन करायला माझ्याकडे .त्याचा चेहेरा बघितला कि सगळ्यात उठावदार जर काय दिसत असेल तर त्या

त्याच्या मिश्या .......गोरा गोरा होता .एकदम गोबर्या गालांचा ..पण त्या मिश्या ........सगळ्या चेहेर्याचा शो घालवत

होत्या .त्याची बहिण ...आई सांगत नाही का त्याला ..नको ठेवत जावूस म्हणून .. माझा दादा कसा मला विचारतो

.......दादाला भारी हाउस आहे दाढी मिश्यांशी खेळायची ...दर दोन महिन्यांनी ह्याच काहीनाकाही चालूच असत ...

आणि मग दहा वेळा आरश्यात बघून ..पंधरा वेळा तरी मला विचारतो .... मी मग खूप भाव खाते .....मिश्यात्ल सगळ

ज्ञान तुलाच ग आहे ..म्हणून मी तुलाच विचारतो ...असल बरच काय काय वदवून घेते त्याच्याकडून ...मग सांगते .

ह्या सुब्याला काडी इतकी अक्कल नाही ...घोड्याच्या शेपटा सारख्या जाड मिश्या ठेवल्यात बावळटाने .....घरच्यांना

आवडलाय ...मलाही आवडलाय पण मिश्यांच काय करू ....

उडवायला सांगितल तर उडवेल का? आणि आई म्हणतेय तसा मिशिप्रेमी असेल तर ?

ह्या आपण नाय बाबा लग्न करणार असल्या मुछड शी ......

पण म्हटल बघू ट्राय मारायला काय हरकत आहे .

दुपारी एक वाजता येणार होते ..आईला म्हटल जेवून येणार आहेत ना ग ? नाहीतर जेवायलाच टपकायचे .... आणि

आई ग ..चहा वगैरे पिताना मिश्यापन चहात बुडत असतील ना ग?

दुध पिताना.. पाणी पिताना ......तरीच एवढ्या तंदुरुस्त आहेत .." दादाने धापकन पाठीत एक धाबाका घातला ....

" अक्कल पाजळवन बंद कर ...चार दिवस झाले रोज ते मिश्यांच ऐकून आता मलाच माझ्या मिश्यांची किळस

वाटायला लागलीय ......एक काम कर तुला नकोयत ना त्याच्या मिश्या ..मग असच बोलत राहा त्याच्यासमोर ...तो

एकतर मिशी काढेल नाहीतर तुला घराच्या बाहेर काढेल ..काहीतरी एक निर्णय मात्र नक्की घेईल ".

मी म्हटल लग्नाच्या आधीच हा प्रयोग करून बघायला हवा ..नाहीतर उद्या लग्न करून बाहेर काढल तर ..काही खर

नाही ....... ह्या भीतीने आयुष्यभर त्या मिश्यांशी जुळवून घ्यावं लागेल .

बरोबर १ वाजता हि मंडळी आली .सुट्टीच्या दिवशी बरोबर दुपार गाठून येणारी हि मंडळी थेट पुण्याहून आलेली .

खरी धम्माल तर आत्ता चालू झाली . टोटल पाच जन आले होते . सुब्या ...त्याचे आई पप्पा .आणि त्याचे

मोठे काका , काकू . दारची बेल वाजली तास दादा ने जावून दार उघडल ..आणि अक्षरशा थबकलाच दारात . भूत

बघितल्यासारख तिथेच त्यांच्याकडे बघत राहिला ....त्या पाठोपाठ पप्पा गेले ..तेही तसेच .....पापणीसुद्धा खाली

पाडेनात हि दोघजण.

शेवटी आई गेली .तिने मात्र ..जावून त्या दोघानाही हटकल .आईने दोघांना दोन्ही हाताने बाजूला सारत पाहुण्या

मंडळीच जरा जास्तच हसून स्वागत केल . ती एवढ का हसतेय हा मला पडलेला प्रश्न . पण मंडळी आत आली आणि

मी किचनच्या दारामागून हळूच त्याचं दर्शन घेतल ..त्या दर्शनातच आईच्या हासण्याच राज ..म्हणजे गुपित उघड

झाल .सगळ्यांच्या चेहेर्यावर दोन प्रकारचे भाव दिसले . पप्पा ..दादा थोडे टेन्शन मध्ये पण तोलूनमापून हसत .

आणि आई भलतीच मिस्कील हसत होती . सगळ्याना बहुतेक माझी मागच्या चार दिवसातली बडबड आठवत

असणार नक्कीच . इनामदारांच सगळच कुटुंब म्हणजे सुब्याची आई आणि काकू सोडून हां .....भलत्याच आकडेबाज

मिश्यांच कुटुंब होत .त्याच्या बाबांच्या मिश्या ....पांढर्या शुभ्र गालिच्यावर मध्येच कुणीतरी तांबूस..तपकिरी रंगाच

केशर विखुर्ल्यासारख्या .....काकांच्या मिश्या म्हणजे नुकतीच रंगरंगोटी केलेली गडद काळ्या रंगाची टोयोटा वाटली

मला . भन्नाट एकदम ......

आता सुब्या ..सुब्याला बघून तर हसायलाच येत होत ..भारी चिकना दिसत होता .गोरापान ...कुरळ्या केसांचा ..गोबर्या

गालांचा ..पाणीदार डोळ्यांचा सुब्या ...झुपकेदार मिश्यांच्या पंगतीत आपल्या बालिश खावूनपिवून मदमस्त मिश्या

कुरवाळीत बसला होता .

आई स्वागत करून झाल्यावर आत आली .म्हणाली " भारी वाटल बाई ह्यांना भेटून ..नाहीतर तुझ्या पप्पांच्या मिश्या

.....दहावेळा सांगितल असेल ..थोड्या तरी ठेवत जा म्हणून ..बघ कस रुबाबदार खानदान वाटतंय कि नाही .......".

आणि पुन्हा हसली . मला तर तिच्याकडे बघून भल्या मोठ्या प्रश्न्चीन्हाच लॉलीपोप तोंडात कोंबून गेल्यासारखी वाटली

.. म्हणजे तिला नक्की काय बोलायचय कळलच नाही मला ...

सगळा कार्यक्रम छान पार पडला . मला आणि सुब्याला एकांतात बोलायला मिळाल ..तेवढ सोडून आपल्याला

तर बाकी कशात इंटरेस्ट नव्हता. सुब्या जाम लाजत होता मला .

लवकर बोलेच ना . मुंबईची घर एवढी मोठी नसतात ..नाहीतर फिल्मी स्टायील ने नेल असत

त्याला ..." आव मै तुम्हे मेरा बेडरूम दिखाती हु " करत .......आम्हाला आमच्या चिमुकल्या ग्यालरीत जे दादाच

स्टडीरूम बनवल गेल होत ......तिथेच गप्पा मारायला दिल्या होत्या .

सुब्या बोलत नाही बघून मीच त्याला विचारल ......पहिला प्रश्न .." तुला चाटिंग करायला आवडत का? " .

सुब्याचा मोठ्ठा आ वासून झाला . उत्तर काय तर " हम्म कधी कधी करतो ..

ज्याच्याशी फोन वर बोलन शक्य होत नाही .....त्यांच्याशीच ".

माझा दुसरा प्रश्न ..." तुला भटकायला आवडत का? म्हणजे फिरायला ......" . सुब्या थोडा खुलला .बोलू लागला.

पटपट भेटून आलेल्या ठिकाणांची यादी तोंडावर फेकली माझ्या .बंदच होईना तोंड . मग मध्येच थांबवून म्हटल .

"तुला कोणती हिरोईन आवडते ". मग एक मस्त लाजरीबुजरी स्मायील टाकली म्हणाला " करीना कपूर "...

" ओय होय छम्मक्छल्लो "..सुब्या असला सोलिड लाजला कि बास ...मी एकदम फिदा . मला जाम आवडला .न

विचारताच मी म्हटल आपल्याला बाबा एकच हिरो आवडायचा ..

पण आत्ता नाही आवडत .." माझ्या चेहेर्यावरचे वाकडे तिकडे हावभाव बघून ...सुब्याला विचारल्याशिवाय राहावल

नाही . सुब्याच्या मिश्यान्प्रमाणे भूवायाही जाड होत्या एकदम .शिन्गासारख्या माझ्यावर उगारल्या त्याने ..आणि

विचारल " कोणता कोणता ? आणि आत्ता का नाही आवडत "?.

मग मी माझे डावपेच टाकायला सुरुवात केली " अरे मला अमीर खान जाम आवडायचा रे .....त्याचा कयामत से

कयामत ..मी कयामत आनेतक बघितला यार ..पण त्याने माझा सगळच मूड ऑफ केला " मी पुन्हा रडका ..दुखी

स्वर आणत म्हटल ....तो शांत झाला ..पुढे काही विचारेच ना ....म्हटल आता विषय बदलायच्या आत सांगाव

.....म्हणून पुन्हा चालू केल ....

" अरे त्याने मंगल पांडे त जो काही अवतार केला होताना ..मिश्या ठेवून ,ह्या ....आपल्याला अजिबात आवडला नाही

...मुळात मला मिश्या हा प्रकारच आवडत नाही "

तसा सुब्याचा उजवा हात मिश्यांवर गेला . सुब्याच्या डोळ्यात काहीतरी चमकल . सुब्या म्हणाला

" म्हणजे तुला मिश्या असणारे कुणीच आवडत नाही?" .

मी म्हटल "सगळे नाही रे .........काही आवडतात ...पण त्यांच्या मिश्याssssssssss ...म्हणजे आता

तुझच बघणा मस्त दिसतोस ..मला आवडलास..पण मी मघास्पासून तुला बिना मिश्यांच इम्याजीन करून बघितल

...तसा मला वाटत जास्त चांगला दिसशील ..." आणि नाही दिसलो तर "..अरे नाही दिसलास तर काय ..पैसे देवून

विकत आणायचीय का?.उगवेल कि पुढे मागे ......." सुब्या असल टेन्शन घेवून बसला कि सारख्याच मिश्या

कुरवाळू लागला .मी म्हटल "अरे वो तो बाद कि बात ह्ये ..तुलाही मी आवडली पाहिजे ना ..

आणि आपण बाकीच तर काही बोललोच नाही ..तुला काही विचारायचं असेल तर विचार हा ".

सुब्याची माझ्याकडे बघून दिलेली स्मायील ..हाय .......त्याच्यातच सुब्याच उत्तर मिळाल .

मंडळी कार्यक्रम उरकून घरी गेली ..आता आमच्या घरात सगळा गोंधळ चालू झाला . आई म्हणाली

" मने..काय ग ...काय ठरव्लस मग ..काय करणार आहेस मिश्यांच " ...भयान चिडवणार हसू फुटलं होत आईला .

दादा म्हणाला " मन्या ..सोड ह्याला ..मला नाही वाटत मिश्या काढेल म्हणून ......त्याच खानदान मिश्याप्रेमी

दिसतंय ...त्याचे बाबा तर वाक्य वाक्याला मिश्या उडवत होते" . माझे पप्पा मात्र शांत होते...म्हणाले मुलगा

आवडला असेल तर फक्त मिश्यांसाठी नकार देण्यात तथ्य नाही “.शेवटी तुझा निर्णय .

सुब्याच्या घरन होकार आला होता .

मला सुब्या आवडला होता . मी जाम बडबडी आहे त्यामुळे सुब्यासारखा शांतच मुलगा नवरा म्हणून हवा ....म्हणजे

माझी बडबड ऐकणारा श्रोता मला हवा होता .. सुब्या दिसायलाही छान होता . हां आता मिश्या नव्हत्या आवडल्या

मला ..पण मनान तर केव्हाच सुब्याच्या बाजूने कौल दिला होता . ठरल तर सुब्याशी लग्न करायचं ......पण त्याला

जास्त कोण प्रिय आहे ..ते आधी चेक करायचं . फक्त प्रयत्न करून बघायचा , काढल्या तर काढल्या ..

पण मला भारीच आत्मविश्वास होता . मी घरी रात्रीच्या जेवणाच्या वेळी सांगून टाकल

" दाद्या सुब्याला फायनल केला रे मी ". दादाचा घास हातातच ..

आई डोळ्यांची चकमक चकमक करत बघू लागली ..पप्पा एकदम खुश . ..

" मने .....शेवटी हरलीस ना मिश्यांपूढे " ..आई ....

" मन्या ..च्यायला घोड्याच्या शेपटा सारख्या मिश्या ..म्हणाली होतीस ......मग आत्ता काय झाल ?"...दादा .

" छान ....आवडला तुझा निर्णय मनु..... मलाही फार आवडला मुलगा ..घरची मंडळीहि समजूतदार आहेत .." पप्पा .

" दादा बरोब्बर एक महिन्याने ह्या मिश्यांच्या ग्यांग मध्ये एक मुछ्मुन्डा दिसेल तुला ...." इट्स माय

च्यालेंज ब्रो......."

दादाने मोठ्ठा हा हा हा केला ..म्हणाला "जेवा .......आणि निर्णयावर कायम रहा ..ड्रेस नाहीय .....नाही आवडला कि

चालीच परत रिटर्न करायला ,नवरा आहे नवरा ..अजून विचार कर आणि मग सांग ".

मी म्हटल "पूर्ण विचार केलाय .सुब्याच माझा नवरा होणार ".....आणि मीही त्याच्यासारखं मोठ्ठा हा हा हा करून

त्याला उत्तर दिल .

आता मात्र माझ डोक विचारात बुडून गेल होत ..काय करू जेणेकरून सुब्या मिश्या काढायला तयार होईल ?

काढेल ना ? नाहीतर माझा दाद्यासमोर पोपट व्हायचा .

मी सुब्याला स्वताहून फोन केला .त्याला भेटायला बोलावल . पुण्यावरून यायचं म्हणजे दुसर्या दिवसाची सुट्टी बघून

आला होता तो कारण घरी रात्री उशीर झाला जायला तरी दुसर्यादिवशी ऑफिससाठी पळापळ नको ,म्हणून ...

शनिवारी आला .

आम्ही दादरला भेटलो . सुब्या मस्त नटून थटून आला होता . सुट्टीच्या दिवशीपण फॉर्मलवेअर मध्ये होता ..इतका मंद

माणूस ......विचारल तर म्हणतो ...." अरे मला वाटल तू म्हणशील ..पहिल्यांदा बाहेर भेटायला बोलावल तर असाच

का आलायस ....म्हणून ".

मी म्हटल असाच ??? म्हणजे तू काहीच न घालता यायच्या विचारात होतास कि काय?" .

घ्या आमच ध्यान पुन्हा लाजल .

"अरे सुब्या किती लाजणार आहेस तू? ओह्ह सॉंरी ..चुकून सुब्या गेल तोंडातून ........". मला खूप ओशाळल्या सारख

झाल .घरी सारख सुब्या सुब्या बोलून इथे पटकन तोंडातून गेल होत ..तरी आई ओरडायची ..

पण ऐकायचं कुणी तीच...
" बोल बोल ..मला आवडल हे नाव ......मला आजपर्यंत कुणीच ह्या नावाने हाक मारली नाही ..

माझे मित्रही मला सुबोधच बोलतात ..घरीही तेच ..आज पहिल्यांदा कुणीतरी इतकी जवळून हाक मारलीय मला

.....मी तुला मनु म्हणेन " मला आश्चर्यच वाटल . किती सोज्वळ खानदान आहे ह्याच ,आणि मी हि अशी

नखरेल ..रंगेल .......दादागिरीची भाषा ..ताळमेळ नसणारी ..बिनधास्त क्क्यारेक्टर.......

" मी तुला सुब्या म्हणेन मग तू मनु का? मन्या म्हण ..दादा तेच म्हणतो "....

" पण तो दादा आहे ग ...मला तुझा सुब्या व्हायचय ..तूला माझी मनु बनायला नाही आवडणार का?" आयला सुब्या

एवढ बोलतो मग लाजतो का?..पण बोलतो एवढ खर .

त्याला बोलत करण गरजेच आहे तर ....

" ओके सुब्या .......". मी चेहेर्यावर खट्याळ हसू आणत..सुब्याच्या वाक्याला सहमती दिली .खूप बोलला आज सुब्या

.अगदी पाचवीत असताना पहिल्यांदा आवडलेल्या सुवर्णा पासून ते अगदी शेवटच्या कंपनीत किती वर्ष होता ..इथपर्यंत

सगळ सांगितल . समुद्र आवडतो इथपासून ते अजूनही रोज रात्री आईच्या हातून डोक्याच मॉंलिश करून

घेतल्याशिवाय झोप येत नाही इथपर्यंत . अगदी मम्माज बॉय वाटला ..पण अतिशय निरागस ....खुली किताब

.......मस्त .

" सुब्या मग मिश्यांबाद्द्ल काय ठरवलस " मी माझ्या उजव्या हाताच्या बोटांची नख दाताखाली कुरतडत ..आणि त्या

नखांकडे बघतच त्याला विचारल ." मिश्या ...त्यांना काय झालय..

सकाळीच तर मस्त शेप देवून आलोय न्हाव्याकडन ...." सुब्याने हाताची तर्जनी आणि अंगठा ह्यांची बर्रोब्बर

मध्यभागी रचना करून ती बोट दोन्ही बाजूनी व्यवस्थित एकसारखी मिश्यांवरून फिरवून ओठांच्या कोपर्यापर्यंत

आणली . " अरे मी म्हटल होत ना तुला तू मिश्या नसल्यावर आणखी चांगला दिसशील ..म्हणजे तस काही नाहीय हा

...जबरदस्ती वगैरे नको समजूस तू.,..पण ..मला तू बिन्मिशितच हवायस ..."..

मी असेल नसेल तेवढी एनर्जी लावून लाडिक बोलण्याचा प्रयत्न केला . सुब्या विचारात पडला ....मग हळूच वर बघून

म्हणला " बाबा गोळी घालतील ग मनु ....आजून अख्या खानदानात कुणी काढल्या नाहीत मिश्या ....कोलेजला

असताना नुकतीच आलेली पहिली मिशी भादरली म्हणून गाल लाल केला होता माझा . नाही मनु ..

हे सोडून काहीही बोल ".

" अरे एक काम करणा ..दाढी करताना मुद्दामहून कट मार ..आणि सांग चुकून कापली म्हणून ".

" मनु अग राहूदे ना ..मलाही आता आवडायला लागल्यात माझ्या मिश्या ......माझे मित्र मैत्रिणी छान कमेंट

देतात ....." सुब्या खरच टेन्शन मध्ये आला होता . त्याचा चेहेरा बघून मी तूर्तास तरी विषय बाजूला ठेवला .

मग प्रत्येक शनिवार सुब्या, मी, दादर चौपाटीचा समुद्र आणि आमच्यात एकच कॉम्मन भेळ..अक्ख्खां दिवस

कसा जायचा कळायचं नाही . प्रत्येक भेटीत निघताना मिश्यांवर ...ठरलेले वाद व्हायचे . मला वाटायचं इतक

समजावते मी ...निदान येणाऱ्या शनिवारी तरी मिशीला पुण्यात ठेवून येईल ..पण कसच काय ..फुकटचा प्रवास करत

त्या मिश्याही येतात मुंबई बघायला..

सुब्या भेटायला येताना माझ्यासाठी .....मस्त शुभ्र रंगाची फूल घेवून यायचा ...मला खूप आवडायची . मी त्याच्या

बोलण्यात ..त्याच्या हळुवार वागण्यात त्याच्या मिश्यांना विसरून जायची .

पण निघताना नेमक दाद्याला दिलेलं च्यालेंज आठवायचं . मग मात्र सुब्याला त्या मिश्यावरून लेक्चर द्यायची ......

ह्यावेळी मात्र मी चुकून बोलूनच गेली .." मिश्या नाही काढल्यास तर माझा दादुल्यापूढे पोपट होईल ".......सगळ

सांगाव लागल त्याला .

" अब मेरी इज्जत तुम्हारे हातो मी ह्ये सुब्या ...बचालो मुझे ......कुछ भी करो ..लेकीन शादिसे पेहेले ये

मिश्या काढो ....." माझ्या ह्या भन्नाट डाईलोग वरपण सुब्या हसला नाही . तसाच ट्रेन मध्ये चढला .

पुढच्या शनिवारी सुब्या ट्रेन ने आलाच नाही . मी स्टेशन वर खूपवेळ उभी होती ..मला वाटल सुब्याने विचारच

बदलला . लग्नच नको म्हणेल तो ...आता मात्र मलाच टेन्शन आल ..

मी माझी अक्कल पाझळवली ...

इतक्यात फोन वाजला .सुब्याचा कॉंल होता . माझ्या जीवात जीव आला .

मी फोन उचलला ..सुब्या काही बोलायच्या आत माझाच पट्टा सुरु झाला ..

" हेल्लो ..सुब्या..सुब्या..सुब्या ..कुठेयस यार ...हादरवलस मला ..मला वाटल ..तू लग्नालाच नकार देणार कि काय

आता ..बर जावूदे ..आहेस कुठे ? आणि येणार आहेस कि नाही ......? कधीची वाट बघतेय ..आणि आता येणार नाही

म्हणून सांगणार असशील तर दोन चार शिव्या खावूनच फोन ठेव ..".

माझ बोलन रागातच संपवलं .

आता सुब्याची बोलायची बारी आली ..म्हणाला .." मनु ..मनु थोडा ब्रेक घे कि ग...किती बडबड करतेयस ..आलोयग

बाई मी ..पण स्टेशनच्या बाहेर प्रायव्हेट पार्किंग च्या तिथे आहे ..आज कार नि आलोय ".

"हाय मेरी जान ..........आप आये तो सही ..इथे मी अगदी तुझी वरात परत पाठवून बसली होती ..आले मी ...थांब

तिथेच "...मी फोन ठेवला .

स्टेशनच्या बाहेर मी पार्किंग च्या तिथे आली तर हा कुठेच दिसेना ..मी उभ्या असणार्या टाळक्यात ह्याच टाळक शोधत

होती ,पण हे महाराज कार मधून खाली उतरलेच नव्हते .

मी परत फोन केला ........तेव्हा त्याने मला त्याच्या स्विफ्ट चा नंबर सांगितला .मी शोधत शोधत स्विफ्ट शोधली .

नजारा ..म्हणजे नजाराच होता ........!!

जिथे माझ मन ..."रूप तेरा मस्ताना ..प्यार मेरा दिवाना " गात होत ..तिथे सुब्याच मन ......" तेरेबिना जिंदगीसे

कोई शिकवा तो नही ...शिकवा नही ..तेरे बिना जिंदगी भी लेकीन जिंदगी तो नही ..जिंदगी नही ..." हे गान गातंय

अस वाटल .

सुब्याने चक्क मिश्या काढल्या होत्या ..आहात कुठे ......आणि नसलेल्या मिश्यांच्या जागेवर सुब्या नेहेमीच्या

स्टायील ने बोट फिरवत बसला होता ..

खर सांगू मला जाम हसायला आल त्याच्याकडे बघून ......सुब्या चिडलेला होता ...मिश्या नसलेला अवतार

कुणाला दिसू नये म्हणून हा कार नि आला होता ..आता ह्याला काय ट्रेन मधली लोक विचारणार होती काय

कि ..का ..का रे बाबा ..सपाट चट का केलंयस ..म्हणून .....सांगा होता कि नाही मंद माझा सुब्या .....

मी जाम खुश होती ...मिश्या काढल्या म्हणून आनंद नव्हता हा ..तर सुब्याने माझ ऐकल ..हा असुरी आनंद होता

......आता दादाच्या पुढे नाक वर करून बोलायला मिळेल हा अभिमानी आनंद ......असले बरेच आनंद झाले होते

त्यावेळी मला .

गाडी तिथेच ठेवून नेहेमीप्रमाणे तिथून चालत चालतच मग समुद्र गाठला .सुब्या खूपच अपसेट होता . एकदम नाराज .

मी बोलत होती पण त्याच लक्ष नव्हत . ....

नेहेमीच्या जागेवर येवून बसलो .सुब्या मिश्याना जाम मिस करत होता .मी मात्र माझ्याच नादात होती ..संध्याकाळी

दाद्याला सांगायचं ..मग त्याच्याकडन मस्त पैकी दाद मिळवून घ्यायची .भन्नाट स्वप्न पहात होती ..

कमाल आहे ना ..सुब्या मिश्या गेल्या म्हणून सुतकात होता ..आणि मी मिश्यांच्या तेराव्याला गोडधोड जेवणाचा बेत

आखत होती ..असच काहीस दृश्य वाटल मला.

एवढ्या वेळात मी सुब्याकडे एकदाही निरखून पाहिलं नव्हत ...आत्ता माझी नजर गेली ..........

सुब्या मिश्या नसतांना जरा जास्तच गोड दिसत होता ..एकदम नाजूक चेहेरा ...गालांच गोबरपन जास्तच गोबर गोबर

दिसत होत ..आणि त्याच्या वरच्या ओठांच आज पूर्ण दर्शन झाल होत . सिद्धिविनायकाच बाहेरून पूर्ण दर्शन

झाल्यावर भाविकाच्या चेहेर्यावर कसल हर्षभरित स्मित उमटत ..अगदी तसच समाधानी हास्य माझ्या ओठांवर फुलल

म्हटल धन्य झाले आज मी ...आज सुब्या पूर्णपणे पावला मला ...मनातल्या मनात गुदगुल्या झाल्यासारखी हसली मी.

पण ..पण ......बापरे ...माझ्या मनात अस का याव ........

मीच मागे लागली होती ना सुब्याच्या मिश्यान्च्या ......काढ काढ म्हणून ......

सुब्या मिश्या असताना रांगडा ..भारदस्त गाडी वाटायचा ....एकदम भारी व्यक्तिमत्व ..चार चौघात उठून

दिसणारा ..........आणि मिश्या नसताना उगाचच त्याचा चेहेरा नाजूक नाजूक ...दिसू लागला होता ....

मला नाजूक नवरा नको होता ....

मनु आणि मग लग्न झाल्या झाल्या दुसर्याच दिवशी भाव्जीनी मिशी काढली .....

आणि जावून पहिला नमस्कार बाबाना केला होता .....बाबांच्या मिश्या गालासोबत फुगल्या होत्या ...

अजून ते सगळ आठवतंय मला."

" मी तर काल संध्याकाळी ताई कडे गेलो ..तिथेच काढल्या आणि तिथंही कुणाला तोंड न दाखवता इकडे आलोय ..

आईला फोन वरच सांगितल ..तसही आधी सांगून ठेवल होत ..मनुला माझ्या मिश्या नाही आवडत म्हणून ....

तीही म्हणाली एकदा काढून बघ ...त्याला काय होतंय ..म्हणून धाडस केल मी ..पण मनु खर सांग .....तुला खरच मी

आवडलो का बिन मिशीत ? सुब्या अगदी केवीलवाण तोंड करून विचारत होता .......

" ह्म्मम्म्म सुब्या खर सांगू आय अल्सो मिस्ड युवर मिश्या ......छान होत्या रे ......

माझ्यामुळे तुला मिश्याना कायमच मुकाव लागल .....".

" कायमच का ..तू म्हणत असशील तर पुन्हा वाढवतो ........" ..

हेच तर नेमक मला हव होत .......

मला तर ड्याशिंग क्क्यारेक्टर हव होत ..हे असल मेन्धळट लूक सुब्याला अजिबात शोभत नव्हत ....

म्हणजे ..म्हणजे मी सुब्याच्या मिश्याना मिस करतेय?.

..मला त्याच्या मिश्या किती देखण्या होत्या ..ते आज कळतंय ?.

....बाप रे ..सुब्याला हे सांगू कस ..मारून टाकेल मला ......

सुब्याचा पडका चेहेरा त्यात मला आणखीनच अपराधी पण जाणवून देत होता ..

"मी खुनी आहे ..हो मी सुब्याच्या मिश्यांचा खून केलाय ".....ह्या भावना जाग्या होऊ लागल्या .....

शेवटी म्हटल मन्या ..बी ब्रेव ......आता सुब्याला तूच आधार दे .....मी लांब लचक श्वास घेतला ,,

आणि सुरुवात केली ......" सुब्या मिश्या काढल्यास ..पण काही रामायण ..महाभारत नाही घडल का रे?....

" मनु ..खूप घडल ..एकट्या आईने सपोर्ट केला ....बाबाना अजून तोंडच दाखवल नाहीय ..ताई तर म्हणाली तुझ्या

भाव्जींच्या समोर जावूच नकोस ..उगाच काहीतरी शेरे मारत बसतील ......पण माझ्या भाव्जीना मिश्या नाहीत ....

मग शेरे काय मारतील तर ...म्हणे ..माझ्या लग्नाच्यावेळी बाबांनी घातलेला गोंधळ आठवतोय ना ....महिन्याभरात

मिश्या वाढवून लग्न कराव लागल आम्हाला ..एकही फोटो धड नाही आला लग्नातला ..पण करणार काय... बाबांची

अट ...म्हणे मुलाला मिश्या नाहीत ..

कसल ध्यान दिसतंय ते बिन मिशीच ..माझ्यासाठी म्हणून त्याने एवढा मोठा त्याग केला ....त्याग म्हणजे लूक चेंज

होतो ना रे सगळा .".

" ए सुब्या त्या मिश्या वाढायच्या आधी चांगले दहा बारा फोटो काढून मला पाठव ..

दादाला दाखवायचेत .."

सुब्याच्या चेहेर्यावर आत्ताशी कुठे कळा आली होती ........

काही म्हणा पण ...पुरुष मिश्यांशिवाय बावळट दिसतो ..हे बाकी मला मनापासून पटल.....

त्यादिवशी मला पहिल्यांदा जाणवल ..कि मी सुब्यावर खरच प्रेम करत होती ..त्याच्या मिश्याना मी फक्त एक

इशू बनवून ठेवला होता ..दाद्याला दिलेल्या च्यालेंज मुळेच मी त्या मिश्यांचा राग राग करत होती ..पण आत्ता

सुब्याने मिशी ठेवू अगर न ठेवू ....तसा कोणताच फरक पडणार नव्हता .....माझ्यासाठी सुब्याने त्याच्या प्रिय

मिश्यांच केलेलं बलिदान बघूनच मी भारावली होती ...

नंतर आठव्ड्याभराण दादाला एक पाकीट मिळाल ..पोस्टाने आलेलं ......त्यात सुब्याचे बिन्मिशीचे फोटो बघून

......आमच्या घरच्यांनी मनसोक्त दात काढून घेतले ..वाटेल त्या कमेंट पास केल्या ...मला वाईट वाटल .

माझ्यामुळेच त्याला हसतायत अस वाटल .

पण तो आता मिश्या पुन्हा वाढवणार आहे ..हे मात्र मी कोणाला सांगितल नाही ..म्हटल सरप्राईज देवूया

........मिश्यांच ........

आज बरोब्बर एक महिना झाला ह्या गोष्टीला ..आज साखरपुडा आहे आमचा ..

सुब्याच्या मिश्यांच पुन्हा एकदा आगमन झालय ....गोरापान ..गुबगुबीत सुब्या ,

आपल्या जाडजूड ..काळ्याभोर ..नव्या कोर्या मिशाना घेवून आमच्या घरी आलाय .......

सुब्या आज भलताच भारदस्त दिसत होतात ..आमच्याकडच्या बाकीच्या मंडळीनी पहिल्यांदाच त्याला

आज पाहिलं होत .सगळ्यांनी "जावई मस्त आहे अगदी "...

अस म्हटल्यावर आईच्या आणि पप्पांच्या चेहेर्यावर भलताच आनंद दिसला मला.

पण झाल काय कि, .......साखरपुडा उरकला ..आणि माझ्या मैत्रिणी आमच्या जवळ आल्या ...त्यातली एक हळूच

माझ्या कानात म्हणाली ..इतक हळू कि जे सुब्याला पण ऐकू जाईल आणि म्हणायला मी हळूच तर बोलली ..

अश्या पद्धतीतल हळू होत ते .......तर ती म्हणाली " मने कुठून शोधलास ग ह्याला .. भारीच दिसतोय एकदम ...

पण ......पण ह्या मिश्या ...त्या नसत्या ना ...तर एकदम ..सुभोध भावेच बघ ......आं ...काय ?..तुला काय वाटत

?........बघ कि एकदा काढायला सांगून .".

झाल.... सुब्याने हळूच बोललेलं तीच हे वाक्य ..हळूच ऐकल ...घाबरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत पुन्हा

एकदा सुब्याने आपली प्रिय मिशी आपल्या उजव्या हाताने कुरवाळली .

.............

*************************THE END **************************

कला

प्रतिक्रिया

वपाडाव's picture

13 Feb 2012 - 9:47 pm | वपाडाव

साखरपुड्यापर्यंत इतकं काही झालंय... लग्नापर्यंत काय-काय मागण्या केल्यात... अन दाद्यासोबत किती पैजा जिंकल्यात...

पैलेच प्रयत्न मे फोड दिया है एकदम... वेल्कम टु मिपा म्याडम...

पक पक पक's picture

13 Feb 2012 - 9:48 pm | पक पक पक

मस्त!! :)

प्रास's picture

13 Feb 2012 - 9:52 pm | प्रास

मिसळपाव संकेतस्थळावर स्वागत आहे.

तेवढी ती मधली टिंब टिंब (....) कमी करता आली तर बघा ब्वॉ पुढच्या वेळेला.

बाकी लेख आधी वाचला होता तेव्हा जेवढा फर्मास वाटला तेवढाच आत्ताही वाटला.

पुनःप्रत्ययाचा आनंद यालाच म्हणतात बहुतेक. :-)

तो तेवढा सुब्याचा फोटो दिला असतात तर..... जास्त मजा आली असती नै? ;-)

पैसा's picture

13 Feb 2012 - 9:53 pm | पैसा

मस्त खुसखुशीत लेख! छान! आणि मिपावर स्वागत. असंच ताजंतवानं आणखी लिहा.

अन्या दातार's picture

13 Feb 2012 - 10:01 pm | अन्या दातार

छान लेखन.

५० फक्त's picture

13 Feb 2012 - 10:07 pm | ५० फक्त

साधं सोपं सरळ छान वाटलं, लग्नाआधीचे दिवस हा एक वेगळा लेखनप्रकार आहे.

अवांतर - विवेक खोत, आर्या आंबेकर वैग्रे वैग्रे आठवले नाही तर पक्का मिपाकर कसला ?

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Feb 2012 - 10:15 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम! भन्नाट! एकदमच आवडलेलं आहे लेखन! हे असं नेहमी लिहा बरं का!

=))

अवांतरः आम्हाला आमच्या चुचुताईंच्या वरसंशोधनाची आठवण आली!!! :ड

चेतनकुलकर्णी_85's picture

13 Feb 2012 - 10:19 pm | चेतनकुलकर्णी_85

......फोटोत तर एकदम तमिळ ..तेलगु ..कन्नड पिच्चर चा हिरो वाटत होता

......चेहेर्याने नाजूक वाटला

दोन्ही गोष्टी कश्या शक्य आहेत???

जेनी...'s picture

13 Feb 2012 - 10:27 pm | जेनी...

अहो चेतन राव ..सुब्या चेहेर्याने नाजूकच वाटला ..पण मिश्या त्या कन्नड चित्रपटाच्या हिरोसार्ख्या ठेवल्या होत्या
तेच तर शोभत न्हवत त्याला ..नाजूक चेहेर्याच्या माणसाने जाड जाड मिश्या ठेवू नयेत ..अस म्हणायचय

स्माय्लि कश्य ताकायच्या इथे ..सान्गाल का कुनि?

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Feb 2012 - 10:31 pm | बिपिन कार्यकर्ते

स्मायली ... : + ) = :) ... ; + ) = ;) .... : + D = :D ... वगैरे नेहमीचंच हो!

जेनी...'s picture

13 Feb 2012 - 10:29 pm | जेनी...

सगळ्याना मनापासून धन्यवाद ..!!

चेतनकुलकर्णी_85's picture

13 Feb 2012 - 10:31 pm | चेतनकुलकर्णी_85

धन्यवाद... :)

पक पक पक's picture

13 Feb 2012 - 10:34 pm | पक पक पक

http://www.misalpav.com/filter/tips/1#filter-smileys-0

हे अस्स हेच्यात बघुन टाकायच... :)

जेनी...'s picture

13 Feb 2012 - 10:42 pm | जेनी...

हाय्ला भारिये ;-)

स्वाती२'s picture

13 Feb 2012 - 10:58 pm | स्वाती२

लै भारी!

मजेदार लेखन.
आधी चुचुतैची आठवण आली.
नंतर गोलमाल शिनेमा नं १ आठवत राहिला.

चिंतामणी's picture

13 Feb 2012 - 11:39 pm | चिंतामणी

एका दमात कथा पुर्ण केल्याने अजून आनंद झाला.

पहील्याच चेंडुवर जोरदार फटका मारला आहे.

मिपावर स्वागत. Skype Emoticons

अत्रुप्त आत्मा's picture

14 Feb 2012 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा

वेलकम टू दी शो... मस्त जमलय एकदम... :-)

सूड's picture

14 Feb 2012 - 12:20 am | सूड

मस्तच लिहीलंय !!

पिंगू's picture

14 Feb 2012 - 2:59 am | पिंगू

पूजा, मुपीवरुन मिपावर आल्याबद्दल स्वागत. बाकी कथा यापूर्वी वाचली आहे आणि छान आहे त्यात शंका नाहीच.

- (अदृश्य मुपीकर) पिंगू

मस्त जमुन आलाय लेख :)
पु.ले.शु. :)

तुषार काळभोर's picture

14 Feb 2012 - 10:38 am | तुषार काळभोर

पहिल्या मॅच मध्ये सेन्चुरी!!
ती पण सचिन, राहूल आणि लक्ष्मणच्या कंबाईन्ड स्टाईलनं!!
वा, वा, वा! एकदम मस्तच!!

सोत्रि's picture

14 Feb 2012 - 11:33 am | सोत्रि

खूप छान आणि एकदम फ्रेश, मजा आली वाचताना !

- (मिशीबरोबर दाढीही असलेला) सोकाजी :)

अवांतरः का कोण जाणे पण नायिकेची भाषा आणि सुब्याचं वर्णन वाचताना प्रीमो आणि हेरंब डोळ्यासमोर येत होते ;)

प्रीत-मोहर's picture

14 Feb 2012 - 12:07 pm | प्रीत-मोहर

नयिका भलतीच आवडल्या गेली आहे. पण शेवट नि आवल्डा बॉ कथेचा ;)

छोटा डॉन's picture

14 Feb 2012 - 11:38 am | छोटा डॉन

एकदम खुसखुशीत आहे कथा.
आवडली.

ह्यापुढेही असेच हलकेफुलके लेखन अपेक्षित आहे. :)

- छोटा डॉन

विजुभाऊ's picture

14 Feb 2012 - 4:24 pm | विजुभाऊ

डान्राव कल्जी घ्या.......
एखाद्या कन्येने जर इतके लांब केसवाला णवरा नको असे सांगितले तर पंचाईत व्हायची तुमची

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Feb 2012 - 5:22 pm | बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ, लेखात वाचलं नाहीत का तुम्ही? केस येतात परत! कळ्ळं? ;)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Feb 2012 - 5:29 pm | परिकथेतील राजकुमार

पण विजुभौंची केस वेगळी आहे.

:P

=))
स्वारी इजुभौ. पण या हलकट पर्‍याच्या प्रतिसादानं हसु आवरता नाही आल.

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2012 - 12:57 am | पिवळा डांबिस

स्वारी इजुभौ. पण या हलकट पर्‍याच्या प्रतिसादानं हसु आवरता नाही आल.
=))

बाकी मिपाच्या नव्या पिढीतल्या लेखिकांचं लिखाण सॉल्लिड पीळदार आहे! आपल्याला आवडलं!! (जुन्या लेखिका, प्लीज नोट!!!! )
:)

खुपच छान!! मजा आली वाचताना!! :-)

सानिकास्वप्निल's picture

14 Feb 2012 - 2:31 pm | सानिकास्वप्निल

मस्तचं जमून आलाय लेख :)

स्वातीविशु's picture

14 Feb 2012 - 3:00 pm | स्वातीविशु

नांदा मिशी सॉरी सौख्य भरे..:wink:

लेख फारच छान.:smile:

मनराव's picture

14 Feb 2012 - 3:08 pm | मनराव

झक्कास जमलाय लेख...........

मोहनराव's picture

14 Feb 2012 - 3:25 pm | मोहनराव

छान छान! लेख भारी झालाय!

प्रश्नचिन्हाचं लॉलीपॉप.. :)

.....

हलकंफुलकं... खुसखुशीत.. आवडलं.

येऊदे आणखी..

अमोल केळकर's picture

14 Feb 2012 - 5:19 pm | अमोल केळकर

मस्त लेख :)

अमोल केळकर

परिकथेतील राजकुमार's picture

14 Feb 2012 - 5:22 pm | परिकथेतील राजकुमार

सुंदर लिखाण गो.

असेच लिहित रहा आता.

बाकी मिपावर स्वागत वैग्रे वैग्रे ...

इरसाल's picture

14 Feb 2012 - 6:07 pm | इरसाल

सुब्याच्या मिश्या आवडल्या...............

मिशीधारी (इरसाल)

राजघराणं's picture

14 Feb 2012 - 6:07 pm | राजघराणं

सुंदर लिखाण

वाह!! पदार्पणातच शेंचुरी की काय?

'एका लग्नाची झक्कास गोष्ट' आवडली. :)

किसन शिंदे's picture

14 Feb 2012 - 8:07 pm | किसन शिंदे

मस्त झालाय "सुब्याच्या मिशीचा” लेख. :)

मिसळपाववर आपले स्वागत!

प्राजक्ता पवार's picture

14 Feb 2012 - 9:46 pm | प्राजक्ता पवार

मस्तं :)

हा हा हा
एकदम खुसखुशीत हलकफुलक लेखन

मन१'s picture

14 Feb 2012 - 11:06 pm | मन१

मस्त. सुंदर.खुसखुशीत.
संपूर्ण लिखाणात निरागसतेची उमटलेली झाक,टवटवी अधिकच आवडली.

आम्ही तर बुवा अजून पहिल्या धारेच्या ज्या ताज्या ताज्या मिशा येतात ना दहावी-बारावीला त्याही अजून काढलेल्या नाहित. तश्शाच ठेवल्यात; पण मग मिशीवाला म्हणून नेहमी माय्नॉरिटित गेल्यासारखं होतं, किम्वा ऑड मॅन आउट झाल्यासारखं ह्या आयटीवाल्यामध्ये.

सिल्किश मऊसूत मिशीवाला

मृगनयनी's picture

15 Feb 2012 - 10:29 am | मृगनयनी

पूजा'जी.. छान लेख!!.. शेवटपर्यन्त वाचावासा वाटला!!! :)

पण ......पण ह्या मिश्या ...त्या नसत्या ना ...तर एकदम ..सुभोध भावेच बघ

हे वाक्य सगळ्यांत जास्त आवडलं! "सुबोध भावे"---Killing Handsome!!!

सुब्या वेड्स मनू... हाउ स्वीट!! :)

हायला ..मला जाम आवडतो सुबोध भावे ..किल्लिंग म्हणजे काय सॉलिड किल्लिन्ग.;);)

मृगनयनी's picture

17 Feb 2012 - 10:25 pm | मृगनयनी

पूजा.... आत्ताच्च घरी 'झी मराठी' वरती "मधली सुट्टी" सुरु झालंय...
'सुबोध भावे'..... त्याच्या लहानपणीच्या आठवणी.... सगळ्या गोष्टी शेअर करतोये... त्याची शाळा..त्याचे बालपणीचे मित्र, टीचर्स...सगळे एकत्र जमून मस्त बालपणीच्या आठवणींना उजाळा देत आहेत... 'सलील कुलकर्णी' होस्टिन्ग करतोये.... (सलील'चा आवाज लय भारी आहेच्च.. पण कधीकधी त्याच्या मानेच्या ठेवणीमुळे आणि एकन्दर लुक'मुळे सलीलकडे पाहिल्यावर - लालबहादूर शास्त्रींची आठवण येते.. ;) ) .. बस्स.. एका टोपीची कमी आहे!! ;) ;)

आणि सुबोध भावे.... कसला दिस्तोये!!... त्याने चक्क मिश्या वाढवल्यायेत... कपाळाला टिळा वगैरे लावलाये.. लय म्हणजे लय भारी दिसतोये... तो!...जबराट्ट!!!!! . त्याला पाहून मला एकदम या "सुब्याच्या मिश्या" आठवल्या... म्हणून ही इन्स्टन्ट प्रतिक्रिया!!!! ;)

;) ;) ;)

जेनी...'s picture

17 Feb 2012 - 10:34 pm | जेनी...

सोलिड ग ..मि ट्राय करते बघन्याचा .. ओन लायिन बघावा लागेल मला ...भारतिय च्यनेल्स माझ्यकडे नाहित ..:(

" सुब्याचा " ( सुबोध भावेचा )तो मिश्यावाला आणि टिळावाला फोटु हाय माझ्याकडे ;)

मी नक्कि प्रयत्न करते बघन्याचा ....." सुब्याकेलिये ......कुछ भी :party:

हायला! सुबोध भावे इतका आवडू शकतो?;)
अगं पोरींनो माझ्या मंडळात नावं नोंदवा, तुम्हाला सुब्यासारखा जोडीदार मिळवून देऊ.;)

sneharani's picture

15 Feb 2012 - 10:35 am | sneharani

मस्त लेख! मजा आली वाचायला!
येऊ दे अजून लिखाण!
:)

मेघवेडा's picture

15 Feb 2012 - 3:03 pm | मेघवेडा

छान! पूर्णविरामांची मात्रा जरा कमी केल्यास नक्की गुण येईल! ;)

Pearl's picture

16 Feb 2012 - 7:38 pm | Pearl

मस्त लेख. छान जमून आला आहे :)
पु.ले.शु.

तर्री's picture

17 Feb 2012 - 10:56 pm | तर्री

एकदम जमून गेला आहे.
पु.ले.शु.

निशदे's picture

17 Feb 2012 - 11:14 pm | निशदे

मस्त जमले आहे.........एकदम झकास flow आहे........
:)

RUPALI POYEKAR's picture

18 Feb 2012 - 1:56 pm | RUPALI POYEKAR

मस्तच जमलाय लेख

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Feb 2012 - 6:24 am | निनाद मुक्काम प...

खमंग, खुसखुशीत दिवाळीच्या फराळासारखी ही गोष्ट जमली आहे.
पु ले शु

=)) कित्ती दिवसांन्नी वाचलं .....

आयला बालिके तू अजून आहेस होय इथे? =))

सत्य धर्म's picture

30 Nov 2015 - 11:56 am | सत्य धर्म

जुन्या आठवणी जाग्या झाल्या.....
माझ्या मिशा मी एकदा काढल्या होत्या वडील आठ दिवस बोलत नव्हते.
ती आठवण आज ताजी झाली.

पद्मावति's picture

30 Nov 2015 - 1:35 pm | पद्मावति

ही ही ही....आई गं, हसून हसून पोट दुखतंय..
मस्तं, मस्तं, मस्तं....

विजुभाऊ's picture

30 Nov 2015 - 7:04 pm | विजुभाऊ

व्वा..
परत एकदा मस्त खुसखुषीत वाचायला मिळाले.
जेनी बै. ल्हित्या व्हा पुन्हा एक डाव

अभय म्हात्रे's picture

1 Dec 2015 - 9:26 am | अभय म्हात्रे

मस्त खुसखुशीत लेख!

विजुभाऊ's picture

21 Feb 2016 - 10:44 pm | विजुभाऊ

पूजा
परत असले कधी लिहिणार?

वाचमन's picture

22 Feb 2016 - 1:59 am | वाचमन

भारी आहे लेख!!पन अगोदर कुठेतरी वाचल्यागत वाटला.